दवबिंदुंचा आरसा झाला...

Submitted by शापित गंधर्व on 9 April, 2012 - 10:02

एक कळी ती गोजीरवाणी
शांत होती झोपलेली
सुर्यकिरण हे तिज स्पर्शीता
लाज लाजुनी ती मोहरली

स्वैर डोलली वार्‍यासवे अन
प्रेम गंधात भिजुनी गेली
सुगंधले मग अंग अंग
सौंदर्याने फुलुनी गेली

रंग ल्याली अनेक कांती
तारुण्याचा बहर आला
रुप दावण्या तिला तिचे मग
दवबिंदुंचा आरसा झाला..
.

प्रचि १ :
प्रचि २ :
प्रचि ३ :
प्रचि ४ :
प्रचि ५ :
प्रचि ६ :
प्रचि ७ :
प्रचि ८ :
प्रचि ९ :
प्रचि १० :

मॅक्रो फोटोग्राफीचा हा माझा पहिलाच प्रयत्न. मॅक्रो लेन्स खुपच महाग असतात. अर्थातच माझ्या मध्यमवर्गीय खिश्याला त्या परवडणार्‍या नाहीत. स्वस्तातला पर्याय म्हणुन रीव्हर्स लेन्स (या प्रकारात लेन्स कॅमेरावर उलटी बसवतात जेणे करु ज्या वस्तुचा फोटो काढायचा आहे ती थोडी मोठी दिसेल) ट्राय करुन बघितली पण त्याने हवा तसा परीणाम साधला गेला नाही. मग कोणितरी सुचवलं की क्लोज-अप फिल्टर वापरुन बघ. एका वर एक फिल्टर वापरल्याने इमेज क्वालिटीत फरक पडतो. विशेषता शार्पनेस ची पार वाट लागते. अगदी मॅक्रो लेन्स सारखे क्लिअर नाही पण बर्‍यापैकी चांगले आले फोटो.
तुम्हाला काय वाटत?

तळटिप:- वरील कविता मायबोलीकर प्रियांका फडणीस(प्रिया.) यांची आहे. त्यांचे आभार मानुन मी मैत्रिच्या नात्याचा अपमान करणार नाही, पण एक जरुर सांगेन की प्रकाशचित्रांचा कंन्सेप्ट सांगितल्यावर त्यांनी अवघ्या ४ तासात कविता करुन पाठवली Happy

गुलमोहर: 

अफाट आहेत हे फोटो.......
फोटोशॉप केलेत का काही शागं?????

गंधर्वा तुझे फोटो अप्रतीमच(आणि आयड्यापण!!!) आणि प्रियाची कविताही!

शागं, बेफाम सुंदर ! इतके अप्रतिम आहेत सगळेच फोटोज. प्रचि १० तर अफलातुन. काल रात्री प्रिया मॅडमकडुन मला या धाग्यावर पाठवण्यात आलं तेव्हाची माझी हालत माहित आहे ना. Happy मला झोपेमुळे एक वाक्य टायपता येत नव्ह्तं. पण ही चित्रं बघुन झोपल्यावर, रात्रभर मला फुलांचीच स्वप्न पडली. सलाम तुझ्या कल्पकतेला, प्रयोगाला आणि कलेला.

प्रिया, कविता पण जमलीच. प्रचिमुळे कविता आणि कवितेमुळे प्रचि उठावदार झाले आहेत.

हे सही आहे...कविता आणि फोटो....:)
मला कवितेतलं फार कळत नाही पण फोटो अप्रतिम्....आणि फोटोग्राफीचं जे छोटंसं लिहिलंय तेही मस्त...:)

सॉल्लीड आलेत रे फोटो. मुळात तुझ्या नजरेला आणि हौसेला दाद द्यायला हवी. द. आफ्रिकेचे फोटो पण उगाच इतके सुंदर नाही आले हे आता लक्षात आलं. जियो !

शप्पथ्थ ! _____/\_____ Happy
इतके सुंदर फोटो मी पहिल्यांदा बघतेय ! खरच ! अरे पण तू इथे काय करतोयस ? तू सरळ उठ आणि फोटोग्राफीत उतर ! अन ती हवी ती लेन्स घेच बाबा !
अन हो असे फोटो टाकताना ते कॉपी होऊ नयेत म्हणून योग्य ती काळजी घे बाबा ! ते तू टाकलेले वॉमा. कोणीही क्रॉप करतील....
प्रिय कविता अप्रतिम, चपखल Happy

परत एकदा सगळ्यांचे मनापासुन आभार Happy

फोटोशॉप केलेत का काही शागं?????>>> अजिबात नाही रे. या वेळी तर फोटोंना बोर्डर पण पिकासा मधेच दिली आहे Happy

अन हो असे फोटो टाकताना ते कॉपी होऊ नयेत म्हणून योग्य ती काळजी घे बाबा ! ते तू टाकलेले वॉमा. कोणीही क्रॉप करतील....>>> कल्पना आहे मला त्याची. कोणि कुठेही, अगदी कमर्शियल परपज साठी जरी मी काढलेले फोटो चोरुन वापरले तरी मला त्याचा राग येणार नाही. मला माझ्या निर्मीती चा अभिमान आहे, वृथा गर्व नाही. निर्मीतीचा आनंद मी मिळवलाच आहे. आता कोणितरी ते फोटो वापरुन काही मिळवायचा प्रयत्न करत असेल तर त्यातही मला आनंदच आहे Happy

क्या बात है!!! अतिसुंदर फोटोज...
कोणत्या नंबरचा जास्त आवडला????.... अजिबात सांगता येणार नाहीत मला..सगळेच खूऊऊऊप आवडले..
तुझे फोटोच शब्दांचे रूप घेऊन कविता होऊन गेलेत...

अतिशय सुंदर फोटो आणि कविताही सुंदर, दवबिंदूंचा आरसा.... झकास.
क्लोझ अप साठी, एक्स्टेंशन रींग वापरुन पहा, फार महाग ही नसतात.
ह्या लिंक पहा.

http://www.youtube.com/watch?v=Q05CkwKOQHs

http://www.neilcreek.com/2007/11/10/about-macro-extension-tubes-p365-nov03/

http://www.bhphotovideo.com/c/product/300603-REG/Canon_9199A001_Extensio...
हि अर्थातच महाग असणार,

<<फोटोशॉप केलेत का काही शागं?????>>> अजिबात नाही रे. या वेळी तर फोटोंना बोर्डर पण पिकासा मधेच दिली आहे >> मग तर सलामच तुला........ अशक्य भारी आहेत हे फोटो.....

व्वा! फोटो आणि कल्पना दोन्ही खूपच मस्त. Happy
प्रिया, कविता पण सुरेखच. दोन्ही 'एक दुजे के लिये' Lol
अन हो असे फोटो टाकताना ते कॉपी होऊ नयेत म्हणून योग्य ती काळजी घे बाबा ! ते तू टाकलेले वॉमा. कोणीही क्रॉप करतील....>>> कल्पना आहे मला त्याची. कोणि कुठेही, अगदी कमर्शियल परपज साठी जरी मी काढलेले फोटो चोरुन वापरले तरी मला त्याचा राग येणार नाही. मला माझ्या निर्मीती चा अभिमान आहे, वृथा गर्व नाही. निर्मीतीचा आनंद मी मिळवलाच आहे. आता कोणितरी ते फोटो वापरुन काही मिळवायचा प्रयत्न करत असेल तर त्यातही मला आनंदच आहे स्मित>>>>>>>>>>>>>>>व्वा! शां.ग. तुमचा हा दृष्टीकोन मला फार आवडला. Happy

Pages