एक कळी ती गोजीरवाणी
शांत होती झोपलेली
सुर्यकिरण हे तिज स्पर्शीता
लाज लाजुनी ती मोहरली
स्वैर डोलली वार्यासवे अन
प्रेम गंधात भिजुनी गेली
सुगंधले मग अंग अंग
सौंदर्याने फुलुनी गेली
रंग ल्याली अनेक कांती
तारुण्याचा बहर आला
रुप दावण्या तिला तिचे मग
दवबिंदुंचा आरसा झाला...
प्रचि १ :प्रचि २ :
प्रचि ३ :
प्रचि ४ :
प्रचि ५ :
प्रचि ६ :
प्रचि ७ :
प्रचि ८ :
प्रचि ९ :
प्रचि १० :
मॅक्रो फोटोग्राफीचा हा माझा पहिलाच प्रयत्न. मॅक्रो लेन्स खुपच महाग असतात. अर्थातच माझ्या मध्यमवर्गीय खिश्याला त्या परवडणार्या नाहीत. स्वस्तातला पर्याय म्हणुन रीव्हर्स लेन्स (या प्रकारात लेन्स कॅमेरावर उलटी बसवतात जेणे करु ज्या वस्तुचा फोटो काढायचा आहे ती थोडी मोठी दिसेल) ट्राय करुन बघितली पण त्याने हवा तसा परीणाम साधला गेला नाही. मग कोणितरी सुचवलं की क्लोज-अप फिल्टर वापरुन बघ. एका वर एक फिल्टर वापरल्याने इमेज क्वालिटीत फरक पडतो. विशेषता शार्पनेस ची पार वाट लागते. अगदी मॅक्रो लेन्स सारखे क्लिअर नाही पण बर्यापैकी चांगले आले फोटो.
तुम्हाला काय वाटत?
तळटिप:- वरील कविता मायबोलीकर प्रियांका फडणीस(प्रिया.) यांची आहे. त्यांचे आभार मानुन मी मैत्रिच्या नात्याचा अपमान करणार नाही, पण एक जरुर सांगेन की प्रकाशचित्रांचा कंन्सेप्ट सांगितल्यावर त्यांनी अवघ्या ४ तासात कविता करुन पाठवली
सुंदर फोटो. ५ आणि ७ खुपच
सुंदर फोटो.
५ आणि ७ खुपच आवडले.
खुपच सुंदर
खुपच सुंदर
अतिशय अतिशय सुंदर प्रचि आणि
अतिशय अतिशय सुंदर प्रचि आणि कविता !!!
गंधर्वा... मस्तं फोटोज
गंधर्वा... मस्तं फोटोज रे............ आवडले...
प्रिया.. कविता छानच
सुंदर प्रयत्न
सुंदर प्रयत्न
सुंदर फोटो. रेनॉक्स डी.सी.आर
सुंदर फोटो.
रेनॉक्स डी.सी.आर १५० आणि २५० एकावर एक स्टॅक करून मॅक्रो मारून बघा.
वॉव........... कसले भन्नाट
वॉव........... कसले भन्नाट फोटो आहेत..... !!
खूप खूप सुंदर
खूप खूप सुंदर
मस्त आहेत शा.ग ..खुपच सुंदर
मस्त आहेत शा.ग ..खुपच सुंदर
कल्पना आणि फोटो दोन्ही
कल्पना आणि फोटो दोन्ही सुंदरच.....!!!!
फोटो जास्त सुरेख कि कविता
फोटो जास्त सुरेख कि कविता सध्या या संभ्रमात आहे
सबको धन्स
सबको धन्स
सुपर्ब फोटोज!!!!! मलाही असंच
सुपर्ब फोटोज!!!!!
मलाही असंच काहितरी शिकायचंय
स्वस्तातला पर्याय म्हणुन रीव्हर्स लेन्स (या प्रकारात लेन्स कॅमेरावर उलटी बसवतात जेणे करु ज्या वस्तुचा फोटो काढायचा आहे ती थोडी मोठी दिसेल)>>>>अगदी हेच मला मार्को पोलोनेही सांगितले होते, पण ट्राय करून नाही पाहिले.
फारच छान फोटो
फारच छान फोटो
अफलातुन प्रचि आहेत.
अफलातुन प्रचि आहेत. अप्रतिम!
प्रियाची कविता ही साजेशीच!
अप्रतिम चित्रे व समर्पक कविता
अप्रतिम चित्रे व समर्पक कविता
अप्रतिम.
अप्रतिम.
एकापे़क्षा एक सरस फोटोज आहेत
एकापे़क्षा एक सरस फोटोज आहेत हे धिरज, सुंदरच
अप्रतिम..
अप्रतिम..
सुरेख..!! फोटो कविता
सुरेख..!! फोटो कविता दोन्ही..
गंधर्वा, रसिक आहेस..!!
सुंदर आशयघन कविता व त्याला
सुंदर आशयघन कविता व त्याला अनुरुप प्र.चि.
मस्त्च
मस्त्च
सही.
सही.
सुरेख !!! लाजवाब
सुरेख !!! लाजवाब कविता......
मस्त प्रचि.
सह्ही रे शागं आणि प्रिया.
सह्ही रे शागं आणि प्रिया. बढीया!!
म्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्सस्स्
म्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्सस्स्स्स्स्स्स्स्स्त!!!!!!!!!!
सह्ही!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
सह्ही!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
निव्वळ अप्रतिम
प्रचि आणि कविता दोन्ही
प्रचि आणि कविता दोन्ही सुपर्ब. क्लासच.
सगळ्यांचे मनापासुन आभार
सगळ्यांचे मनापासुन आभार ____/|\____
प्रिया, तुझी कविता एकदम हिट
काही आठवड्यांपुर्वी लोकप्रभात अशा फोटोंवर लेख होता. पण अगदी खरं सांगायचे तर त्या लेखातल्या
फोटोंपेक्षा हे जास्त सुंदर आहेत.>>> दिनेशदा, शक्य असेल तर लोकप्रभातल्या त्या लेखाची लिंक द्या. काही टिप्स मिळाल्यातर तेव्हडीच ज्ञानात भर पडेल.
गंधर्वा - तू नक्कीच शापित असणार - पण तुला इंद्रलोकातून पृथ्वीतलावर पाठवायचे कारण मात्र कळत नाहीये........>>> कारण असं चार चौघात सांगण्या सारख नाहिये, कधी भेटलोच प्रत्यक्षात तर सांगेन तुम्हाला
रेनॉक्स डी.सी.आर १५० आणि २५० एकावर एक स्टॅक करून मॅक्रो मारून बघा.>>> माझ्या कडे १८/५५ आणि ७०/३०० लेन्स आहेत त्या ट्राय करुन बघितल्या पण मनासारखे फोटो आले नाहित. काही टिप्स असतिल तर नक्की कळवा, परत प्रयत्न करुन बघतो.
मलाही असंच काहितरी शिकायचंय>>> जिप्सी, मित्रा तु माझा गुरु आहेस या क्षेत्रातला आणि तुच असं म्हणतोस???
भारिच..
भारिच..
Pages