'जनगणमन' या आपल्या राष्ट्रगीताची शताब्दी साजरी करण्यासाठी, आणि 'जन गण मन' या चित्रपटाचं स्वागत करण्यासाठी मायबोलीवर आयोजित केलेल्या स्पर्धांमधली ही तिसरी परस्परसंबंध ओळखा स्पर्धा!!!
खाली काही चित्रं दिली आहेत. या सर्व चित्रांचा कशाशी संबंध आहे, या चित्रांतून काय लक्षात येते, ते तुम्ही इथे लिहायचं आहे.



समान धागा, म्हणजेच परस्परसंबंध ओळखण्यासाठी तुम्ही कितीही वेळा प्रयत्न करू शकता, कितीही वेळा उत्तर देऊ शकता. यासाठी तुम्ही कुठल्याही माहितीस्रोतांचा वापर करू शकता.
मात्र पूर्ण उत्तरंच स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जातील. सर्व चित्रांचा संबंध उत्तरात असणे आवश्यक आहे.
बाफवर जे उत्तर सर्वप्रथम बरोबर असेल त्याला बक्षीस मिळेल. बरोबर उत्तर जेव्हा येईल तेव्हाच आम्ही तसे जाहीर करू. चूक उत्तराला आमच्याकडून काहीच प्रतिसाद मिळणार नाही. जोपर्यंत आमच्याकडून 'हे बरोबर उत्तर आहे' असे जाहीर केले जात नाही, तोपर्यंत तुम्ही कोडे सोडवण्याचे प्रयत्न चालू ठेवावेत, अशी विनंती.
आलेल्या सर्व उत्तरांमध्ये कुठलेच उत्तर अचूक नसेल, तर अचूक उत्तराच्या सर्वात जवळ जाणारे उत्तर 'बरोबर' म्हणून निवडले जाईल. याबाबत संयोजकांचा निर्णय अंतिम असेल.
उत्तर देताना 'उत्तर कसे काढले' हे सांगणे आवश्यक आहे. 
या स्पर्धेच्या विजेत्याला मिळेल पुण्यात २६ जानेवारी, २०१२ रोजी होणार्या 'जन गण मन' या चित्रपटाच्या प्रीमियर शोचं एक तिकीट, किंवा मुंडू टिव्हीचं हा चित्रपट एकदा पाहण्यासाठीचं सबस्क्रिप्शन. त्यामुळे तुम्ही भारतात नसलात तरी या स्पर्धेत भाग घेऊ शकता.
तुम्हांला सर्वांना शुभेच्छा. 
पहिल्या चित्रावरून 86th
पहिल्या चित्रावरून 86th Amendment Act
तिसर्या चित्रावरून Article 21(A)
आणि या दोन्ही गोष्टींचा संबंध 'सर्व शिक्षा अभियान' शी आहे म्हणून दुसरे चित्र.
माझं उत्तर ८६ अॅक्ट नुसार
माझं उत्तर
८६ अॅक्ट नुसार प्रत्येक राज्यात सर्व शिक्षा अभियान चालवल्यास( चायना आणि टर्की प्रमाणे ९ वर्ष शिक्षण सर्वांना मिळालेच पाहिजे). हिमाचलप्रदेशाप्रमाणे सर्व राज्यांत १००% लिटरसी रेट होईल.
हो हेच आहे उत्तर. पहिल्या
हो हेच आहे उत्तर. पहिल्या चित्रातून ८६. सहा वर्षांनंतर एक महत्त्वाची घटना घडली. (बिल पास होणे.) तिसर्यातून 21 A म्हणजेच मधले चित्र सर्व शिक्षा अभियान. आणि तेच ते ६ ते १४ वयोगट, दोन्ही देशातल्या शिक्षणपद्धती आणि लिंग ,जात, धर्म, व्यवसाय यांना छेदून जाणारे सर्व शिक्षा अभियान.
मुघल साम्राज्याचं काय? त्याचा
मुघल साम्राज्याचं काय? त्याचा क्लु काय?
मुघल साम्राज्य दिशाभूल
मुघल साम्राज्य दिशाभूल करण्यासाठी दिलं असेल.
पिंजोरचे मुघल गार्डन एवढाच लाक्षणिक अर्थ असावा. माप्रांच्या फेकलेल्या जाळ्यात आपण अडकलोच हवे तसे.
६ + १ चे कोडे नीट सुटत नाहीये
६ + १ चे कोडे नीट सुटत नाहीये अजून. आता वाईल्ड गेस.

सहा मुले झाली तर एक दत्तक घ्यायचेच. कंपल्सरी एक फ्री. (फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन प्रमाणे.) सर्व शिक्षा. सर्वांना शिक्षा.
आशुडी, ६+१ गूगल केल्यावर कळलं
आशुडी,
६+१ गूगल केल्यावर कळलं की ते एक मॉडेल आहे. Model of instruction and Assessment. जे चायना आणि टर्कीमध्ये पण वापरलं जातं.
६+१ सातवीपर्यंत कुणालाही
६+१ सातवीपर्यंत कुणालाही नापास करत नाहीत. हेच ते मॉडेल का?
किंवा मग मूल ६+ झाल्यावर
किंवा मग मूल ६+ झाल्यावर शाळेत गेलचं पाहिजे असही असेल.
हह आणि आशूडी, पुन्हा एकदा
हह आणि आशूडी, पुन्हा एकदा बरोबर रस्त्यावर आहात. (राजमार्ग/हायवे/२१अ इ.)
६+१ चे मात्र अजूनही बाकी आहे.
अरेरे म्हणजे हिमाचल प्रदेश,
अरेरे म्हणजे हिमाचल प्रदेश, लिटरसी रेट वगैरे चुकीचा ट्रॅक पकडला तर.

६+१ पण चुकलं
चला पुन्हा गूगलच्या वाटेवर
six plus one असं गुगलल्यावर
six plus one असं गुगलल्यावर हे मिळालं :
6+1 Trait® Writing
The 6+1 Trait® Writing Model of Instruction & Assessment provides a common language for teachers and students to communicate about the characteristics of writing and establishes a clear vision of what good writing looks like.
Pioneered by Education Northwest more than 20 years ago, the 6+1 Traits continue to help thousands of teachers worldwide who have been trained in the model improve their writing instruction, their understanding of the qualities of good writing, and their ability to provide effective feedback to students.
मामी, हेच लिहायला आले होते.
मामी, हेच लिहायला आले होते.
अरे पण ते नाहीये न. मी तेच
अरे पण ते नाहीये न. मी तेच म्हटलयं की वर
स्कुल चले हम या गाण्याचा काही
स्कुल चले हम या गाण्याचा काही संबध असेल का? कारण सर्व शिक्षा अभियान साठी ते लिहिलेल.
माझे पण तोडलेले तारे २१ A
माझे पण तोडलेले तारे
२१ A national highway असला तरी इथे तो 86th amendment मधलं आर्टिकल म्हणून असु शकतो
THE CONSTITUTION (EIGHTY-SIXTH AMENDMENT) ACT, 2002
[12th December, 2002.]
An Act further to amend the Constitution of India. .
BE it enacted by Parliament in the Fifty-third Year of the Republic of India as follows:-
1. Short title and commencement.- (1) This Act may be called the Constitution (Eighty-sixth Amendment) Act, 2002.
(2) It shall come into force on such date as the Central Government may, by notification in the Official Gazette, appoint.
2. Insertion of new article 21A.- After article 21 of the Constitution, the following article shall be inserted, namely:-
Right to education.-
"21A. The State shall provide free and compulsory education to all children of the age of six to fourteen years in such
manner as the State may, by law, determine.".
3. Substitution of new article for article 45.- For article 45 of the Constitution,the following article shall be
substituted, namely:- .
Provision for early childhood care and education to children below the age of six years.
"45. The State shall endeavour to provide early childhood care and education for all children until they complete the
age of six years.".
4. Amendment of article 51A.- In article 51A of the Constitution, after clause (J), the following clause shall be added,
namely:-
"(k) who is a parent or guardian to provide opportunities for education to his child or, as the case may be, ward between the age of six and fourteen years.".
६+१ = ट्वेन्टीफोर वाय सेवन
६+१ = ट्वेन्टीफोर वाय सेवन डेज सारखे साती दिवस शिक्षण असे असेल का?
नाही नाही. ६ दिवस शाळा आणि एक
नाही नाही. ६ दिवस शाळा आणि एक दिवस (रविवार) सुट्टी
अश्विनी.
६+१ म्हणजे प्रायमरी स्कूलमधे
६+१ म्हणजे प्रायमरी स्कूलमधे शिकवले जाणारे विषय का? प्रादेशिक भाषा, इंग्रजी,गणित, शास्त्र, इतिहास, भूगोल आणि जनरल नॉलेज (ऑप्शनल म्हणून +१) + १ म्हणजे व्यायाम ही घेऊ शकतो.आणि हे सारे शिकण्याचा हक्क नाकारायचा नाही म्हणून not 286.
आशू
आशू
हा संपूर्ण धागा फॉलो करतेय
हा संपूर्ण धागा फॉलो करतेय सुरुवातीपासून... आईशप्पथ, कसलं मस्त वाटतंय हा शोधप्रवास वाचायला. दा विन्चि कोड चे थ्रिल जाणवतेय. जामोप्या आणि लिंबूदा अफाट करमणूक करतायत, बाकी मंडळींची तर्कबुद्धी पाहता एनटिएस(नॅशनल टॅलेन्ट सर्च) च्या क्लासमध्ये बसल्याचा फील येतोय... "क्लूलेस" आठवला... अॅक्टिव्ह भाग घेतला नव्हता, पण धागा मात्र वाचला होता. लगे रहो! खुप्प्प्प्प्प मज्जा येतेय.
६ दिवस शाळा आणि एक दिवस
६ दिवस शाळा आणि एक दिवस (रविवार) सुट्टी >>>
माप्र नुसतेच कोण कोण बरोबर
माप्र नुसतेच कोण कोण बरोबर डायरेक्शन मध्ये आहे तेव्हढंच सांगतायेत.. क्लू काही देत नाहीयेत पण..
६+१ =८६ सात वर्षाचं प्रायमरी
६+१ =८६ सात वर्षाचं प्रायमरी एज्युकेशन कम्पल्सरी टु ऑल ८६ व्या अमेंडमेंट नुसार
पेन्सील वरची मुलं सर्व शिक्षा अभियान चा सिंबॉल
फ्लॅग हे "सर्व शिक्षा अभियान भारताचा फ्लॅगशीप प्रोग्रॅम आहे असं सुचवत असावं. ह्यातले तुर्की आणि चीन हे दोन्ही देश लिटरसी रेस मधे आपल्या पुढे आहेत. भारत १३७ व्या नंबर वर आहे तुर्की ९९ व्या. ह्या अभियानाद्वारे आपण त्यांच्या पर्यंत पोहोचू असं अपेक्षित असावं
चित्र ३ नॅशनल हायवे २१A= २१A हे ८६ व्या अमेंडमेंट मधलच एक आर्टिकल सर्व शिक्षा अभियान संदर्भातलच
बहुतेक हे कायद्या अंतर्गत शिक्षणाची मुलभुत सेवा + सर्व शिक्षा अभियान वर असावं
तुटले समदे तारे
६ शिक्षक आणि १ मुख्याध्यापक
६ शिक्षक आणि १ मुख्याध्यापक
अश्विनी
अश्विनी
नै पण ६+१ मला जामच छळतय. अस
नै पण ६+१ मला जामच छळतय.
अस तर नै ना? पूर्वी कस? ७+४+४ अस होत! (७वी व्हर्नाक्युलर, अकरावी एसेस्सी, ४ वर्षे कॉलेज)
नन्तर ते १०+२+३ अस केलं
तर पहिल्या ७वी पर्यन्तचे ६+१ असे भाग नै ना पाडलेले पुन्हा? की किमान सातवी पर्यन्तचे शिक्षण कम्पलसरी! (हल्ली ड्रायव्हिन्ग लायसन्स मिळवायला कितवीपर्यन्तचे शिक्षण कम्पलसरी केलय?)
हे काय ४ दिवस नै आलो तर किति
हे काय ४ दिवस नै आलो तर किति मिस् केलय मि इकडे ....
मुलीना वाढवा, शिक्षण द्या,
मुलीना वाढवा, शिक्षण द्या, त्याना मारु नका नैतर ६ पांडवात एक द्रौपदी अशी वेळ येईल.... म्हणून ६ +१.
Pages