'लिंगनिरपेक्ष ओळख - मैत्री' चर्चा

Submitted by संयोजक_संयुक्ता on 8 March, 2012 - 14:00

महिला दिन २०१२ च्या निमित्ताने घडवलेला निरभ्र : लिंगनिरपेक्ष ओळख-मैत्री परिसंवाद विशेषांक तुम्ही वाचला असेल किंवा वाचत असालच.

अंकामधे जाहिर केल्याप्रमाणे या विषयाच्या सर्व पैलूंवर सर्व बाजूने चर्चा होणे अतिशय गरजेचे आहे. त्याशिवाय विशेषांक पूर्ण होणार नाही.

या धाग्यावर लिंगनिरपेक्ष मैत्री - ओळख (आयडेन्टिटी) या विषयाची चर्चा करूया. चर्चा करताना काही थोडीशी पथ्ये पाळूया.
१. विशेषांकातल्या लेखांतले, लेखांबाहेरचे सर्वच मुद्दे घेऊन अवश्य चर्चा करू. विशेषांकामधे काय बरोबर नाही, संपादक मंडळाचे कुठे चुकते आहे याचा उहापोह इथे नको. तो त्या त्या लेखाच्या धाग्यावर करू.

२. आपली भाषा, आपण वापरत असलेली उदाहरणे या सगळ्यांचा सभ्यतेच्या संदर्भातून विचार करणे अतिशय गरजेचे. धागा मॉडरेटेड असणार आहे याची कृपया नोंद घ्यावी.

- संपादक मंडळ

विषय: 

रामा शिवा गोविंदा Happy त्या देऊळ चित्रपटात केशवला शेवटी 'देव म्हणजे काय' याचा स्वतःपुरता परिचय किंवा साक्षात्कार होतो,तसा बेफि़कीर यांना 'लिंगनिरपेक्षता म्हणजे काय' याचा साक्षात्कार होवो हीच त्या देवाचरणी प्रार्थना Happy Happy बेफिकीर, प्लीज दिवे घ्या.
जोक्स अपार्ट , पण अगो यांचा लेख सुस्पष्ट होता खूपसा.त्या नोटवर चर्चा पुढे जायला हवी होती असं वाटलं (परंपरेने दिलेला चष्मा काढायचा का/गरज आहे का/ कितपत काढणे जमेल्,आवडेल प्रत्येकाला, असे काहीसे) म्हणजे सुरवातीच्या पोस्ट्स मध्ये या शब्दाविषयीचा पुरेसा ऊहापोह आणि स्त्री-पुरुष समानता आणि लिंगनिरपेक्षता यांच्यातील थोडासा फरक , याविषयी व्यवस्थित स्पष्टीकरण झाले होते असे मलातरी वाटले.असो.

अंकामधे जाहिर केल्याप्रमाणे या विषयाच्या सर्व पैलूंवर सर्व बाजूने चर्चा होणे अतिशय गरजेचे आहे. त्याशिवाय विशेषांक पूर्ण होणार नाही.>>

अशी चर्चा का होत नसावी?

<<अगो यांचा लेख सुस्पष्ट होता खूपसा.त्या नोटवर चर्चा पुढे जायला हवी होती असं वाटलं (परंपरेने दिलेला चष्मा काढायचा का/गरज आहे का/ कितपत काढणे जमेल्,आवडेल प्रत्येकाला, असे काहीसे) म्हणजे सुरवातीच्या पोस्ट्स मध्ये या शब्दाविषयीचा पुरेसा ऊहापोह आणि स्त्री-पुरुष समानता आणि लिंगनिरपेक्षता यांच्यातील थोडासा फरक , याविषयी व्यवस्थित स्पष्टीकरण झाले होते असे मलातरी वाटले.असो.>>

त्यावेळी मी भलताच अर्थ घेऊन त्यावर लिहीत होतो, आता जो अर्थ योग्य असावा तो घेऊन लिहीत आहे त्यामुळे अगो यांच्या लेखातील अनेक मुद्दे (जसे संगोपन इत्यादी) (जरी आता त्या लेखावर जाऊन हे लिहीत नसलो तरी) पटू लागतात कारण अर्थच वेगळा घेत होतो मी

पण एक परिसंवाद म्हणून 'सर्व पैलूंवर चर्चा होणे' हे होत का नाही?

दुसरे पैलू कोणते हेही आता चर्चेला घ्यायला हवे की

<पण एक परिसंवाद म्हणून 'सर्व पैलूंवर चर्चा होणे' हे होत का नाही?>

एक पैलू (शब्दाचा अर्थ) घासतानाच अवजारे कामी आली .

>>समजा ऑफीसमधून घरी आलेला नवरा बायकोला प्रेमाने वागवत आहे व माणूस म्हणूनही वागवत आहे पण तिला आल्या आल्या चहा करायला सांगत आहे. (येथे उदाहरणापुरते हे गृहीत धरले की...) त्या पत्नीला चहा नवर्‍याने स्वतःचा स्वतः करून प्यावा असे वाटत आहे, तर ते माणूसपणे न वागवले जाण्याचे निदर्शक ठरेल का? माणूस म्हणून वागवल्यानंतरही जे अनेक शतकांपासून निर्माण झालेले समज (चुकीचे अथवा काही वेळा काही ठिकाणी योग्य) हे जातील असे कुठे?>>
मला कळले नाही.
नवरा जर का बायकोला प्रेमाने आणि माणूस म्हणूनही वागवत असेल तर त्यांचे नाते सामंजस्याचे असेल ना. ऑफिसमधून घरी आल्यावर आयता चहा मिळावा असे वाटण्यात गैर काहीच नाही. तसे कुणालाही वाटू शकते. जोडीदाराचा मूड असेल तर चहा करुन देइल किंवा मला कंटाळा आलाय/मी कामात आहे तुझा तू करुन घे असे सांगेल. आयता चहा मिळाला नाही म्हणून व्यक्ती थोडी हिरमुसली होईल पण बायको म्हणून हे तुझे कामच आहे असे नाही म्हणणार किंवा मी बायको आहे म्हणून माझ्याकडून आयत्या चहाची अपेक्षा केली जाते असे बायकोला नाही वाटणार.

माणूस म्हणून स्त्री व पुरुष दोघांनाही वागवले जावे व माणूसपणाच्या दृष्टीने परस्पर वागणूक असावी ही इच्छा.>>

या अरुंधती कुलकर्णींच्या विधानावरील हा प्रतिसाद होता Happy

मला असे म्हणायचे होते की माणूस म्हणून दोन्ही लिंगांना वागवले जाणे ही लिंगनिरपेक्षता नसून शुद्ध स्त्री पुरुष समानता आहे. (किंवा माणूसकी आहे)

(नंतर नीधप याही म्हणाल्या की समानतेबाहेरही लिंगनिरपेक्षतेची बरीच मोठी व्याप्ती आहे)

बेफिकीर, संपादक मंडळ व इतर मित्र-मैत्रिणींनो: Happy

लिंगनिरपेक्षता : Gender neutrality (adjective form: gender-neutral) describes the idea that language and other social institutions should avoid distinguishing people by their gender, in order to avoid discrimination arising from the impression that there are social roles for which one gender is more suited than the other.

अर्थातः
"लिंगनिरपेक्षता ही अशी कल्पना आहे की जी, भाषा आणि इतर सामाजिक संस्था या ठिकाणी, लोकांचा त्यांच्या लिंगावरुन (स्त्री/पुरुष/नपुंसक/इतर) भेद न करता याचे विश्लेषण करते की त्यांच्यात लिंगावर आधारित फरक टाळता येईल, जो अशा समजावर आधारित आहे की एक लिंग (स्त्री/पुरुष/नपुंसक/इतर) हे दुसर्‍या / इतर लिंगापेक्षा (स्त्री/पुरुष/नपुंसक/इतर) काही विशिष्ट सामाजिक सहभागात अधिक उपयुक्त आहे."

Happy

विकीपेडियाचा यासंबंधी धागा:

http://en.wikipedia.org/wiki/Gender_neutrality

खूपच छान धागा...!
काही मुद्दे सूचित करावेसे वाटतात.

१. निसर्ग लिंगनिरपेक्ष नाही. जसा अंधार आहे म्हणून उजेडाला अर्थ आहे, खोलीमुळे उंचीला अर्थ आहे, प्रोटोन मुळे इलेक्टरोन ला अर्थ आहे, नसण्यामुळे असण्याला अर्थ आहे, तसा स्त्री मुळे पुरुषाला अर्थ आहे. ज्या दोन गोष्टी एकमेकांशिवाय निरर्थक ठरतात, त्यांच्यात निरपेक्षता कशी असू शकेल? उद्या जर binary मध्ये 0 आणी 1 मध्ये निरपेक्ष भाव मांडायला गेलो तर कसं शक्य होइल ते?

२. निरपेक्षतेपेक्षा लिंगसापेक्ष भाव, मर्यादा, महत्व, कर्तव्य या गोष्टी स्त्री, पुरुष दोघांनी समजुन घेतल्या पहिजेत. या गोष्टी देखील, देश, भाषा, धर्म, कर्म यांच्या अन्वये बदलत असतात. त्यांच्यात तुलना नसावी.

३. मुळात लिंगसापेक्ष वर्तन म्हणजे भेदभाव असा रोखच नसावा मुळी. आणि मुळात भेदभाव होतो/असतो हेच या चर्चेचे किन्वा विषयाचे कारण असावे. सगळ्यांशी समान वागून कसं चालेल? प्रत्येकाचे roles वेगळेच system मध्ये! मग ओळख आणि मैत्री यात लिंगनिरपेक्षता कशी येइल?

धन्यवाद!!!

सर्वप्रथम सर्वांना धन्यवाद. वाद वाचून वाचून धन्य झालो होतो! आत्ता कुठे गाडी जरा रुळावर येते आहे वाटते.

इंग्रजीचा अनुवाद कदाचित थोडाफार डावी-उजवीकडे गेला असण्याची शक्यता आहे, कारण पुन्हा हेच, की विकीपेडिया वर सर्वसाधारणपणे कुठल्या अंगाने हे लिहिले आहे ते मला पूर्णपणे ठाऊक नाहिये. तरीही, माझा अंदाज आहे की मी "सर्वसाधारणपणे" बरोबर अनुवाद केला आहे. तुम्हीच ठरवा.................

आद्या, माझ्या या विषयावरील लेख जरुर वाचा. माझाही अगदी हाच रोख आहे.

एक गंमत जाणवली. या चर्चेच्या निमित्ताने जी मंडळी (स्त्री/पुरुष्)/इतर) इथे चर्चा करीत आहेत, त्यांच्या लिहिण्यावरुनच त्यांच्या स्त्री/पुरुष असण्याचा गंध येत आहे, नाही का?

>> समानतेपेक्षा बरीच जास्त म्हणजे नेमकी काय

मला समजल्याप्रमाणे उदाहरणे.

मध्यंतरी इथे मुलीबायकांना टॉपलेस फिरण्याची परवानगी का नाही म्हणून निदर्शने झाली. (कायद्याने गुन्हा आहे.) त्यासाठी पत्रके वाटणार्‍या मुली (आणि मुले) टॉपलेस होती. मग पोलिसांनी येऊन मुलींना शर्ट घालण्याची विनंती केली आणि थोड्या वादानंतर मुलींनी शर्ट घातले.
तर इथे निदर्शने स्त्रीपुरुष समानतेसाठी. माणूस म्हणून समान हक्क हवे यासाठी.

त्यात जास्तीचे म्हणजे आपले स्वतःचे वागणे व इतरांना वागवणे घातले की लिंगनिरपेक्षता. उदा. मित्र/मैत्रिणीला प्रेमाने मिठी मारल्यावर वैषयिक भावना न जाणवणे. सानीच्या लेखात लिहिल्याप्रमाणे जर्मनीतील स्नानगृहे. जर स्नानगृहात स्त्रियांसाठी वेगळी व्यवस्था असती, तर ती समानता झालीच असती. पण एकत्र व्यवस्था _आणि_ त्यात कोणाला संकोच न वाटणे ही लिंगनिरपेक्ष व्यवस्था.

मध्यंतरी इथे मुलीबायकांना टॉपलेस फिरण्याची परवानगी का नाही म्हणून निदर्शने झाली. (कायद्याने गुन्हा आहे.) त्यासाठी पत्रके वाटणार्‍या मुली (आणि मुले) टॉपलेस होती. मग पोलिसांनी येऊन मुलींना शर्ट घालण्याची विनंती केली आणि थोड्या वादानंतर मुलींनी शर्ट घातले.
तर इथे निदर्शने स्त्रीपुरुष समानतेसाठी. माणूस म्हणून समान हक्क हवे यासाठी.>>

सॉमरसेट येथे टॉपलेस फिरणे हा हक्क वाटतो हे अद्भुत आहे

वेगवेगळे परीघ, व्यास एक आपला
एवढाच दैवदुर्विलास एक आपला

सॉमरसेट नाही हो फक्त. इंग्लंडभर होती बहुतेक. मी बातमी बघितली ती बहुतेक मँचेस्टर भागातली होती.
ते असो. तुम्हाला फरक पटला का?

अहो आम्हा पुरुषांकडेही वासनेने पाहणार्‍या स्त्रिया असतात हो, त्यांचे काय करायचे?

नाही तुम्ही मंडळींनी विषय काढलाच आहे, तर माझे म्हणणे हेच की पुनःपुन्हा लैंगिक वैषयिक वासनेकडे तुम्ही विषय नेताय, त्याचे कारणच मुळात हे आहे की, आपली लैंगिक ओळख घट्ट असते. ती मेल्यावरच सुटू शकते. वैषयिक वासना असणे चूक किंवा बरोबर नसते. तशी ती असते हे महत्त्वाचे. लिंगनिरपेक्षता (किंवा कुठलीही गोष्ट) ओढूनताणून आणण्याचा प्रयत्न चुकीचा आहे. नैसर्गिकरित्या आपण (स्वयंस्फूर्तीने) जे इतर लिंगियांशी वागतो, तेच खरे असते, तसेच वागावे.

मुळात स्त्री-पुरुष समानता आणि लिंगनिरपेक्षता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एका बाजूला स्त्री व पुरुष यांनी एकत्र येऊन समाज घडवावा ही कल्पना तर दुसर्‍या बाजूला स्त्री व पुरुष यांनी एकत्र येऊन समाज निर्मिती करावी ही कल्पना, दोन्ही एकाच वेळी अस्तित्वात असतात. एकाच वेळी निसर्गाची ही दोन्ही कामे सुरु असतात. त्यांची उगीच फारकत करण्याचा प्रयत्न करु नये.

समाजात स्त्रियांना जर दुय्यम स्थान मिळत असेल तर सर्वप्रथम दोष स्त्रियांकडेच जातो. याचे कारण सो कॉल्ड कल्पना पुरुषांनी लादल्या त्यापेक्षा स्त्रियांनी लादून घेतल्या आहेत.

पुरुष कमकुवत असतात, त्यांनाही आधाराची गरज असते. म्हणून पुरुषांनी "पुरुष-मुक्ती" वगैरे करावी काय?

आद्या,

>> ३. मुळात लिंगसापेक्ष वर्तन म्हणजे भेदभाव असा रोखच नसावा मुळी. आणि मुळात भेदभाव होतो/असतो हेच
>> या चर्चेचे किन्वा विषयाचे कारण असावे. सगळ्यांशी समान वागून कसं चालेल? प्रत्येकाचे roles वेगळेच
>> system मध्ये! मग ओळख आणि मैत्री यात लिंगनिरपेक्षता कशी येइल?

मला वाटतं की लिंगनिरपेक्षता ही अमूर्त संकल्पना आहे. त्यामुळे ती व्यवहारात मूर्तपणे उतरणं शक्य नाही. थोडक्यात म्हणजे पुरुषाने पुरुषासारखं वागावं आणि बाईने बाईसारखं. पण पुरुष आणि स्त्री दोघांनाही वागवावं माणसासारखं. त्यांना भिन्न वागणूक द्यावी ती केवळ सोय म्हणून. अन्यथा दोन्ही एकाच आत्म्याची (किंवा एकाच मनुष्यजातीची म्हणा हवं तर) दोन रूपे आहेत हे सदोदित ध्यानी असू द्यावं.

आता असं बघा की एखादा बालोन्मत्तपिशाच्चवत् योगी सार्वजनिक ठिकाणी विवस्त्रपणे बसून असतो. याचं कारण तो निर्लज्ज असतो हे नाही. त्याला देहभान नसल्याने तो लाजेच्या पलीकडे गेलेला असतो. अश्या स्थितीला लज्जातीत ही संज्ञा चपखल ठरावी. त्याचप्रमाणे लिंगनिरपेक्ष या शब्दाचा अर्थ लिंगविहीन असा (मूर्त) न घेता लिंगातीत असा (अमूर्त) घ्यावा.

असं आपलं मला वाटतं.

आ.न.,
-गा.पै.

मुळात जर एखादी संकल्पना समजून घ्यायची मानसिक तयारी असेल तर त्याबद्दल विचार, वाचन, चर्चा करून, त्याबद्दल वास्तवातील उदाहरणे पाहून, जाणून त्याविषयी माहिती मिळवता येते.
येथे उपक्रम - विशेषांकाद्वारे मांडलेली जेंडरलेस (लिंगनिरपेक्ष) ओळख, मैत्री याबद्दलच्या चर्चेत शब्दच्छल जास्त व मुख्य विषयाला बगल देऊन फाटे फोडण्याचे प्रकार चाललेत असे वाटते.

जेंडरलेस ओळख जिथे म्हणतो तिथे सामाजिक संकेतांनुसार स्त्री व पुरुषांबद्दलच्या ज्या पूर्वग्रहयुक्त धारणा आहेत त्यांना ओलांडून किंवा छेदून स्त्री-पुरुषांना एक व्यक्ती - एक माणूस म्हणून जगता यावे अशी अपेक्षा आहे व असते. त्यात समानतेपेक्षा केवळ पूर्वग्रहावर आधारित समजांमुळे त्या त्या व्यक्तीला एका ठराविक साच्यातील आयुष्य जगावे लागते त्यापासून मुक्ती अभिप्रेत आहे. स्त्री व पुरुष या जेंडरने बांधलेल्या सामाजिक ओळखीमुळे एड्स, एच आय व्ही यांसारख्या गंभीर आजारांबाबत व कुटुंब नियोजनासारख्या महत्त्वाच्या बाबतीत अनेक अडसर निर्माण होतात हे आजवरच्या अनेक अभ्यासकांनी मांडलेले निष्कर्ष आहेत.

असे जेंडरवर आधारित काही (गैर)समज :

# स्त्रियांच्या सहभागाशिवाय पुरुष बालसंगोपन करू शकत नाहीत.

# स्त्रिया विश्लेषणात्मक कामे करू शकत नाहीत.

# पुरुष संवेदनशील नसतात.

# स्त्रियांनी अमका तमका व्यवसाय करणे / शिक्षण घेणे उचित - अनुचित / पुरुषांनी अमका तमका व्यवसाय करणे उचित - अनुचित

# स्त्रियांनी अमक्या तमक्या विषयावर मत व्यक्त करणे / बोलणे निषिद्ध.

# पुरुष स्वयंपाक करू शकत नाहीत. स्त्रीच उत्तम स्वयंपाक करू शकते.

# पुरुषांना घरकाम जमत नाही. त्यांना त्यात रुची नसते.

एखाद्या जेंडरविषयीचे पूर्वग्रह झटकून टाकणे किंवा त्यांच्याकडे पूर्वग्रहरहित दृष्टीने पाहणे म्हणजे स्त्री-पुरुष समानता राबविणे असे होत नाही.

याबद्दलच्या चर्चेत शब्दच्छल जास्त व मुख्य विषयाला बगल देऊन फाटे फोडण्याचे प्रकार चाललेत असे वाटते.>>

हंहं

जेंडरलेस ओळख जिथे म्हणतो तिथे सामाजिक संकेतांनुसार स्त्री व पुरुषांबद्दलच्या ज्या पूर्वग्रहयुक्त धारणा आहेत त्यांना ओलांडून किंवा छेदून स्त्री-पुरुषांना एक व्यक्ती - एक माणूस म्हणून जगता यावे अशी अपेक्षा आहे व असते. >>

हे

त्यात समानतेपेक्षा केवळ पूर्वग्रहावर आधारित समजांमुळे त्या त्या व्यक्तीला एका ठराविक साच्यातील आयुष्य जगावे लागते त्यापासून मुक्ती अभिप्रेत आहे. >>

हे

यात फरक आहे याची काही उदाहरणे कृपया दिली जावीत

प्रामाणिकपणे विचारत आहे.

व्यक्ती म्हणून / माणूस म्हणून जगता येणे आणि ठराविक साच्यातील जगणे जगावे न लागणे यात नेमके फरक काय हे उदाहरणासहीत स्पष्ट व्हावे अशी विनंती

ती उदाहरणे सर्वांना पटली तर बरोबर, नाहीतर 'फाटे फोडले जात आहेत' अशा स्वरुपाची विधाने मागे घेतली जातील अशी नम्र अपेक्षा आहे

जेंडरलेस ओळख जिथे म्हणतो >>

जेन्डरलेस म्हणजे लिंगनिरपेक्ष की लिंगविरहीत?

'लेस' (एल ई डबल एस ) चा अर्थ 'विरहीत' असा होतो

जेन्डरनॉनरिलेटीव्ह असे म्हणायचे आहे का?

परिसंवाद =

एक दुसर्‍याला उद्देशून काय म्हणतो, यावर दुसर्‍याचे म्हणणे विचारले जाणे व व्यक्त करण्यास मदत करणे आवश्यक

असो

हे 'आधीचे' स्पष्टीकरण

हे समज कुणाचे आहेत????????????????????

# स्त्रियांच्या सहभागाशिवाय पुरुष बालसंगोपन करू शकत नाहीत.>>>

विधुर जगात उपलब्ध आहेत. बालसंगोपन (आई वडील दोघेही असूनही न होणे) याबाबत आपला सर्व्हे काहीच म्हणताना दिसत नाही.

# स्त्रिया विश्लेषणात्मक कामे करू शकत नाहीत.

(विश्लेषणातक म्हणजे काय? नाही समजले. आणि असा समज कोणाचा आहे? खेड्यापाड्यात असणे हेही बरोबरच, पण आजकाल तर खेड्यापाड्यातून महिलाच लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येत विश्लेषणात्मक कार्य करताना दिसत आहेत)

# पुरुष संवेदनशील नसतात.

Lol

(पुरुष कवीही असतात)

# स्त्रियांनी अमका तमका व्यवसाय करणे / शिक्षण घेणे उचित - अनुचित / पुरुषांनी अमका तमका व्यवसाय करणे उचित - अनुचित

(हे कुठे चालते? बिहार, यू पी, खेडीपाडी वगैरे ? मग ते लोक कुठे आहेत या चर्चेत? चर्चा करणारे तर त्या अधिकारांबाबत अधिकारवाणीने बोलताना दिसत आहेत. म्हणजे हा उपक्रम पुरेसा व्यापक नाही असे म्हणावे का?) (शहरी लोकांच्या मतीला खाद्य म्हणून आहे का, असे)

# स्त्रियांनी अमक्या तमक्या विषयावर मत व्यक्त करणे / बोलणे निषिद्ध.

(अरे बापरे, इथेच बघा)

# पुरुष स्वयंपाक करू शकत नाहीत. स्त्रीच उत्तम स्वयंपाक करू शकते.

(ऐतिहासिकरीत्या आचारी पुरुषच असायचे)

# पुरुषांना घरकाम जमत नाही. त्यांना त्यात रुची नसते.

अशा सर्व तथाकथित समजांवरून एकदम लिंगनिरपेक्षता या संज्ञेकडे वाटचाल जरा साहसीच वाटते मला तरी

वर उदाहरणेच दिली आहेत व ती जेंडरवर आधारित (गैर)समजांवर आहेत.

जेंडरलेस ओळखीत त्या व्यक्तीला ती स्त्री/पुरुष आहे यावर ती बालसंगोपन करू शकते का, कोणता व्यवसाय - शिक्षण - नोकरी पत्करू शकते का, कोणत्या कार्यात सहभागी होऊ शकते का, स्त्री-पुरुषांबद्दलच्या प्रस्थापित सामाजिक संकेतांनुसार वा रुढींनुसार वर्तन करते का, स्त्री/ पुरुष असण्यावरून तिची बौद्धिक क्षमता, तिची कुवत इ. इ. यावर त्या व्यक्तीची योग्यायोग्यता, तिची ओळख ठरविली जाणार नाही : त्या व्यक्तीतर्फेही व इतरांतर्फेही.

तसेच ती व्यक्ती स्त्री/पुरुष आहे यावरून तिने गृहसदस्यांच्या आरोग्याच्या बाबतीत / स्वतःच्या आरोग्याच्या बाबतीत निर्णय घेणे - न घेणे हे तिच्या स्त्री/पुरुष असण्यावर अवलंबून असणार नाही. हीच गोष्ट आर्थिक, कौटुंबिक निर्णयांबद्दलही लागू. समाजात त्या व्यक्तीला वावरताना ती स्त्री/पुरुष म्हणून अडसर येणार नाही, अडचण - खोळंबा - कुचेष्टा सहन करावी लागणार नाही. तिचा ती केवळ स्त्री/पुरुष आहे म्हणून अवमान केला जाणार नाही. ती स्त्री/पुरुष आहे व ती व्यक्ती तिच्या दिलेल्या/ ठरविल्या गेलेल्या 'रोल' व्यतिरिक्त वागली म्हणून तिची भर दिवसा नागव्याने गावातून धिंड काढली जाणार नाही किंवा तिला अन्य प्रकारे अवमानित केले जाणार नाही. तिला ठराविक (धार्मिक) ठिकाणी प्रवेश निषिद्ध केला जाणार नाही. ती व्यक्ती स्त्री/पुरुष आहे यावरून त्या व्यक्तीबाबत ''नीती - अनीती''च्या संकल्पना व नियम ठरणार नाहीत.

जेंडरलेस ओळखीत त्या व्यक्तीला ती स्त्री/पुरुष आहे यावर ती बालसंगोपन करू शकते का, कोणता व्यवसाय - शिक्षण - नोकरी पत्करू शकते का, कोणत्या कार्यात सहभागी होऊ शकते का, स्त्री-पुरुषांबद्दलच्या प्रस्थापित सामाजिक संकेतांनुसार वा रुढींनुसार वर्तन करते का, स्त्री/ पुरुष असण्यावरून तिची बौद्धिक क्षमता, तिची कुवत इ. इ. यावर त्या व्यक्तीची योग्यायोग्यता, तिची ओळख ठरविली जाणार नाही : त्या व्यक्तीतर्फेही व इतरांतर्फेही.>>>

आधी 'जेन्डरलेस' म्हणजे काय ते सांगाल का? मी मराठी माध्यमात शिकूनही त्या भाषेचा पुरेसा अभ्यास केलेला नाही.

तुम्ही जे बोलताय ते स्त्री पुरुष समानतेपलीकडे काही आहे का?

मला वाटत नाही.

(मला काय वाटते हा प्रश्नही असू शकत नाही म्हणा)

पण तुम्ही जे बोलताय ते माणूसकी आणि समानता या पलीकडे नाही Sad

अरुंधती,

काहीतरी नवीन सांगा

पेशवा/बेफिकीर,
तुमचे या विषयासंबंधी नसलेले प्रतिसाद अप्रकाशीत केले आहेत. तुमचे वैयक्तिक वाद इथे नकोत.

मला एकूणच इथेच नाही तर हल्ली केव्हाही वाद्-विवादासाठी किंवा परिसंवादासाठी विषय दिला जातो तेव्हा जो एक प्रश्ण पडतो, तोच प्रश्ण ह्या परिसंवादाच्या विषयावर विचार करतानाही आलाच.
कोणत्याही विषयाच्या 'वादी आणि प्रतीवादी' अश्या दोन्ही बाजूंनी मुद्दे मांडून उत्तम वाद्-विवाद साधता येतो.
पण असं करताना 'आपण जो विचार करतो/जसं वागतो' त्याच बाजूनी कायम मुद्दे मांडावेत अशी अपेक्षा असते का? किंवा स्वतःकडूनही तशी अपेक्षा ठेवावी का?
की एक अनुकूल आणि एक प्रतिकूल अश्या कोणत्याही बाजूने विचार करून मुद्दे मांडता यायला हवेत.

मी हे इथे लिहिण्याचं कारण वरची (किंवा मायबोलीवरची अजूनही काही ठिकाणची) चर्चा वाचून परत जाणवलं की 'खूप सुसंगत चालू झालेल्या चर्चा अनेकदा पुढे - मी विचार करतो/करते, वागतो/वागते तेच फक्त योग्य' या टप्यावर येतात. मग माझ्यासारखीला 'इतकं ठामपणे 'मीच बरोबर' म्हणणारे लोकं प्रत्यक्ष आयुष्यात वागताना इतकेच ठाम , निश्चित असतात का ? असा प्रश्ण पडतो.

लिंगनिरपेक्षतेबद्दलच्या ह्या परिसंवादात मत मांडताना तुम्ही 'आचार्/विचार' मांडले आहेत की वाद्-विवाद विषय म्हणून मत व्यक्त केली आहेत ?
आणि आचार्/विचार मांडले असतील तर तुमच्या आयुष्यात तुम्ही ते खरोखरच इतक्याच ठामपणे आचरणात आणता का?
मला खरंच कुतुहल आहे या सगळ्याबद्दल Happy

>>आणि आचार्/विचार मांडले असतील तर तुमच्या आयुष्यात तुम्ही ते खरोखरच इतक्याच ठामपणे आचरणात आणता का>><<

हा योग्य प्रश्ण आहे.

नाहीतर सांगायला म्हणून सांगायचे की , मी लिंगनिरपेक्ष वागायला कठिण नाही, ते इतकं सोपं जसं चष्मा काढला की झालं... वगैरे मला तरी पटत नाही.

नुसत्या चर्च्या करायच्या असतील तर गूगलून मी सुद्धा वाख्या शोधून काढून लिहु शकते.
पण जी गोष्ट मी खर्‍या जीवनात कशी उतरवते ह्या विषयाशी निगडीत तरच त्याला अर्थ.

नाहीतर नुसत्या स्वपनिक संकल्पना चर्चण्यात काय अर्थ?

Pages