परस्परसंबंध ओळखा स्पर्धा - ३

Submitted by माध्यम_प्रायोजक on 15 January, 2012 - 21:38

'जनगणमन' या आपल्या राष्ट्रगीताची शताब्दी साजरी करण्यासाठी, आणि 'जन गण मन' या चित्रपटाचं स्वागत करण्यासाठी मायबोलीवर आयोजित केलेल्या स्पर्धांमधली ही तिसरी परस्परसंबंध ओळखा स्पर्धा!!!

खाली काही चित्रं दिली आहेत. या सर्व चित्रांचा कशाशी संबंध आहे, या चित्रांतून काय लक्षात येते, ते तुम्ही इथे लिहायचं आहे.

Quiz_3c.jpgQuiz_3a.jpgQuiz_3.jpg

समान धागा, म्हणजेच परस्परसंबंध ओळखण्यासाठी तुम्ही कितीही वेळा प्रयत्न करू शकता, कितीही वेळा उत्तर देऊ शकता. यासाठी तुम्ही कुठल्याही माहितीस्रोतांचा वापर करू शकता.

मात्र पूर्ण उत्तरंच स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जातील. सर्व चित्रांचा संबंध उत्तरात असणे आवश्यक आहे.

बाफवर जे उत्तर सर्वप्रथम बरोबर असेल त्याला बक्षीस मिळेल. बरोबर उत्तर जेव्हा येईल तेव्हाच आम्ही तसे जाहीर करू. चूक उत्तराला आमच्याकडून काहीच प्रतिसाद मिळणार नाही. जोपर्यंत आमच्याकडून 'हे बरोबर उत्तर आहे' असे जाहीर केले जात नाही, तोपर्यंत तुम्ही कोडे सोडवण्याचे प्रयत्न चालू ठेवावेत, अशी विनंती.

आलेल्या सर्व उत्तरांमध्ये कुठलेच उत्तर अचूक नसेल, तर अचूक उत्तराच्या सर्वात जवळ जाणारे उत्तर 'बरोबर' म्हणून निवडले जाईल. याबाबत संयोजकांचा निर्णय अंतिम असेल.

उत्तर देताना 'उत्तर कसे काढले' हे सांगणे आवश्यक आहे. Happy

या स्पर्धेच्या विजेत्याला मिळेल पुण्यात २६ जानेवारी, २०१२ रोजी होणार्‍या 'जन गण मन' या चित्रपटाच्या प्रीमियर शोचं एक तिकीट, किंवा मुंडू टिव्हीचं हा चित्रपट एकदा पाहण्यासाठीचं सबस्क्रिप्शन. त्यामुळे तुम्ही भारतात नसलात तरी या स्पर्धेत भाग घेऊ शकता.

तुम्हांला सर्वांना शुभेच्छा. Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

३१-२०N 76-45 E
31-20=11 = K
76-45=21 = U

NUKE!
तो बाण अण्वस्त्रांची दिशा दाखवतो.
ती पेन्सील पण न्युक्स दाखवते - Ender's Game ची थीम वापरली आहे.
चिन कम्युनिस्ट आहे तर टर्की सेक्युलर. पेन्सील्रुपी अण्वस्त्रांनीच ती क्रांती शक्य आहे.

correction हे नाम आहे म्हणुन प्रश्न्चिन्ह.
corrected ही अ‍ॅक्शन आहे. आपल्याला अ‍ॅक्शन्चीच गरज आहे.

नीट अ‍ॅक्शन घेतली तर आपण अनंताकडे झेप घेऊ शकु. अनंत म्हणजे इन्फिनिटी - आडवा आठ. पण रॉकेट करता म्हणुन उभा केला आहे.

KNUE हे एक FM station आहे (ते ही टेक्सस मधील) .
तिथे दिसणारे जे स्टेज आहे तिथे एक FM कार्यक्रम झाला होता.
जग हे एक स्टेज आहे हा गितेचा संदेश अण्वस्त्र रूपी शिक्षणाद्वारे सर्वांपर्यंत पाचवल्या गेला (५ = ६-१ ; + मधली आडवी दांडी म्हणजे -, उभी दांडी म्हणजे रॉकेट).

EKUN काय तर दुनिया गोल आहे.

टीपः माप्र व्यतिरीक्त कोणीही हे सिरियसली घेऊ नये.

अश्चिगं... Lol EKUN Rofl
माप्र, एखादी हिंट द्या. मागच्या वेळेस शाळा दिली होती तसं काहीतरी.

बिनबोभाट . . .
चिन (कम्युनिस्ट) आणि टर्की (सेक्युलर) दोघांना शिक्षणाची गरज आहे . . :p Lol

जन गण मन राष्ट्रगीताची शताब्दी साजरी करण्यासाठी आयोजित केलेल्या स्पर्धांमधली कोडी जन गण मन शी संबंधित असलीच पहिजेत असे थोडेच . ?? .. . . . Happy

छान

थोड अधिक खोदाखोद केल्यावर अस वाचायला मिळाल कि 21(A) amendment हे वय वर्षे १४ पर्यंत शिक्षणाचा अधिकार देत आणि वय वर्षे ६ पर्यंत Early childhood care चा.
The Right of Children to Free and Compulsory Education Act or Right to Education Act (RTE) हा १ अप्रिल २०१० पासून अंमलात आणला गेला.
वरच ६+1 === ६ Fundamental Rights recognized by constitution
हे सगळ जोडून एक शब्द कसा ओळखायचा आता?

अजून एक तीर ६+१ च्या बाबतीत.
विकीप्रमाणे ६ फंडामेंटल राईटस आहेत भारतीय नागरिकांचे घटनेनुसार.
त्यापैकी 86 th Amendement नुसार Right to Freedom च्या अंतर्गत 21 a article घातले गेले ज्यानुसार ६-१४ वयोगटातील प्रत्येक मुलाला शिक्षण मिळाले पाहिजे.
In 2002, through the 86th Amendment Act, Article 21(A) was incorporated. It made the right to primary education part of the right to freedom, stating that the State would provide free and compulsory education to children from six to fourteen years of age.[27] Six years after an amendment was made in the Indian Constitution, the union cabinet cleared the Right to Education Bill in 2008. It is now soon to be tabled in Parliament for approval before it makes a fundamental right of every child to get free and compulsory education.[28]

जर हा रेफरंस धरला तर ६+१ म्हणजे.,
आधी ६ हक्कांमध्ये हे सर्वांना शिक्षण कलम नव्हते. म्हणजेच 6+1 =86 coreection?
त्यात ६+१ (२१ अ) घातल्यानंतर ६+१ = ८६ करेक्टेड झालं. पण ते २८६ नाही लक्षात येतं.

फार विस्कळीत आणि लंबा तीर मारलाय Proud

सीमा शेवटचा ६ Fundamental Rights मुद्दा चांगला शोधलास.
हे ६ Fundamental Rights + 1 Right to education असं काही अपेक्षित असेल.

HH , बिल्वा पण ते २८६ च पुढे काय ते अज्जिब्बातच कळत नाहीये.
६ +१ = ६ fundamental rights + १ Right to property हा अगोदर fundamental right होता. जो आता लिगल राईट झाला आहे. अस असेल काय? पण त्याचा इथे काहीच संबध वाटत नाहीये.

या सगळ्या लॉ मेकींग प्रोसेस मधे बील पास झाल्यावर सर्वात शेवटी राष्ट्रपतींची सही लागते तरच ते अमलात येतं. तेव्हा पुर्वी मारलेला तुक्का बरोबर असेल तर,
ते 6+1 not 286. = ६+१०२८६= १०२९२ (माबो नोड)= राष्ट्रपती. Proud त्यांनी सम्मती दिल्यावर अ‍ॅक्ट लागू झाला.

एचेच, सही लॉजिक. त्यापुढे जाऊन विचार केला आणि तो नोड बघितल्यावर लक्षात येतयं की डॉ. ए पी जे अब्दुल कलाम ह्यांनी ते २१ ए साईन केलं. १०२९२ वरचं उत्तर Happy

कलाम मुसलमान त्यामुळे स्त्रीशिक्षण देणारे मुघल सम्राट ते मुसलमान राष्ट्रपती असे वर्तुळही पूर्ण झाले. Happy

हिंट एकच. तुम्ही सारे योग्य मार्गावर आहात, आणि उत्तराच्या अगदी जवळ. Happy
शिवाय, वर एकत्रित उत्तर देण्याबद्दलचा नियम लक्षात असू द्या. Happy

ह्या सगळ्याचा संबंध २६ जानेवारीशी लागतोय. 86th amendement,21 A = घटना, आणि म्हणून २६ जानेवारी. शालेय शिक्षण घेणारे म्हणजेच विद्यार्थी, विद्यार्थिनी.

दुसरा गेस-
२६ जानेवारीच. राष्ट्रपती भवन- राजपथ ( मागच्या पानावर माप्रांनी हिंट दिलीये २१ अ- राजमार्ग/ हायवे :फिदी:). २६ जानेवारीची परेड. त्यात भाग घेणारे शाळकरी विद्यार्थी/नी.

किंवा मग अजून फार लांब जायचं झालं तर शौर्यपदक. शौर्यपदकांतर्गत मिळणारी स्कॉलरशिप/ शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य.

चीन, तुर्कस्तान आणि भारतात डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट गर्ल चाइल्ड आहे .
चीन आणि तुर्कस्थानच्या मधल्या जागेत जो पांढरा क्रॉस दिसतोय त्याचा विचार केला तर लाल रंगात पांढरा क्रॉस हा स्वित्झर्लंडचा झेंडा आहे. जेंडर इक्वॅलिटीत स्वित्झर्लंड जगांत पहिल्या १० मधे आहे.

सर्व शिक्षा अभियान ( नक्कीच ) आणि चाइल्ड लेबर संबंधी काही असावं असं वाटतय..
१४ वर्षांपर्यंत सक्तीचं आणि मोफत शिक्षण आणि वय वर्ष १४ पर्यंत कोणत्याही मुला / मुलीला कामाला लावू नये ( १९८६ चा कायदा )

काही संबंध आहे का?

86th Amendment अ‍ॅक्ट राष्ट्रपतींनी सही केल्यानंतर सर्व शिक्षा अभियान चालू झाले आणि त्यानंतर २१ए ने सर्व मुलामुलींसाठी ( चीन व टर्कीप्रमाणे मोफत व सक्तीचे शिक्षण) शिक्षणाचा राजमार्ग खुला केला.

हुश्श! माझ्याकडून खेळ संपला आता Proud

** चीन आणि टर्की मधे अल्पसंख्यांकाच्या राईट टु एज्युकेशन ह्या संबंधित आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करत आहे.
** Art. 21A. The State shall provide free and compulsory education to all children of the age of six to fourteen years in such manner as the State may, by law, determine. (EIGHTY-SIXTH AMENDMENT ACT, 2002)

** Art. 6 Rights of citizenship of certain persons who have migrated to India from Pakistan.

** Art. 7 (=6+1) Rights of citizenship of certain migrants to Pakistan.

** Art. 286 Restrictions as to imposition of tax on the sale or purchase of goods (याचा संबंध ६ + १ शी कसा ते माहीत नाही )

Pages