निसर्गाच्या गप्पा (भाग - ६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 February, 2012 - 01:28

निसर्गाच्या गप्पांच्या धाग्याचा ६ वा भाग चालू होत आहे. त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत
२८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग) स्मित

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुर्गाबाईंनी, मुचकुंदांच्या फुलांच्या बाह्यदलांच्या वेणीचा उल्लेख केलाय. (जिप्स्या फोटो
टाक रे परत.)
सोनेरी पिवळ्या रंगाच्या पाकळ्या विणून केलेली वेणी खरेच सुंदर दिसत असेल, पण
मी बघितली नाही कधी. त्यांनी लिहिल्याप्रमाणे, ही वेणी मुंबईतील "खत्री" बायकांची
खासियत होती. म्हणजे कोण, ते पण मला कळले नाही.

मिरच्या तिखट न लागता, कडू लागतात !!>>>>> हो मी पण ऐकलं आहे असं...>>> मी पण. विषबाधा झाली की चव कळत नाही असे ऐकले आहे. जुने लोक विषबाधेची शंका आली की लगेच मीठ खायला लावत असे ऐकले आहे. त्याने फायदे दोन. चवीमुळे विषबाधाझाली का नाही हे कळते व मीठामुळे उलटी होउन बाधलेले अन्न बाहेर येते.

शकून त्या निळ्या पांढर्‍या फुलांचा फोटो मस्त आलाय.

दिनेश, मावळतीचा हिरवा रंग एकदम खास आणि अनोखा. ह्याची कारण मिमांसा माहित आहे का? गुगलदेवाने फारशी मदत केली नाही. ऑरोरा सूर्याकडून येणार्‍या विद्युतचुंबकीय प्रारणांमुळे दिसतात पण ते धृवबिंदूच्या आसपासच दिसतात त्यामुळे ते कारण नसावे ह्या हिरव्या रंगाचे.

ते इन्सुलीनचे झाड ठाण्याच्या प्रदर्शनात दर वर्षी असते. ते खरेच मधुमेहाच्या रुग्णांना उपयोगी पडते का?

हे असले गैरसमज, शशांकनी वाचले तर आपली खैर नाही. ते तर याच क्षेत्रात आहेत. Lol >>>>> मला फक्त एवढेच माहित आहे की विषारी सर्पदंशावर अँटी स्नेक व्हेनमशिवाय दुसरा काहीही इलाज नाही (सायंटिफिकली प्रूव्ह्ड ) - त्यामुळे मीठ खारट लागते का नाही, मिरच्या तिखट लागतात का नाही याबद्दल मी काही सांगू शकत नाही.

अवांतर - आयुर्वेद किंवा जाणकार वैद्य मंडळी बचनागाचा कंद किंवा तत्सम झाड-पाल्याबद्दल असे औषध जाणतही असतील पण हे सर्व जगासमोर मांडताना आजकाल क्लिनीकल ट्रायल सारख्या गोष्टींशिवाय कोणी ऐकूनही घेणार नाही.

दुसरे असे की अँटी स्नेक व्हेनम आपल्या हातात असताना इतर गोष्टींकडे जाण्यात काय अर्थ आहे (मी अँटी स्नेक व्हेनमचे मार्केटिंग करत नाहीये हां...;))

दुसरे असे की अँटी स्नेक व्हेनम आपल्या हातात असताना इतर गोष्टींकडे जाण्यात काय अर्थ आहे>>>>>>>> शशांक छान माहिती... पण इथे अजुन एक शंका आहे... अँटी स्नेक व्हेनम हे फक्त सरकारी दवाखान्यातच उपलब्ध असते असं ऐकुन आहे, हे खरं आहे का?

शशांक, तूम्ही दिलेल्या पुस्तकात हाफकिन संस्थेबद्दल (तिच्या धोरणांबद्दल) चांगले
लिहिलेले नाही. पण तूमच्या संस्थेबद्दल चांगले लिहिलेले आहे.

अँटी स्नेक व्हेनम आपल्या हातात असताना इतर गोष्टींकडे जाण्यात काय अर्थ आहे >> शशांक, ते अँटी स्नेक व्हेनम बनवताना अनेक सर्पांना प्रमाणाबाहेर विष काढल्याने प्राण गमवावे लागत नाहीत का? हल्ली सापांच्या विषाशिवाय अँटी स्नेक व्हेनम बनवता येते का?

हाफकिन संस्थेबद्दल << मी जिएस कडून ऐकलय या बद्दल , त्यांनी देवगड परिसरात मोठ्या प्रमाणावर फुरसे उचलले होते ना. आता देवगड मधे ते फारसे दिसत नाहित जे पुर्वी जागोजागी सापडायचे.

मधुमेहाबद्दल सध्या तरी सर्वांना माहित झाले आहे की यात दोन प्रकार असतात -

टाईप १ - इन्सुलिन डिपेण्डण्ट डायबेटिस मेलिटस (आय. डि. डि. एम.) - यात दररोज इन्सुलिन दररोज टोचून घ्यावे लागतेच -त्याला इतर काहीही पर्याय सध्या तरी नाही - इन्सुलिन हे पॅनक्रियाज ग्रंथीत तयार होऊन थेट रक्तात मिसळले जाणारे हार्मोन आहे. हा प्रकार साधारण लहान मुलात आढळून येतो त्यामुळे त्याला जुवेनाईल (बालमधुमेह) डायबेटिस म्हणतात. हा आटो इम्युन डिस ऑर्डरचा प्रकार असल्याने शरीरात इन्सुलिनच तयार होत नाही.

टाईप २ - सर्वसाधारण आढळणारा - डायबेटिस मेलिटस - याची कारणे अनंत आहेत - वेगवेगळ्या अ‍ॅलोपॅथिक गोळ्या, योग्य आहार / व्यायाम वगैरेंनी याला आटोक्यात ठेवता येते. इथे इन्सुलिन तयार होते पण ते शरीराला कमी पडते. क्वचित प्रसंगीच इन्सुलिन टोचावे लागते - नियमित नाही
या दुसर्‍या प्रकारात अनेक औषधी वनस्पतींचा वापर करता येतो (ज्यात त्या इन्सुलिनचे झाड वा तत्सम वनस्पतींचा उल्लेख आहे) ज्या वनस्पती आपल्या रक्तातील साखर खाली आणू शकतात (पण हे इन्सुलिन नाही) - तो त्या वनस्पतींतील रसायनाचा गुणधर्म आहे. इन्सुलिनला हा कधीही पर्याय होऊ शकत नाही.

फारच शास्त्रीय माहिती आणि ती ही फार किचकटपणे देतोय नाही का - थांबतोच.

अरे बापरे या अँटी स्नेक व्हेनम वर मंडळी तुटून पडलेली दिसतात.

सापांच्या विषाशिवाय अँटी स्नेक व्हेनम बनवता येते का?>>>> नाही.

ते अँटी स्नेक व्हेनम बनवताना अनेक सर्पांना प्रमाणाबाहेर विष काढल्याने प्राण गमवावे लागत नाहीत का?>>>> पूर्वी प्राण गमवावे लागायचे, सध्या अनेक संस्था असे विषारी साप पाळतात व मधून मधून त्या सापांचे विष काढून विकतात (साप न मारता). सापाचे विष हवे असेल तर साप मारल्यावर त्याचे विष काढणार कसे ?

अँटी स्नेक व्हेनम हे फक्त सरकारी दवाखान्यातच उपलब्ध असते असं ऐकुन आहे, हे खरं आहे का?>>> खेडेगाव / तालुका ठिकाणी असे असते, शहरात काही ठराविक केमिस्टच ते ठेवतात (जास्त मार्केट नसल्यामुळे)

माझ्या संस्थेने हे अँटी स्नेक व्हेनम तयार करणे केव्हाच बंद केले आहे.

फारच शास्त्रीय माहिती आणि ती ही फार किचकटपणे देतोय नाही >> नाही शशांक आणखी लिहा याविषयी.

शशांक, डायबेटिस मेलिटसबद्दल एक शंका - मध्यंतरी आमच्या कार्यालयात एक योग्य जीवनशैलीवर एक कार्यक्रम झाला. त्यातील एका व्यक्तीने असे सांगितले की जेंव्हाही आपण साखर असलेले पदार्थ खातो (गोड, पिष्टमय इ) तेंव्हा पॅनक्रिआ इन्सुलीन रक्तात सोडतात. पण या क्रियेला निसर्गानेच एक चाप दिलाय. रक्तातले इन्सुलीन्चे प्रमाण ठराविक पातळीपर्यंत पोहचले की पॅनक्रिआ इन्सुलीनची निर्मिती करत नाहीत - गोड पदार्थ खाल्ल्यावर देखील. आणि त्यामुळे रक्तातले साखरेचे प्रमाण वाढते. म्हणजे एकाच वेळेला रक्तात संपृक्त पातळीपर्यंत पोहचलेले इन्सुलीन असते आणि साखरही असते. पण ते इन्सुलीन ती साखर पचवायला असमर्थ असते.

ही वरची माहिती कितपत बरोबर आहे?

सर्व निसर्गप्रेमींना माझा नमस्कार !
पुन्हा इथे (माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांला) प्रवेश दिल्याबद्दल मनापासुन धन्यवाद !

माझं इथे एक पान वाचून पूर्ण होईपर्यंत दोन नवी पानं लिहिली जाताहेत ... त्यामुळे आता मी शेवटाकडून सुरुवात केलीय. Happy

इन्सुलिनच्या झाडाविषयी मीही मलकापूरच्या नर्सरीत ऐकलं. मी हे झाड विकत आणलंय मागच्या महिन्यात. उद्या - परवा फोटो टकू शकेन. टाईप २ डायबेटीसमध्ये रक्तातली साखर कमी ठवण्यात या झाडाच्या पानांनी हमखास गुण येतो असं ऐकलंय. अजून त्याची माहिती धुंडाळली नाही.

दिनेशदा, मायाळूचे वेल माझ्या आईच्या बिल्डिंगच्या अंगणात आहेत. त्याचेही फोटो टाकते लवकरच. आणि भेंड म्हणजेच भेंडी गुलाब का?

शांकली, शोभाच्या फोटोतली फुलं बहुतेक युफोर्बियाची नाहीत. हा बोगनवेलीसारखा एक वेल असतो. याचाही फोटो बहुतेक मिळेल माझ्याकडे.

शकुननी टाकलेल्या फोटोतली पांढरी - जांभळी फुलं बहुतेक क्रॉकसची आहेत. युरोपात बर्फ वितळल्या वितळल्या दिसणारी ही पहिली फुलं असतात.

टाईप १ - इन्सुलिन डिपेण्डण्ट डायबेटिस मेलिटस (आय. डि. डि. एम.) - यात दररोज इन्सुलिन दररोज टोचून घ्यावे लागतेच -त्याला इतर काहीही पर्याय सध्या तरी नाही - इन्सुलिन हे पॅनक्रियाज ग्रंथीत तयार होऊन थेट रक्तात मिसळले जाणारे हार्मोन आहे. हा प्रकार साधारण लहान मुलात आढळून येतो त्यामुळे त्याला जुवेनाईल (बालमधुमेह) डायबेटिस म्हणतात. हा आटो इम्युन डिस ऑर्डरचा प्रकार असल्याने शरीरात इन्सुलिनच तयार होत नाही.

मध्यंतरी आमच्या कार्यालयात एक योग्य जीवनशैलीवर एक कार्यक्रम झाला. त्यातील एका व्यक्तीने असे सांगितले की जेंव्हाही आपण साखर असलेले पदार्थ खातो (गोड, पिष्टमय इ) तेंव्हा पॅनक्रिआ इन्सुलीन रक्तात सोडतात. पण या क्रियेला निसर्गानेच एक चाप दिलाय. रक्तातले इन्सुलीन्चे प्रमाण ठराविक पातळीपर्यंत पोहचले की पॅनक्रिआ इन्सुलीनची निर्मिती करत नाहीत - गोड पदार्थ खाल्ल्यावर देखील. आणि त्यामुळे रक्तातले साखरेचे प्रमाण वाढते. म्हणजे एकाच वेळेला रक्तात संपृक्त पातळीपर्यंत पोहचलेले इन्सुलीन असते आणि साखरही असते. पण ते इन्सुलीन ती साखर पचवायला असमर्थ असते.

जर दुसरा पॅरेग्राफ खरा तर पहिल्यातील केसेस कशामुळे होतात? म्ह़णजे लहान मुलांतील (जन्मजात / लवकर होणार्‍या) मधुमेहाची कारणे काय?

माधव - तुम्ही म्हणताय ही गोष्ट टाईप २ मधील जरा कॉम्प्लिकेटेड गोष्ट असणार.
एक म्हणजे आपण (सर्वसामान्य / नॉनमेडिकल मंडळी) सर्व साधारणच गोष्टी जाणून असतो - जसे की टाईप १ मधे इन्सुलीनचा डोस जास्त झाला की त्या व्यक्तिला हायपोग्लायसेमिआचा (रक्तातील साखर नेहेमीच्या पातळीपेक्षा खाली जाणे) शॉक बसणार. हीच गोष्ट (हायपोग्लायसेमिआ) नॉर्मल व्यक्तिमधेही इन्सुलीन टोचून घेतले तर आढळेलच.
पण टाईप २ यात अनेक कॉम्प्लिकेशन असतात - यात तुम्ही म्हणता तसा प्रकार असूही शकेल - तज्ज्ञ डॉ. मंडळीच हे सांगू शकतील. पण माझ्या मते हा अभावानेच (रेअर केस) सापडणारा प्रकार असावा. अशा टाईप २ व्यक्तिला इन्सुलीन जास्त टोचले तरीही ते काहीही काम करणार नाही (सर्व पेशींना रक्तातील साखर शोषून घेण्यास उद्युक्त करणे) हे अशक्य वाटते - पण नैसर्गिकरित्या तयार होणार्‍या इन्सुलीनबाबत तुम्ही म्हटले तशी शक्यता असू शकेल.

सर्व साधारण माहिती - इन्सुलीन हे हार्मोन शरीरातील सर्व पेशींना रक्तातील साखर शोषून घेण्यास उद्युक्त करते. इन्सुलीनअभावी ही साखर रक्तात तशीच पडून रहाते - पर्यायाने पेशींना उपलब्ध होत नाही - रक्त शर्करा वाढते - मधुमेह.

इन्सुलीनला चाप देणारे ग्लुकॅगॉन नावाचे दुसरे हार्मोन पॅनक्रियाजमधेच तयार होते - या दोन्ही हार्मोन्समुळे आपली शरीरातील (रक्तातील) साखर नियंत्रित केली जाते. ८० ते १२० मि ग्रॅ. एवढ्या छोट्या रेंजमधे ही रक्त शर्करा त्यामुळेच नियंत्रित होऊ शकते - आपण कितीही गोड खाल्ले तरी वा खूप व्यायाम करुन ती साखर मेटॅबोलाईज केली तरी. हे नॉर्मल व्यक्तित घडते.

मोनाली पहिल्या प्रकारात इन्सुलीन निर्मितीच होत नाही. हा शरीरातील बिघाड असतो - अनुवंशिकता सारख्या कारणांनी आलेला. जसे एखादे बाळ जन्मजात बहिरे असते तसेच हे पण. शरीरात इन्सुलीन निर्मितीच होत नसल्यामुळे बाहेरून इन्सुलीन घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो.

तर दुसर्‍या प्रकारात चुकीच्या जीवनशैलीमुळे / खाण्याच्या सवयीमुळे शरीरातली इन्सुलीन करण्याची प्रक्रिया बिघडते. इन्सुलीन निर्मिती होत असते पण ती पुरेशी आणि योग्य वेळी होत नाही. एकदा झालेला मधुमेह बरा होत नाही पण या प्रकारात तो आटोक्यात ठेवता येऊ शकतो. या प्रकारात बाहेरून इन्सुलीन द्यायची गरज पडतेच असे नाही. मला न कळलेला मुदा म्हणजे या प्रकारात इन्सुलीनची पातळी एका प्रमाणाबाहेर वाढलेली असते (threshold). मी हे पहिल्यांदीच ऐकले.

अशा टाईप २ व्यक्तिला इन्सुलीन जास्त टोचले तरीही ते काहीही काम करणार नाही (सर्व पेशींना रक्तातील साखर शोषून घेण्यास उद्युक्त करणे) हे अशक्य वाटते>>>>> शशांक, विकि वर ही माहिती मिळाली... Some cases of diabetes are caused by the body's tissue receptors not responding to insulin (even when insulin levels are normal, which is what separates it from type 2 diabetes); this form is very uncommon.

या टाइपबद्दल आधी वाचलं होतं पण आत्ता आठवत नाहिये...

म्ह़णजे लहान मुलांतील (जन्मजात / लवकर होणार्‍या) मधुमेहाची कारणे काय?>>>> टाईप १ डायबेटिस हा ऑटो इम्युन डिस ऑर्डर स्वरुपात मोडतो - आपलेच शरीर अचानक आपल्याच शरीरातील पेशींविरुद्ध अँटीबॉडीज तयार करते (उदा. संधिवात) - अशाच अँटीबॉडीज इन्सुलिन तयार करणार्‍या पेशींविरुद्ध असल्यास त्या पेशी मरतात - पर्यायाने इन्सुलिन तयार करणेच बंद पडते - हे असे का होते (आपल्याच शरीरातील पेशींविरुद्ध अँटीबॉडीज तयार करते) याला वैद्यक शास्त्रात अनंत कारणे दिलेली आहेत (जी वाचून त्या पेशंटला काहीही उपयोग नसतो - त्याला इन्सुलिन टोचून घ्यावेच लागते) .

जी वाचून त्या पेशंटला काहीही उपयोग नसतो - त्याला इन्सुलिन टोचून घ्यावेच लागते>>>>>>> अगदी

शशांक, डायबेटिस करता immunotherapy मधे काही ऑप्शन्स आहेत का?

सॉरी, निसर्गगप्पा सोडुन विषय भलतीकडेच वळला आहे... हवं असल्यास विपुमधे विचारते...

सॉरी, निसर्गगप्पा सोडुन विषय भलतीकडेच वळला आहे... हवं असल्यास विपुमधे विचारते...>>> हे असे नका करु. इंटरेस्टींग आहे. आम्हलाही कळु देत. ईथे नाहीतर कुठे दुसरीकडे करु हवे तर ही चर्चा Happy

आहारशास्त्र वर वेगळा धागा सुरु करता येईल. आपल्याकडे आणखी काही तज्ञ आहेत, या विषयावर. नीट सुसंगत माहिती मिळेल.

मला इथे इन्श्युलिन प्लांटविषयी काही माहिती मिळाली ...
http://my.diabetovalens.com/diab_update/latestnews.asp?newsid=1245
पूर्ण माहिती नसताना औषध म्हणून हे झाड वापरणं मला तरी धोक्याचं वाटतंय.

मोनाली पहिल्या प्रकारात इन्सुलीन निर्मितीच होत नाही. हा शरीरातील बिघाड असतो - अनुवंशिकता सारख्या कारणांनी आलेला. जसे एखादे बाळ जन्मजात बहिरे असते तसेच हे पण. >>>>> एक दुरुस्ती करु इच्छितो - माधव - टाईप १ हा अनुवंशिक नाही - सख्ख्या भावंडात मात्र -एकाला असेल तर इतर भावंडांना व्हायची शक्यता जास्त असते. (कायम होतोच असे नाही - पण होण्याची प्रॉबेबिलिटी जास्त). टाईप १ - एक दिवसाचे मूल ते १६-१८ वर्षापर्यंत सर्वसाधारणतः होतो - क्वचित ३०-३५ वय असताना.

शशांक, डायबेटिस करता immunotherapy मधे काही ऑप्शन्स आहेत का? >>> सध्या तरी टाईप १ करता काही नाही - इन्सुलिन टोचुन घेणे एवढेच आपल्या हातात आहे.

तर दुसर्‍या प्रकारात चुकीच्या जीवनशैलीमुळे / खाण्याच्या सवयीमुळे शरीरातली इन्सुलीन करण्याची प्रक्रिया बिघडते. इन्सुलीन निर्मिती होत असते पण ती पुरेशी आणि योग्य वेळी होत नाही. एकदा झालेला मधुमेह बरा होत नाही पण या प्रकारात तो आटोक्यात ठेवता येऊ शकतो.>>>> या प्रकारात (टाईप २)अनुवंशिकतेचा फार वाटा आहे.

Pages