Submitted by उदयन. on 19 January, 2012 - 02:25
काल पासुन सुरु झालेले झी मराठी वरचे सारेगमपा...नवे पर्व...तार्यांचे

याधाग्यावर सारेगमपा प्रेमींचे स्वागत आहे
यंदा मराठी तारकांचा समावेश सारेगमपा मधे केला आहे...
परिक्षक आहेत : वंदना गुप्ते आणि अवधुत गुप्ते (गुप्ते गुप्ते
)
आणि सहभागी होणारे कलाकार आहेत
मोहन जोशी, प्रशांत दामले, किशोरी शहाणे, अमृता सुभाष, क्रांती रेडकर, वैभव मांगले, सतिश तारे, अभिजीत केळकर, गिरिजा ओक, दिप्ति भागवत, केतकी थत्ते, अजय,
या पर्वाचे सुत्र संचालन करणार आहे अभिजीत खांडकेकर............
चला तर चर्चा सुरु करु...... 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पराग, आभाळमायातली मुग्धा
पराग,
आभाळमायातली मुग्धा गोडबोले वेगळी. ती मी नव्हे.
google music, pandora, limewire
वंगु मला फार आवडायच्या (
वंगु मला फार आवडायच्या ( मागच्या आठवड्यापर्यंत). आता परिक्षक म्हणुन अजिबात आवडत नाहीएत.

>>> +१
तशाही त्या मला या कार्यक्रमासाठी परिक्षक म्हणून जरा ऑड्च वाटल्या होत्या. माणिक वर्मांची मुलगी एवढीच त्यांची गायनाच्या क्षेत्रातील ओळख आहे - निदान मला तरी. महाराष्ट्राचा सुपरस्टार सारख्या नाट्यवर आधरित कार्यक्रमासाठी परिक्षक म्हणून शोभल्या असत्या. पण इथे काय सगळाच उजेड असतो एनिवे.
<<फारच गणपतीत मिळणारा
<<फारच गणपतीत मिळणारा स्वस्तातला ऑर्केस्ट्रा असणार कदाचित. >>

मी जेवढं ऐकलं त्यावरुन मोहन
मी जेवढं ऐकलं त्यावरुन मोहन जोशी ऑर्केस्ट्रात निवेदक होते. गायक नव्हे. पण निवेदकाला कधीतरी गायचीही वेळ येऊ शकते असं म्हटले ते
हे "सुर मनातले" शेड्युल
हे "सुर मनातले" शेड्युल अति-महाभयानक आहे एकंदरीत. काल त्या किशोरी विज शहाणेचा अवतार पाहीला का? पुलंच्या शब्दात....."काय ते गाणं आणि काय ते दिसणं...." जरासुद्धा सुराशी संबंध नसलेल्या कलाकारांना पकडून आणले आहे आपल्या डोक्यावर मारायला. परिक्षकांना ३०-४० हजार एका एपिसोडचे मिळतात असे समजले.
केतकी थत्तेला पायाचा काही
केतकी थत्तेला पायाचा काही प्रॉब्लेम आहे का? नेहमी बसून गाते
हे "सुर मनातले" शेड्युल
हे "सुर मनातले" शेड्युल अति-महाभयानक आहे एकंदरीत. काल त्या किशोरी विज शहाणेचा अवतार पाहीला का? पुलंच्या शब्दात....."काय ते गाणं आणि काय ते दिसणं...." जरासुद्धा सुराशी संबंध नसलेल्या कलाकारांना पकडून आणले आहे आपल्या डोक्यावर मारायला. >>>>> अनुमोदन
खरतर माबोतील हा धागा पाहून सारेगम प बघायला गेले आणि घरातील सर्वांची बोलणी खाल्ली ..... आता काय घरचे बघू देत नाय हा फियास्को ......
मी जेवढं ऐकलं त्यावरुन मोहन
मी जेवढं ऐकलं त्यावरुन मोहन जोशी ऑर्केस्ट्रात निवेदक होते. गायक नव्हे. पण निवेदकाला कधीतरी गायचीही वेळ येऊ शकते असं म्हटले ते>>> अगो + १.
सगळ्यांनाच एक नम्र आवाहन : टीका करा, नकारात्मक प्रतिक्रिया द्या, पण भान राखून.
केतकीचा पाय दुखावला आहे, बँडेजमध्ये आहे हे पहिल्याच भागात सांगितले होते.
केतकीच्या पायाला फ्रॅक्चर
केतकीच्या पायाला फ्रॅक्चर झालेले आहे.. ३ आठवडे एक प्लॅस्टर आणि नंतर पुढचे ३ आठवडे दुसरे प्लॅस्टर असे तिनेच सांगितले पहिल्याच भागात...
सर्वात विनोद गेले दोन भाग होते.. लहान मुलांची २ शेड्युल्स झाली त्यात कुठल्याही मुलांना गेल्या दोन भागातली गाणी गायला सांगितली नाहीत आणि त्या मुलांच्या आई बाबांच्या वयाच्या व्यक्तींना लहान मुलांची गाणी गायला लावली...
सारेगमप बहुतेक कायमचे बंद करायची इच्छा दिसते आहे झी वाल्यांची..
१०० वी पोस्ट
१०० वी पोस्ट
या वर्षीचा सगळ्यात फालतू
या वर्षीचा सगळ्यात फालतू कार्यक्रम
अमोल केळकर
या वर्षीचा सगळ्यात फालतू
या वर्षीचा सगळ्यात फालतू कार्यक्रम
अमोल केळकर >>>>>>>>>>>>>>> हा कोणता कार्यक्रम आहे.....कोणत्या चॅनल वर येतो ......
वंदना गुप्ते - मला सुरवातीला
वंदना गुप्ते - मला सुरवातीला वंगु स्पर्धक वाटली पण परीक्षक म्हणून अजिबात झेपत नाहीये ती .
अवधूत गुप्ते - याचा थिल्लरपणा फार वाढलाय आजकल...(याचे जोक बायकांवरच असतात.....कायचा काय कमेंट करत असतो )
(परीक्षक अजिबात आवडले नाहीत ....)
अजय - १ नं (बहुतेक 'हेच' जिंकतील हे पर्व )
प्रशांत - खूप सोज्वळ गातो.
अभिजित केळकर - मला याने गायलेले 'हा सागरी किनारा' आवडले ....छान गातो.... त्यामुळे टिकेल
वैभव - फुबाई फु आणि बऱ्याचशा कार्यक्रमात मी एखादी पंक्ती गाताना ऐकलीय बरा गातो
दीप्ती आणि केतकी - या दोघी टिकतील. अगदीच कंटाळवाण्या नाहीत
गिरीजा आणि अमृता - त्यातल्यात्यात बऱ्या आहेत (अमृताने पहिलेच गाणे "रसिका जोशी" ला समर्पित केले ते आवडले )
मोहन जोशी, किशोरी, सतीश तारे, क्रांती रेडकर - यांनी या पर्वातून बाहेर पडल्यावर पुन्हा गाण्याचा "प्रयत्न" हि करू नये.
सगळ्यांनाच एक नम्र आवाहन :
सगळ्यांनाच एक नम्र आवाहन : टीका करा, नकारात्मक प्रतिक्रिया द्या, पण भान राखून. >>>>>
हे सगळे अभिनेते आहेत. त्यांच्या प्रांतात ते राजे .... अर्थात मर्यादा अगदी पैशासाठी सोडल्या तर मग हसूच होईल....जे रसिक प्रेम करतात , डोक्यावर घेतात ते अंडी देखील मारतात....
आज चा मस्त होता...प्रशांत
आज चा मस्त होता...प्रशांत दामले सहज गायला...
अम्रूता चे स्वर गेले पण ठसक्यात गायली...
किशोरी..आनंदीआनंद होता नेहमी प्रमाणे...
..
आज पासुन निकाल
आज पासुन निकाल लागणार....किशोरी चे गाणे ऐकुन हीच आधी जाणार हे जास्त वाटु लागले आहे....तारे नी मागच्या पेक्शा बर गायला..
"जेणु काम तेणु ठाय्...दुजा
"जेणु काम तेणु ठाय्...दुजा करे सो गोता खाय्"....ही उक्ती पटते आहे. निदान काल अवधूत किशोरीला म्हणाला तरी की बाई, तु सुर ताल शब्द वगैरे मधे सुधारणा करु शकशील पण किमान अभिनय तरी करु शकली असतीस...(अश्या अर्थाचे काहीतरी)...अमृता सुभाषच्या लावणीवर काल वंगु सुद्धा नाच करु शकल्या असत्या. परिक्षकांचा पेहेरावही तसाच होता..
"मालवून टाक दीप" (केतकी
"मालवून टाक दीप" (केतकी थत्ते) आवडलं.
चला आज बेटींग बेटींग
चला आज बेटींग बेटींग खेळु................आज कोण जाणार यावर......
मोहन जोशी, = ०.५०
प्रशांत दामले, = ५
किशोरी शहाणे, = ०.१०
अमृता सुभाष, = १.२५
क्रांती रेडकर, = ०.११
वैभव मांगले, = १.७५
सतिश तारे, = ०.२५
अभिजीत केळकर = १
गिरिजा ओक = १.५०
दिप्ति भागवत = २
केतकी थत्ते = ४
अजय = ३
हा भाव आहे आज चा............ आज कोण जाणार
आजचा मान किशोरीताईंना मिळेल
आजचा मान किशोरीताईंना मिळेल असेच वाटते.
१)केतकीच - मालवुन टाक दीप
१)केतकीच - मालवुन टाक दीप (दोन्ही कडवी) मस्तच झालीत
२)अजय - सख्या चला बगामधी रंग खेळु चला (घाशिराम कोतवाल)
३) प्रशांत दामले - मी हे गाण मिसल
४)अमृता - छबीदार छबी नी तोर्यात उभी (चांगल)
५)सतिष तारे -हाऊस ऑफ बांबू ( मागच्यापेक्षा चांगल गायले)
६) किशोरी शहाणे - हिचं गाणही आठवत नाहिये.
कालचा एपिसोड चांगला झाला. आज क्रांती, गिरिजा, मोहन जोशी, दिप्ती मलातरी त्यांची एक झलक दाखवली तेंव्हा फक्त दिप्ती आणि मोहन जोशी ठीक वाटले आज बघुयात
हिचं गाणही आठवत
हिचं गाणही आठवत नाहिये..............ऐरणी च्या देवा तुला ठिणगी ठिणगी
गेली एकदाची किशोरी.... गिरीजा
गेली एकदाची किशोरी....
गिरीजा जितकी छान दिसली तितकीच वाईट गायली...
....
.?...
.?...
मांगलेचे शेवटच्या ३ मध्ये
मांगलेचे शेवटच्या ३ मध्ये असणे काही पटले नाही....
त्याच्याजागी गिरिजा जास्त योग्य होती..
पुरकर व मांगले दोघांनाही गुण देताना अन्याय केला.
तो अभिजीत सूत्रसंचालन ठीक
तो अभिजीत सूत्रसंचालन ठीक करतो, पण
स्वर मनातले (यातला 'स्वर' हा शब्द) आणि स्वप्न तार्यांचे (यातला 'स्वप्न' हा शब्द), हे फार हिंदवट बोलतो.
कार्यक्रम मराठी, माणूस मराठी आणि उच्चार हिंदवट?
राज ठाकरेला सांगायला पाहिजे, दुसर्या दिवशी कार्यक्रम बंद.
तिच्यायला सगळ्यांच्या डोक्याची कटकट जाईल...
काल मी मागच्या आठवड्याचे भाग
काल मी मागच्या आठवड्याचे भाग पाहिले. संगीतकार विशेष वाले. अभिजीतचं सूत्रसंचालन चांगले वाटले. मुळात म्हणजे सुरु केलेले वाक्य पूर्ण करतो. नाहीतर अनेकदा वाक्याचा शेवट सूत्रधाराच्या हावभावांवर संपतो. आणि पल्लवीपेक्षा कितीतरी सुंदर बोलतो आहे. आवडले.
आणि वंदनाताईंचं 'वंदन' करणं कसल्लं मॉडर्न!! कपाळाच्या उजव्या कोपर्याला बोटांची टोकं हलकेच टेकवून!
अवधूतला प्रत्येक वेळी स्पष्ट करावं लागतं, 'ही कॉम्प्लिमेंट आहे!'
स्पर्धकांबद्दल नंतर.
त्यामानाने दोन्ही गुप्ते वात आणतात. नको त्या कमेंटस.
आशूच्या संपूर्ण पोस्टीला
आशूच्या संपूर्ण पोस्टीला अनुमोदन!
काल मी मागच्या आठवड्याचे भाग
काल मी मागच्या आठवड्याचे भाग पाहिले. संगीतकार विशेष वाले. अभिजीतचं सूत्रसंचालन चांगले वाटले. मुळात म्हणजे सुरु केलेले वाक्य पूर्ण करतो. नाहीतर अनेकदा वाक्याचा शेवट सूत्रधाराच्या हावभावांवर संपतो. आणि पल्लवीपेक्षा कितीतरी सुंदर बोलतो आहे. आवडले.>>>>>>> अनुमोदन.
मला पण अगदी पहिल्या
मला पण अगदी पहिल्या भागापासूनच अभिजीत चं निवेदन आवडलं
काल त्या क्रांती रेडकर च्या गाण्याला अवधूत "चाबूक गायलीस " म्हणाला. कान बंद करून ऐकलं की काय त्यानं ??? कमाल आहे.
Pages