'कोकणमय'
'कोकणमय' (१) — वालावल, नेरूरपार आणि धामापूर
'कोकणमय' (२) — "निवती"
'कोकणमय' (३) — "निवती समुद्रात फेरफटका"
'कोकणमय' (४) — श्री वेतोबा (आरवली), रेडीचा गणपती, मोचेमाड समुद्रकिनारा
'कोकणमय' (५) — मालवणची शान "किल्ले सिंधुदुर्ग"
'कोकणमय' (६) — "तारकर्ली-देवबाग"
'कोकणमय' (७) — जयगणेश मंदिर, श्री रामेश्वर (कांदळगाव), श्रीभराडीदेवी (आंगणेवाडी), जलमंदिर (बिळवस)
'कोकणमय' (८) — कुणकेश्वर, वाडातर, श्रीरामेश्वर (गिर्ये)
=======================================================================
=======================================================================
बारा गावच्या, बारा राठीच्या, बारा वायवाटीच्या, बारा देशातल्या मायबोलीकरा.. म्हाराजा
सांगना करुक कारन.. म्हाराजा
तुझ्या कृपाशीर्वादाने "कोकणमय" मालिकेचो ह्यो शेवटचो भाग सादर करतय.. ही सेवा चरणी रुजू करुन घे
म्हाराजा...
देवा रवळनाथा... तुझ्या कृपेने संपूर्ण मालिकेक भरभरून प्रतिसाद गावले... ही कृपा अशीच ठेव म्हाराजा...
ज्येंनी ज्येंनी ही मालिका बगली.. आवर्जून प्रतिसाद दिले त्यांचे मनापासून आभार. ज्येंनी बगली पण प्रतिसाद देवची बुद्धी नाय झाली त्येंचेव आभार
... प्रतिसाद दिलेल्यांचा भला मागतंय, न दिलेल्यांका प्रतिसाद देवची बुध्दी.. व्हय म्हाराजा. 
सगळ्या मायबोलीकर गोतावळ्याक सुखी ठेव.. वाकड्याक सरळ कर आणि तिड्याक सिध्धो कर.. भांडनान फक्त भांडान वाडता, एकत्र इल्यात तर एकी व्हता ह्यां पटवून दी... म्हाराजा
मायबोलीची अशीच कायम भरभराट जावंदेत... म्हाराजा
एकूण सगळ्यांचा भला भला जावंदेत... म्हाराजा
आशा करतय कि दहा भागांची हि 'कोकणमय' सफर सगळ्यांका आवडली आसात.. म्हाराजा
माझ्या प्रचिंवर सगळ्यांचोच असोच लोभ कायम रवांदेत.... म्हाराजा..
पुढ्ल्या वर्षी सुद्धा, तुझ्या पायाकडे येंवक, अजून नवीन उत्साहाने कोकण भ्रमंती करुक.. अशीच ताकद आणि बुद्धी दी ह्या तुका अखेरचा सांगणा... व्हय म्हाराजा..... 
=======================================================================
=======================================================================
किल्ले विजयदुर्ग:
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील वाघोटण खाडीच्या दक्षिणेस समुद्रात शिरलेल्या एका मोठ्या खडकावर विजयदुर्ग किल्ला बांधलेला आहे. या किल्ल्यास घेरीया असंही नाव आहे. या किल्ल्यास २००६ साली ८०० वर्षे पूर्ण झाली. अतिशय प्राचीन असा हा जलदुर्ग म्हणजे मराठ्यांच्या आरमारातील मानाचं पान आहे. शिलाहार राजा भोज याने महाराष्ट्रात बांधलेल्या सोळा किल्ल्यांपैकी एक विजयदुर्ग हा एक. पाण्यात पसरलेला, ऐतिहासिक, वैभवशाली, सामर्थ्यवान, मराठवाडयांच्या आरमारी सामर्थ्याचा तेजबिंदू, आंग्रे घराण्याचे बलस्थान आणि शिवरायांच्या ऐतिहासिक पराक्रमाची साक्ष देणारा तरीपण फितुरीला बळी पडलेला विजयदुर्ग किल्ला सिंधुदूर्ग जिल्हयाच्या उत्तरेला टोकाला आहे. सुमारे ४० किमी. लांबीच्या वाघोटण खाडीच्या आणि अरबी समुद्राच्या संगमावरच हा किल्ला उभा आहे. हा किल्ला शिवाजी महाराजांनी इ.स.1653 मध्ये आदिलशाहीतून स्वराज्याच्या काळात कब्जात घेतला आणि त्यामध्ये अनेक सुधारणा केल्या. स्वराज्याचा भगवा ध्वज तेथे फडकविला. त्यावेळी विजय संवत्सर चालू होते. त्यावरूनच या किल्ल्याचे नांव विजयदुर्ग ठेवले. सुमारे 700 वर्षांहून अधिक काळ स्वबळावर अंत्यंत प्रभावी आरमारी केंद्र म्हणून उभ्या असलेल्या या किल्ल्यावर कान्होजी आंग्रे, तुळाजी आंग्रे, आनंदराव धुळप यांच्यासारखे शूर व तेजस्वी आरमार प्रमुख होऊन गेले.जयदुर्ग गावात पायउतार झाल्यावर समोरच आपणास ऐसपैस असा विजयदुर्ग किल्ला दिसतो.गडावर प्रवेश केल्यावर मारुतीचे मंदीर लागते,हे मंदीर शिवाजी महाराजांनी गड जिंकल्यावर बांधून घेतले.या मंदीरासमोरून पुढे गेल्यावर जिबीचा दरवाजा लागतो,या दरवाज्यातून आत गेल्यावर डाव्या हातासच ३० फूट उंचीची तटबंदी दिसते,इथून पुढे गेल्याणंतर गडाचे मुख्य प्रवेशद्वार लागते,भव्य अशा प्रवेशद्वाराच्या आत पहारेकर्यांसाठी देवड्या आहेत.दरवाजातून आत गेल्यावर पोलिस चौकी आहे,तिथे दुतर्फा तोफेचे गोळे व्यवस्थित मांडून ठेवले आहेत,इथे डाव्या बाजूस खलबत्खाना आहे.तिथून पायर्यांच्या वाटेने आपण ध्वजस्तंभाजवळ येवून पोहोचतो.हा ध्वजस्तंभाचा बुरूज पाहून आल्या वाटेने खाली उतरून समोरची सदर व दारूकोठार पहायचे.या कोठारा शेजारच्या भुयारातून 'खूबलढा तोफा बारा ' या बुरुजावर यायचं या भुयाराच्या बाजूने ततावर जाण्यासाठी पायर्या असून या पायर्यांच्या मार्गाने तटावर चढायचे,इथून तटावर फेरफटका मारण्यास सुरवात करावी.
विजयदुर्गास २० बुरुज असून प्रत्येक बुरुजावर नावाचा सिमेंटचा बोर्ड लावलेला आहे,पुढे तटावरच उभे असलेले लाईट हाऊस लागते,त्याचे पुढेच तटाच्या खाली चुण्याची घाणी दिसते,या चुण्याच्या घाणीच्या बाजूलच गोड्या पाण्याची विहीर असून तिच्या पासून फक्त २० फूटांवर समुद्र आहे.विजयदुर्गास तिहेरी तटबंदी असून गडाच्या पश्चिम तटाबाहेर मोठे दगड टाकून लाटांच्या मारापासून तटबंदीचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे.गडाचा तट सुस्थितीत असून त्यावर चढण्यास जागोजागी पायर्या असल्यामूळे संपूर्ण गडास व्यवस्थीत तटफेरी मारता येते.
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
चुना मळण्याचे जाते
प्रचि १७
हे आमचे इंद्रवज्र 

प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
सुकलेली विहिर
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
=======================================================================
=======================================================================
कोकणचा कॅलिफोर्निया कधी होईल ते माहित नाही पण कॅलिफोर्नियाच्या तोडीचे सौंदर्य कोकणात आहे हे मात्र मान्य. या चार दिवसात मनसोक्त कोकण भटकलो आणि खर्या अर्थाने कोकण अनुभवला. कोकणातील काही ठिकाणं तर अक्षरशः वेड लावणारी आहेत. या निसर्गाच्या नशेतच खरी धुंदी आहे त्याला कुठल्याही कृत्रिम नशेची गरज नाही. कोकणच हे सौंदर्य असंच अबाधित राहो आणि त्याचा काही अति हौशी पर्यटकांमुळे बदनाम झालेला "गोवा" न होवो हिच देवाचरणी प्रार्थना.
प्रचि २९
पुन्हा एकदा कोकणात परत येण्याचे आश्वासन देत आम्ही चार दिवसाची कोकण भ्रमंती संपवून मुंबईकडे निघालो.
(तटि: विजयदुर्ग माहिती कोकण पर्यटन पुस्तकातुन साभार. गार्हाण लिहिण्यास मदत केल्याबद्दल मायबोलीकर "नीलुचे" खास आभार. :-))
(समाप्त)
जिप्सी > आम्हा
जिप्सी >
आम्हा कोल्हापुरकरांच्यासाठी कोकण अगदी पलिकडच्या गावातील शेजारी अशा नात्यातील असल्याने महिन्या-दोन महिन्यात एखादी तरी सहल तुमच्या या मालिकेतील कोणत्याना कोणत्या गावी होत असतेच, पण आता तुम्ही या मालिकेद्वारे घडवून आणलेली नेत्रदीपक सहल प्रत्यक्ष सदेह सहलीपेक्षा अभिनव आणि देखणी वाटली. विशेषतः हा विजयदुर्ग. किमान चारपाच वेळा पाहून झालाय, तरीही या क्षणी तुम्ही काढलेले फोटोग्राफ्स पाहून परत तिकडे गाडी वळवावी अशी भावना मनी निर्माण झाली आहे.
याचे सारे श्रेय तुमच्या मांडणीला.
एकूणचे ही कोकण मालिका "निवडक १०" मध्ये सर्वजण नोंदवतील याची खात्री आहे.
धन्यवाद
अशोक पाटील
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!
काहीSS गरज नाहिये त्याला बदलायची>>>>+१
प्रचि १७ मधे उजवीकडुन तिसरा तुच ना?>>>>चिमुरी

मनापासुन धन्यवाद गोळेकाका.
प्रकाशचित्र २६ मध्ये दिसणार्या तटाच्या मागे समुद्रात पाण्याखाली विजयदुर्गाची वैशिष्ट असलेली जवळ-जवळ एक किलोमीटर लांबीची तटबंदी दडली आहे>>>>येस्स, गुणाजींच्या एका कार्यक्रमात हि भिंत पाहिली होती.
हेलीयम वायुचा शोध विजयदुर्ग वरच लागला>>>अगदी अगदी. मी पण हे वाचलं होत. पण पूर्ण माहिती नसल्याने इथे त्याचा उल्लेख केला नाही.
सचिन, देउदत्त, अधिक माहितीबद्दल धन्स.
वास्तविक, तो ' साहेबाचा कट्टा' हेही एक आकर्षण व्हायला हरकत नसावी विजयदुर्गचं.>>>>+१
धन्स अशोकजी.
भाऊ, प्रसिद्ध लेखक रवीन्द्र
भाऊ,
प्रसिद्ध लेखक रवीन्द्र पिंगे आणि मी एकाच गावचे !
वाघोटण खाडीवर वसलेले 'उपळे' हे आमचं एक नितांत सुंदर गाव.
पिंग्यांच्या लेखनात कोकण, विजयदुर्ग खाडी आणि विशेषकरून 'उपळं' नेहेमीच डोकावतं.
पुढ्ल्या वर्षी सुद्धा, तुझ्या
पुढ्ल्या वर्षी सुद्धा, तुझ्या पायाकडे येंवक, अजून नवीन उत्साहाने कोकण भ्रमंती करुक.. अशीच ताकद आणि बुद्धी दी ह्या तुका अखेरचा सांगणा... व्हय म्हाराजा....>>
दिलेल्या आज्ञापलिकडे न जाण्याची नि आयुष्यभर जिप्स्याक साथ देण्याची त्याच्या कॅमर्याक सदबुद्धी दे.. आणि पुढच्यावेळी ह्यो तुका नमस्कार करुक येतला तेव्हा दोनाचे चार हात असांदे रे म्हाराजा !.... _/\_
विजयदुर्ग मस्तच ! संपूर्ण मालिका मस्तच ! कौतुकास्पद !
नि अभिमानास्पद 
मस्त! मस्त!! मस्त!!!
मस्त! मस्त!! मस्त!!!
खासच रे मित्रा... १७ वा फोटो
खासच रे मित्रा...
१७ वा फोटो तर भन्नाटच ! जियो...
योग्या... पुढच्यावेळी ह्यो
योग्या...
...
पुढच्यावेळी ह्यो तुका नमस्कार करुक येतला तेव्हा दोनाचे चार हात असांदे रे म्हाराजा !.... >>>... तुका अनुमोदन... खरां सांगाचां तर, मी हंयसर त्याच कामासाठी ईलेलंय... तू माझां काम सोप्यां करुन ठेवलंस...
जिप्सी.. खूप छान सफर घडवलीस
जिप्सी.. खूप छान सफर घडवलीस !!!! धन्स रे..
सुंदर सुंदर फोटोज दाखवलेस आणी माहिती सांगितलीस!! इंद्रवज्र खासच!!
असच नवीन नवीन ठिकाणी फिरवत राहा..
प्रस्तावनाही एक्दम झकास!!!
ह्यो तुका नमस्कार करुक येतला
ह्यो तुका नमस्कार करुक येतला तेव्हा दोनाचे चार हात असांदे रे म्हाराजा !....>>>

तुझ्यानंतर त्याचा नम्बर लावण्याची किती घाई रे.
जिप्स्या फोटो मालिका उत्तमच होती रे.
पायाला भिन्गरी लावल्यासारखं जे फिरतोस ना ते कायम ठेव.
फार कमी लोकाना अस जमत.
महाराज......... एकंदरी शेवटचा
महाराज.........
एकंदरी शेवटचा धरून सर्वच भाग अप्रतिम ......
मनापासून अभार...........
मस्त कोकण दर्शन घडवल्याबद्दल.......
........मुजरा...........
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे मनापासुन आभार!!!!
Pages