कांचमकुंद कॉफी

Submitted by pradyumnasantu on 6 April, 2012 - 21:34
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्य : कुठलीही आवडती पण इन्स्टंट कॉफी दोन चमचे, साखर अडीच चमचे, दूध एक मोठा कप, (अर्धा दूध अर्धे पाणी घेतले तरी चालेल. पण त्यापेक्षा अधिक पाणी मात्र नको}

क्रमवार पाककृती: 

कृती : एका कपात इन्स्टंट कोफी व साखर घ्यावी व त्यात अर्धा चमचा पाणी घालून घोटायला सुरुवात करावी. न कंटाळता साधारण चार मिनिटे घोटले की मिश्रणाचा रंग बदलण्यास सुरुवात होईल. चॉकलेटीपासून पांढरट होऊ लागेल. तसेच आणखी घोटत रहावे. साखर पूर्ण विरघळू द्यावी व हात दुखू द्यावेत.
हात मनसोक्त दुखल्यावर मिश्रण खूप पांढरट क्रीम कलरचे झालेले असेल.
आता त्यावर कढत कढत दूध किंवा दूध्-पाणी ओतावे. थोडे उंचावरून ओतल्यास फेसही मस्त येईल.
आता थोडेसे ढवळून आस्वाद घ्यावा.

वाढणी/प्रमाण: 
एक व्यक्ती
अधिक टिपा: 

नेहमीचीच कॉफी पण चव मात्र वेगळी. स्वर्गीय म्हणावी अशी. रंग माझा वेगळा म्हणणारी. दिसायला कॉफी रंगाची नव्हे तर कृष्ण व सोनेरी रंगाचे मिश्रण. म्हणूनही 'कांचमकुंद' कॉफी.

माहितीचा स्रोत: 
वहिनी: कै. कांचन मुकुंद कर्णिक
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy
माझी व माझ्या मैत्रिणीची हीच रेस्पी कॉफीची.. गप्पा मारत फेटायला मजा येते! आणि काय अफाट लागते! उद्या करणार! Happy

बाय्दवे नाव आवडले! Happy

जास्त प्रमाणात अशी फेटलेली कॉफी करायची असेल तर... मिक्सर मधे साखर्,कॉफी पुड अगदी थोडेसे गरम पाणी-- -साखर ,कॉफी ओलसर होईल इतके--घालुन मिश्रण पांढरे होईपर्यंत फिरवुन घ्यावी.वाटल्यास अशी फेटलेली कॉफी फ्रिज मधे करुन ठेवता येते.जायफळ्-वेलची घालुन चव वाढवता येईल.

प्रद्युम्नः मस्त झाली होती कॉफी. मी नेहेमीच अशी करतो! ऑल टाईम मस्त!!!

मिक्सर पेक्शा चमच्यानी लवकर होतं. मिक्सरचे भांडं धुवायचाही त्रास नाही.
मंजूडी- हो. एक चमचा कॉफी + एक चमचा साखर पण चालेल.

ही कॉफी मी नेहेमी करते.फक्त कॉफी फेटायला पाणी थोडे थोडे घालावे.थोडे जरी जास्त झाले तर फेस येत नाही.पाणचट होते.आता उसगावातुन छोटेसे रवीसारखे सेलवर चालणारे घेतले आहे.त्यानेच फेटते.
नाव मात्र छान आहे.

मस्त व आवडता प्रकार! वरून उंचावरून ओतायलाही मजा येते.
उन्हाळ्यात मात्र खरी मजा कोल्ड कॉफी + आईसक्रीमची! Happy

आमच्या कंपनीत आहे असा एक दर्दी..... दिवसातून ३ वेळा असे दहा-दहा मिनिटे कपात चमचा वाजवत राहून आख्खी पँट्री दणाणून सोडतो Happy

अशी मस्त गरम कॉफी बनवायची आणि वरून थोडेसे ड्रिंकिंग चॉकलेट (पावडर) भुरभुरवायचे. मस्त लागते. Happy

थोडे उंचावरून ओतल्यास फेसही मस्त येईल.>>> हे महत्त्वाचे आहे.

आमच्या घरी सगळे कॉफी प्यायला आले की नवर्‍याच्या एका ज्युनिअरची ड्युटी असायची कॉफी घोटायची. सोफ्यावर कोपर्‍यात बसून कॉफी घोटत राहायचा. Happy

केल. पण रंग बदलला नाही... राड पाणी- पिठूळ चव असे काही तरी झाले. एकजीव झाले नाही... Sad ( करताना शर्टावर डाग पडला, तो कसा घालवायचा?)

जामोप्या- अगदी वर जसं दिलयं तसं केलत तर बहुतेक नाही होणार चूक. मी सेम तशीच कॉफी घोटून ब्लॅक कॉफी पण करतो ती पण नाही बिघड्त !

योगेशजी, मला वाटले होते की जामोप्या गंमत करताहेत. म्हणून मी पुढीलप्रमाणे प्रतिसाद देणार होतो:=
"कदाचित हे झोपेत घडले असावे, कृपया आधी जागो मोहन प्यारे !!"

कॉफीत पाणी खूप कमी घालाचे व हातानेच घोटायचे १५ मिनीटे. मिक्सर वगैरे कामाचा नाही. ती मजा नाही.
व दोन फूटावरून ताजं दूध उकळी येइपर्यंत तापवून ओतायचे. दोनदा असे करायचे

आमच्याकडे पण सगळे जमले की अशी कॉफी केली जाते. फेटण्यासाठी मात्र पाण्याऐवजी दुधच वापरतो आम्ही. फेटण्याचं काम आणि एकूणच कॉफी बनवण्याचं काम धाकट्या दिरांपैकी एखाद्याचं असतं.

सगळे लोक इतकी चर्चा करताहेत. पण मला कळले नाही की यात वेगळं काय आहे? दूधात जसे काँप्लॅन किंवा हॉर्लिक्स वा तत्सम पावडरी + साखर घालून व ढवळून फ्लेवर्ड मिल्क बनवतात तसेच मी नेहमी कॉफीच्या बाबतीत ही करते. (ब्रु किंवा नेस कुठलीही कॉफी). Uhoh की कॉफी करण्याचे स्पेशल अशी काही पद्धत आहे? Uhoh कृपया अज्ञानी बालकाच्या ज्ञानात थोडी भर घाला. Proud

मी करते अशी कॉफी. सगळ्यात सोपा प्रकार म्हणजे जास्तीची करुन फ्रीज करणे. प्लॅस्टीकच्या डब्यात करायचे सगळे. ( आवाज कमी येतो ) आणि झाकण लावुन फ्रीजमधे ठेवायचे. हवी तेव्हा गरम दुधात चमचाभर मिश्रण ओतले की कॉफी तयार Happy

निंबुडा:
फारसे वेगळे काहीच नाही. मात्र अखंड फेटण्यामुळे एक वेगळीच चव येते. आपण म्हणता त्यापेक्षा खूपच वेगळी. एकदा करून तरी पहा.

अशी मस्त गरम कॉफी बनवायची आणि वरून थोडेसे ड्रिंकिंग चॉकलेट (पावडर) भुरभुरवायचे. मस्त लागते >>> लोणावळा गावात मिळते अशी कॉफी. पाऊस पडत असताना त्या दुकानाच्या आडोशाला उभं राहून गरम गरम कॉफी प्यायला एकदम धमाल येते.

Pages