दवबिंदुंचा आरसा झाला...

Submitted by शापित गंधर्व on 9 April, 2012 - 10:02

एक कळी ती गोजीरवाणी
शांत होती झोपलेली
सुर्यकिरण हे तिज स्पर्शीता
लाज लाजुनी ती मोहरली

स्वैर डोलली वार्‍यासवे अन
प्रेम गंधात भिजुनी गेली
सुगंधले मग अंग अंग
सौंदर्याने फुलुनी गेली

रंग ल्याली अनेक कांती
तारुण्याचा बहर आला
रुप दावण्या तिला तिचे मग
दवबिंदुंचा आरसा झाला..
.

प्रचि १ :
प्रचि २ :
प्रचि ३ :
प्रचि ४ :
प्रचि ५ :
प्रचि ६ :
प्रचि ७ :
प्रचि ८ :
प्रचि ९ :
प्रचि १० :

मॅक्रो फोटोग्राफीचा हा माझा पहिलाच प्रयत्न. मॅक्रो लेन्स खुपच महाग असतात. अर्थातच माझ्या मध्यमवर्गीय खिश्याला त्या परवडणार्‍या नाहीत. स्वस्तातला पर्याय म्हणुन रीव्हर्स लेन्स (या प्रकारात लेन्स कॅमेरावर उलटी बसवतात जेणे करु ज्या वस्तुचा फोटो काढायचा आहे ती थोडी मोठी दिसेल) ट्राय करुन बघितली पण त्याने हवा तसा परीणाम साधला गेला नाही. मग कोणितरी सुचवलं की क्लोज-अप फिल्टर वापरुन बघ. एका वर एक फिल्टर वापरल्याने इमेज क्वालिटीत फरक पडतो. विशेषता शार्पनेस ची पार वाट लागते. अगदी मॅक्रो लेन्स सारखे क्लिअर नाही पण बर्‍यापैकी चांगले आले फोटो.
तुम्हाला काय वाटत?

तळटिप:- वरील कविता मायबोलीकर प्रियांका फडणीस(प्रिया.) यांची आहे. त्यांचे आभार मानुन मी मैत्रिच्या नात्याचा अपमान करणार नाही, पण एक जरुर सांगेन की प्रकाशचित्रांचा कंन्सेप्ट सांगितल्यावर त्यांनी अवघ्या ४ तासात कविता करुन पाठवली Happy

गुलमोहर: 

चाफ्या कविता तशी मी २ मिनिटात लिहिली
पण उगाच (काल जसा सेलिब्रिटींनी शिकवला तसा) उशीर लावला
यु नो व्हॉट आय मीन
है ना?
Proud

त्यांनी अवघ्या ४ तासात कविता करुन पाठवली >>>>> तरी बराSच उशीर केला रे>>>> कविता, भारत ते द. अफ्रिका पोहोचायला इतका वेळ लागणारच रे Wink

अप्रतिम फोटो आहेत्.
काही आठवड्यांपुर्वी लोकप्रभात अशा फोटोंवर लेख होता. पण अगदी खरं सांगायचे तर त्या लेखातल्या
फोटोंपेक्षा हे जास्त सुंदर आहेत.

कविता छान..

प्रचि अतोनात सुंदर आहेत... सगळेच... प्रचि ३ मधे फुल आणि दवबिंदु असे काही अ‍ॅड्जस्ट झाले आहेत की संपुर्ण चित्र बघितलं तर टेडी बिअर असल्यासारखं वाटत आहे मला.. Happy

एकदा माय्क्रोस्कोपखाली मच्छर बघताना खिडकी बाहेरील कन्हेरीचं झाड दिसलं होतं माय्क्रोस्कोपमधे, ते आठवलं...

कविता आणि फोटो दोन्ही अप्रतिम. पहीलाच प्रयत्न इतका झकास जमला आहे की प्रोफेशनल झक मारतील.

गंधर्वा - तू नक्कीच शापित असणार - पण तुला इंद्रलोकातून पृथ्वीतलावर पाठवायचे कारण मात्र कळत नाहीये........

काय अप्रतिम फोटो काढलेस मित्रा - फोटोंची कल्पनाही सुंदर व फोटो आलेतही सुंदर.......

प्रियाची कविताही सुरेखच..........

Pages