निसर्गाच्या गप्पा (भाग - ६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 February, 2012 - 01:28

निसर्गाच्या गप्पांच्या धाग्याचा ६ वा भाग चालू होत आहे. त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत
२८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग) स्मित

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो रे, ते नॉदर्न लाईट्स, पाहणे माझ्या "थिंग्ज टू डू बिफोर यू डाय " यादीत आहेत.

लोकसत्तामधे, नद्या जोडणी योजनेबद्दल, सुरेश प्रभुंचा छान लेख आलाय.
हे जर घडले, तर भारताचा पाणीप्रश्न कायमचा सूटेल. स्वातंत्र्य मिळाल्यापासून, हि योजना ऐकतोय, पण राजकिय इच्छाशक्तीच नसल्याने हि योजना प्रत्यक्षात आली
नाही. आता सर्वोच्च न्यायालयाने, हा विषय परत छेडला आहे.
(आरवली बद्दल, दळवींचा एक जूना लेख लोकप्रभात आहे.)

शशांक,
ऋतुचक्र मधे, भेंडा आणि बचनागाचे छान वर्णन आलेय. हे पुस्तक माझ्या मोठ्या
भावाला, इंटर सायन्सला अवांतर वाचनासाठी होते. त्याचवेळी मी पण वाचले होते.
(आता गिरीराजने परत भेट म्हणून दिले.) पण त्यातलीही काही झाडे, आता
हरवल्यासारखी वाटताहेत.

लोकसत्तामधे, नद्या जोडणी योजनेबद्दल, सुरेश प्रभुंचा छान लेख आलाय.>>>>येस्स्स Happy

वर बित्तुने दिलेल्या लिंक अवश्य पहा. खुपच सुरेख माहिती आहे. Happy

दिनेशदा तुम्ही टाकलेले फोटो बेस्टच.. हिरवा रंग सहीच... Happy
जागु पक्ष्याचं प्रचि पण सुंदर आहे...

जो_एस, पौड रोडला पण मस्त टॅबेबुया फुललाय.>>>>>चिमुरी, नक्की कुठे ग?>>> शोभा उद्या सांगते.. झाडाचा पत्ता आज बघुन ठेवते..

वर बित्तुने दिलेल्या लिंक अवश्य पहा. खुपच सुरेख माहिती आहे.>>>>>> +१

दिनेशदा, तगरीचा औषधी उपयोग असतो का?

मी काही दिवसांपुर्वी गाजराचा वरचा राहीलेला भाग कापून काचेच्या बशीत पाणी टाकुन ठेवले होते. आठ दिवसांत त्याला छान कोंब आले. हे मला जमीनीत लावायचे होते. पण दुर्लक्ष होऊन सगळा बेत बारगळला.

जागू, त्या चकत्या थेट मातीत रोवल्या तरी चालतील. पाणी मात्र रोज द्यावे लागेल.
त्याला छान फुले येतात.

तगरीचा काही खास उपयोग नाही. (वनस्पती बाड मधे किरकोळ उपयोग वाचला होता.) डिकेमालीचे झाड आणि फूल साधारण तसेच दिसते. त्याला मात्र बाळाच्या
घुटीत महत्वाचे स्थान आहे.

तगरीचा काही खास उपयोग नाही. (वनस्पती बाड मधे किरकोळ उपयोग वाचला होता.) >>>>>> ओक्के.. चिंचवडमधे काल बर्‍याच ठिकाणी तगर पाहिली.. जवळपास बर्‍याच बंगल्यांमधे आहेच.. फुलांना वास नसल्याने केसात कोणी माळत नाही.. शाळेत असताना, फक्त तगरीचीच फुलं मिळायची वर्गातल्या सरस्वतीच्या फोटोला घालायला.. त्यातल्या त्यात ती भरगच्च दिसणारी फुलं मिळाली की अस्मादीक खूष..

डिकेमालीचे झाड आणि फूल साधारण तसेच दिसते. त्याला मात्र बाळाच्या
घुटीत महत्वाचे स्थान आहे.>>>> डिकेमालीचं झाड कधी ऐकण्यात नाहिये.. पण बाळाला दात येताना त्याचं चुर्ण्/पावडर हिरड्यांना चोळतात हे माहित आहे...

चिमुरी हल्ली तगरीच्या कळ्यांचा गजरा करून मोगर्‍याच्या गजर्‍याच्या नावाखाली खपविल्या जातात. काही ठिकाणी त्यावर मोगर्‍याचे अत्तर मारूनही ठेवतात.

डिकेमालीचं झाड कधी ऐकण्यात नाहिये.. पण >>> हो हे झाड कालच संपलेल्या ठाण्याच्या वृक्ष प्रदर्शनात होते. बहुदा आत्ताच नि. गटग झले त्या महाराष्ट्र उद्यानातल्या लोकांनी ठेवलेले. तेथे दापोलीच्या एका नर्सरीने ठवलेले इन्सुलीनचे पण झाड होते.

जिप्सी तुला मिसले काल प्रदर्शनात फिरताना तुझे फोटो आठवत होते. वाटले तु असतास तर मस्त फोटो काढले असतेस. ते प्रदर्शन एवढे मोठे व सुंदर आहे हे माहिती असते तर आधी तुला फोन केला असता. Sad (कालच संपलेय ते)

त्यावर लिहिलेले की याचे १ पान रोज चावल्याने (की खाल्याने) इन्सुलीन प्रमाणात रहाते. (मधुमेही लोकांसाठी होते बहुदा ते)

Insulin Plant (Costus Ingneus) Ayurvedic Medicinal Herbs
March 23rd, 2007 | admin
Insulin plant (Costus ingneus) is a relatively new entrant to Kerala and India. The plant is a late entrant to Kerala Ayurvedic medicinal herb scene mostly from USA. Insulin plant has not got a Malayalam name yet, except the occasional use of insulin chedy or insulin chedi, where chedy means a plant. The catchphrase of this plant is ‘a leaf a day keeps diabetes away’.
The plant is characterized by large fleshy looking leaves. It grows very quickly. Propagation is by stem cutting. It grows in slightly shady areas.
Diabetes patients are advised to chew down a leaf in the morning and one in the evening for a month. Allopathic doctors too recommend it and it is found to be effective in bringing blood sugar levels under completely under control. There is also dried and ground powder of the leaves now available in the market.
Costus ingneus belongs to the family zingiberaceae.

--- http://www.keralaayurvedics.com/herbs-plants/insulin-plant-costus-ingneu...

धन्स गुगल.

त्यावर लिहिलेले की याचे १ पान रोज चावल्याने (की खाल्याने) इन्सुलीन प्रमाणात रहाते. (मधुमेही लोकांसाठी होते बहुदा ते)>>>>>मी पण काही दिवसांपूर्वी या बद्दल ऐकल आहे.

तेथे, साधारण ३ फुट (वा जास्तच) लांबीची चिंच पण होती. त्याच्या बीयांची पावडर सांधेदुखी साठी विकत होते.

आंब्याच्या बोन्सायचा मोहोर, कुंडीतल्या झाडावर आलेले वांगे, मिरच्या, कोबी, फ्लॉवर, भोपळी मिरच्या, टोमॅटो .... एकुणात, मस्त होते ते प्रदर्शन.

मोनालि, आतापर्यंत इन्सुलिन हे तोंडावाटे घेणे अशक्य आहे, असेच वाचले होते.

जेरुसलेम आर्टीचोक नावाची, एक सूर्यफूलाच्या कूळातली भाजी आहे. तिची बटाट्यासारखी दिसणारी, मूळे खातात. त्यात इन्यूलीन असते, त्याचा पण
इन्सुलिन, असा चुकीचा उल्लेख केला जातो.

मोनालि, आतापर्यंत इन्सुलिन हे तोंडावाटे घेणे अशक्य आहे, असेच वाचले होते.>>>> त्या झाडात इन्स्युलिन असे मला वाटत नाही... त्यात डायबेटिस कन्ट्रोल करणारे काही घटक असतील...

तोंडावाटे घेतायेण्याजोगं इन्स्युलिन डेव्हलप होत आहे, बायोकॉन करत आहे कदाचीत..

वर इन्सुलिन म्हणुन् ज्याचा उल्लेख होतो त्याचा फोटो आहे का? आंबोलीला बेडगी म्हणुनेक वेल येते तिची पाने खाल्ल्याने मधुमेह आटोक्यात राहतो असा तिथल्या लोकांचा समज आहे. ती पाने चावल्यावर तोंडात साखर घातली तर ती गोड लागत नाही हे मी अनुभवलेय पण मधुमेह कंट्रोलबद्दल शंका आहे. माझ्या घरात खानदानी मधुमेह आहे, काका नियमीत बेडगीच्या पाल्याचे सेवन करत होता पण तरी शेवटी त्याचा मधुमेहाने घात केलाच. Sad (अर्थात पथ्य नामक चीज पाळायचे त्याने कधीही मनावर घेतले नाही हे त्याचा मधुमेहाने घात करण्याचे प्रमुख कारण होते)

Costus ingneus चे रोपटे गुगलुन पाहिले. ते साधारण हळद्/आले व.व. च्या कुळातल्या रोपांच्या पानांसारखे दिसतेय. गावी मी जे पाहिलेय ते असे नाहीय. यावेळी गेले की वेल शोधुन फोटो काढेन.

ती पाने चावल्यावर तोंडात साखर घातली तर ती गोड लागत नाही >>>>>> साखर गोड लागत नाही म्हणजे ती पोटात जाणार नाही असं तर होत नाही ना? उलट साखर खाण्याचं प्रमाण अजुनच वाढेल अश्याने..

ती पाने चावल्यावर तोंडात साखर घातली तर ती गोड लागत नाही

ही वेल पहिल्यांदच पाहणा-याची गंमत करावी म्हणौन गावातले लोक ही ट्रिक वापरतात. मी एकदा मामाबरोबर हिरण्यकेशीला गेले होते तेव्हा त्याने मुद्दाम साखरेची पुडी खिशातुन आणली होती. वाटेल बेडगी दिसल्यावर त्याने मला पाने चावायला दिली आणि मग वर साखर खायला लावली. साखर अगदी मातीसारखी लागल्यावर माझा चेहरा पाहण्यासारखा झाला आणि त्याला हा किस्सा दिवसभर इतरांना सांगायला पुरला. Happy

त्या वेलीत खरेच काही गुण आहेत का हे मात्र मला माहित नाही.

पाचगणी / महाबळेश्वर भागात पण स्थानिक लोक असे पान देतात (पण झाड दाखवत
नाहीत.) मला वाटतं अशा पानाने जिभ संवेदना हरवत असेल (नंब) म्हणून साखर
गोड लागत नसेल. सगळेच आडाखे खोटे असतील असे नाही, पण संशोधन होणे
गरजेचे आहे.

आईच्या गावी मी अनेकवेळा ऐकलेय, कि विषारी साप चावला, तर मिरच्या तिखट
न लागता, कडू लागतात !!

आईच्या गावी मी अनेकवेळा ऐकलेय, कि विषारी साप चावला, तर मिरच्या तिखट
न लागता, कडू लागतात !!>>>>बापरे!! ऐकावे ते नवलच.

पण संशोधन होणे गरजेचे आहे.>>>>> +१

मिरच्या तिखट न लागता, कडू लागतात !!>>>>> हो मी पण ऐकलं आहे असं...

दिनेशदा, विष उतरवण्याकरता की कशाकरता तरी कोणत्या तरी झाडाचा (रुईचा) चीक कानात (??) वगैरे टाकतात, आणि मिरची तिखट लागयला लागली की विष उतरलं असंही काहिसं ऐकण्यात आलं आहे... हे नक्की कुठे ऐकलं होतं काहीच आठवत नाहीये, आणि तपशीलही नीटसे आठवत नाहियेत Sad

चिमुरी हल्ली तगरीच्या कळ्यांचा गजरा करून मोगर्‍याच्या गजर्‍याच्या नावाखाली खपविल्या जातात. काही ठिकाणी त्यावर मोगर्‍याचे अत्तर मारूनही ठेवतात.>>>>>> Sad हे आत्ता वाचलं...

साधना, र्‍होडोडेंड्रॉन आणि बुरांश एकच आहेत. मी पण याचे फक्त फोटोच बघितलेत.

आणि इन्शुलीन प्लँट नावाचे खरंच एक झुडुप असते. पण डायबेटीससाठी याच्या पानांचा उपयोग होतो का हे प्रयोगशाळेत सिद्ध झालेले नाही. पण याची पानं मात्र गोडसर असतात चवीला. वर साधना म्हणते ते कोणते रोप तेही बघायला पाहिजे. हे इन्शुलीन प्लॅंट थोडे कोष्ट-कुळिंजनासारखे दिसते. (अर्थात मी या पानांची चव घेऊन बघितली नाहीये! बायकोचा धाक म्हणून!)

Pages