भरली वांगी मसाला दाक्षिणात्य पद्धतीने

Submitted by तोषवी on 2 April, 2012 - 14:16
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

७-८ लहान वांगी
१/२ कप ओलं खोबरं
२ चमचा तीळ
१ चमचा खसखस
१ चमचा जीरे
२ चमचे भाजलेले शेंगदाणे
१ मध्यम कांदा
१ टॉमॅटो
१/२ चमचा हळद
१ चमचा लाल तिखट
१ चमचा गरम मसाला
१ चमचा आलं लसूण पेस्ट
१ चमचा धणे जीरे पावडर
चवीनुसार मीठ
१ चमचा चिंचेचा कोळ
२ चमचे तेल

फोडणी साठी तेल ,१ चमचा मोहरी, ६/७ कढीपत्त्याची पाने

क्रमवार पाककृती: 

वांग्याना + आकारात चिर पाडून घ्या ही चिर अगदी खालपर्यन्त नको.
वा.गी पाण्यात बुडवून ठेवा.
प्रथम सगळे जिन्नस २ चमचे तेलावर नीट परतून घ्या.
मग मि़क्सर मधून वाटण काढून घ्या

फोडणी करून त्यात प्रथम वांगी परतून घ्या.उलट पालट करून शिजू द्या मग ती वांगी दुसर्‍या बाउल मधे काढून घ्या.

मग त्याच तेलात मिक्सर मधून काढलेले वाटण परता.त्यात हळद , गरम मसाला,तिखट्,धणेजीरे पावडर घाला .
त्यात थोडे गरजेनुसार पाणी घाला.त्यात वांगी ठेवा.झाकण ठेउन,१ वाफ येउ द्या.मग चिंचेचा कोळ घालून नीट ढवळा.रस्सा थोडा घट्ट्सर होउ द्या.
गरम भाकरी किवा फुलक्यांसोबत किवा वाफाळलेल्या भाताबरोबर गट्टम करा.

वाढणी/प्रमाण: 
२-३ जणं
अधिक टिपा: 

मुरल्यावर जास्त छान चव येते.

माहितीचा स्रोत: 
माझी तेलगु मैत्रीण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users