झी मराठी: सारेगमप !! सुर मनातले..स्वप्न तार्‍यांचे..!!

Submitted by उदयन. on 19 January, 2012 - 02:25

काल पासुन सुरु झालेले झी मराठी वरचे सारेगमपा...नवे पर्व...तार्‍यांचे

saregamapa-logo.jpg

याधाग्यावर सारेगमपा प्रेमींचे स्वागत आहे
यंदा मराठी तारकांचा समावेश सारेगमपा मधे केला आहे...

परिक्षक आहेत : वंदना गुप्ते आणि अवधुत गुप्ते (गुप्ते गुप्ते Lol )

आणि सहभागी होणारे कलाकार आहेत
मोहन जोशी, प्रशांत दामले, किशोरी शहाणे, अमृता सुभाष, क्रांती रेडकर, वैभव मांगले, सतिश तारे, अभिजीत केळकर, गिरिजा ओक, दिप्ति भागवत, केतकी थत्ते, अजय,

या पर्वाचे सुत्र संचालन करणार आहे अभिजीत खांडकेकर............

चला तर चर्चा सुरु करु...... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मलाही नाही आवडत गं ती, म्हणूनच वरती सुखद धक्का म्हटलं ना.
मला अमृताही नाही आवडत. Sad अगदीच बळंच आहे ती...

सतिश तारे तर सिरयलमध्ये संवाद बोलतानासुध्दा गळ्याच्या शिरा ताणून बोलतात असे वाटते आणि आता गाणार पण बापरे??????????????????????????????

मला तर अभिजीत खांडकेकर चं निवेदन आवडलं. उगाच आरडाओरडा नाही.....संयमीत होतं सगळं बोलणं !!
बाकी गाणी......... कोण चांगलं गातंय आणि कोण नाही.....हे काही दिवसात कळेलंच Happy

हो बरोबर जयूताई, ह्याआधीच्या पर्वातही प्रिया बापट लग्नाच्या सुट्टीवर असताना अभिजीत आला होता तेव्हा छान सांभाळलं होतं त्याने Happy

उदय, काल रात्री उत्साहाने 'सारेगमप' बघायला बसले आणि नंतर जे काही झालं ते पाहुन वाटलंच कि कोणी तरी धागा चालु करणार.

केतकी आणि अजय (:इश्श:) - मस्तच गायले.
मोहन जोशी - ऑर्केस्ट्रा गायक होते असं काही भारी गायले नाहीत. ठीक होतं. वाईट तरी नक्कीच नव्हतं.
गिरीजा - ठीक होती. पण वंगुने डोळ्यात पाणी काढण्याइतकं?
क्रांतीच्या गाण्यासाठी पहा ही स्वरदा गोखलेंची कमेंट आणि माझे त्यात + १००. <<क्रांती रेडकरने कोंबडी ची पार चिकन बिर्याणी केली आणि वंगु आणि अगुने चविचविने खाल्ली. >>> दोन्ही गुप्ते काय छानदार खोटं बोलले. Proud

नंतर जे काही झालं ते पाहुन वाटलंच कि कोणी तरी धागा चालु करणार. >>>>>>>> माझ्या मनात नव्हते .....गिरीजा चे लग्न झाले ना..त्त्याच्या दुखा:त नकळत काढला Happy

क्रांती किती किंचाळत होती... कान किटले अगदी... कधी एकदा गाण संपतय अस झाल होत..
स्वतःच्याच गाण्याची का इतकी वाट लावावी??? वर आणि किती तो मेकअप आणि नखरे.. गाण कमी नी नखरेच जास्त करत होती त्यापेक्षा त्या मागच्यांबरोबर नाचली असती तर बरी वाटली असती त्या नाईट गाऊन मध्ये..
अजय पुरकर एक्दम झक्कास...............

अजय आणि केतकी छानच गायले.......
अमृता, प्रशांत दामलेंकडुनही अपेक्षा आहेत. बघु काय होते ते? Happy

क्रांतिच्या गाण्यावरच्या परीक्षकांच्या प्रतिक्रिया मात्र डोळे फिरवायला लावणार्‍या होत्या Proud

सगळ्यांना अनुमोदन. विशेषतः आगावाला. कालचा भाग पाहुन मलाही वाटलेच कि आज माबोवर आले की धागा असणारच.
क्रांती रेडा... आणि अ.सु. बाईंना पहिले बाहेर काढा.
अजय-१ नंबर

त्या मागल्या वेळच्या "ऑव्हीयस" रिझल्ट्स पासुन मी झीसारेगम बघणेच सोडुन दिलय.
सबब, बाकी सिरीयल्स मधुन चुकुन माकुन तिकडे जाता आल, अन ते लिम्बीला आवडल (तिला गाणी आवडतात - चान्गल्या गायकान्नी म्हणलेली, मी नाही) तर बघितल जाईल कदाचित. (तसाही टीव्हीबाबत मला चॉईस नस्तोच कधीही - मग मी आपला लोकसत्तेत नैतर पुजापाठान्च्या पुस्तकात डोक खुपसुन घेतो).

अरे वा, हे पर्व बघायला आवडेल ( असं आत्ता तरी वाटतंय ) Happy
प्रोमोमधील गिरीजा ओकचं गाणं माझ्यासाठीही सुखद धक्काच होता. अजय पूरकर म्हणजे इन्स्पेक्टर वझलवार का ? ऐकायला हवं त्यांचं गाणं इथल्या प्रतिक्रिया वाचून. अमॄताच्या गळ्यात सूर आहे. तिने एकंदरीतच प्रेक्षकांच्या अंगावर येणं थांबवलं तर चांगलं गाऊ शकेल पण तिला ते जमेल असं वाटत नाही Wink
प्रशांत दामले नाटकात फार सुंदर गातात. मोहन जोशींचं ऐकलं नाहीये कधी गाणं. केतकी थत्ते उत्तम डान्सर आहे हे माहीत आहे. कॉलेजच्या गॅदरिंगला तिने 'पिया घर आया' वर केलेला डान्स लक्षात आहे Happy

खूप दिवसात माबोवर आले नव्हते, पण काल सारेगमप सुरु झाल्या झाल्या ठरवल की उद्या काहीही करुन माबो बघायचच Happy
प्रशांत दामले खरच खूप छान गातो.
कालच्या भागात क्रांती आणि सतिश ही दोन माणस सोडली तर बाकी बरे आणि चांगले या सदरात गायले, फक्त अजय मस्त गायला.

red tube, pandora, limewire

वा वा आला का धागा ?
बघायला पाहिजे आता.. अगु वंगु जज म्हणजे निदान निरूपणं तरी नसतील ! जरा टाईमपास करतील दोघंही..

बायदवे वरच्या मुग्धा.रानडे म्हणजे आभाळमायातल्या मुग्धा गोडबोले का?

अजय , केतकी थत्ते छान गायले.
प्रशांत दामले साठी पण बघायचय,
क्रांती आणि सतिश तारे यांना मात्र उगाच घुसवलय अस वाटतं .

अमृता बरीये की लोकहो. हां आता नाटकी आहे पण तसा गाता गळा आहे तिचा.
अजय पूरकर मात्र खरच प्लेझंट सरप्राईज होता काल.
सतिश तारे Sad कोलावरी ??
गिरीजा काल बरी वाटली. ती पण नाटकीच आहे. डोळे भरून येण्याएवढे आर्त वगैरे काही झालं नव्हतं तिचं गाणं. वंगु बळचं.

पहिला नं जाणार- क्रांती रेडकर/ सतिश तारे.

क्रांती किती किंचाळत होती... कान किटले अगदी... कधी एकदा गाण संपतय अस झाल होत..
स्वतःच्याच गाण्याची का इतकी वाट लावावी??? वर आणि किती तो मेकअप आणि नखरे.. गाण कमी नी नखरेच जास्त >>>>>>>>>>>>>>> हो नं...कसली केकाटत होती ती..

अजय पूरकर चांगला गातोय.
क्रांती रेड्कर चे आड्नाव 'रेड'कर आहे याचा पुरावा मिळाला Lol
सतिश तारे पहीले बाहेर जाणार
>>>गिरीजा काल बरी वाटली. ती पण नाटकीच आहे. डोळे भरून येण्याएवढे आर्त वगैरे काही झालं नव्हतं तिचं गाणं. वंगु बळचं.>> हो हो ती उगीच रडत होती (नाटक करत होती)

Pages