कांचमकुंद कॉफी

Submitted by pradyumnasantu on 6 April, 2012 - 21:34
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्य : कुठलीही आवडती पण इन्स्टंट कॉफी दोन चमचे, साखर अडीच चमचे, दूध एक मोठा कप, (अर्धा दूध अर्धे पाणी घेतले तरी चालेल. पण त्यापेक्षा अधिक पाणी मात्र नको}

क्रमवार पाककृती: 

कृती : एका कपात इन्स्टंट कोफी व साखर घ्यावी व त्यात अर्धा चमचा पाणी घालून घोटायला सुरुवात करावी. न कंटाळता साधारण चार मिनिटे घोटले की मिश्रणाचा रंग बदलण्यास सुरुवात होईल. चॉकलेटीपासून पांढरट होऊ लागेल. तसेच आणखी घोटत रहावे. साखर पूर्ण विरघळू द्यावी व हात दुखू द्यावेत.
हात मनसोक्त दुखल्यावर मिश्रण खूप पांढरट क्रीम कलरचे झालेले असेल.
आता त्यावर कढत कढत दूध किंवा दूध्-पाणी ओतावे. थोडे उंचावरून ओतल्यास फेसही मस्त येईल.
आता थोडेसे ढवळून आस्वाद घ्यावा.

वाढणी/प्रमाण: 
एक व्यक्ती
अधिक टिपा: 

नेहमीचीच कॉफी पण चव मात्र वेगळी. स्वर्गीय म्हणावी अशी. रंग माझा वेगळा म्हणणारी. दिसायला कॉफी रंगाची नव्हे तर कृष्ण व सोनेरी रंगाचे मिश्रण. म्हणूनही 'कांचमकुंद' कॉफी.

माहितीचा स्रोत: 
वहिनी: कै. कांचन मुकुंद कर्णिक
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोला, मस्त! Happy

लले Happy

कधीतरी एखाद थेंब व्हॅनीला इसेन्स/एक्स्ट्रॅक्ट/ घालुन पहा Happy किंवा हेझलनट सिरप Happy

महान कॉफी होते या प्रकाराने. प्रद्युम्न इथे सांगितल्याबद्दल धन्यवाद.

माझ्या सारख्या आळशी लोकांकरता एक टिपः एलेक्ट्रीक एग बिटर वापरून कष्ट बरेच कमी होतात. ९०% चव येते.

काल रविवार सकाळचे निमित्त साधून मी केली होती अशी कॉफी. नेटाने ५ मिनिटं घोटत बसले होते. पण अप्रतिम चव आली होती Happy

पंधरा मिनिटे फेटली अस्ती तर स्वर्गीय चव आली असती व अगदी तिथेच असल्यासारखे वाटले असते पण मग तिथून खाली यायला वेळ गेला असता. Proud

ह. घ्या.

ही कॉफी कधीच केली नाहिये. लोलाचाचा फोटो अमानुष आहे. अत्यंत दमलेले असतानाही ही कॉफी लगेच करुन पहावी असे वाटायला लावणारा. Happy एक सांगा, फक्त अर्धा चमचा पाणी कमी नाही का? पुरते पाक व्हायला? चहाचा चमचा की टेबलस्पुन? उत्तरे द्या नाहीतर कॉफी चांगली होणार नाही तुमची. Happy

सुनिधी, चहाचा चमचा. मागच्या पानावर झंपीने 'बोल्ड' लिहिले आहे ते वाचले नाहीस काय? Happy पाणी जास्त घातलेस तर जामोप्या होऊन कपड्यावर डाग पडेल.

Proud

अरे यार लोला, झंपी ची भिती वाटते, म्हणुन तिची पोस्ट न वाचता घाईघाईत पुढे गेले... Wink
जामोप्यासाठी ... खिखि..

घ्या ... झंपी आता तुझे नांव टेरर घे Wink Proud . लोकं घाबरायला लागली तुला Happy .

लोलाचा फोटो खत्तरनाक आहे Happy . मला ह्यात आमच्याकडे मिळतात ते वेगवेगळे फ्लेवर्स घालून केलेली कॉफी सुद्धा आवडते .
monin700.jpg

पुण्याला शिकायला असताना चाखलिय चव याची..मी अजिबात कॉफी फॅन नाही पण माझि रुममेट जबरी बनवायची हा प्रकार.
पाणी चुकुन जरी जास्त झाले तर प्रकरण गंडते..

जबरी.. होस्टेलच्या कैक आठवणी जाग्या झाल्या ह्या कॉफीने. रात्री अभ्यासाला बसायच्या आधी आमचा हा कार्यक्रम असायचा. कॉफी करायला तास दोन तास आणि त्यानंतर अभ्यास फार तर अर्धा तास असे चालायचे.
तेव्हाच्या बर्‍याच रात्री जिव्हाळ्याच्या गप्पा मारत मारत अशी कॉफी तास दिड तास घोटत घालवल्या आहेत. माझी एक मैत्रीण खूप सही करायची ही कॉफी.
अहाहा.... करायलाच हवी आता.

निंबुडाने म्हटल्याप्रमाणे मी पण बोर्नविटा किंवा कॉम्प्लॅन सारखी गरम दुधात साखर आणि कॉफी अ‍ॅड करुन प्यायचे. आज वेळ काढुन अशी कॉफी करुन घेतली. ऑफिसला उशीर झाला, पण रोजचीच कॉफी इतकी वेगळी लागली. उद्यापासुन सकाळच्या स्केड्युलमधे १० मिनिटं जास्त ठेवावी लागणार.

लोला:
कॉफीला तुझ्या मस्त फोटोंनी चार चांद लागले. आभार.
सर्वांचे आभार.
सुनिधी:
प्राजक्ताचा प्रतिसाद लक्षात ठेवा.
'पाणी चुकुन जरी जास्त झाले तर प्रकरण गंडते..'

Pages