निसर्गाच्या गप्पा (भाग-७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 April, 2012 - 00:54


(ह्या भागाला आपला निसर्गमय आयडी महान छायाचित्रकार जिप्सी ह्याच्या सौजन्याने वरील छायाचित्र मिळाले आहे. )

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझं डोकं कसं चालतं तेच मला कळत नाही. कलिंगडावरुन मला एक वेगळीच कथा आठवली.
बहुतेक शरद उपाध्ये यांच्याकडून ऐकली असणार.

तर कथा आहे साडेसातीची. साडेसाती कुणाला चुकलीय ? साक्षात श्री दत्तगुरुंना पण ती भोगावीच
लागली. पण त्यांचे महात्म्य एवढे कि प्रत्यक्ष शनि महाराज त्यांना पूर्वसूचना देण्यास आले.
श्री दत्तगुरु म्हणाले, मी असा संन्यस्त. माझ्यामागे कशी लागेल साडेसाती ? शनि महाराज म्हणाले, मी तूम्हाला पूर्वसूचना देतोय.
त्यानंतर श्री दत्तगुरूंना कुणीतरी कलिंगड दिले. ते त्यांनी झोळीत ठेवले. कुठल्याश्या धक्क्याने ते
फुटले. त्यातून लाल पाणी वाहू लागले.
ते लाल पाणी आणि डोक्यासारखा आकार म्हणून श्री दत्तगुरुंना देखील मनुष्यवधाच्या आरोपाचा
सामना करावा लागला.

दिनेशदांनी दत्तगुरुंचा उल्लेख केला म्हणून सहज आठवल. वडिलांकडून गुरुचरित्रातली गरीब भक्ताच्या झोपडी बाहेर असलेल्या वालाच्या वेलीला ते उपटून टाकतात ती कथा ऐकली आहे. मग वडिलांनी ती एक रूपक कथा कशी आहे तेही सांगितल, वाल ही अशी वेल आहे की ती खूप पसरते एक बी टाकल तर खूप शेंगा येतात; त्यातले वाल पेरले तर आणखी कितीतरी येतील अस सुरु राहील. तर ही वालाची वेल म्हणजे माणसाच्या वासना/इच्छा यांच प्रतीक आहे त्यांना अंत नाही. पण त्या उपटून टाकल्या अन खणल (प्रयत्न केले )तर अध्यात्मिक ज्ञानाच्या सुवर्णमोहरांचा हंडा सापडेल असा काहीसा अर्थ होता.

श्रीकांत ती घेवड्याची वेल. मलाही ती कथा खुप आवडते.

दिनेशदा दत्तगुरु आपल्या झोळीत दोन कलिंगडे घेउन चालले होते. त्याच वेळी त्यांना काही घटकेसाठी साडेसाती लागली त्याबरोबर त्या कलिंगडांची दोन लहान मुलांची डोकी होऊन त्यातुन रक्त वाहू लागले. ते पाहताच तेथिल राजाला कोणीतरी ही सुचना दिली. त्याच वेळी त्या राजाची दोन मुले बेपत्ता होती तेंव्हा दत्तगुरुंवर ती मुले मारण्याचाच आळ आला. दत्तगुरुंना शिक्षा होणार इतक्यात त्यांची साडेसाती संपली आणि ती बेपत्ता दोन मुले धावत आली आणि त्या डोक्यांच्या जागी परत कलिंगडे झाली. अशी ती कथा आहे.

वाल अन घेवडा!! यावरन झालेली एक मजा सांगतो. अलिबागला फार पूर्वी आम्ही नवीनच लग्न झालेल्या मित्रांनी एकदा पोपटी करायच ठरवल, पेणच्या एका मित्रानी पोपटी ची रसभरीत वर्णनं केली अन बाकी सगळ मी करेन तू फक्त वाल घेउन ये अस मला सांगितल.अन मी घेउन गेलो घेवडा!! विदर्भात घेवड्याला वाल म्हणतात. यातून हा घोटाळा झाला होता. सुदैवाने भाजीवाल्याने काही मटार व काही वाल ही दिले होते.पण मित्रानी त्या रात्री मला सगळ्या घेवड्याच्या शेंगा तूच संपवायच्यास अस चिडवून चिडवून बेजार केल होत. अजून ही पोपटी चा विषय निघाला की काय मग घेवडापोपटी करायची का? अस चिडवण सुरु होत. Happy

मला काल स्वप्न पडलं, मला एक मोठा पक्षी दिसला. त्याचे शरीर धनेश पक्षासारखच होतं रंग ही तसाच होता,काळा पाढरा, फक्त मानेपासून पुढच्या भागाच आकार वेगळा होता. तो पक्षी इकडून तिकडे ऊडत होता. आणि प्रज्ञाकडे कॅमेरा मागत होते. शेवटी फोटो काढला की नाही, ते मात्र आता आठवत नाही. Sad

दिनेशदा, धनेश पक्षी उडतो, तेव्हा त्याच्या पंखांचा आवाज कित्ती मोठा येतो ना. Happy

धनेश उडताना आवाज येतो तर घुबड उडताना अजिबात येत नाही.
धनेशाची पिसे मोठी आणि सुटी सुटी असतात तर घुबडाची लहान आणि एकमेकांत गुंतलेली असतात.
धनेशाला तसा शत्रू नाही बहुदा. घुबडाच्या चाहुलीने त्याचे भक्ष्य सावध होऊन लपू नये म्हणून
अशी योजना.
आपला शत्रू उंदीर याचे अनेक शत्रु असले (मोर, घुबड, मांजर, कोल्हा वगैरे) तरी त्याच्या बिळात घुसून
त्याची शिकार करण्याची क्षमता फक्त सापाकडेच असते.

शोभा मला अगदी लहानपणी मोर आमच्या ताडाच्या झाडावर चढलाय अस स्वप्न पडल होत अजुन मला ते आठवत.

शोभा Proud

आले का सगळे राणीच्या बागेतून? काय काय पाह्यलं? फोटो????...........
आम्ही वाट बघतोय ना.........
ही पोपटीची भाजी ऐकलिये; पण कशी करायची ते माहित नाही.:अरेरे:

शांकली,
जागूने सविस्तर लेख लिहिला होता पोपटीवर. एका मडक्यात वालाच्या कोवळ्या शेंगा भरुन त्याच्यावर
भांबूर्ड्याचा पाला भरुन ते शेकोटीवर शिजवतात. तिने फोटोपण टाकले होतेच.

फळं गोड करण्याकरता त्यांना इंजेक्शन्स देण्यात येतात.. ज्या सफरचंदांवर बेस्ट क्वालिटी किंवा ओके ची अंडाकृती लेबल्स चिटकवलेली असतात ती काढली तर तर त्याच्या खाली बर्‍याचदा इंजेक्शन टोचल्याच्या खुणा दिसतात. तसेच त्यांच्यातील ओलावा टिकवुन ठेवण्याकरता मेणाचं कोटिंग करतात.. आता हे मेण खाण्यायोग्य आहे की नाही हे माहित नाही, पण शक्यतो नसावं.. अगदी लाल भडक, चमकदार दिसणारी सफरचंदांवर जर हलक्या हाताने सुरीने स्क्रॅच केलं तर हे वॅक्स निघुन येतं.. काही दिवस मोबाईलवरुन वाचत असल्याने प्रतिसाद देत नव्हते.. पण फळांबद्दल हे सांगायचं होतंच म्हणुन तो विषय बंद झालाय तरी इथे सांगुन टाकलं Happy

सगळी माहिती छान आहे.. प्रचि पण सुरेख..

सफरचंदांच्या मेणाचे मीही काहीवर्षांपुर्वी वाचले. मी तेव्हापासुन स. खाणेच बंद केले.

फुकुओकांचे स्ट्रॉ रेवोलुशन वाचत होते त्यात तर जपानात संत्री मोसंबीवरही असे कोटींग करतात हे वाचलेले. हल्ली फळे बघितली की वाचलेले सगळे डोळ्यासमोर येते Sad

औरंगाबादला हल्लीच असे लाल पेरुंवर कोटिंग केलेले पाहिले. लाल पेरू अधिकच लाल चुटूक दिसावेत म्हणून.. Happy

मी तेव्हापासुन स. खाणेच बंद केले.>>>>> मी सफरचंदाची साल सोलण्याने काढुन खाते.. किंवा घेतानाच छोटी आणि जास्त लाल, चकाकी नसलेले घ्याय्चे..

संत्री मोसंबीवरही असे कोटींग करतात >>>> पण याची साल खात नसल्याने जास्त काही फरक पडणार नाही खाताना..

केळी, आंबे वगैरे कोणतं तरी केमिकल वापरुन पिकवतात ना? चव तितकी चांगली येत नाही, पण याव्यतिरिक्त अशी फळं खाउन आरोग्याला काही हानी पोहचते का? याबद्दल काही माहिती असल्यास सांगा ना..

तसेच त्यांच्यातील ओलावा टिकवुन ठेवण्याकरता मेणाचं कोटिंग करतात..

>>> मला सांगण्यात आलेली माहिती अशी आहे की, फलाच्या देठाच्या भागाकडुन फलाच्या आतील गराचा हवेशी संपर्क होऊन, कच्च्या फळाचे पिकलेल्या फळात रुपांतर होते, ही पिकण्याची क्रिया नियंत्रीत करण्यासाठी मेणाचा उपयोग करत असावेत.

केळी, आंबे वगैरे कोणतं तरी केमिकल वापरुन पिकवतात ना? >>> बाजारात मिळणारी सगळी केळी ही केमिकल वापरुनच पिकवलेली असतात.

सालीवर कोटींग करुन ती फळे जास्त दिवस टिकवतात. सफरचंदांच्या बाबतीत मी ऐकलेय की ६ महिने त्यांना टिकवतात.

कच्चीच असताना झाडावरुन तोडलेली, कृत्रिमरित्या पिकवलेली आणि मग ती सडु नये म्हणुन कोटींग केलेली फळे आपल्याला अपेक्षित असे गुणधर्म बाळगुन असतील काय? फक्त डोळ्यांना चांगली दिसणारी ही फळे आपल्याला पोषण देऊ शकतील काय??

केळी गॅस वापरुन पिकवतात. गॅस वापरुन पिकवणे कायदेशीर आहे. पण हे महागडे ठरते. जी केळी १० रु डजन मिळायची ती आता ३५-४० रु. वर गेलीत याचे कारण गॅस हे आहे (मला एका केळ्यावाल्याने हे सांगितले, गेल्या वर्षी मीही दुकान सुरू केलेले ना .. ). केळीउत्पादकाला हा भाव मिळत नाही.

बेकायदेशीर उद्योग - एका पाण्याच्या पिंपात कार्बाईड पुड टाकुन त्यात मिनिटभर घड बुडवायचा. सकाळि कच्चा असलेला घड संध्याकाळपर्यंत पिवळा होतो. भाव तोच मिळतो. ३५-४० रु. पण खर्च कमी. आरोग्याला विधातक असले तरी ते खाणा-याचे आरोग्य. विकणा-याला त्यचे काय?

आंबेसकट इतर खुप फळे अशीव्च पिकवतात. वाशी एपिएम्सीट हाच उद्योग चालतो. बेकायदेशीर आहे पण कायद्याच्या डोळ्यावर पैशांच्या पट्ट्या बांधता येतात.

कालच्या हिंदुस्तात टाईम्स्च्या ब्रंच मध्ये वीर संघवीचा एक चांगला लेख आहे हा विषयावर./

त्याने तर म्हटलेय की इथल्या डॉक्टरांनी परदेशातले वाचुन डोळे मिटुन पांढरे मास चांगले, लाल वाईट. म्हणुन बोकड खाऊ नका चिकन खा हे सांगायल असुरवात केली. प्रत्यक्षात ही बॅटरी चिकन आरोग्याला जास्त घातक आहेत. त्यामानाने बोकड अजुनही मोकळ्या वातावरणात, गवत खात जगतात. खुराड्यात बंद, कधीही सुर्यकिरण न बघितलेल्या रोगट कोंबड्या खाण्यापेक्षा मोकळ्या वातावरणात वाढलेले बोकड खाणे तुलनेत जास्त आरोग्यदायक आहे.

गॅस वापरुन पिकवणे कायदेशीर आहे>>> कायदेशीर आहे म्हणजे आरोग्याला चांगले असं आता म्हणता येइल असं वाटत नाही...

कालच्या हिंदुस्तात टाईम्स्च्या ब्रंच मध्ये वीर संघवीचा एक चांगला लेख आहे हा विषयावर>>>>> लिंक देता येइल का?

फळांचे रंग भडक (अगदी स्वयंप्रकाशित वाटावेत एवढे) करण्याकडे कल आहे आता. युगांडासारख्या चिमुकल्या देशात आता नैसर्गिक शेतीची चळवळ मूळ धरु लागली आहेत. रंगाने फारशी चमकदार
नसलेली पण चवीला अप्रतिम अशी फळे आता आमच्या बाजारात मिळतात.
त्यामानाने इस्राईल, चायना या देशातून आलेली आकर्षक रंगाची पण पाणचट चवीची फळे, घ्यावीशी
वाट्त नाहीत.
वॅक्स तसे फळांचे संरक्षण करते. त्या आवरणामूळे फळातील ओलावा टिकून राहतो. पोटात गेले तरी ते आपल्या
पचनसंस्थेत शोषले जात नाही.

----
आमच्याकडे कोरफ़डीच्या अनेक जाती दिसतात. काही चिमुकल्या तरी काही
झाडाप्रमाणे वाढणाऱ्या. हि आहेत एका जातीची फुले.

----

अंधार करा, डोळे मिटून शांत रहा, आणि हि लिंक सुरु करा.
नैसर्गिक आवाजांचे मस्त संकलन आहे हे.

http://www.youtube.com/watch?v=MOBzSxFK8E0&feature=fvsr

माझ्या घरी असलेल्या कोरफडीला गेल्या महिन्यात अशीच लाल रंगाची फुले आली होती... ह्या आधी मी कधीच ही अशी फुले पहिली नव्हती.. Happy

आहा.. यू ट्यूब ची लिंक सुप्पर्ब आहे.. खूपच रिलॅक्सिंग!!!
फळांबद्दल वाचून फळं विकत घेताना खरच भीती वाटत असते.. Sad

कोरफडीला फुलं येवु शकतात हेच आजवर डोक्यात आलं नव्हतं Sad छान प्रचि दिनेशदा.. Happy

पोटात गेले तरी ते आपल्या
पचनसंस्थेत शोषले जात नाही.>>>>> शोषलं गेलं नाही तरी जर ते आतड्याला चिकटुन वगैरे राहिलं तर प्रॉब्लेम येइल असं वाटतय.. सिताफळाला मला वाटतं काही औषधं किंवा प्रोसेसिंग लागत नसावं ना?? अजुन अशी कोणकोणती फळं आहेत की ज्यांना जास्त कीटकनाशकं वगैरे वापरण्याची गरज पडत नाही..

आजकालच्या डाळिंबामधला ओरिजिनल डाळिंबी रंगच हरवला आहे..

सुप्रभात.

दिनेशदा सुंदर प्रची आहेत.

आंब्याला पिवळा भडक रंग येउन लवकर पिकण्यासाठी पावडर लावतात.

शांकली पोपटीची लिंक शोधून देते तुला.

द्राक्ष आणि आंबे यांना अशी प्रक्रिया करतात.
युरपमधे केळी लोकप्रिय आहेत पण त्या देशात ती पिकत नाहीत.
ती पिकवली जातात कोस्टा रिका मधे. तिथे ती पूर्णपणे यांत्रिक
पद्धतीने पिकवतात. पण त्यावर टिकण्यासाठी, चमकदार रंगांसाठी
एवढे फवारे मारले जातात कि तिथल्या कामगारांच्या तब्येतीवर
परीणाम होऊ लागला आहे. याबद्दल मिलिंद बोकिल यांनी
समुद्रापारचे समाज, या पुस्तकात सविस्तर लिहिले आहे.

Pages