निसर्गाच्या गप्पा (भाग - ६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 February, 2012 - 01:28

निसर्गाच्या गप्पांच्या धाग्याचा ६ वा भाग चालू होत आहे. त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत
२८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग) स्मित

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आधीची सगळी गप्पांची पानं वाचुन होइपर्यंत कदाचीत नवीन धागा निघेल.. Happy

सगळ्याच पोस्टी मस्त आहेत...

जागू, सळसळत जाणार्‍या सापाचा फोटो काढणं खूपच अवघड असतं. मागे 'ह्यां'च्या ऑफिससमोरच्या रस्त्यावर एक धामण चालली होती; ८-१० जण काठी घेऊन उभे होते; सगळ्यांनी तिला मारायचा प्रयत्न केला पण एकाचीही काठी तिला लागली नाही; ती त्यांच्या मधून पळून गेली.
तुझ्या धाडसाचं कौतुक करावं तितकं थोडं आहे.

हो गं जागू; खरंच आहेस.

प्र-ताय कोड्याचं उत्तर द्या की

<<<फुगाच आहे - ज्या बाजूला रंगवलाय त्याच्या विरुद्ध बाजुला कशावर तरी घासल्यामुळे त्याच्यात स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी निर्माण होऊन त्या सनमायका / फॉर्मायकावर चिकटून बसलाय.>>>>
शशांकजीनी स्पष्टीकरणासहीत ऊत्तर दिल्यामुळे त्यांना पूर्ण मार्क्स देण्यात येत आहेत.
काल माझ्या मुलाने काहीतरी टी.पी. करताना सहज गंमत म्हणून केलेली करागिरी. त्यानेच मला माबोवर टाकायला सांगितले म्हणुन ईथे टाकले. अजून एक.....
Baloon 2.jpg

सर्वांचे आभार.

ॐ नमः शिवाय... महाशिवरात्रीच्या शुभेच्छा..
वा.. हे बरे केलेस जिप्सी..

गेल्या वेळचा अनुभव सुंदर होता. सर्वत्र गर्दी मग जावे कुठे असा विचार मी आणि शमी करत होतो... अचानक लक्ष्यात आले माहुली गाव.. Happy गाडी काढली आणि सरळ ४० मिनिटात सर्व सामान घेऊन माहुली गावात पोचलो. अजिबात गर्दी नव्हती. शांतपणे शंभू महादेवाची पूजा करता आली.

सरळ ४० मिनिटात सर्व सामान घेऊन माहुली गावात पोचलो. अजिबात गर्दी नव्हती. शांतपणे शंभू महादेवाची पूजा करता आली.>>>>>मस्तच रे Happy

आज नैरोबीत पण आम्ही देवळात जाऊन आलो. इथे ठंडाईचा प्रसाद असतो. रात्री जेवण असते.
---
मी वर उल्लेख केलेय ते पुस्तक (साप आपला सोबती) रत्नागिरीच्या प्रा ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी लिहिले आहे.

त्यात त्यांनी अनेक गैरसमजांचेही निराकरण केलेय.
उदा. एक साप मारला कि बाकिचे साप मागावर येतात, असा सार्वत्रिक समज आहे.
सापाची दृष्टी आणि स्मरणशक्ती दोन्ही कमी असल्याने त्या बळावर तो कुणाला लक्षात ठेवून त्याच्या मागावर राहिल याची शक्यताच नाही. पण तरीही असे घडू शकते, याचे
कारण त्यांनी दिले आहे ते असे.

सापाची मादी माजावर आली, कि ती आपल्या शरीरातून एक प्रकारचा गंध सोडते आणि त्यावर आकृष्ट होऊन अनेक नर तिच्या मागावर असतात. समजा दुर्दैवाने मादी काठीने मारली, तर त्या काठीलाही तो गंध लागतो आणि त्या गंधाच्या मागावर, चार पाच नर येऊन, त्या काठीला विळखा घालणे सहज शक्य आहे.
असे नर मग आयतेच ताब्यात सापडून, मारले जातात. हा गंध अगदी सूक्ष्म असतो पण त्या जातीच्या नरांना तो दूरवर येऊ शकतो. या शक्यतेतून, एक साप मारल्यास, सात साप मागावर येतात, असा गैरसमज पसरला.

छान माहीती.. स्मित साप डुख धरतात हे गैरसमज खुप आहे आपल्याकडे.>>>>> +१
शहरात जे पूर्वी गारुडी फिरायचे ते ही त्यांच्याजवळील सापांचे फार हाल करायचे. सापाच्या तोंडाला दोन्ही बाजूने मिशांसारखे केस लावतात - कसे तर ते केस त्या सापाच्या तोंडाला शिवलेले असतात - चक्क सुई वापरुन.........:(
सध्या असे गारुडीच दिसत नाहीत व सर्पमित्र मंडळी अशा मंडळींना मज्जाव करतात लगेच.

पुण्यात जे सर्पोद्यान आहे तिथे पूर्वी - मे महिन्याच्या सुट्टीत ज्या विद्यार्थ्यांना साप हाताळायची इच्छा आहे त्यांना काही प्राथमिक शिक्षण द्यायचे - सध्या काय स्थिती आहे माहित नाही.

आणखी एक गैरसमग म्हणजे नागमणी. साऊथच्या काही सिनेमात तर मी तो चक्क बघितलाय Wink

त्याबद्दल प्रा म्हात्रे लिहिताहेत. जंगलात रात्री साप दिसल्यावर त्याच्या फणीमागे एखादा काजवा दिसू शकतो. किंवा काही सापांचे खवले चमकदार असल्याने, त्यावरुन चंद्रप्रकाश परावर्तित होऊ शकतो.
दुसरी शक्यता म्हणजे, साप मेल्यावर त्याच्या कातडीचे वगैरे विघटन झाले तरी मणके तसेच राहू शकतात आणि डोक्यातील विषग्रंथींतल्या विषाचे स्फटीक बनू
शकतात. आणि ते मण्यासारखे दिसू शकतात. अर्थातच सापाकडे कुठलाही मणी
नसतो.

दिनेश, त्या ऑकलंड बीचच्या फोटोतील #२८ मधल्या जोडप्याला नि.ग.वर यायचे आमंत्रण द्यायचेत. Happy माणसांच्या ऐवजी पक्षांच्या साक्षीने लग्न करणे म्हणजे ते दोघे खरेच निसर्गप्रेमी असणार.

बरेच दिवस झाले, पुण्यात घोले रोडवरचं मोहाचं झाड बघायचं होतं. काल मैत्रिणीबरोबर गेले आणि शोधूनच काढलं. कालची संध्याकाळ सार्थकी लागली!!
शबरी हॉटेल कडून बालगंधर्वकडे यायला लागलो की १०० मीटर्सवर उजव्या हाताला हा मोह आहे. आम्ही दोघी आधी बालगंधर्व कडून शबरीकडे येत होतो; अचानक आम्हाला आंबेमोहोराच्या तांदुळाचा वास आला. आम्हाला वाटलं की पोती घेऊन एखादा टेंपो गेला असेल. इतका घमघमाट सुटला होता. आणि अर्थातच येता येता प्रत्येक झाड बघत येत होतो. पण मोह दिसला नाही. मग उलट प्रवास सुरू केला; आणि त्याच ठिकाणी परत तो आंबेमोहोराचा सुगंध यायला लागला. मग नीट निरखून वर बघितलं तर................. मोह!! लागलीच त्याचे फोटो काढले.

warli 004.jpgwarli 006.jpg

तिथून आघारकर इन्स्टीट्यूट जवळच आहे. मैत्रिणीला सेमला कांचन बघायचा होता म्हणून तिथे गेलो. हा वृक्ष खूपच प्रचंड आहे; आणि कंपौंडच्या अगदी कडेला लावलेला अस्ल्यामुळे सस्त्यावरून सहज दिसतो. त्यामुळे काल संस्थेला सुट्टी असली तरी काहीच प्रश्न नव्हता. याच्याच जवळ कांचनराज हा पण वृक्ष आहे. तो बघताना आम्हाला ही वेल दिसली. तिची फुलं बघून फांदी तोडायचा मोह आवरला नाही. मग काय पटकन खाली आलेली छोटी फांदी तोडली आणि घरी येई पर्यंत ती सुकेल म्हणून लगेच फोटो काढले.

warli 003_0.jpg

मात्र घरी आल्यावर ह्या वेलीचे नाव शोधले तेव्हा कळाले हिचे नाव विषव्ल्लरी!
पण मंडळी आम्ही २०-२५ इतरही झाडं बघितली. (फक्त त्याचसाठी बाहेर पडलो होतो.) खूप मज्जा आली.

शांकली, वेली, फुले खुपच छान आहेत...:)
दिनेशदा, सगळे फोटो अतिशय सुंदर आलेत.. खुप आवडले.. सापांबद्द्लची माहिती पण मस्तच...
जिप्सि, महादेवाचे छान दर्शन घडवलेत... Happy

अरे वा. मी जवळजवळ पूर्ण सिझनभर मोहाच्या झाडाच्या सहवासात होतो. (त्याच नावाची माझी एक कथा पण होती, इथे ) त्यावर अगदी पहाटे पहाटे पक्ष्यांचा डल्ला
पडतो.
ती फुले घालून भात आणि भाकरी पण छान होते. पण घरात फुले ठेवली तर असह्य
होईल एवढा गंध सूटतो.

ती विषवल्ली, मुंबईच्या राणीबागेत सिंहीणीच्या पिंजर्‍यावर आहे. भरभरुन फुलते तिथे.
नावाबाबत मात्र गूढ आहे.

मी खुप दिवसांनी आले आज इथे..

माझ्या घरच्या कुंडित ४ कारली आणि ५ टोमॅटो आले आहेत.

ह्या वर्षी टोमॅटोंचा साइज पण मस्त आहे Happy

मस्त वाटतं.

साधना..कमळ मस्तच ग Happy

धन्यवाद दिनेशदा आणि प्रीती. काल अजून एका वृक्षाच्या फळांचे फोटो काढले; रोहितकाच्या! त्याची फळं आता उकलली आहेत. आणि त्यातल्या बियाचा सडा झाडाखाली पडलेला असतो. याच्या फळांचे आणि हिरव्यागार पानांचे फोटो मी मागे इथे दिले होते. याच्या बिया खूप लालबुंद असतात. पण जरा केशरी रंगाकडे झुकणार्‍या रंगापासून अगदी लालचुटुक रंगापर्यंत व्हरायटी बघायला मिळते.
या उकललेल्या बियांचे फोटो.............

warli 018.jpgwarli 019.jpg

शांकली, हा लाल रंग म्हणजे पक्ष्यांना आमंत्रण. एवढी मोठी बी गिळू शकणारे मोठे पक्षी, या झाडावर नक्कीच येत असणार. शिवाय या फळातून बी बाहेर काढण्यासाठी त्यांची चोच पण खास बाकदार असणार. (पण मनात एक शंकाही येतेय, जर हे झाडच दुर्मिळ झाले असेल तर, पक्षीही विसरले असणार किंवा त्यांनी पर्याय शोधला असणार.)

आज खूप दिवसांनी नि ग वर आले ... सहाव्या भागाच्या शंभरापेक्षा जास्त प्रतिक्रिया आल्यात मला पत्ताच नाही! अभिनंदन सर्व निसर्गप्रेमींचं!
अजून सगळ्या गप्पा नीट वाचायच्यात. पण तो रोहितकाचा फोटो बघून आठवलं, शांकली, मागच्या आठवड्यात भांडारकर रस्त्याला, अगदी गुडलक चौकाजवळ एक झाड बघितलं अश्या बियांचं. तोच रोहितक आहे का? साधारण सोनचाफ्याएवढं झाड आहे.

नाही दिनेशदा, हा वृक्ष पुण्यात आता खूप लावला गेलाय. पण कोणते पक्षी यावर येतात हे माहिती नाही. आणि फळ उकललं की बिया सहजपणे मोकळ्या होतात. कारण याच्या खाली बियांचा सडा पडलेला असतो.
गौरी, अशा उकललेल्या बिया असतील तर नक्कीच रोहितक असणार. तुला बर्‍याच दिवसांनी इथे बघितलं.

Pages