कांदा भजी / खेकडा भजी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 9 February, 2012 - 02:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

३ ते ४ मोठे कांदे
बेसन पाव किलो
२-३ मिरच्या चिरुन किंवा मिरची पुड
थोडी कोथिंबीर चिरुन
चिमुटभर हिंग
पाव चमचा हळद
अर्धा चमचा धणे घसपटून किंवा पाव चमचा ओवा किंवा पाव चमचा जिरे (ऑप्शनल)
मिठ
तेल

क्रमवार पाककृती: 

प्रथम कांदे उभे चिरुन घ्या. चिरलेल्या कांद्याला थोडे मिठ मिसळा. ५-६ मिनीटांत मिठामुळे कांद्याला पाणी सुटेल.

आता कांदा चांगला चुरा व त्यात हिंग, हळद, मिरची किंवा मिरची पुड, कोथिंबीर, ओवा/धणे/जिरे ह्यापैकी एक हवे असल्यास, टाकावे. नंतर त्यात थोडे थोडे बेसन टाकत रहावे.

पाणी आजीबात टाकू नये. कांद्याला सुटलेल्या पाण्यातच मिश्रण घटासर होईपर्यंत बेसन टाकावे. अगदी घट्टही करू नये. अंदाजे किंवा पिठाची चव पाहून जर मिठ अजुन हवे असेल तर टाकावे.

एका कढईत तेल चांगले गरम करावे व त्यात चमच्याचे किंवा हाताने खेकडे म्हणजे भजी सोडावी Happy गॅस मंद ठेवावा. म्हणजे खेकडे म्हणजे भजी कुरकुरीत होते व आतुन चांगली शिजते.

मंद गॅसवर उलथापालथ करून भजी कुरकुरीत तळून झाली की ४-५ हिरव्यागार आख्या मिरच्यांना मधुन चिर पाडावी व कढईत टाकून जरा परतून लगेच बाहेर काढावीत. मिरच्यांवर थोडे मिठ चोळायचे आणि कुरकुरीत भजी सोबत ह्या मिरच्या मटकवायच्या.

वाढणी/प्रमाण: 
एकाला एक डिश.
अधिक टिपा: 

धणे, जिर, ओवा ऑप्शनल आहे आवडत नसल्यास नाही टाकले तरी चालते. पण टाकल्यास स्वाद येतो. काहीतरी एकच टाकावे.

मला एका हॉटेलवाल्याकडून माहीती मिळाली की तेल थंड असतानाच भजी टाकली की ती चांगली कुरकुरीत होते पण मी अशी रिस्क कधी घेतली नाही. वरील पद्धतीने चांगली कुरकुरीत होते.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागु, मस्तच ग. खरच एकदम तोंपासु. Happy
मी पण अशीच करते. पण ओवा घालत नाही. आता घालुन बघेन...

यम्मी, यम्मी, यम्मी!!!!!!!!!!!!!!!!!!!! Happy

जागुले, बर्‍याच दिवसांनी रेसिपी टाकलिस?

जागुले,,
तो पा सु

.. ति शेवटची प्लेट माझि बाकी मला काआआआआआआआअही नको Happy

[त्या प्लेटीत तु फिश थेउन पण फोटू काढलेत ना? मला ति जाम आवडेश

मी पण हा धागा उघडला नाही, काही म्हणजे काही वाचलं नाही आणि फोटो सुद्धा बघितले नाहीत.
(कैच्याकैच!! वैट्ट लोक्स अस्तात आणि भुकेच्या वेळी हे अस्लं इथे द्यायचं म्हंजे फार्फार वैट्ट!!)
जागू तू मात्र माझी कॉमेंट वाच बरंका!
असो, मस्तच गं अगदी तोंपासू...........................

मस्त. मी थोडा तरी पाण्याचा हात लावायचे . मागे एकदा बहुदा 'लालूने' ही टिप दिलेली कि कांद्याला मीठ लावून थोडावेळ ठेवा म्हणुन. तेव्हा पासून खेकडा भजी एकदम पर्फेक्ट जमायला लागल्या.

मला वाटलं खेकड्याची भजी केलीयेत Uhoh

ही मस्त आहेत पण...:) माझे आजोबा/पप्पा नेहमी करतात अशी भजी. पावसाळ्यात चहासोबत ताव मारायला उत्तम! Wink

जागू ~

काल सायंकाळी लागलीच ही कृती केली. कदाचित बेसन पीठाचे प्रमाण काहीसे चुकल्याने (म्हणजे कांद्यापेक्षा पीठ जास्त झाले) सारे रसायन तुम्ही दिलेल्या क्रमांक ३ फोटोप्रमाणे हलके न होता काहीसे घट्ट झाले. त्यामुळे नाईलाजास्तव नंतर थोडेसे पाणी टाकून पाहिले. अगदी खेकड्याप्रमाणे जरी झाली नसली तरीही अगदीच काही खराब झाली नाहीत. चांगली खरपूस तळल्यावर बाहेर काढली, मात्र खाताना लक्षात आले की भज्यांच्या पोटात अजून घट्टपणा जाणवतो. कदाचित तो जादाच्या पीठाचा परिणाम असेल.

[मी शेंगदाणा तेल वापरतो. प्रश्न असा की, वरीलप्रमाणे सारी कृती करून अन्य खाद्य तेलात तळल्यावर चवीत वा खुसखुशीतपणात काही फरक पडेल ?]

जागू, मस्त. यात बेसन घालतांना चिमूटभर खायचा सोडा घातला तर आणखी मस्त कुरकुरीत होतात.
तसंच बेसनाबरोबर थोडी तांदुळाची पिठी घातल्यानेही.

~आता पुढच्या वेळी खरोखरच्याच खेकड्याची भजी करून रेसिपी टाकते.~
जागुदी म्हणजे आत्ता पुढची पाककृती Crab Cake ची ना? मी वाट पाहीन.....

कांद्याची भाजी खाऊन खूप वर्ष झाली. मला आत्ता पर्यंत असा विश्वास होता की चांगली भाजी फक्त भारतात टपरीवर मिळते. तुमच्या पाककृतीचे फोटो पाहून हा समज खोटा ठरवला आहे. मला सुद्धा बनवता येईल असा विश्वास वाटतो आहे. बनवली तर नक्की कळवीन....

एक आईडिया ची कल्पना: तिथे राजदा ने अमृततुल्य चहा बनवला आहे तर कांदा भजी आणि अमृततुल्य चहा मस्त एकत्र धागा काढायला हवा आहे.

जागू, मस्तच गं. गरमागरम भजी थंड किंवा पावसाळी हवेत खायची मजाच वेगळी. मला भजी साध्या पावाच्या स्लाईसमध्ये गुंडाळून खायलाही आवडतात Happy

जागु तु माझ्याकडे ६ महिने येऊन रहा आणि मला ही पाककला शिकव जराशी.

पाककला होय ?.... मी पकवायला शिकव (लोकाना) असे वाचले !!!! Lol

डॉ तुमचे खेक्डे बारीक हैत की. Happy
पण ह्ये ब्येस.
काल घरात दोन ल्हान पोरं हुती, पाउस पडायला लागल्यावर भुक भुक करत होते.
मी एकटाच घरी.
मग काय मॅगी वर भागवलं.

Pages