Submitted by उदयन. on 19 January, 2012 - 02:25
काल पासुन सुरु झालेले झी मराठी वरचे सारेगमपा...नवे पर्व...तार्यांचे

याधाग्यावर सारेगमपा प्रेमींचे स्वागत आहे
यंदा मराठी तारकांचा समावेश सारेगमपा मधे केला आहे...
परिक्षक आहेत : वंदना गुप्ते आणि अवधुत गुप्ते (गुप्ते गुप्ते
)
आणि सहभागी होणारे कलाकार आहेत
मोहन जोशी, प्रशांत दामले, किशोरी शहाणे, अमृता सुभाष, क्रांती रेडकर, वैभव मांगले, सतिश तारे, अभिजीत केळकर, गिरिजा ओक, दिप्ति भागवत, केतकी थत्ते, अजय,
या पर्वाचे सुत्र संचालन करणार आहे अभिजीत खांडकेकर............
चला तर चर्चा सुरु करु...... 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कुठं बघता हे सगळं? तुनळीची
कुठं बघता हे सगळं? तुनळीची लिंक द्या ना...
बस्के, तो आधी रेडिओ जॉकी
बस्के, तो आधी रेडिओ जॉकी होता. भाषा, आवाज सगळंच एकदम मस्त आहे त्याचं... फक्त तो दाढी का करत नाही हे काही कळत नाही.
मंजू....त्याचे पप्पा त्याला 2
मंजू....त्याचे पप्पा त्याला 2 रूपये वेळेवर देत नसतील.... म्हणून दाढी करत नाही...
मंजू....त्याचे पप्पा त्याला 2
मंजू....त्याचे पप्पा त्याला 2 रूपये वेळेवर देत नसतील.... म्हणून दाढी करत नाही... :)....
अय्या!! भारीच तुम्ही विनोदी
अय्या!! भारीच तुम्ही विनोदी बै udayone
मला पण अभिजीत खांडकेकरचं
मला पण अभिजीत खांडकेकरचं निवेदन खूप आवडतं.......... छान वाटतं त्याचं बोलणं ऐकायला
आवाज पण खूप तार सप्तकात नसतो.........ओरडाआरडी नाही....... मस्त वाटतं
मंजू, सकाळ मधे तो कॉलम लिहितो
मंजू, सकाळ मधे तो कॉलम लिहितो त्यात काल की परवाच त्याने लिहीलेलं की तो एका सिनेमासाठी दाढी वाढवतोय म्हणुन.
हां, मला असंच काही असेल असं
हां, मला असंच काही असेल असं वाटलं होतं. धन्यवाद गं अमृता
एका सिनेमासाठी दाढी वाढवतोय
एका सिनेमासाठी दाढी वाढवतोय म्हणुन. >>>>>>>>. २ रुपये वाचले
मंजू २ रुपयात कुठे दाढी करून
मंजू
२ रुपयात कुठे दाढी करून मिळते आजकाल?
बस्के, तो आमच्या नाशीकचा आहे हो.
कालच्या भागातलं अजय पूरकरचं
कालच्या भागातलं अजय पूरकरचं गाणं कसलं भारी झालं. खूपच सुंदर!!
२ रुपयात कुठे दाढी करून मिळते
२ रुपयात कुठे दाढी करून मिळते आजकाल?>>>>>>>>>>> मॅडम......२ रुपयात ब्लेड मिळते ते घ्यायचे विकत आनि घरी करायची
..
.
.
.
काल अजय नी कमालच केली......... तो आणि प्रशांत यांच्यातच खरी चुरस आहे.......
खेळताना रंग बाई होळीचा ऐकताना
खेळताना रंग बाई होळीचा ऐकताना मला उगाचच सुलोचना बाईंची नक्कल होत असल्याचा भास होत होता.
अजय च्या गाण्याला अनुमोदन. अभ्यास करुन म्हणल्यासारख जाणवत होतं तीच ती टिपीकल होळीची गाणी म्हणण्यापेक्षा असे प्रयोग स्वागतार्ह.
प्रशांत दामलेच्या आवाजाची
प्रशांत दामलेच्या आवाजाची परवा अवधूतने एकदम अचूक चिरफाड केली. तो कुठल्याही प्रकारच्या गाण्याला एकाच प्रकारे आवाज लावतो. पण समस सुरू झालेत त्यामुळे पंखा-मंडळाच्या जोरावर खूप पुढे जाणार तो.
परवाचं केतकी थत्तेने गायलेलं 'क्वाल' पण मस्त झालं होतं. पण ती त्याच प्रकारची गाणी चांगली गाऊ शकते वैविध्य कमी आहे जरा तिच्याकडे.
अजय पूरकर सगळ्यात योग्य वाटतोय विजेतेपदाकरता.
खेळताना रंग बाई होळीचा ऐकताना
खेळताना रंग बाई होळीचा ऐकताना मला उगाचच सुलोचना बाईंची नक्कल होत असल्याचा भास होत होता.>>>>>
अरे देवा कोण म्हणालं असं???
अमृता ही लावणी bold attitude ने गायली असं वाटलं मूळ लावणी ऐकल्यावर...
सुलोचना बाईंचा आवाज खणखणीत असला तरी तो उत्तान नाही वाटला कधीच! त्या सगळे भाव खुप छान दाखवतात आणि त्यांचा स्वतः न हलता केलेला गाण्यातला अभिनय लाजवाब!
केतकीने गायलेला शुभ मुद्गल यांचा 'रंग' मस्त!
मोहन जोशींचं रंग बरसे पण छान जमलं!
दिप्ती भागवत ने पण होळीचा वेगळा बाज असलेलं गाणं निवडलेलं!
पण शेवटी मनात राहीलं ते अजयचं गाणं!
पुर्वी, मला म्हणायचय की
पुर्वी, मला म्हणायचय की सुलोचना बाईंचा आवाज काढायचा प्रयत्न (थोडा नेझल).
सुलोचना बाईंचा आवाज खणखणीत असला तरी तो उत्तान नाही वाटला कधीच! त्या सगळे भाव खुप छान दाखवतात आणि त्यांचा स्वतः न हलता केलेला गाण्यातला अभिनय लाजवाब!
>>>ह्याला अनुमोदन. त्यांची लावणी घरंदाज असते कायम.
सुलोचना बाईंचा आवाज खणखणीत
सुलोचना बाईंचा आवाज खणखणीत असला तरी तो उत्तान नाही वाटला कधीच! त्या सगळे भाव खुप छान दाखवतात आणि त्यांचा स्वतः न हलता केलेला गाण्यातला अभिनय लाजवाब! >> पण हे अभिनेत्यांचे पर्व असल्यामुळे गाण्याबरोबरच अभिनय पण आला पाहिजे असे अवधूत म्हणाला की मागे एकदा. अमृता अप्रतिम गायली असे जराही म्हणायचे नाहीये पण मुळात स्पर्धेचे निकष काय आहेत ते पण जाणून घ्यायला हवेत.
तसाही निव्वळ गाण्यातून, त्याच्या सुरावटीतून भाव, अदाकारी सादर करता येत नाही असे त्याचे पहिल्या पर्वापासूनचे म्हणणे आहे. गाण्याबरोबर सादरीकरणालाही तेवढेच महत्व आहे असे त्याचे म्हणणे होते आणि आहे. तेंव्हा देवकीताईंना ते मत जराही मान्य नव्हते. पहिल्या पर्वात त्या दोघांचे या विषयावर शाब्दिक झालेले आहे. मग देवकीताई सारेगमप मधून बाहेर पडल्या आणि अवधूतच्या विचारसरणीचीच सरशी होत गेली या कार्यक्रमात. अपवाद फक्त पंडितजींच्या पर्वाचा - पण ते पर्व त्या पर्वातल्या स्पर्धकांमुळे कंटाळवाणे झाले होते.
त्यामुळे निव्वळ सूरांतून आणि शब्दांच्या फेकीतून अभिनय सादर होणे या कार्यक्रमात कठीणच आहे.
शुभांगी, मला वाटलं अवधूत
शुभांगी,
मला वाटलं अवधूत गुप्ते किंवा वंदना गुप्ते असं म्हणाल्या की काय...
ही लावणी परत परत ऐकली, खरंच कोणत्याही प्रकारे अमृताचा आवाज लावणी साम्राज्ञी सुलोचना चव्हाणांच्या आवाजाशी जुळणारा वाटत नाही हो...!:अओ:
सा रे ग म प सुर मनातले..स्वप्न तार्यांचे..!! या स्पर्धेचे निकष म्हणजे कठीणच वाटतंय अगदी...
स्पर्धा गाण्याची घ्यायची आणि गायक म्हणून स्पर्धेत आलेल्या लोकांना गाणं सुधारण्याऐवजी अभिनय करायला लावायचा याला काय अर्थ आहे?:राग:
निव्वळ सूरांतून आणि शब्दांच्या फेकीतून अभिनय सादर होणे या कार्यक्रमात कठीणच आहे.>>>
माधव अनुमोदन...
एकूण, गेली काही वर्षे
एकूण, गेली काही वर्षे गाण्याच्या कार्यक्रमामधल्या कलाकारांचा दर्जा खालावत चालला आहे हे प्रकर्षाने जाणवते आहे. "Quality of entertainment is as good as the Audiance" हे पटू लागले आहे.
सारेगामा हा सर्वस्वी संगीताचा प्रोग्राम असताना हे फुटकळ प्रयोग करून काय साधतात लोक काही कळत नाही..
सूरात न गाणार्या लोकाना भरभरून दाद देणारे परिक्षक पाहिले की हसावे की रडावे तेच कळत नाही.
सारेगामा हा सर्वस्वी संगीताचा
सारेगामा हा सर्वस्वी संगीताचा प्रोग्राम असताना हे फुटकळ प्रयोग करून काय साधतात लोक काही कळत नाही..
सूरात न गाणार्या लोकाना भरभरून दाद देणारे परिक्षक पाहिले की हसावे की रडावे तेच कळत नाही.>>>>
प्रचंड सहमत !
>>>सूरात न गाणार्या लोकाना
>>>सूरात न गाणार्या लोकाना भरभरून दाद देणारे परिक्षक पाहिले की हसावे की रडावे तेच कळत नाही.>>>>>सगळेच असूर म्हटल्यावर हे व्हायचेच.
Pages