निसर्गाच्या गप्पा (भाग - ६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 February, 2012 - 01:28

निसर्गाच्या गप्पांच्या धाग्याचा ६ वा भाग चालू होत आहे. त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत
२८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग) स्मित

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मागे श्रावणात याचे दर्शन झाले - पुरंदर किल्ल्याच्या आसपास.........

phpflMpHGPM.jpg

सर्व नि प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.......

सेनापतींचे विशेष अभिनंदन - "पानिपत" ची आघाडी सांभाळून निसर्गातही अगदी रंगलेत, रमलेत........

शांकली अग माझ कसल अभिनंदन सगळ्या नि.ग. प्रेमींचे अभिनंदन. त्यात तुही आहेसच.
सेनापती दोन नंबरचा पक्षी आमच्याकडे फिरकतो बर्‍याचदा. नाव माहीत नाही.

कितीजणांना हे फळ माहीत आहे ?

मला माहितीय हे फळ !
गोव्यात काटेफणस म्हणतात तर नायजेरियात चप चप.
सिताफळ आणि फणस यांची एकत्र चव असते त्याला. पण पानांच्या आकाराच्या मानाने हे फळ चांगलेच मोठे, म्हणजे ओंजळीएवढे होते. गोव्यात गणपतीच्या माटोळीत असते. थायलंडमधे याचा ज्यूस पण मिळतो. आपल्याकडे मात्र तेवढे खाल्ले जात नाही.

सेनापती दोन नंबरचा पक्षी टकाचोर - ट्रीपाय.

काटेफणस कधी पाहिला नाही. जागु, एडेनियम तुझ्या घरचे??

सेनापतींचे विशेष अभिनंदन - "पानिपत" ची आघाडी सांभाळून निसर्गातही अगदी रंगलेत, रमलेत........

उगीच सेनापती झालेत होय...... Proud

रच्याकने, अर्ध्या तासापुर्वी ऐशूचा फोन आला की कमळ उमललेय आणि तिच्याकडे पाहुन खुदुखुदू हसतेय.. मला तर धावत घरी जावेसे वाटत होते पण ते शक्य नाही म्हणुन तिला लगेच फोटो टाकायला लावले. मोबाईलवर फोटो नीट आले नाहीत पण तरीही टाकते.

अगदी १ इंच कळी होती पण फुल किती मोठे दिसतेय ना?? ऐशुच्या मते थम्प्स अपच्या बुचाएवढेच आहे.

दगड्या, Long Tailed Shrike म्हणजे खाटिक. तो लहान असतो. हा ट्रीपाय आहे, मी पाहिलाय याला.

असले धागे भरकटतातच कारण काही लोक तोच हेतू घेऊन नेटवर वावरतात. पण तिकडे लक्ष न देता आपण किल्ला लढवत राहायला पाहिजे. पानिपत का झाले हे मला इतिहासात वाचले असेल तरी आता आठवत नव्हते. तुम्ही जी माहिती देताय ती फार चांगली आहे.

कुठेतरी वाचलेले की कोणाचाही आज असा का आहे हे जाणण्यासाठी त्याचा काल कसा होता हे जाणणे आवश्यक आहे. इथे लोक आज असा का आहे हे जाणुन घेण्याऐवजी काल जसा होता तोच बदलायला निघालेत.

साधना, मस्तच गं... आता बाकीच्या फुलल्या की त्यांचे पण फोटो टाक.
यो रॉक्स त्या केशरी फुलांना पांगारी म्हणतात.
सेनापती पक्षी सुंदर.
काटेफणस प्रथमच बघितला.

कसले अभिनंदन करताय.. धागा भरकटलाय म्हणून का...डोळा मारा>>>>>>> पुढून-मागून / इकडून -तिकडून वार होत असतानाही पानिपत धागा व्यवस्थित लढवताय म्हणून अभिनंदन, सेनापती. उगाच का कोणी अभिनंदन करेल ?

काटेफणस पहिल्यांदाच पहातोय.

साधना आता 'कमळ'वाली झालीये - "लक्षात ठेवा कमळ, कमळ आणि कमळ" - अभिनंदन "कमळाबाई".

टकाचोर (ट्रीपाय्)चे फोटो मस्तच.

पांगारीही छानच.

पुढच्या निसर्ग गटगला प्रत्येकाने किमान १ फुल, झाड किंवा निसर्गाशी संबंधित एखाद गिफ्ट घेऊन यायचे म्हणजे जितकी माणसे असतील तितकी गिफ्ट्स असतील आणि मग ती चिठ्या पाडून प्रत्येकी १ अशी वाटून घ्यायची.. Happy परत जाताना आठवण म्हणून छान वाटतील.. Happy

इथे लोक आज असा का आहे हे जाणुन घेण्याऐवजी काल जसा होता तोच बदलायला निघालेत.

साधनाला अनुमोदन.

सेनापती इथे (नि ग वर) विश्रांतीसाठी येतात - त्यांच्या विश्रांतीच्याआड कोणीही आल्यास त्याचा मुलाहिजा ठेवण्यात येणार नाही - सावधान का खबर्दार (जे काय असेल ते)....... Happy Happy Happy

जागू सॉरी तू पाचव्या धाग्यावर लिहिल्यावरही मी तिथे पोस्ट टाकली. हा धागा उघडलाय हे माहित नव्हतं. ती पोस्टही तिथल्या शेवटच्या टॉपिकबद्दल होती म्हणून ठीक आहे.

साधना अभिनंदन!!! मस्त आनंदी कमळ!! एकदम वॉव!

रणकपूर हे मी दोनदा रणबीर कपूर असं वाचलं... Sad

जागू पाचव्या धाग्यावर हा धागा बंद केला आहे आता (इथे लिंक देऊन) या ठिकाणी जा. असं काहीतरी लिहिशील का?

यो, तो मला पांगार्‍याचा प्रकार वाटतोय.
साधना, लवकर घरी जा आज. (ऐशूने छान काढलेत फोटो.)

साधना ते अ‍ॅडेनियम गो ग्रिन नर्सरीतल आहे. कमळ खुप सुंदर आहे. अग आमच्या घराच्या बाजूच्या डबक्यात जी वॉटर लिली आहेत ती अशीच आहेत. पण त्यांचा आकार छोटा आहे. योगेश पांगार्‍याच्या फुलांची आठवण झाली ही फुले पाहून.

व्वा!!! नविन भाग...... Happy अभिनंदन सगळ्यांचे......
मी वाचक मोड मध्ये आहेच...... Happy

रणबीर कपूर
>>>>... मामी .. Lol

एकदा ह्या गो ग्रीन मध्ये गेले पाहिजे असे सारखे तिकडून जाता-येता म्हणत असतो. एकदा जमवायलाच पाहिजे आता.

Pages