साहित्य : कुठलीही आवडती पण इन्स्टंट कॉफी दोन चमचे, साखर अडीच चमचे, दूध एक मोठा कप, (अर्धा दूध अर्धे पाणी घेतले तरी चालेल. पण त्यापेक्षा अधिक पाणी मात्र नको}
कृती : एका कपात इन्स्टंट कोफी व साखर घ्यावी व त्यात अर्धा चमचा पाणी घालून घोटायला सुरुवात करावी. न कंटाळता साधारण चार मिनिटे घोटले की मिश्रणाचा रंग बदलण्यास सुरुवात होईल. चॉकलेटीपासून पांढरट होऊ लागेल. तसेच आणखी घोटत रहावे. साखर पूर्ण विरघळू द्यावी व हात दुखू द्यावेत.
हात मनसोक्त दुखल्यावर मिश्रण खूप पांढरट क्रीम कलरचे झालेले असेल.
आता त्यावर कढत कढत दूध किंवा दूध्-पाणी ओतावे. थोडे उंचावरून ओतल्यास फेसही मस्त येईल.
आता थोडेसे ढवळून आस्वाद घ्यावा.
नेहमीचीच कॉफी पण चव मात्र वेगळी. स्वर्गीय म्हणावी अशी. रंग माझा वेगळा म्हणणारी. दिसायला कॉफी रंगाची नव्हे तर कृष्ण व सोनेरी रंगाचे मिश्रण. म्हणूनही 'कांचमकुंद' कॉफी.
वा लोला सही फोटो. . (लोला
वा लोला सही फोटो. :). (लोला इथेय होय, आणि मी बेकरीत वाट बघत होते.)
लोला मस्तच फोटो.... हे शुगर
लोला मस्तच फोटो....:)
हे शुगर फ्री वापरुनही असच होईल का?
मी पण करून प्यायली. सही झाली
मी पण करून प्यायली. सही झाली होती
कॉफीत चिमूटभर दालचिनीची पूड
कॉफीत चिमूटभर दालचिनीची पूड घालून कुणालाच प्याविशी वाटत नाही का? कस्सली सही लागते... !!
लोला, मस्त! लले कधीतरी
लोला, मस्त!
लले
कधीतरी एखाद थेंब व्हॅनीला इसेन्स/एक्स्ट्रॅक्ट/ घालुन पहा किंवा हेझलनट सिरप
महान कॉफी होते या प्रकाराने.
महान कॉफी होते या प्रकाराने. प्रद्युम्न इथे सांगितल्याबद्दल धन्यवाद.
माझ्या सारख्या आळशी लोकांकरता एक टिपः एलेक्ट्रीक एग बिटर वापरून कष्ट बरेच कमी होतात. ९०% चव येते.
काल रविवार सकाळचे निमित्त
काल रविवार सकाळचे निमित्त साधून मी केली होती अशी कॉफी. नेटाने ५ मिनिटं घोटत बसले होते. पण अप्रतिम चव आली होती
कातिल फोटो...
कातिल फोटो...
पंधरा मिनिटे फेटली अस्ती तर
पंधरा मिनिटे फेटली अस्ती तर स्वर्गीय चव आली असती व अगदी तिथेच असल्यासारखे वाटले असते पण मग तिथून खाली यायला वेळ गेला असता.
ह. घ्या.
ही कॉफी कधीच केली नाहिये.
ही कॉफी कधीच केली नाहिये. लोलाचाचा फोटो अमानुष आहे. अत्यंत दमलेले असतानाही ही कॉफी लगेच करुन पहावी असे वाटायला लावणारा. एक सांगा, फक्त अर्धा चमचा पाणी कमी नाही का? पुरते पाक व्हायला? चहाचा चमचा की टेबलस्पुन? उत्तरे द्या नाहीतर कॉफी चांगली होणार नाही तुमची.
सुनिधी, चहाचा चमचा. मागच्या
सुनिधी, चहाचा चमचा. मागच्या पानावर झंपीने 'बोल्ड' लिहिले आहे ते वाचले नाहीस काय? पाणी जास्त घातलेस तर जामोप्या होऊन कपड्यावर डाग पडेल.
(No subject)
अरे यार लोला, झंपी ची भिती
अरे यार लोला, झंपी ची भिती वाटते, म्हणुन तिची पोस्ट न वाचता घाईघाईत पुढे गेले...
जामोप्यासाठी ... खिखि..
घ्या ... झंपी आता तुझे नांव
घ्या ... झंपी आता तुझे नांव टेरर घे . लोकं घाबरायला लागली तुला .
लोलाचा फोटो खत्तरनाक आहे . मला ह्यात आमच्याकडे मिळतात ते वेगवेगळे फ्लेवर्स घालून केलेली कॉफी सुद्धा आवडते .
पुण्याला शिकायला असताना
पुण्याला शिकायला असताना चाखलिय चव याची..मी अजिबात कॉफी फॅन नाही पण माझि रुममेट जबरी बनवायची हा प्रकार.
पाणी चुकुन जरी जास्त झाले तर प्रकरण गंडते..
जबरी.. होस्टेलच्या कैक आठवणी
जबरी.. होस्टेलच्या कैक आठवणी जाग्या झाल्या ह्या कॉफीने. रात्री अभ्यासाला बसायच्या आधी आमचा हा कार्यक्रम असायचा. कॉफी करायला तास दोन तास आणि त्यानंतर अभ्यास फार तर अर्धा तास असे चालायचे.
तेव्हाच्या बर्याच रात्री जिव्हाळ्याच्या गप्पा मारत मारत अशी कॉफी तास दिड तास घोटत घालवल्या आहेत. माझी एक मैत्रीण खूप सही करायची ही कॉफी.
अहाहा.... करायलाच हवी आता.
केली ...पिली.. निव्वळ
केली ...पिली.. निव्वळ अप्रतिम.
प्रद्युम्न, धन्यवाद
निंबुडाने म्हटल्याप्रमाणे मी
निंबुडाने म्हटल्याप्रमाणे मी पण बोर्नविटा किंवा कॉम्प्लॅन सारखी गरम दुधात साखर आणि कॉफी अॅड करुन प्यायचे. आज वेळ काढुन अशी कॉफी करुन घेतली. ऑफिसला उशीर झाला, पण रोजचीच कॉफी इतकी वेगळी लागली. उद्यापासुन सकाळच्या स्केड्युलमधे १० मिनिटं जास्त ठेवावी लागणार.
,मस्तच!!
,मस्तच!!
लोला: कॉफीला तुझ्या मस्त
लोला:
कॉफीला तुझ्या मस्त फोटोंनी चार चांद लागले. आभार.
सर्वांचे आभार.
सुनिधी:
प्राजक्ताचा प्रतिसाद लक्षात ठेवा.
'पाणी चुकुन जरी जास्त झाले तर प्रकरण गंडते..'
Pages