धूर

Submitted by फडतूस on 19 February, 2012 - 13:19

समोरच्याच्या सिग्रेटच्या धुराची वलये,
नको तशी घुटमळतात
थेट भूतकाळात घेवून जातात........

अशी वलये... मी कधिच सोडली नाहीत.
कारण मी आहे सुसंस्कृत ,पांढरपेशी समाजाचा प्रतिनिधी
मला निषिद्ध आहेत असले विधि

दारु प्यायची नाही...
सिग्रेट ओढायची नाही..
तंबाखूचे नाव नको,
छचोरतेला वाव नको

जोराचा आवाज नको
फिल्मी अंदाज नको

अमुक वेळेस घर सोडावे
तमुकच्या आतच परत यावे

कपडे नकोत बहुरंगी
नको तमाशेपट जंगी

हे पुस्तक्,ते मासिक वाचू नये
नृत्य करावे,नाचू नये

हे काय जगणं आहे ? श्शी......

आता आपल्या अस्तित्वाची खूण दाखवायला हवी.,
आणि एक शिवी द्यायलाच हवी ,करकचून , दात ओठ खावून
आणि,.......आणि..
मनसोक्त धूर आत घ्यायलाच हवा,
एक मस्त सिग्रेट शिलगावून....

.
.
एक मस्त सिग्रेट शिलगावून.

-फडतूस

गुलमोहर: 

अशी वलये... मी कधिच सोडली नाहीत.
तर मग शिवीतली मजा, सिगरेट्ची लज्जत
कशी आली समजून
फक्त ऐकून?

कवितेवर किरण्यके ह्यांचा प्रभाव जाणवला.

सिग्रेटच्या वलयांचे चाकोरीबद्ध जगण्याशी जुळवलेले कोष्टक लक्षात आले नाही.

कवितेवर किरण्यके ह्यांचा प्रभाव जाणवला.>>>>

विदिपा
कविता किरण्यके यांची नाही ही खात्री बाळगा. ( तुम्हाला चांगलंच माहीत असावं ते ). माझी कुठलीच कविता य शैलीशी मिळतीजुळती नाही. माझ्या शैलीनेच कुणाला ड्युआय बनवून कविता लिहायची हुक्की आली असेल तर मला विश्वासात घेतलेलं जास्त चांगलं. एकतर मी करेक्शन करून देईन आणि नाव पण सांगणार नाही Biggrin प्रॉमिस !! पण न विचारताच लिहीली तर मग ते कसं जमायचं ? मी भावनांवर लिहीतो. किमान एकाला अरी भिडेल या उद्देशाने.. तीच मिसिंग आहे इथं Wink

आता एक शिवी द्यायलाच हवी ,करकचून , दात ओठ खावून

हे माझ्या लिखाणात येणं शक्य नाही. अगदी ड्युआय बनवला तरीही. त्याला ते मूळचंच रक्तात असावे लागते. तुम्हाला कस काय जाणवला माझा प्रभाव ?

धन्यवाद !

तुम्हाला कस काय जाणवला माझा प्रभाव ?>>>

जाणवला, आता काय कारणमीमांसा द्यावी Proud मांडण्याची शैली मला तशी वाटली.

रागावू नयेत.

कारणमीमांसा मला कळाली. -हस्व दीर्घ चेक करा मग तुम्हाला नेमका प्रभाव कुणाचा ते कळून येईल. शैली माझ्याशी मिळतीजुळती नाही आणि भाषाही...हे असं वैचारिक बैचारिक मी कवितेत मांडत नाही. देवाच्या दयेने इथं त्यासाठी गद्य लिखाणाची सोय आहे. ज्यांना मांडायचं त्यांना माझा विर्दोह नाही. तेव्हा पुन्हा एकदा क्लिअर करतो. उगाच माझ्यामागे भलते लचांड लावून देऊ नये ही नम्र विनंती.. काय म्हणता ? Proud

चांगली आहे कविता. न केलेल्या गोष्टींची लालसा - कदाचित कुतुहलापोटीही असू शकेल - मनात जन्म घेते कधीतरी. वावगं काही नाही त्यात.

pradyumnasantu | 20 February, 2012 - 01:12
अशी वलये... मी कधिच सोडली नाहीत.
तर मग शिवीतली मजा, सिगरेट्ची लज्जत
कशी आली समजून
फक्त ऐकून?>>>>>>>>>>

शिवी देण्यात मजा आहे किंवा सिग्रेट ओढणे लज्जतदार आहे असं मी कुठेतरी सूचित केलंय का?
उगाच काहीतरी प्रतिसाद देता.

अनिल सोनवणे | 20 February, 2012 - 05:33
काहीच कळालं नाही. शैली ओळखीची असल्यासारखी वाटली.>>>>>>

ही माझीच शैली आहे.

एम.कर्णिक | 20 February, 2012 - 10:35
चांगली आहे कविता. न केलेल्या गोष्टींची लालसा - कदाचित कुतुहलापोटीही असू शकेल - मनात जन्म घेते कधीतरी. वावगं काही नाही त्यात.>>>>>>>>

कुतूहल नव्हे,आपल्या अस्तित्वाची जाणीव जगास व्हावी म्हणून उद्वेगाने आपलं सो कॉल्ड पांढरपेशेपणा झुगारुन देण्या ची कवीची मानसिकता आहे.

इतर सर्व प्रतिसाद देणार्‍याचा मी आभारी आहे.

-फडतूस

हे काय जगणं आहे ? श्शी......
जे काही शिस्तीचं आहे त्याला आपण श्शी म्हणता. स्वतः काहीही लिहिता आणि प्रतिसाद देणा-याला निष्कारण दोष देता? काही तरी लाज बाळगा.

हे काय जगणं आहे ? श्शी......
जे काही शिस्तीचं आहे त्याला आपण श्शी म्हणता. स्वतः काहीही लिहिता आणि प्रतिसाद देणा-याला निष्कारण दोष देता? काही तरी लाज बाळगा.>>>>>>>>>

चर्चा इतरत्र भरकटवू नका.

शिवितली मजा,सिग्रेटची लज्जत यावर आपण कमेंट केली आहे आणि त्यावरच मी उत्तर दिले आहे.
आपण एका न्वीन मुद्द्याला स्पर्श करत आहात.
एकूण कवितेवरच टीका करायची असेल तर या कवितेचे रसग्रहण करा. मी मैदानात उतरलेलो आहेच. आणि हो अंगावर कपडे आहेत. लाज बाळगूनच आहे.

-फडतूस.

ह्म्म ठिक आहे.
येते ही अवस्था कधीतरी. येते तशी जातेही.
नियम, चाकोरी नाकारणं हे काय नवीन नाही आणि वावगंही नाही.

कवितेबद्दल म्हणाल तर या अवस्थेचा पुरेपूर अनुभव असल्याने काय म्हणायचंय ते कळलं पण अनुभव म्हणाल तर मिळाला नाहीच. प्रत्येक कलाकृतीने सगळ्यात आधी भलाबुरा, मोडकातोडका कसाही का असेना अनुभव द्यायला हवा असं मला वाटतं. तो काय मिळाला नाही.

pradyumnasantu

आपली http://www.maayboli.com/node/32794 ही महान कविता वाचली. असो.

आपल्या प्रांजळ प्रतिसादाबद्दल आभारी आहे नीधप.

-फडतूस

जगाने आपल्याला
कवी म्हणावं
म्हणून कविता पाडण्याचा
किती हा अट्टाहास.?
किती हा अट्टाहास.??
किती हा अट्टाहास.???

चला ''फडतूस'' आपण कवी झालात.

>>रागावू नयेत.

Rofl

किरण्या, त्यांना खवीस/सुखनवर कोण आहे ते विचार smiley_laughing_01.gif Wink
यावर त्यांनी रागवू नये Proud Light 1

सिग्रेट शिलगवून धूर आत घेऊन आणि एक कचकचित शिवी देऊनच आपलं अस्तित्व जगाला जाणवून देता येत? की येन केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषो भवेत ही मानसिकता आहे कवीची?

>>रागावू नयेत.

किरण्या, त्यांना खवीस/सुखनवर कोण आहे ते विचार
यावर त्यांनी रागवू नये

>>>

मंदार, तुझी मधेमधे लुडबुडायची सवय कधीतरी तुझ्या फार अंगाशी येईल असे वाटत नाही का?

फडतूसराव तुमची शैली कुणासारखी आहे ते माहित नाही पण मला आवडली .
खास करून मुक्त छंदासाठी लागणारी सगळी वैशिष्ठ्ये मला जाणवली . ठराविक शब्दानंतर लयीत येणारे यमक , ठराविक ओळीनंतर बेमालूमपणे बदललेला भावनेचा सूर .......... मला फार आवडलंय सगळं.,.................................. कीप इट अप !!
पुलेशु !!
(मला मुक्तछंदातलं काही कळत नाही
मी कधी तो हाताळलाही नाहीय
जर माझे विचार पटलेच तर जास्त मनावर घेउ नका)

आयडीचं नाव बदललं होतं. आता पुन्हा जुनं नाव घ्यायला गेलो तर नेम ऑलरेडी टेकन असा मेसेज येतोय. हे नाव कुणी घेतलं हे बघायला गेलो तर ही कविता समोर आली.. Happy