झी मराठी: सारेगमप !! सुर मनातले..स्वप्न तार्‍यांचे..!!

Submitted by उदयन. on 19 January, 2012 - 02:25

काल पासुन सुरु झालेले झी मराठी वरचे सारेगमपा...नवे पर्व...तार्‍यांचे

saregamapa-logo.jpg

याधाग्यावर सारेगमपा प्रेमींचे स्वागत आहे
यंदा मराठी तारकांचा समावेश सारेगमपा मधे केला आहे...

परिक्षक आहेत : वंदना गुप्ते आणि अवधुत गुप्ते (गुप्ते गुप्ते Lol )

आणि सहभागी होणारे कलाकार आहेत
मोहन जोशी, प्रशांत दामले, किशोरी शहाणे, अमृता सुभाष, क्रांती रेडकर, वैभव मांगले, सतिश तारे, अभिजीत केळकर, गिरिजा ओक, दिप्ति भागवत, केतकी थत्ते, अजय,

या पर्वाचे सुत्र संचालन करणार आहे अभिजीत खांडकेकर............

चला तर चर्चा सुरु करु...... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सारेगम'पा' नाही हो... सारेगमप Happy (कार्यक्रम ऐकलात ना नीट? Proud )

सहभागी कलाकारांमध्ये अजयचं पण नाव घाला. काल त्याने 'माझे जीवनगाणे' खूप सुरेख गायलं.
मोहन जोशी, गिरीजा ओक सुखद धक्का Happy

एक खटकत होते................तो अरे तुरे सगळ्यांना करत होता.....काल खडी साखर देत होता म्हणुन कोणी बोलले नाही त्याला ..:)

गिरीजा ओक सुखद धक्का>>>>>>>.नाही गायली तरी माझ्यासाठी ती सुखद धक्काच आहे Happy

नुसते अरे तुरेच नाही तर काका, काकु, दादा वगैरे अगदी सारेगमप गुप्ते कुटुंबात आल्यासारख वाटत होत.
बर इथे फक्त चांगलच बोलायच आहे का??

नाही गायली तरी माझ्यासाठी ती सुखद धक्काच आहे
>>>
उदय, रेडकरांच्या क्रांतीपुढे ती सुखदच आहे आणि गातेही चांगलीच की.

अजय पूरकर...

गुब्बे.. माबोवरचा कुठला तरी धागा असा आहे का की ज्यावर फक्त चांगलेच बोलले जाते...

अजय पूरकर, वैभव मांगले, अमृता सुभाष आणि केतकी थत्ते ह्यांच्यातच लढत होणार..

वैभव मांगले, अमृता सुभाष >>> ईईईई Sad अमृता सुभाष आधीच रडी... त्यात आजच्या भागात तिने गाणं पण रडं म्हटलंय.

'माँ' हे गाणं तू कुणाला डेडीकेट करणार? असा तुफान हुशार प्रश्न काल विचारला गेला, आता हे गाणे सासरे, आज्जेसासू किंवा चुलतमावसबहिण इ. नातेवाईकांनाही डेडीकेट करता येतं का?

अमृता सुभाषबद्दल अनुमोदन. ती स्वतःलाच एक गायिका म्हणून हाईप करून घेते आहे! Proud काय आणि किती ते कळेलच आता.
अजय पूरकर मात्र एक नंबर.
वैभव मांगले आणि प्रशांत दामले बरं गातात. मोहन जोशीही.

माँ' हे गाणं तू कुणाला डेडीकेट करणार? असा तुफान हुशार प्रश्न काल विचारला गेला >>> हो आणि मी जाम हसलो होतो त्याला.

मला माहिती नव्हते की हे पर्व तार्‍या बिर्‍यांचे आहे. मी आपले नेहमीचे असेल म्हणून लावलेले. आता बंद. त्यांनी गायलेले ऐकल्यापेक्षा मी हॅलो मि डिजे अन एकॉनला पण ऐकेन.

पूनमला अनुमोदन. अमृता सुभाष बोअर करणार आहे.
अजय, वैभव मांगले, प्रशांत दामले, केतकी थत्ते चांगले वाटताहेत.

आगावा Lol मी काल अगदी हेच बोलले घरी. ते म्हंजी कसय पिवळा पिताम्बर, रात्रीची नाईट आणि लेडिज बायका टाईप.

बरं ह्या पर्वातून बाहेर पडणारे पहिले कोण असेल??

क्रांती रेडकर, सतिश तारे की अजून कोणी..

बरं ह्या पर्वातून बाहेर पडणारे पहिले कोण असेल?? >>> रसिक मायबाप >>> Lol आणि मग क्रांती रेडकर.....
खुप्च उत्तम बेसुर, भेसुर गाते ती Proud

गिरीजा ओक आणि क्रांती रेडकर Uhoh अजय पूरकर भारी गातो हे असंभवच्या वेळीच कळाले होते. तो भेटला होता सवाईला तेव्हाच्या तेव्हा एकाने माहिती दिली होती, मी तेव्हा 'इन्स्पेक्टर वझलवार' म्हणूनच ओरडले होते!

पहिला नंबर ..........सतिश तारे..............काल त्याने चमकवलेच आहेत तारे Happy
दुसरा नंबर ...........क्रांती रेडेकर............ रेडा तिच्यापेक्षा चांगली गाणी म्हणेल.. Happy
तिसरा नंबर ......... आजचा एपिसोड बघु या मग ठरवु

पहिल्या, दुसर्‍या भागात बाहेर काढण्यासाठी कोणी मेम्बर नको का? >>>>>> माझ्या लक्षातच आलं नाही
बाकी केतकी थत्ते चांगली गाते ....

Pages