'लिंगनिरपेक्ष ओळख - मैत्री' चर्चा

Submitted by संयोजक_संयुक्ता on 8 March, 2012 - 14:00

महिला दिन २०१२ च्या निमित्ताने घडवलेला निरभ्र : लिंगनिरपेक्ष ओळख-मैत्री परिसंवाद विशेषांक तुम्ही वाचला असेल किंवा वाचत असालच.

अंकामधे जाहिर केल्याप्रमाणे या विषयाच्या सर्व पैलूंवर सर्व बाजूने चर्चा होणे अतिशय गरजेचे आहे. त्याशिवाय विशेषांक पूर्ण होणार नाही.

या धाग्यावर लिंगनिरपेक्ष मैत्री - ओळख (आयडेन्टिटी) या विषयाची चर्चा करूया. चर्चा करताना काही थोडीशी पथ्ये पाळूया.
१. विशेषांकातल्या लेखांतले, लेखांबाहेरचे सर्वच मुद्दे घेऊन अवश्य चर्चा करू. विशेषांकामधे काय बरोबर नाही, संपादक मंडळाचे कुठे चुकते आहे याचा उहापोह इथे नको. तो त्या त्या लेखाच्या धाग्यावर करू.

२. आपली भाषा, आपण वापरत असलेली उदाहरणे या सगळ्यांचा सभ्यतेच्या संदर्भातून विचार करणे अतिशय गरजेचे. धागा मॉडरेटेड असणार आहे याची कृपया नोंद घ्यावी.

- संपादक मंडळ

विषय: 

हे म्हणजे स्वतःच्या लग्नात दहा दहा प्रथा करून झाले की लग्न प्रथा कश्या वाईट ह्यावर चर्चा करायच्या. किम्वा स्वतः कायदे तोडून कायदे तोडणारे किती वाईट ह्यावर एक चर्चा. Proud

रार, विचार मांडताना प्रत्यक्षात त्यानुसार वागणारे पाहावयास गेले तर माझ्या मते हाताची दहा बोटेही खूप होतील. माझे निरीक्षण हे आहे की विचार मांडताना अनेकदा 'विशफुल थिंकिंग'ही केले जाते. म्हणजे प्रत्यक्षात तसे नसले तरी ते तसे व्हावे ही इच्छा असते, ती त्या चिंतनात प्रकट होते. Happy पण त्या विचारांमधील काही टक्के विचार जरी प्रत्यक्ष वर्तनात आणता आले, अंगी बाणवता आले, मनात त्याविषयी एक जागृती / जागरुकता निर्माण झाली तर मला वाटते त्याचा अंतिमतः फायदाच होईल.

उदा : येथील चर्चा वाचल्यावर माझ्या तोंडून किंवा विचारांमध्ये ''अमका तमका हा मुलगा आहे म्हणून त्याने असे वागले पाहिजे'', किंवा ''मुलींनी अमक्या तमक्या प्रकारे वागणे अपेक्षित आहे'' असे उद्गार / विचार डोकावणार नाहीत. आणि यदाकदाचित ते तसे आले तर त्यांचा माझ्याकडूनच खरपूस समाचार घेतला जाईल. Happy तसेच अवतीभवती वावरणार्‍या लोकांना एक वेगळा दृष्टीकोन देण्याइतपत मुद्दे माझ्याकडे निश्चितच जमा झालेले असतील. अशा संवादातून व्यक्तिगत पातळीवर इतके जरी साध्य झाले तरी ते त्या परिसंवादाचे यशच म्हणावे असे मला वाटते.

मुळात तनया मोहंती यांच्या संशोधनाचा विषय "काही पॉप्युलर प्रकारच्या पुस्तकांतून मुले / मुली यांच्या मनात वैयक्तिक लिंगजाणिवांबद्दल निर्माण होणारे प्रश्न" अशा प्रकारचा आहे !

नानबा यांनी काहीतरी वेगळाच अनुवाद केला आहे !!

वरची चर्चा आणखीनच काहीतरी असंबद्ध सुरू आहे!!!

गाडी कोठून कुठे नेताय राव?

Proud

(टिकू तलसानिया : "ये क्या हो रहा है" ?)

अकु
तुमच्या पोस्टवर विचार करतोय...( उदाहरणे दिलेली पोस्ट )

पहिला भाग पटतोय. दुसरा भाग.. ज्यात उदाहरणे दिलेली आहेत (समज - गैरसमज) तो स्त्री - पुरूष समानता दर्शवतो. हा शब्दच्छल वाटू नये... इतकंच म्हणायचं होतं. बाकि चालू द्या..

दीपक भिडे,
तुमच्या पोस्टला उद्देशून, पण तुमच्याकरता नव्हे तर इतर वाचकांकरता ह्या विषयावरची माझी 'अनुवाद' ह्या विषयावरची शेवटची पोस्ट:
१. तनया मोहांतींनी ह्या उपक्रमासाठी म्हणून हा लेख लिहून दिला
२. व्यासपीठ मराठी असल्यानं अनुवाद करायचं ठरलं
३. त्याप्रमाणे मी त्याचा अनुवाद केला
४. अनुवाद करण्याचा अनुभव असणार्‍या/तज्ञ व्यक्तींकडून तो तपासून घेतला. सूचनांवर विचार/चर्चा करून त्यानुसार बदल केले. संपादक मंडळानंही अनुवाद रिव्यु केला
५. तुम्ही मुळ धागा सोडून विविध ठिकाणी टाकलेल्या तनया मोहांतीच्या लेखावरच्या आदळापटीला योग्य त्या ठिकाणी विविध लोकांनी उत्तर दिलं (मी सहसा 'आदळापट' सारखे शब्द पोस्ट मधे वापरत नाही - पण तुमच्या वर्तनाला तोच शब्द मराठी भाषेत आहे, त्यामुळे पर्याय नाही)
६. तुम्हाला जिथे उत्तर दिलं तिथे सोडून इतर ठिकाणी आदळापट सुरूच ठेवलीत
७. तुमच्या अनेक शंकाना तनया मोहांतींनी उत्तर दिली
८. तुमचा हेतू काय माहित नाही - पण तुम्ही लेख मिळवण्याचा अनेक प्रकारे प्रयत्न केलात (लेख न मिळाल्याने एखाद्याचा इगो दुखावू शकतो काय? (विचारात पडलेली बाहुली))
९. अनुवाद प्रकाशित करायचा हा संपादक मंडळाचा निर्णय होता आणि I think, its time that one accepts it & moves ahead, if not, its one's choice, but then people may not respond after a while. शेवटी, झोपेचं सोंग घेतलेल्या जागं करणं शक्य नाही हे मी वैयक्तिकरित्या ओळखलेलं सत्य आहे.

इतर वाचकांचा गैरसमज होऊ नये म्हणून हा लेखनप्रपंच.
भीडे, तुमचं चालुद्या. Happy

नानबा, किती खोटं बोलाल? स्वतःशी तरी खरं बोला............

तुम्ही स्त्री आहात की पुरुष यापेक्षा एक माणूस म्हणून तुम्ही धादांत खोटे लिहित आहात याची तुम्हालाही चांगलीच कल्पना आहे. ते शेवटचं "शेवटी, झोपेचं सोंग घेतलेल्या जागं करणं शक्य नाही हे मी वैयक्तिकरित्या ओळखलेलं सत्य आहे" हे मात्र (चुकून) खरे बोललात.

मूळ मुद्दा सोडून दिलात. तनया मोहंती यांनी मायबोलीसाठी लिहिलेला लेख कुठे आहे? तुमचं झोपेचं सोंग होतं हे मला आत्ता कळलं.

Happy तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना.

आणि "इतर वाचकांच्या गैरसमजाबद्दल तुम्हाला एवढी कणव असती, तर आधी एवढी मोठी जबाबदारी ही जबाबदारी समजून वक्तव्य केली असतीत.

दीपक_भिडे, खोटं काय बोलले हे प्रूव्ह कराल प्लीज?

अ‍ॅडमिन, वैयक्तिक आणि खोटे दोषारोप चालले आहेत. तुम्ही सगळ्या प्रक्रियेला साक्षिदार आहात.
इकडे लक्ष द्याल का प्लीज?

युरी गागारिन, वर मी दिलेली जी उदाहरणे आहेत ती काय दर्शवितात?
तर माझ्या मते, एखादी व्यक्ती स्त्री/पुरुष आहे यावरून तिच्याविषयी जे ठोकताळे मांडले जातात, गृहीतके मांडली जातात ते दर्शवितात.
(उदा : पुरुष संवेदनशील नसतात. : हे गृहीतक समग्र पुरुषांना 'असंवेदनशील' असे लेबल लावते. वस्तुस्थिती तशी नसते. आणि अशा लेबलांपायी संवेदनशील पुरुषांवर अन्याय होत असतो.)
जेव्हा त्या व्यक्तीला तिच्या जेंडरनुसार जोखले जाते तेव्हा तिथे लिंगनिरपेक्षता अस्तित्त्वात येऊ शकत नाही. परंतु जेव्हा हे जेंडरनुसार जोखणे, आडाखे बांधणे, अनुमान काढणे, लेबले लावणे थांबते व त्या व्यक्तीकडे ''एक व्यक्ती'', ''एक माणूस'' म्हणून पाहिले जाऊ लागते तेव्हा तो प्रवास लिंगनिरपेक्षतेकडे जातो. तिथे त्या व्यक्तीच्या जेंडरविषयी असलेल्या समजांनुसार तिने वागावे, बोलावे इ.इ. अपेक्षा नसते.

जोवर स्त्री-पुरुष असमानता आहे तोवर लिंगनिरपेक्षता तरी कशी येणार हाही विचार करण्यासारखा मुद्दा आहे.

नानबा : तनया मोहंती यांनी मायबोलीसाठी लिहिलेला लेख कुठे आहे? कृपया इथे दिलात तर छानपैकी वाचता येईल.

एवढंच मी सुरुवातीपासून सांगतो / विनंती करतो / टाहो फोडून सांगतो / हर तर्‍हेने मिनतवार्‍या करुन सांगतो आहे हो...........................

मायबोली हे मराठी संकेतस्थळ आहे. त्यामुळे भाषांतर छापले आहे.
तो लेख अस्तित्वातच नाही आणि नानबा यांनी मनानेच काहीतरी लिहून भाषांतर म्हणून दिले आहे असे काही तुम्हाला म्हणायचे आहे का?

आणि हे खोटे आरोप तुम्ही कुठल्या सबळ पुराव्याच्या आधारे करता आहात? असे करून नानबा यांना किंवा मायबोलीला किंवा परिसंवादाला काय साध्य होणार आहे असं तुमचं म्हणणं आहे?

तुम्हाला लेख वाचायला देणे न देणे हा संपादक मंडळाचा वा लेखिकेचा निर्णय. पण त्याचा अर्थ तो नाहीच असे नाही. तुम्ही मूळ लेखिकेलाही त्या लेखासाठी हॅरॅस करायचा प्रयत्न केलात हे आम्हाला कळले आहे.

मायबोली प्रशासन, संयुक्ता व्यवस्थापन, परिसंवाद संपादक मंडळ ह्या सर्वांच्यावर तुम्ही हा संशय घेत आहात.

नानबा यांच्यावर अतिशय घाणेरड्या प्रकारे केलेल्या तुमच्या कॉमेंटस तुम्हाला केवळ आरडाओरडाच करायचा आहे हे स्पष्ट करतात. त्यामुळे हे शेवटचं.

तो मूळ लेख प्रकाशित केला जाणार नाही. याउप्पर त्या लेखाच्या असण्यानसण्यासंदर्भात कुठलेही एक्स्प्लेनेशन, चर्चा केली जाणार नाही.

नानबा:

जीवनगाणे.....गातंच जावे,
झालेगेले विसरुन जावे.....पुढेपुढे चालावे.

१.एखादी गोष्ट अधिकाधिक परिपूर्ण कशी होईल याचा कायम ध्यास घेतल्याशिवाय ती गोष्ट अर्थपूर्ण होत नाही.
२. मूळ विषयाशी प्रतारणा करुन एखादा परिसंवाद परिपूर्ण होऊ शकत नाही.
३. मी कोणाही व्यक्तीशी आकसाने / ईगोने इथे लिहिण्याचा प्रश्नच येत नाही. कृपया सुरुवातीपासून ही चर्चा एकदा, आपल्या अमूल्य वेळात वेळ काढून, वाचून पहावी ही विनंती.
४. "निंदकाचे घर असावे शेजारी" ही उक्ती कायम लक्षात ठेवा, त्या मागचे कारण लक्षात घ्या, म्हणजे माझ्यासारख्यांचे उद्देश कदाचित लक्षात येतील.

तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन. कारण तुम्ही मंडळींनी खरोखरंच "शून्यातून" हे परिसंवाद-विश्व निर्माण केले आहे. कारण मुळात ज्या लेखापासून स्फूर्ती घेतली आहे असे म्हणता, तो लेख (आता या परिसंवादाची लाकडे स्मशानात गेली तरी) तुम्ही मंडळींनी कुठेच दिलेला नाही !!

असो. तुमच्या आयुष्यात तसेच इथल्याही वाटचालीत मनापासून शुभाशिर्वाद. तुम्हाला नको असले तरीही.

धन्यवाद. निरोप घेतो.

शेवटी:

जाहले भजन आता नमितो तव चरणा, आम्ही नमितो तव चरणा,
वारुनिया इथली नसती विघ्ने, रक्षावे दीना, आता लिहावे तनया !!

नीधपः
"तुम्ही मूळ लेखिकेलाही त्या लेखासाठी हॅरॅस करायचा प्रयत्न केलात हे आम्हाला कळले आहे" ?????

ह्सावं की रडावं की काय करावं तुमच्या अशा चाईल्डिश बीहॅवियरला बघून? प्लीज लवकर रिकवर व्हा हो तुम्ही. अहो हॅरॅसमेंट कशाला म्हणतात माहितीये का? तुम्ही जी माझी करताय ती हॅरॅसमेंट आहे. मी तनया मोहंती यांच्याशी हॅरॅसमेंट केली असती तर त्यांनी माझ्याविरुद्ध काही अ‍ॅक्शन घेतली असतीच ना आजपर्यंत?? बात करताय राव.

जाऊ दे. आता बास. तुमच्या अ‍ॅडॅमेंट बीहॅवियर पुढे मला यापुढे काही बोलायचं नाहिये. तुम्हाला सुधारायचं तर सुधारणा करा, नाहीतर नको. मायबोलीच्या चांगले असण्यात आणखी परिपक्वता आणली तर बरे, असे अजूनही वाटते, एवढे मात्र खरे. गुड्बाय.

<<<१.एखादी गोष्ट अधिकाधिक परिपूर्ण कशी होईल याचा कायम ध्यास घेतल्याशिवाय ती गोष्ट अर्थपूर्ण होत नाही.
२. मूळ विषयाशी प्रतारणा करुन एखादा परिसंवाद परिपूर्ण होऊ शकत नाही.
३. मी कोणाही व्यक्तीशी आकसाने / ईगोने इथे लिहिण्याचा प्रश्नच येत नाही. कृपया सुरुवातीपासून ही चर्चा एकदा, आपल्या अमूल्य वेळात वेळ काढून, वाचून पहावी ही विनंती.
४. "निंदकाचे घर असावे शेजारी" ही उक्ती कायम लक्षात ठेवा, त्या मागचे कारण लक्षात घ्या, म्हणजे माझ्यासारख्यांचे उद्देश कदाचित लक्षात येतील.>>>

भिडे, मूळ विषयाशी प्रतारणा न करणारा मुद्दा नेमका कोणता ते कृपया लिहावेत अशी विनंती

मी या चर्चेत असण्याला काही दिवस झाल्याने आणि माझ्यावर बेमुरव्वत गरळओक झाल्याने मला आपले म्हणणे समजलेच नाहीये

Happy

दीपक भिडे,
तुम्हाला मूळ लेख का हवा आहे? भाषांतरातून मुद्दे स्पष्ट होतायत की. त्यात जे आले नसतील ते तुम्ही मांडू शकताच.

संयोजक,
मूळ लेख न देण्यात काय अडचण आहे? (भाषांतर दिलं त्या अर्थी प्रताधिकाराचा प्रश्न नसावा.)

दीपक भिडे,
तुम्हाला मूळ लेख का हवा आहे? भाषांतरातून मुद्दे स्पष्ट होतायत की. त्यात जे आले नसतील ते तुम्ही मांडू शकताच
<><><><><><><><><>

धन्यवाद स्वाती:

भाषांतरातून मुद्दे स्पष्ट होताहेत हे तेव्हाच कळेल जेव्हा मूळ लेख वाचायला मिळेल. अनुवादाचा लेख विचारप्रवर्तक आहेच, पण चौकसपणे विचार करायला गेलो तेव्हा प्रश्न पडला की मूळ लेख जर वाचायला मिळाला तर नानबा यांचे भाषांतर त्याच्याशी ताडून पाहता येईल. तसेच, तनया मोहंती यांनी जे चार प्रकार लिहिले आहेत, त्यांचा उगम कुठून झाला? म्हणजे त्या चार संज्ञा मुळात भारतीय समाजाशी अथवा इतर कुठल्या समाजाशी संबंधित आहेत, हे जाणून घ्यावेसे वाटले. याला कारण असे की अशा तर्‍हेचे अभ्यास अनेकानेक होत असतात, ते त्या-त्या समाजाचे / वर्गाचे / देशाचे (इ.इ.) प्रतिनिधित्व करत असल्यास उत्तमच, अन्यथा त्यावर आधारित चर्चा निष्फळ असते. त्याबद्द्ल मी संपादक मंडळाला सहजच विचारले असता उडवाउडवीची व उद्धट उत्तरे वाचायला मिळाली. नानबा यांच्याकडून असे उत्तर मिळाले की "तनया मोहंती यांनी मूळ संज्ञा तयार केल्या नसल्या तरी त्यांनी मूळ संज्ञांवर आधारित हे संशोधन केले आहे". म्हणून मी स्वतः तनया मोहंती यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माझ्या म्हणण्याला (की, त्या-त्या समाजाशी निगडीत संशोधन असावयास हवे") अनुमोदन दिले, व असे सांगितले की त्या संज्ञा त्यांनी स्वतः निर्माण केल्या आहेत आणि ओरिसातील भुवनेश्वर जवळील गावातील मुलामुलींच्या मनातल्या जाणीवांवर त्यांनी हा अभ्यास केला आहे, जो मुळात "काही विशिष्ट प्रकारच्या साहित्याचा मुलांच्या लैंगिक भावविश्वावर काय परिणाम होतो हे जाणून घेण्यासाठी" अशा प्रकारचा आहे !! म्हणजेच, इथे जे लिहिले आहे त्याचा मूळ अभ्यासाशी फारच दूरचा संबंध आहे !!

नानबा यांच्या व तनया मोहंती यांच्या सांगण्यातील अशा फरकामुळे साहजिकच माझ्या मनात अधिकच कुतूहल निर्माण झाले, की मुळात तनया मोहंती यांनी लेख लिहिला आहे, तो वाचावा. नेट्वरुन शोधले असता मूळ पुस्तकाचा सारांश वाचला असता मला लक्षात आले की त्या सारांशात लिहिलेले आणि नानबा यांनी मूळ लेखाचा अनुवाद म्हणून लिहिलेले यात खूपच फरक आहे ! त्यामुळे मी पुन्हा मूळ लेख देण्याबद्दल विनंती केली असता मुख्य संपादकांकडून उद्धट प्रकारे ("नानबा यांनी दिलेले उत्तर समजत नाही का" या शब्दांत) उत्तर मिळाले व आणखी लावून धरले असता त्यांनी नंतर असेही सांगितले की "तनया मोहंती यांनी मुळात लिहिलेल्या पुस्तकातील भागाचा अनुवाद केला नसून, तनया मोहंती यांनी मायबोलीच्या या उपक्रमासाठी लिहून दिलेल्या (इंग्रजीतील) लेखाचा नानबा यांनी अनुवाद केला आहे !!

अनुवादात लिहिलेले नक्कीच वाचनीय व विचार करायला लावणारे आहे. पण "त्या" मूळ लेखाचा अनुवाद म्हणून हा मराठीतील लेख कितपत योग्य उतरला आहे, हे मुळ लेख वाचल्याशिवाय मलातरी समजणार नाही. याचसाठी मी ही विनंती पुनःपुन्हा करतो आहे, एवढेच.

शिवाय, ही चर्चा आपण पहिल्यापासून वाचल्यास आपल्या असे लक्षात येईलच की मी वेळोवेळी "इतर" अनेक मुद्द्यांबाबत चर्चा केली आहेच, इतरांच्या म्हणण्याबाबत माझे विचार लिहिले आहेतच.

मी चर्चेच्या ठिकाणी लिहिले आहेच की मी अजून "पिग्मॅलियन" न वाचता "ती फुलराणी" तेवढं पाहिल्याने मुळातले नाटक मुळातून पाहण्याची इच्छा कायम आहेच.

पुन्हा एकवार धन्यवाद व नव्या आर्थिक वर्षासाठी सर्वांना शुभेच्छा !!

दीपक भिड्यांच्या मूळ लेखाच्या मागणीस अनुमोदन. तनया मोहंतींनी ज्या मुलामुलींवरून निष्कर्ष काढले आहेत ती मुलेमुली महाराष्ट्राशी संबंधित नसावीत.

मूळ लेख वाचायला मिळाला तर अनेक गोष्टी स्पष्ट होतील असं वाटतं. कारण लिंगनिरपेक्षता हा शब्द genderless वरून उचललेला आहे. मूळ शब्द इंग्रजी असल्याने त्याचे मराठीतले संदर्भ बदललेले असू शकतात (नव्हे, बदललेले आहेतच!). Happy

-गा.पै.

"लिंगाधारित व्यक्तिमत्त्व" या तनया मोहंतींच्या मूळ लेखावर आधारित नानबा यांनी लिहिलेल्या अनुवादावरील चर्चेच्या ठिकाणी मी अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत, तेही वाचल्यास ही चर्चा (वाटल्यास) पुढे जाईल व संपादक मंडळाची इच्छा पूर्ण होईल, की "सर्व बाजूंनी या विषयावर या परिसंवादात चर्चा व्हावी" !!

दीपक भिडे यांचे म्हणणे वाचले व मला पटले.

एक मूळ लेख आहे. जो त्या लेखिकेने एका विशिष्ट संस्कृतीवर वा त्यातील मुलामुलींच्या वर्तनावर आधारीत असा किंवा त्यावर संशोधन करून असा लिहिला आहे. त्या लेखाचा अनुवाद अथवा त्यांनी खास मायबोलीसाठी लिहिलेल्या लेखाचा अनुवाद नानबा यांनी या परिसंवादात दिला आहे.

येथे अनेक शक्यता निर्माण होतात.

१. मायबोलीसाठी खास लिहिलेला लेख असे स्वरूप असल्यास संयुक्ताच्या या उपक्रमाचे ब्रिफिंग माननीय मोहंती यांना संयुक्ताकडून झालेले असणार व त्यामुळे त्यांनी लिहिलेला लेख हा संयोजकांच्या अपेक्षापूर्तीवर काहीसा विसंबून असणार

२. त्यांनी त्यांना हवे ते लिहिलेले असल्यास नानबा यांचा अनुवाद पुरेसा ठरणारच. मात्र मूळ लेखिकेने केलेल्या 'मायबोलीबाह्य संशोधन व लेखनातील मुद्दे' त्यांच्या मायबोलीसाठी लिहिलेल्या लेखापेक्षा काहीसे भिन्न असल्याचे निदर्शनास आले तर मायबोलीसाठी लिहिलेल्या लेखाच्या सॅन्क्टिटीवरच प्रश्नचिन्ह उठणार.

या व या स्वरुपाच्या इतर काही शक्यता लक्षात घेतल्यानंतर व मूळ लेख येथे देण्यास संयुक्ता संयोजक रिलक्टंट आहेत हे पाहिल्यानंतर 'नानबा यांनी केलेला अनुवाद' हाच मुळात हरकतीस पात्र असावा असे कोणालाही वाटू शकेल. 'टेलरमेड फॉर सेमिनार' असा तो लेख नाही हे सांगणे मंडळाला स्वतःची जबाबदारी वाटत नाही आहे का?

पण ते काही असले तरी माझ्यामते महत्वाचा मुद्दा हा असायला हवा की प्रादेशिकता व त्यानुसार बदलणारी संस्कृती लिंगनिरपेक्षता किंवा स्त्रीपुरुष समानता किंवा लैंगीक जाणिवांवर प्रभाव पाडते हे इतके सहज का मान्य केले गेले? का मान्य केले जात आहे?

समजा ओरिसातील मुलामुलींवर संशोधन झाले आहे (जे कदाचित या परिसंवादाशी संबंधित नसेलही) तर त्या मुलामुलींची संस्कृती, संस्कार, आजूबाजूची सामाजिक व राजकीय परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती यावर त्यांच्या लैंगीक जाणिवा व विचार अवलंबून असणार हे नक्कीच. पुण्यामुंबईच्या मुलांच्या जाणिवा त्याहून वेगळ्या असणार आणि अमेरिकेतल्या मुलांच्या जाणिवा त्याहीहून वेगळ्या असणार हेही नक्कीच. मात्र काहीतरी किमान समान असे प्रत्येक संस्कृतीत असणारच ना? म्हणजे अरबस्तानातील मुलीला कदाचित बुरखा घालावा लागत असेल तर अमेरिकेतील मुलीला कदाचित स्वतःच्या वयाच्या चौदाव्या वर्षी संततीरोधक साधने घेता येत असतील. पण 'हा मुलगा आहे, मी मुलगी आहे' (किंवा तसेच उलटे) या जाणिवा एका किमान पातळीवर समान असणार ना? एखादी व्यक्ती कोणत्या लिंगाची आहे याला काही महत्वच नसणे ही लिंगनिरपेक्षता नाही का?

=========

पुन्हा एकदा:

स्वाती आंबोळेंनी सांगितल्यानंतर माझ्या मनातील लिंगनिरपेक्षतेची एक व्याख्या मी निकालात काढली. पण अरुंधतींचे प्रतिसाद (जे नेहमीच संयत व माहितीपूर्ण असतात) वाचून मात्र (कदाचित आता सर्वांना कंटाळाच येईल असाच) प्रश्न पुन्हा पडत आहे की:

लिंगनिरपेक्षता व स्त्री पुरुष समानता यात नेमका फरक काय (हे स्पष्ट व नि:संदिग्ध शब्दात सांगता येईल काय)

धन्यवाद

-'बेफिकीर'!

गुड बेफि..... आय एक्स्पेक्टेड धिस फ्रॉम यू...

१. मला मान्य आहे (आहे म्हणजे काय, तसे आहेच ना....) की पृथ्वीवरील सर्व मुला-मुलींच्या लैंगिक जाणीवांत काही एक "किमान समान" प्रकारची लैंगिक जाणीव असणारंच. पण मुद्दा हा होता, की त्या-त्या ठिकाणचे संशोधन त्या-त्या ठिकाणीच सर्वसाधारणपणे उपयोगी पडणारे असेल. उदाहरणार्थ, बांगलादेशातील ग्रामीण बँकेचे उदाहरण भारतात जसेच्या तसे नाही वापरता येणार. (एस. के. एस. मायक्रोफायनान्स वाल्यांनी काय घोटाळा करुन ठेवला, पाहिले ना?) त्याच प्रकारे, उदा. धारावीतील मुलांवरील संशोधनाचा त्या मुलांकरिताच उपयोग (सर्वसाधारणपणे) जास्त प्रमाणात करता येईल. (संतती-प्रतिबंधाचे उपाय शाळेत जाणार्‍या मुलांना सांगावे लागणे / न लागणे). बाकी, तुम्ही म्हणता ते काही प्रमाणात बरोबर आहेच, की ओरिसातील त्या मुलांच्या व आपल्या इतर शहरांतील मुलांच्या वा तुमच्या इंग्लंडातील मुला-मुलींच्या लैंगिक जाणीवांत एक काहीतरी समान धागा असणारंच. पण, अजून भारतात तरी एखादी "पापा डोन्ट प्रीच" वाली मॅडोना (माझ्या माहितीत तरी) तयार झाली नाहीये. किंवा, तुमच्या इंग्लंडसारख्या इथल्या तरुणी अजून तरी ब्रा-बर्निंग करीत नाहीयेत ! लैंगिक स्वातंत्र्याच्या संकल्पना अनेक ठिकाणी वेगवेगळ्या आहेतही.

२. मुळात तनया मोहंती यांचे संशोधन "विशिष्ट पॉप्युलर प्रकारच्या साहित्याचा मुला-मुलींच्या लैंगिक जाणीवांवर काय परिणाम होतो" अशा काही प्रकारचा आहे. वाढलेल्या स्त्री-पुरुषांच्या लैंगिक जाणीवांवर ते संशोधन केले गेलेच नाहीये. आपण सारे मात्र असे साहित्य सोडून स्त्री / पुरुष / इतर लिंगीय (!) माणसांच्या लैंगिकतेबद्दल मारे चर्चा करीत आहोत! याचा दोष आपल्या कुणाचाच नाहीये, कारण मुळात आपल्याला इथे सांगितलेल्या विषयाबद्दलच लेख लिहिले गेले आहेत आणि चर्चा सुरु आहे.

३. सध्या एवढेच. या कंटाळवाण्या विषयात इतुके सखोल लक्ष घातल्याबद्दल धन्यवाद !

ही चर्चा मायबोलीबाहेर सुद्धा औत्सुक्याचा विषय ठरली होती हे आठवलं.
सध्या काय परिस्थिती आहे ? किती जणांनी यातल्या "नव्या" गोष्टी आचरणात आणल्या ?

कि तत्वतः पुरोगामी, मुद्देगामी रॅशनल, लक्षवेधी सेन्सिबल याच पातळीवर आहेत बहुतेक ? Lol

Pages