'कोकणमय'
'कोकणमय' (१) — वालावल, नेरूरपार आणि धामापूर
'कोकणमय' (२) — "निवती"
'कोकणमय' (३) — "निवती समुद्रात फेरफटका"
'कोकणमय' (४) — श्री वेतोबा (आरवली), रेडीचा गणपती, मोचेमाड समुद्रकिनारा
'कोकणमय' (५) — मालवणची शान "किल्ले सिंधुदुर्ग"
'कोकणमय' (६) — "तारकर्ली-देवबाग"
'कोकणमय' (७) — जयगणेश मंदिर, श्री रामेश्वर (कांदळगाव), श्रीभराडीदेवी (आंगणेवाडी), जलमंदिर (बिळवस)
=======================================================================
=======================================================================
कोकण दौर्याचा आमचा शेवटचा दिवस उजाडला. कांदळगाव-आचरा मार्गे कुणकेश्वर, नंतर गिर्येचे रामेश्वर आणि सरते शेवटी विजयदुर्ग करून मुंबई गाठायची असा प्लान होता. त्याप्रमाणे सकाळी लवकर उठुन तयारी करून प्रथम कांदळगावच्या रामेश्वराचे दर्शन घेऊन मुंबईला परतीच्या प्रवासाला निघालो. संध्याकाळी साधारण ४-५ पर्यंत विजयदुर्ग पाहुन मग मुंबईला निघायचे असा बेत होता. प्लानिंगनुसार पहिल्यांदा भेट दिली ती देवगड तालुक्यातील श्री कुणकेश्वर मंदिराला. महाशिवरात्रीच्या जत्रेची तयारी चालु असल्याने संपूर्ण मंदिराला रंगरंगोटी देण्याचे काम चालु होते.
श्री कुणकेश्वर मंदिर
देवगडपासुन १५ किमी अंतराव असलेल्या श्री कुणकेश्वर मंदिराला "कोकणची काशी" असेही म्हटले जाते. प्राचीन अशा या मंदिराची स्थापना अकराव्या शतकात झाली असे सांगण्यात येते. हे स्थान समुद्रकिनारी असल्याने सागराअच्य अलाटांनी मंदिराचा पश्चिम तट नित्य प्रक्षाळला जातो. समुद्राच्या लाटांमुळे मंदिराचे नुकसान होऊ नये म्हणुन मंदिराच्या कलात्मकपेक्षा मजबुतीकडे जास्त लक्ष दिलेले आहे. या ठिकाणी पूर्वी कनक नावांच्या वृक्षांची राई असावी म्हणुन या स्थानास कुणकेश्वर हे नाव पडले असावे. अतिशय नयनरम्य असणारे हे कुणकेश्वर मंदिर समुद्राच्या सान्निध्यामुळे दे़खणे दिसते. येथील समुद्रकिनारा स्वच्छ आणी सुंदर आहे. महाशिवरात्रीला या ठिकाणी मोठी जत्रा भरते.
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
कुणकेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही गिर्येच्या रामेश्वराकडे निघालो. वाटेत वाडातर पुलावर गाडी थांबवली आणि फोटोसेशन सुरु केले.
वाडातर
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
पुढे कुणकेश्वर-वाडातर मार्गे विजयदुर्गच्या वाटेवरच्या गिर्ये गावातील रामेश्वर मंदिराकडे आम्ही पोहचलो.
विजयदुर्गला पोहचण्याआधी काहि किमी अंतरावर गिर्ये येथे मुख्य रस्त्या पासून ३ कि. मी. अंतरावर इतिहासकालीन श्री देव रामेश्वर मंदिर आहे. पेशवे नाना फडणीसांचे बंधू गंगाधर भानू यांनी या रामेश्वर मंदिराची उभारणी केली. देवालय साधे कौलारू आहे. समोर खास कोकणी पध्दतीच्या दिपमाळा आहेत. रामेश्वर देवालय खोलगट भागात आहे. मुख्य रस्त्यावरून अगर प्रवेशद्वाराच्या नजीकच्या पठारावरून हे मंदिर दिसत नाही. देवालयात जाण्यासाठी दीडशे मीटर लांब पंधरा मीटर खोल अशा जांभया दगडाच्या अखंड खडकातून खोदून मार्ग काढलेला आहे. मंदिरातील मुख्य गाभार्यात शिवपिंडी आहे. बाहेरील बंदिस्त भागात सुमारे पन्नास किलो चांदीची नंदीवर आरूढ मूर्ती असलेली चतुर्भुज श्री शंकराची प्रासादिक मूर्ती होती. हि मूर्ती काहि वर्षापूर्वी चोरीला गेली.
ई.स. १७९२/९३ मध्ये पेशव्यांच्या आरमाराचे प्रमुख आनंदराव धुळप यांनी इंग्रजांच्या जहाजावरून पकडून जप्त करून आणलेली अजस्त्र घंटा या ठिकाणी असून ही घंटा पुढे कृष्णराव धुळप यांनी ई.स.१८२७ मध्ये श्री देव रामेश्वरला अर्पण केली.
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
या रामेश्वर मंदिराच्या आवारातच उजव्या बाजूला मराठांच्या आरमाराचे सरखेल संभाजी आंग्रे यांची समाधी आहे. ते शिव भक्त होते. रामेश्वर मंदिर भोवतालची दगडी तटबंदी, फरसबंदी पटांगण सरखेल संभाजी आंग्रे यांनीच बांधले.
सरखेल संभाजी आंग्रे यांची समाधी
प्रचि २८
गिर्येच्या श्री रामेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही आमच्या कोकण भटकंतीतल्या शेवटच्या ठिकाणाला भेट देण्यासाठी "विजयदुर्ग" येथे निघालो.(क्रमश: पुढिल अंतिम भागात "किल्ले विजयदुर्ग")
संपत आले भाग... हा पण भाग
संपत आले भाग...
हा पण भाग छानच...
जिप्या मस्तच हा भाग सुद्दा
जिप्या मस्तच हा भाग सुद्दा
जिप्स्या, ह्या सगळ्या
जिप्स्या, ह्या सगळ्या मालिकेलाच झ्ब्बू द्यायचा मोह होतोय. तो भागच इतका सुंदर आहे की आजही मनात रुतून बसलेला आहे.
सुं द र!!! या ठिकाणांवर जायला
सुं द र!!! या ठिकाणांवर जायला मिळेल कि नाही शंकाच होती पण तूच छान फिरवून आणलंस
धन्स!!!!
छान प्रचि.
छान प्रचि.
<< तो भागच इतका सुंदर आहे की
<< तो भागच इतका सुंदर आहे की आजही मनात रुतून बसलेला आहे. >> १००% सहमत. देवगड- मिठबांव- कुणकेश्वर इ. परिसरात फिरणं हा एक मस्त अनुभव. कुणकेश्वर तर सुंदरच !!
समुद्र सदाचा लाडिकपणे पायांत घुटमळत राहिला तरीही महाराष्ट्राने समुद्राला आपलेपण मात्र नाही दिलं, ही माझी खूप जुनी व मोठी खंत. सरखेलांची समाधी बघून हें पुन्हा तीव्रतेने जाणवलं !!
छान माहिती आणि फोटो!
छान माहिती आणि फोटो!
आता तर सगळे शब्द संपलेत
आता तर सगळे शब्द संपलेत रे.
छान/मस्त्/सुंदर सगळच बोलुन झालय.
आता परत काय बोलणार???
प्रचि १९ च प्रपोझिशन आवडल
मस्तच
मस्तच
शांत बसा की राव? असे फोटो
शांत बसा की राव?
असे फोटो पाहून माणसाला इयर एन्डिंगमध्ये लक्ष देता येईल का?
उत्तम समुद्र, शांत देवालये
उत्कृष्ट चित्रण
अभिनंदन
जिप्स्या, ह्या सगळ्या
जिप्स्या, ह्या सगळ्या मालिकेलाच झ्ब्बू द्यायचा मोह होतोय. >>>> माधव + १.
सुंदर प्र.चि., माझ्या फोटोमध्येसुध्धा वाडातर पुलावरुन दिसणारे गुलाबी मंदिर होते
र्.च्या.क.ने.,
पेशवे नाना फडणीसांचे >>>>
जिप्स्या - नाना फडणीस हे पेशवे नव्हते, ते पेशव्यांचे मुख्य कारभारी होते.
सुंदर.
सुंदर.
आता तर सगळे शब्द संपलेत रे.
आता तर सगळे शब्द संपलेत रे. >>> म्हणून मी प्रतिसाद देणं बंद केलयं :p
सुंदरच फोटो माहितीही छान
सुंदरच फोटो
माहितीही छान
सुधीर
जिप्सी, काय प्रतिसाद द्यावा
जिप्सी, काय प्रतिसाद द्यावा हेच सुचत नाही. छान फोटो आहेत.
सुंदर!माहितीपूर्ण
सुंदर!माहितीपूर्ण प्रचिमालिका!
देवगड- मिठबांव- कुणकेश्वर इ.
देवगड- मिठबांव- कुणकेश्वर इ. परिसरात फिरणं हा एक मस्त अनुभव. अगदी अगदी भाऊकाकांनू!
ह्या मालिकेचा नांव 'तळकोकणमय' आसां व्होया खरां तर..!जब्ब्ब्ब्बराट प्रचि!!
अगदी मस्त आहेत रे फोटो. ही
अगदी मस्त आहेत रे फोटो.
ही मालिका संपू नये असे वाटते. पूढचा भाग शेवटचा नाही मित्रा, विसरू नकोस तूला परत जायचय आणी गंडलेले सूर्यास्ताचे फोटो परत काढून येथे प्रर्दशीत करायचे आहेत. इतक्या सहजा सहजी सोडणार नाही आम्ही तूला.
<< गंडलेले सूर्यास्ताचे फोटो
<< गंडलेले सूर्यास्ताचे फोटो परत काढून येथे प्रर्दशीत करायचे आहेत >> हो, सूर्याने पण कांही महिने तरी अधिकाधीक उशीरा मावळायचं मान्य केलंय, खास किरुकडूनच फोटू काढून घ्यायला !!
नेहमीप्रमाणेच सुंदर... आणी
नेहमीप्रमाणेच सुंदर...
आणी मालिका संपत आली होय?
प्रतिसादाबद्दल मनापासुन
प्रतिसादाबद्दल मनापासुन धन्यवाद!!!!

इंद्रा
देवगड- मिठबांव- कुणकेश्वर इ. परिसरात फिरणं हा एक मस्त अनुभव.>>>>>+१
ह्या मालिकेचा नांव 'तळकोकणमय' आसां व्होया खरां तर>>>>
इतक्या सहजा सहजी सोडणार नाही आम्ही तूला.>>>>

अप्रतिम फोटो. देवगडवरून
अप्रतिम फोटो. देवगडवरून वाडातर ब्रिजनेच आमच्या गावाला फणसे येथे जायचे.
आजून कुंकेस्वराचा दर्शन काय
आजून कुंकेस्वराचा दर्शन काय झाला नाय एव्हढ्या वर्षात. आता मातुर वाट वाकडी करुक होयी.
पुढच्या खेपेक येतंय रे बा देवा म्हाराजा!
देवळाचे फोटो मस्तच,