कांदा भजी / खेकडा भजी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 9 February, 2012 - 02:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

३ ते ४ मोठे कांदे
बेसन पाव किलो
२-३ मिरच्या चिरुन किंवा मिरची पुड
थोडी कोथिंबीर चिरुन
चिमुटभर हिंग
पाव चमचा हळद
अर्धा चमचा धणे घसपटून किंवा पाव चमचा ओवा किंवा पाव चमचा जिरे (ऑप्शनल)
मिठ
तेल

क्रमवार पाककृती: 

प्रथम कांदे उभे चिरुन घ्या. चिरलेल्या कांद्याला थोडे मिठ मिसळा. ५-६ मिनीटांत मिठामुळे कांद्याला पाणी सुटेल.

आता कांदा चांगला चुरा व त्यात हिंग, हळद, मिरची किंवा मिरची पुड, कोथिंबीर, ओवा/धणे/जिरे ह्यापैकी एक हवे असल्यास, टाकावे. नंतर त्यात थोडे थोडे बेसन टाकत रहावे.

पाणी आजीबात टाकू नये. कांद्याला सुटलेल्या पाण्यातच मिश्रण घटासर होईपर्यंत बेसन टाकावे. अगदी घट्टही करू नये. अंदाजे किंवा पिठाची चव पाहून जर मिठ अजुन हवे असेल तर टाकावे.

एका कढईत तेल चांगले गरम करावे व त्यात चमच्याचे किंवा हाताने खेकडे म्हणजे भजी सोडावी Happy गॅस मंद ठेवावा. म्हणजे खेकडे म्हणजे भजी कुरकुरीत होते व आतुन चांगली शिजते.

मंद गॅसवर उलथापालथ करून भजी कुरकुरीत तळून झाली की ४-५ हिरव्यागार आख्या मिरच्यांना मधुन चिर पाडावी व कढईत टाकून जरा परतून लगेच बाहेर काढावीत. मिरच्यांवर थोडे मिठ चोळायचे आणि कुरकुरीत भजी सोबत ह्या मिरच्या मटकवायच्या.

वाढणी/प्रमाण: 
एकाला एक डिश.
अधिक टिपा: 

धणे, जिर, ओवा ऑप्शनल आहे आवडत नसल्यास नाही टाकले तरी चालते. पण टाकल्यास स्वाद येतो. काहीतरी एकच टाकावे.

मला एका हॉटेलवाल्याकडून माहीती मिळाली की तेल थंड असतानाच भजी टाकली की ती चांगली कुरकुरीत होते पण मी अशी रिस्क कधी घेतली नाही. वरील पद्धतीने चांगली कुरकुरीत होते.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागु तुझी कान्दा भाजी छान आहे ग.मी पन घरी batata भजी बनवते.माझ्या सासरच्या मानसाना खुप आवदते.जागु तुला जर बोकदाचे पाय बन्वता येत असतिल तर मला क्रुती लिहुन दे.

पिठूळ न लागनारी , फारशी न जळालेली , आतून थोडी ओलसर भजी कशी बनवावीत? मला तर पिठूळ न लागनारी भजी कुठे मिलतच नाहीत. क्रिस्पी बनवण्याच्या नादात अति कडक बनतात. व जळकट लागतात.

पिठूळ न लागनारी , फारशी न जळालेली , आतून थोडी ओलसर भजी कशी बनवावीत? >>>>>> अगदी थोडे पाणी घालावे.मस्त भजी होतात.

पिठूळ न लागनारी , फारशी न जळालेली , आतून थोडी ओलसर भजी कशी बनवावीत? मला तर पिठूळ न लागनारी भजी कुठे मिलतच नाहीत। ,>>>> आमच्या ऑफिसजवळ मिळते अशी भजी, अगदी अप्रतिम चव अन क्रिस्पी लागते.
ते सुद्धा पाणी न घालता करतात भज्या, म्हणजे कांद्यात जेवढे पीठ भिजेल तेवढेच घालून.

20210517_184356.jpgखेकडा भजी चा धागा वर आला होता.. आणि मस्त पावसाळी हवा.. खेकडा भजी करण्याची इच्छा झाली ..खाऊन झाल्यावर शेवटची २ च उरली असताना फोटो काढायची आठवण झाली..

आज कित्येक महिन्यांनी सहज फेरफटका मारायला मायबोलीवर आले आणि बघते तर माझी रेसिपी वर आलेली. खुप आनंद झाला. धन्यवाद.

श्रवु मस्तच.

हाय जागू कशी आहेस.

पिकल्या केळ्याची भजी मस्त लागतात >>> खूप दिवसांनी ही भजी आठवली, मी विसरून गेलेले कारण मला आवडत नाहीत पण आई खुपदा करायची. तुमच्या post मुळे आठवलं, ही भजी लहानपणी बरेचदा खाल्ली ते. अर्थात जरी आवडत नसलं तरी केलेलं थोडं तरी खायचं हे compulsory होतं. करून बघायला हवीत. नवऱ्याला आवडतील, तो गोडखाऊ आहे. हे लिहिल्याबद्दल धन्यवाद. विस्मरणात गेलेली.

Pages