झी मराठी: सारेगमप !! सुर मनातले..स्वप्न तार्‍यांचे..!!

Submitted by उदयन. on 19 January, 2012 - 02:25

काल पासुन सुरु झालेले झी मराठी वरचे सारेगमपा...नवे पर्व...तार्‍यांचे

saregamapa-logo.jpg

याधाग्यावर सारेगमपा प्रेमींचे स्वागत आहे
यंदा मराठी तारकांचा समावेश सारेगमपा मधे केला आहे...

परिक्षक आहेत : वंदना गुप्ते आणि अवधुत गुप्ते (गुप्ते गुप्ते Lol )

आणि सहभागी होणारे कलाकार आहेत
मोहन जोशी, प्रशांत दामले, किशोरी शहाणे, अमृता सुभाष, क्रांती रेडकर, वैभव मांगले, सतिश तारे, अभिजीत केळकर, गिरिजा ओक, दिप्ति भागवत, केतकी थत्ते, अजय,

या पर्वाचे सुत्र संचालन करणार आहे अभिजीत खांडकेकर............

चला तर चर्चा सुरु करु...... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्रांती गायली यावरच माझा विश्वास बसत नव्हता पाच मिनिटे Lol अर्धवट डोळे उघडे ठेवुन गात होती आणि सुरांबद्दल तर बोलायलाच नको.
मोहन जोशी चांगल गायले पण वरचा सा मिळण्यासारख गाण नव्हत.
वैभव मांगलेने गायलेल - वार्‍यावरती गंध पसरला मला तरी आवडल. त्याला मार्क देताना दोन्ही गुप्ते आखडते हात का घेतात कळत नाही.
आज केतकीच 'राजसा, जवळी जरा बसा' एकदम चांगल असणार.
अजय पण आजच आहे. म्हणजे माझे दोन्ही आवडते कलाकार आज आहेत. उद्या लिहिते त्याबद्दल.

@शुभांगी कुलकर्णी..अगदी खरे आहे...कसली भयाण गायली (?????????????) ती रेडकर..पण लय हसवल तिने..डोळे अर्धे उघडे ठेवून ती जे काही करत होती ना ते प्रचंड ईनोदी होत आणि ती जे काही हसली गाण संपताना तेव्हा तर लई हसलो Happy फार मजा आली मात्र.. तिने अशीच करमणूक करावी आणि तिला फायनल परेंत न्यावे..:)

ते एक सुभाषित आहे ना 'अहो रुपं अहो ध्वनिम' चपखल बसते इथे एकदम जेव्हा गुप्ते बाई कमेंट फेकतात तेव्हा Happy

त्या क्रांती रेडकरला गायला का लावतायत हे लोक? कायच्या काय चालल्य तिकडे Uhoh जोशींनी गायलेल्या गाण्याला सा दिला तो, त्या गाण्याला असावा. त्या गाण्याचा आत्माच मुळात श्रीमंत आहे, गायकीचा संबंध नसावा दोन्ही परिक्षकांच्यामते.

आणि एक खटकतय ते म्हणजे हिंदी गाणी का? अरे? मराठी सारेगम आहे ना मग मराठी जुनी गाणी काय कमी आहेत का आपल्याकडे?

मध्यंतरी सोनु निगमनी सोडल्यानंतर हिंदी सारेगमप ला ब्रेक घ्यावा लागला होता. तसं मराठी सारेगम ला ब्रेक ची नितांत आवश्यकता आहे.

अभिजीतच निवेदन उत्तम, गेल्या पर्वात कोण होत्या त्या बाई त्यांना फार ओढून ताणून बोलावं लागत होत.

काल मला सुनिधी चौहान चा फोन आलेला..
एका खुनाची शिक्शा किती आणि दोन केले तर किती...?

काल चुकून क्रांती चे गाणे ऐकले....

काय सल्ला देऊ...?

Lol

अहो उदयवन जरा दमाने! Happy
काही जण वाईट गात आहेत हे पहिल्या भागापासून कळलय ना. मग पाहू नका त्यांची गाणी. कंपल्शन थोडीच आहे. पण एकदम खुनापर्यंत नका पोचू !!

अहो मला नाही....सुनिधीला....तिला कसे समजावू... Happy

>>काल त्या क्रांती रेडकर च्या गाण्याला अवधूत "चाबूक गायलीस " म्हणाला. कान बंद करून ऐकलं की काय त्यानं ??? कमाल आहे. <<
बहुतेक अवधुत गुप्ते मनसोक्त "आनंद लुटुन" आलेले अशी शंका घ्यायला जागा आहे. अरे गाणं काय, आवाज काय, हावभाव काय; सगळीकडे आनंदि आनंद... Happy

मोहन जोशींच हि तेच. सिजन्च्या सुरुवातीला अवधुत त्यांच्या पाया वगैरे पडला, अजुन तो त्याच दडपणाखाली आहे असं वाटतंय. वैभव मांगलेवर मात्र कमी गुण देऊन अन्याय होतोय. सुधीर फडक्यांच्या त्या गाण्याची झलक अतिशय सुंदर.

आज किशोर कुमार चा प्राण नक्कीच तळमळला असेल.....
सतिश सारखे भयानक स्वप्न उभ्या आयुष्यात पडले नसेल... Happy
.

अवधूतवर काय वेळ आली आहे. लिंबु-टींबुंच्या टीममधे कच्चा आणि पक्का लिंबु ठरवतो आहे बिचारा. त्याची खास विशेषणेही आता बोथट झाली आहेत. हया पर्वानंतर तो कधीही परिक्षक होईल असे वाटत नाही.

कालची सगळीच गाणी चांगली होती अपेक्षेप्रमाणे.
अजय आणि केतकी नेहमीप्रमाणे चांगल आणि प्रामाणिक गायले. तयारी दिसते त्यांची. Happy
मुळातच, लताबाईंच 'राजसा, जवळी जरा बसा' ही एक अप्रतिम बैठकीची लावणी आहे त्यात ती केतकीने योग्य प्रकारे निभावली. तिचे हावभाव सुद्धा किती समर्पक होते.
गिरीजाच गुन गुन गुना रे गुन गुन गुना गाना रे ठीक होतं.
सतीष तारेंनी गाण म्हणण्यापेक्षा खरच एखाद्या वाद्यात प्रभुत्व मिळवल तर खुप चांगल होईल आणि आपल्यालाही एक चांगला वादक मिळेल. काल त्यांना दिलेली अवधुतची कमेंट आवडली.
वंदना ताईंच्या कुठल्याही कमेंटवर मी भाष्य करणार नाही.
प्रशांत दामलेंचे गाणे यावेळीही नाही मिळाले ऐकायला मला Sad

मी परवा(बुधवारी) प्रथमच हा कार्यक्रम पाहीला.
क्रांतीला इतके छान गुण कशाच्या बेसीसवर दिले काही कळल नाही. तिच्यापेक्षा अभिजीत कितितरी छान गायला अस मला तरी वाटल.
कालचा भाग मी मिसला...

का पोष्टींचा पाउस पाडताय?
आवडलं तर बघा नाहीतर टी वी बंद ठेवा. तेवढीच वीज बचत.

काल अभिजित केळकरला दिलेले गुण कितपत योग्य होते?
दिप्ती व वैभव वर तर सरळ सरळ अन्याय झाला. वन्दनाबाई म्हणे बैलाबद्द्ल अभिमान होता प्रेम नव्हे..... आता बोला Happy

ही वंदना गुप्ते काहीवेळा फार कुजकटपणा करते, असं नाही वाटत का?

गिरिजा ओकबद्दल म्हणाली होती, "लहानपणापासूनच ही खोडसाळ आहे"

अमृता सुभाष मागच्या आठवड्यात कौतुकाने सांगत होती की काही उर्दू शब्दांचे अर्थ विचारण्यासाठी तिने गुलजार यांना फोन लावला होता. तर वंदना गुप्ते असे काहीसे म्हणाली होती, "अरे वा! डायरेक्ट तिथपर्यंत वशिला लावला का!"

'खुपते तिथे गुप्ते' मध्ये स्मिता तांबेसुद्धा तिने श्रेयस तळपदेशी कॉन्टॅक्ट केला होता असं काहीतरी सांगत होती, तर कुजकट अवधूत गुप्ते असं काहितरी म्हणाला होता, "अरे वा! डायरेक्ट बॉलिवूड ला वशिला लावला का?"

--------

ह्या गुप्ते मंडळींच्या पोटात एवढे का दुखते बरं? Uhoh

काल अभिजित केळकरला दिलेले गुण कितपत योग्य होते?
दिप्ती व वैभव वर तर सरळ सरळ अन्याय झाला.>> अगदी अगदी.
दिप्ती खूप वेगवेगळ्या स्टाईल चे गाउ शकते ,कालच तर मस्तच होतं

तारे गेले...... फायनली....

आता बरे गाणारेच राहीलेत... Happy
....

काल चा भाग चांगला होता........विशेषतः मोहन जोशी आणि दिप्तीचे गाणे छान झाले.........

मी खरतर प्रशांत दामले च्या गाण्याची वाट बघत बसलेलो पण ते आजच्या भागात आहे Sad

चला किमान आता चांगले गाणारेच उरले आहेत Happy

काल दिप्तीवर फारच अन्याय झाला... ती नक्कीच चांगलं गायली होती.. आणि ते गाणे अजिबातच सोपे नाही...

काल प्रशांत दामलेचे गाणे मस्त झाले........ सुरात गेला थोडाफार पण छान होते...
त्याला बघुन वाटत नाही की इतकी मोठी मुलगी आहे त्याला Happy

काल अभिजित एलिमेट झाला

काल प्रशांत दामलेचे गाणे मस्त झाले........ सुरात गेला थोडाफार पण छान होते...
>>>
त्याने प्रामाणिक प्रयत्न केला गायचा. सगळे टिपं गाळत होते ते मात्र पटल नाही. प्रत्येकवेळी मेलोड्रामा करण्याची गरज आहे का? त्याची लेक जातिये सासरी तेंव्हा त्याने थोडं भावुक होणं ठीक आहे पण सगळेच?? असो.

मला पुन्हा एकदा अजय पूरकर आवडला (गायलेलं गाणच इतक अप्रतिम होत की). आण्णांच गाणं आणि तेही ताकदीने निभावण कठीण आहे.

दिप्ती भागवत चांगल गायली. पण अमृतापुढे तिच्यावर अन्याय झालाय हे जाणवत होतं.

अभिजीत केळकर चा नंबर लागणारच होता.
केतकी थत्ते इतरवेळी चांगल बघते मग गायच्या वेळीच एक डोळा का बारीक करते हे कळ्ळ नाही. तिचं कालचं गाणं ठीक ठीकच होत.

मी प्रशांत दामलेचे गाणे थोडे ऐकले.. चांगले वाटले.
तो माप्रिप्रिक वाला निवेदक किती चांगलं निवेदन करतो! मागच्यावेळेस प्रिबाच्या निवेदनापासून धसका घेतला होता!

Pages