निसर्गाच्या गप्पा (भाग-७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 April, 2012 - 00:54


(ह्या भागाला आपला निसर्गमय आयडी महान छायाचित्रकार जिप्सी ह्याच्या सौजन्याने वरील छायाचित्र मिळाले आहे. )

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा, खरंच ईकडे आणण्यासाठी एक छान फणस काढून ठेवला होता, पण विसरून तिथेच राहिला. Uhoh नंतर माझ्या काकूचा फोन आला पण तोपर्यंत आम्ही खूप पुढे आलो होतो.

नमस्कार मंडळी,
नि.ग.चा भाग-७ अगदी पहिल्या दिवशी पाहायला मिळावा ही माझ्यासाठी खुप आनंदाची गोष्ट आहे...
सुरुवात खुप सुंदर वाटली ...

दिनेशदा,जागु,साधना,शोभा,पद्मजा
आजचे सगळे फोटो खुप छान आहेत...

अर्रेच्या!! सातवा भाग सुरू पण झाला! सर्व निसर्गप्रेमींचे हार्दिक अभिनंदन!!
माझ्यातर्फे आमच्या बागेतली ही फुले.............

ओळखा पाहू....(दिनेशदा,साधना आणि जागू यांना नावं आधी फोडायला जाहीर बंदी आहे Happy

1 274.jpg1 276.jpg1 278.jpg

उंदीरमारी नका म्हणु हो. चांगले ग्लिरीसिडीया किंवा गिरीपुष्प असे नाव आहे.. उंदिरमारी म्हटले की कंबरेला पदर खोचकुन म एका हातात काठी नी दुस-या हातात टॉर्च घेऊन उंदरांना शोधणारी बाई डोळ्यासमोर येते.. त्यापेक्षा गिरीपुष्प म्हटले की कसा फुलांनी बहरलेला, आभाळाला भिडलेला वृक्ष डोळ्यासमोर येतो.>>>>>>>>>>> साधना... Rofl

प्रज्ञा, मी तर म्हणेन...नुस्ता फणस कशाला भाजीच करून आण कशी!!
जागू अगं बाई फोटो बिटो काढतेस नाग-सापांचे म्हंजे काय म्हणावे तुला? मागे पण तू गाडीच्या चाकावरच्या धामणीचा आणि नंतर एका काळ्या सापाचा असे फोटो काढले होतेस.. सांभाळून हं!!
माझी बोबडीच वळाली असती!! विषारी-बिनविषारी नंतर बघू म्हणाले असते.. आधी मनसोक्त किंचाळून घेतलं असतं!!
माधव, ऊर्वशीचा फोटो सुंदर आलाय. पुण्यात हा खूपच दुर्मिळ आहे.सगळी मिळून ३/४ मंडळी असावीत. आणि मला वाटतं बावधन इथल्या श्री डेंगळे यांच्याकडचाच फुलतो बहुधा.

माधव, आता साबुदाणा खाववणारच नाही!
पद्मजा, पेंटिंग अप्रतिम आलंय हं!
जिप्सी, अ‍ॅडेनियमचा फोटो फारच सुंदर आलाय. ती ट्रिक मस्त आहे.

साबुदाणा बनवताना तव्याला तेलकट करावे लागते. तो तेलकटपणा येण्यासाठी प्राण्यांची चरबी वापरली जाते हे कारण देत जैन धर्मगुरूनी त्यांच्या मंडळीना उपासाला सबुदाणा खायला बंदी केलीय.

मागच्याच आठवड्यात आम्ही मुळशीला गेलो होतो. जाताना काही ठिकाणी ही झुडपं खूप दिसली. ह्याचे नाव आहे रान-तंबाखू. याचे तुरे खूप सुंदर दिसतात.
पण सावधान!! ह्या झुडपाला लागलेला हात जर चुकुन आपल्या डोळ्याला लागला तर temporary blindness येऊ शकतो.किंवा घामाने ओलसर झालेल्या त्वचेला लागल्यास आग होऊ शकते. त्यामुळे मुद्दाम याचे फोटो इथे देत आहे.
हिचा बहर आता कमी होऊ लागला आहे आणि बीजप्रसाराचं काम सुरू झालंय त्यामुळे कृपया या झुडपाच्या फार जवळ जाऊ नका. क्वचित आपण एखाद्या सुंदर फुलाचा फोटो घ्यायला म्हणून जावं तर त्या वृक्षाच्या आजूबाजूला अशी झुडपं नाहीत ना अशी खात्री करून मग फोटो काढा. किंवा हातात ग्लोव्हज घालून फोटो काढता येतील. कारण बर्‍याच वनस्पती,त्यांच्यातून निघणारे चीक किंवा परागकण आपल्याला थोड्या त्रासदायक ठरू शकतात.

1 234.jpg1 236.jpg1 237.jpg1 239.jpg

शांकली, फोटो मस्तच आहेत.
अनिल७६, बरेच दिवसांनी ईकडे दिसताय.
शांकली Happy

हो शांकली, या रानतंबाखू चा धोका असतोच. पाकळ्यांना उभी खिडकी, हि खासियत आहे याची.

न्यू झीलंडला रस्त्यावर बघितलेली ही वेगळीच फुले. आधी मला जांभळाचा फुलोरा वाटला, पण नव्हता. त्या कूळातला (जांभळे, पेरू, लवंग, जाम) पण नव्हता. पण मुद्दाम लावलेले झाड असल्याने विषारी नक्कीच नसणार.

हिरनंदीनेची झाडे आता फोफावलेली दिसतात. मी १९९७ साली विक्रोळीहून अंधेराला जात असे. तेंव्हा आमच्या कंपनीची बस हिरानंदीनीला वेढा घालूनच जायची. त्यावेळी ते बघायला फार छान वाटायचे.

हिरनंदीनेची झाडे आता फोफावलेली दिसतात. >>>>>अगदी अगदी. छान निगा राखलेली आहे सर्व झाडांची.

चला हिरानंदानी इथे तरी बघायला मिळालं>>>>:फिदी:

छानच आहे हि बाग. आपले जायचे ठरलेय ना ?>>>>येस्स, कधी जायचे? Happy

wow..masta photo aahet.. (sorry, mobilewarun marathi nai yet type karta..pan rahavla nai ikde aalyashivay)
Shankalijee..warchya photo madhe dusra Bird of paradise.. Ka asach kaitari te ful aahe na?
Gypsy.. Sahie photo aahet sagle... Happy

शांकली, तू सांगितलेली दुरंगी बाभूळ, दुसर्‍या दिवशीच पाहिली. फक्त तुला सांगायचे राहिले. Uhoh
आणि तो रान तंबाखूचा फोटो माझ्याकडे पण आहे. शनिवारीच काढलाय मी. Happy
फोटो दाखवून नाव विचारणार होते. तर तू आधीच नाव सांगितलस धन्यवाद. Happy

Shankalijee..warchya photo madhe dusra Bird of paradise.. Ka asach kaitari te ful aahe na?>>>> पहिला फोटो ज्या फुलाचा आहे त्याचीच कळी आहे दुसर्‍या फोटोत.... , तिसरा फोटो हे मात्र वेगळेच फुल आहे.

दिनेशदा,साधना आणि जागू यांना नावं आधी फोडायला जाहीर बंदी आहे>>>>>>>> शशांक तुम्ही नावं सांगु शकता स्मित>>>>>>>> चिमुरी - मला तर सगळ्यात आधी बंदी असते (जाहीर न करताच).....

चला - कोणीही सांगा नावे आता - हे आमच्या "मंगळ"सूत्राकडून सांगण्यात येत आहे हं .......

Pages