सचिनने रचला इतिहास !!

Submitted by RISHIKESH BARVE on 28 March, 2012 - 13:38

नवज्योत सिंग सिद्धू यानी सांगितलेली १९९८९-९० च्या पाकिस्तान दौर्याची गोष्ट.
(या दौर्यातच सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल टाकलां)
१९८९ चा पाकिस्तान दौरा.
पहिल्या तीन मॅचेस ड्रॉ झालेल्या.
चौथी मॅच सयालकोट. महांमद अली जीना स्टेजडयम. ग्राऊडवर गवताच साम्राज्य.
इम्रानखानने धमकीच दिली होती. जो गवत कापील त्याचा गळा कापीन. हेच शब्द . गळा कापीन! फ़ास्ट बॉल साठी पूर्णपणे इंतजाम करून ठेवलेला.
पहिल्या चार वकेट बावन रन्सवर आटोपलेल्या. एकेक फ़ास्ट बॉल खांदा , कान, छाती असा वेध घेणारा. कुठून कसा यायचा आणि जायचा याचा पत्ताच लागत नव्हता. अंग छाती माराने लाल झालेल. चार चार फ़ास्ट बॉलर . मॅचचा पाचवा दिवस . भारत बावन्न रन्स वर चार विकेट . माझां नुकतांच लग्न झालेलं. देवा !! मी घरी हातीपायी धड जाईन ना? या जन्मी बायकोची भेट होईल ना? वाचव रे देवा. आउटच कर. यातून बाहेर पडायचा एकच मार्ग. आऊट होणं.
समोर रवी शास्त्री बॅटिंग करतोय. वकारचा एक फ़ास्ट बॉल. मी वाकलो आणि वाचलो. रवी शास्त्री म्हणाला : “मस्त चुकवलास बॉल. छान खेळलास.”
मी म्हटलां : “अरे कसला छान! मला तर बॉल दिसलाच नाही.”
तो चडफ़डत आपल्या जागी गेला.
पुढची ओव्हर तयाला आली . बाउन्सर ! सपाक्. त्याच्या ग्लोव्हला लागून कॅच. गली अध्ये कॅच. आउट.
तो बडबडत बाहेर निघाला . "चर्च मध्ये जायला हवां होतं . यांव, तयांव." मी मनात म्हटलां, "बेटा वाचलास. आउट झालास ते नशीब" . मी स्वतः कधी आउट होतो याच्या आशेवर होतो. संकटातून कधी सुटेन.
आजण बघतो तर सचिन तेंडुलकर नावाचा एक कोवळा पोरगा मैदानात येतोय. अरे हा पोरगां तर बळीचा बकरा दिसतोय .बिचारा रे ! हा लगेचच जाईल. मग कोण ? कुंबळे वगैरे तर नावालाच . सायकल स्टॅंडवर एक सायकलला धक्का दिला की सगळ्या धपाधप पडतात तसे हे सगळे गळणार. चला. रामनाम सत्य है म्हणायच.
सचिन आला. सचिनला पहिलाच बॉल झूमकन आतून गेला. मी म्हटलां संपलं बीचर्याचे . अरेरे.
दुसरा बॉल ऐतिहासिक होता. प्रचांड वेगाने आलेला सीझनचा बॉल सचिन हुक करायला गेला. बॅटची आतली कड लागून बॉल आपटला तो थेट त्याच्या नाकावर. आणि बटाट्याची गोणी कोसळावी तसा सचिन धपाक्कन जमिनीवर कोसळला. थेट जमिनीवर. निपचित .
मी मनातल्या मनात म्हटलां : “मेलां बिचारा पोरगां. खलास”.
मी धावलो.
जवळ जाऊन बघतो तर नाक पुरतां फ़ुटलेलां. रक्ताच्या चीळकांद्यानी शर्ट भिजलेला.
मी ओरडलो : “स्टेचर! स्टेचर !!”
मला हा वाचेल की नाही याचीच भीती . आणि समोर बघतो तर ढोल्या डॉ अली इराणी येत होता. त्याला बघून मी म्हटलं आता तर नक्की संपलाच . कारण अलीला फ़क्त दोनच औषधं माहिती. एक सारीडॉन आणि दुसरी बर्फाची पिशवी खरंच अली बर्फाची पिशवी घेऊन येत होता.आता या बिचर्या पोराचां काही खरं नाही.
हळहळत मी परत नॉन स्ट्रायकर एन्डला निघालो . मनात म्हटलं “चला आता हा तर संपलाच . आता तीन चार बाउन्सर येतील. मग खेळ खल्लास.”
तेवढ्यात मागून सचिनचा टिपिकल हलकासा आवाज आला. “मै खेलेगा. मै खेलेगा.”
मी झटकन मागे वळलो. मी जे बघितलं ते आठवलां की आजही काटा उभा रहातो. नाकावरचा कापूस रक्ताने भरून खाली टपकत होता.शर्ट रक्ताळलेला. आणि त्या अवस्थेतला सचिन तेंडुलकर डॉ अली इराणीला हाताने ढकलत होता. “मै खेलेगा. मै खेलेगा. मै खेलेगा!!” “अरे मै खेलेगा!”
मला जर इतकां लागलां असतां तर मी संध्याकाळी साडेपाच पर्यंत उठलोच नसतो.
तेव्हा मला जाणीव झाली. साला आपण अठ्ठावीस वर्षाणचे सरदारजी पुरुष घाबरतो. आणि हा पंधरा सोळा वर्षाचा कोवळा पोरगा जीवाची बाजी लावून खेळायचा विचार करतो. म्हणतो मै खेलेगा. याला म्हणतात देशप्रेम . मला लाज वाटली. मी बायकोला भेटण्याचा आणि स्वतःच्या जीवाचा विचार करतोय? झटकन मनात ठिणगीसारखा विचार आला
"वो भरा नहीं है भाव , बहती जिसमें रसधार नहीं
वो हृदय नहीं वह पत्त्थर है, जिसमें स्वदेशका प्यार नहीं."
मी माझ्या झोपेतून खडबडून जागा झालो. भानावर आलो. माझ्यातला लढाऊ खेळाडू जागा झाला. मला माहित होतं पुढचा योर्कर सचिनवर येऊन आदळणार. मी ते आधी भोगलं होतं . एक तर टाळक फ़ुटणार किंवा ढोपर. आम्ही सगळ्यांनी ते भोगलं होतं . गेल्या मॅचमध्ये मी, कपिल, कुंबळे सर्वांनाच हा प्रसाद या आधी मिळाला होता. आणि आता हे सोळा वर्षाचं पोरगं .
पुढचा बॉल. योर्कर !! सचिन आधीच दोन पावलं मागे होऊन तयारीत उभा. १५० कि.मी. च्या वेगाने बॉल आला. आणि सपाक्. सजचनच्या बॅटला लागून १८० कि.मी. च्या स्पीडने माझ्या दोन ढेंगाच्या मधून सुसाट जाऊन समोरच्या बोर्डावर ठाण्णकन आदळला.
शांत !!
सगळीकडे चिडीचूप.
अख्खं स्टेडीयम अवाक.
पिनड्रॉप सायलेंस.
फ़ोर !!
खवळलेला वकार युनुस सचिनच्या दिशेने गेला. त्याची खुनाशी नजर. त्या भयंकर नजरेने माझ्या सारख्याच्या काळजाच पाणी पाणी झालं असतं .
मी त्याच्या त्या तश्या नजरेला नजर भिडवूच शकलो नसतो.
पण सचिनने त्याही परिस्थितीत त्याच्या नजरेला नजर भिडविली, आणि बोलला. काहीतरी बोलला. जे बोलला ते मराठीत. मला मराठी येत नाही. तो काय बोलला त्याचा अर्थ मला आजही माहिती नाही. मी कोणाला विचारलाही नाही. कारण त्याचा अर्थ काहीतरी भयंकर असेल याचा विचार करूनच मी घाबरतो. पण मराठी लोकांना ते कळेल म्हणून मी सांगतो. सचिन बोलला. “बटर! बटर!! तुझ्या आयचा घो!!!”
काय झालं माहित नाही. कशामुळे झालं माहित नाही. सचिनच्या नजरेचा प्रताप असेल. पण वकार मागे वळला. आणि संपला . ढेपाळला.
नंतर घडला तो इतिहास.
सगळे फ़ास्ट बॉलर ढेपाळले. त्या चौघानाही आम्ही दोघांनी सपासप चोपले. ठोकले. हाणले.
तया वेळी सजचन ने नाबाद सत्तावन्न रन्स ठोकले. नाबाद सत्तावन्न.
त्याच्या संगतीचा परिणाम म्हणा किंव्हा काही म्हणा. मी सत्त्याण्णव रन्स दणादण ठोकले. नाबाद. माझ्या आयुष्यातली ती सर्वात मोठी भागीदारी. सातव्या विकेट साठीचा जागतिक विक्रम. आजवर कोणीही न मोडलेला. हा सचिनच्या शब्दांचा परिणाम होता. एखादा पराक्रम करण्यासाठी आधी तो मनातून ठरवावा लागतो. त्यावर विश्वास ठेवावा लागतो. स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो. स्वतःच्या स्वप्नावर , कुवतीवर विश्वास ठेवावा लागतो. धाडसाचा हा परिणाम असतो. एकाचं धाडस दुसर्याला शक्ती देते.

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< “बटर! बटर!! तुझ्या आयचा घो!!!” >> तोपर्यंत शाळेपासून कांबळीबरोबर विक्रमी भागिदार्‍या केल्यामुळे त्याच्या 'स्टाईल'मधलं कांहीतरी उचलंच असणार ना सचिनने !! Wink
सिद्धू सचिनचा पक्का 'फॅन' आहे हे त्याच्या बोलण्यातून अनेकदा जाणवतंच. छान आठवण.

<< “बटर! बटर!! तुझ्या आयचा घो!!!” >> तोपर्यंत शाळेपासून कांबळीबरोबर विक्रमी भागिदार्‍या केल्यामुळे त्याच्या 'स्टाईल'मधलं कांहीतरी उचलंच असणार ना सचिनने !! >> Lol भाऊ अगदी

एकाचं धाडस दुसर्याला शक्ती देते - वा मस्त किस्सा Happy

सचिनला सलाम!!!!!!!!!!!!!>>>>>>>>+++++++

बटर! बटर!! तुझ्या आयचा घो!!!”

हे वाक्य काही वाईट नाही पण सचिनवरच्या संस्कारांबद्दल त्याला ओळखणा-या कुणाकडून तरी ऐकलेलं आहे त्यावरून तो असं काही म्हणेल असं वाटत नाही. हे सिद्धूचं मसाला भरीत आहे. या माणसाने एका फायटीत चांगला आंडदांड मनुष्य गारद केलेला आहे. ती चूक झाली नसती तर दीर्घकाळ त्याच्याकडूनही क्रिकेटची सेवा झाली असती. त्याचा खेळ आणि तेजतर्रार जीभ दोन्ही आवडतं ( कॉमेडी सर्कस मधलं बळंच हसणं तेव्हढं नाही आवडत )..

यू ट्यूब वर ती इनिंग शोधून टाका रे कुणीतरी