कोथिंबीर वडी + कोथिंबीर गाजर वडी (फोटोसह)

Submitted by दिनेश. on 1 April, 2012 - 13:16
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
एक प्रकार पारंपारीक, दुसरा माझा प्रयोग.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेश दा..थांकु थांकु...
माझ्या आवडत्या दहात टाकल्यात त्यामुळे आता हरवणार नाही Happy
आता चण्याची डाळ भिजत घालून करून पाहीनच ..

वा! काय मस्त आहेत वड्या, आपण तर एकदम खलास झालो ब्वॉ!
इतक्या कुरकुरीत खमंग दिसतायेत - आणि बिनतेलाच्या? विश्वासच बसत नाहीये!

दिनेशदा कूकरमधे प्रेशर आल्यावर ६/७ मिनिटे उकडा अस लिहिलत म्हणजे एक शिट्टी झाल्यावर गॅस बारीक करायचा का ६\६ मिनिटे

सावरी, प्रेशर आल्यावर गॅस मध्यम करायचा, आणि वेळ मोजायला सुरवात करायची.
(शिट्या मोजायच्या नाहीत.) प्रेशर कूकर वापरायची हिच योग्य रित आहे. खरे तर शिट्या होऊ दिल्या कि प्रेशर कमी होते आणि परत ते निर्माण व्हायला थोडा वेळ जातो. शिट्या होऊ न देता, प्रेशर कायम ठेवले म्हणजेच शिट्टी (वेंट वेट) गोल गोल फिरत राहिली, कि बास.
अनेक पाककृतींमधे अमूक शिट्या होऊ द्या, असे लिहिलेले असते ते चुकीचे असते.
कूकरबरोबर येणार्‍या पुस्तिकेत नेहमी वेळच दिलेली असते.

दक्षिणा - कुणी माझ्या बरोबर असते, तर व्हीडिओ नक्कीच काढला असता !!

प्रेशर आल्यावर गॅस मध्यम करायचा म्हण्जे नक्की कधी हे नाही कळल मला.. म्हणजे शिट्टी तर लावायची पण ती व्हायच्या आतच गॅस बारीक करावा का

हो सावरी, तसेच. शिट्टीमधून सूं सूं आवाज यायला लागला कि गॅस मध्यम करायचा.
यापेक्षा योग्य रित म्हणजे आधी शिट्टी लावायचीच नाही, त्या नळीतून एकसारखी वाफ यायला लागली, कि शिट्टी लावायची.

मंजूडी,
अ‍ॅसिडीक म्हणजेच आम्ल असणार्‍या पदार्थांबाबत, फॉईलचा धोका जास्त असतो. पण या कोथिंबीर वड्यात, कुठलाच आंबट पदार्थ नाही.

खूपच छान! तुमच्या टीप्सही एकदम सह्ही असतात. मीही अश्याचपध्दतीने कुकर करते. आणि हो द्राक्ष्-बटाटा भाजी एका पार्टीसठी केली होती खूप हिट झाली.

मोनाली,
जर वळकटी जमत नसेल तरच फॉईल वापरायची. आंबट पदार्थ (उदा. टोमॅटो, चिंच) असेल तर थोडीफार रीअ‍ॅक्शन होतेही. पण एरवी विशेष धोकादायक नाही.

गाजर कोथिंबीर वडी हा नविनच प्रकार नक्की करून बघीन. फोटो खूपच टेम्प्टिंग आलेत हं!! (अर्थात ते नेहेमीच असतात)

कोथिंबीर वडीत बेसनाऐवजी भिजवून वाटलेली डाळ वापरायची कल्पना आवडली. थोडे तांदळाचे पीठ घातलले तर वड्या मस्त कुरकुरीत होतात.

मस्त! आज तुमच्या पद्धतीने डाळ वापरुन कोथिंबीर वड्या करणार आहे. गाजर कोथिंबीर वड्यांच्या कृतीबद्दल खूप खूप धन्यवाद! आईला देइन रेसिपी. Happy

Pages