परस्परसंबंध ओळखा स्पर्धा - ३

Submitted by माध्यम_प्रायोजक on 15 January, 2012 - 21:38

'जनगणमन' या आपल्या राष्ट्रगीताची शताब्दी साजरी करण्यासाठी, आणि 'जन गण मन' या चित्रपटाचं स्वागत करण्यासाठी मायबोलीवर आयोजित केलेल्या स्पर्धांमधली ही तिसरी परस्परसंबंध ओळखा स्पर्धा!!!

खाली काही चित्रं दिली आहेत. या सर्व चित्रांचा कशाशी संबंध आहे, या चित्रांतून काय लक्षात येते, ते तुम्ही इथे लिहायचं आहे.

Quiz_3c.jpgQuiz_3a.jpgQuiz_3.jpg

समान धागा, म्हणजेच परस्परसंबंध ओळखण्यासाठी तुम्ही कितीही वेळा प्रयत्न करू शकता, कितीही वेळा उत्तर देऊ शकता. यासाठी तुम्ही कुठल्याही माहितीस्रोतांचा वापर करू शकता.

मात्र पूर्ण उत्तरंच स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जातील. सर्व चित्रांचा संबंध उत्तरात असणे आवश्यक आहे.

बाफवर जे उत्तर सर्वप्रथम बरोबर असेल त्याला बक्षीस मिळेल. बरोबर उत्तर जेव्हा येईल तेव्हाच आम्ही तसे जाहीर करू. चूक उत्तराला आमच्याकडून काहीच प्रतिसाद मिळणार नाही. जोपर्यंत आमच्याकडून 'हे बरोबर उत्तर आहे' असे जाहीर केले जात नाही, तोपर्यंत तुम्ही कोडे सोडवण्याचे प्रयत्न चालू ठेवावेत, अशी विनंती.

आलेल्या सर्व उत्तरांमध्ये कुठलेच उत्तर अचूक नसेल, तर अचूक उत्तराच्या सर्वात जवळ जाणारे उत्तर 'बरोबर' म्हणून निवडले जाईल. याबाबत संयोजकांचा निर्णय अंतिम असेल.

उत्तर देताना 'उत्तर कसे काढले' हे सांगणे आवश्यक आहे. Happy

या स्पर्धेच्या विजेत्याला मिळेल पुण्यात २६ जानेवारी, २०१२ रोजी होणार्‍या 'जन गण मन' या चित्रपटाच्या प्रीमियर शोचं एक तिकीट, किंवा मुंडू टिव्हीचं हा चित्रपट एकदा पाहण्यासाठीचं सबस्क्रिप्शन. त्यामुळे तुम्ही भारतात नसलात तरी या स्पर्धेत भाग घेऊ शकता.

तुम्हांला सर्वांना शुभेच्छा. Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धमाल आहे! Lol मी पण प्रयत्न करणार हा यावेळी.
६ + १ = ७. ८६ ही नाही आणि २८६ पण नाही. पण ७८६ हा आकडा बिसमिल्लाह म्हणून इस्लामधर्मात पवित्र मानला जातो.
चीन आणि टर्की झेंड्यांमधला लाल रंग हा देशासाठी लढलेल्या, रक्त सांडलेल्या शूरांचे प्रतीक मानले जातो. तसेच पिवळा रंग हा देशाच्या समृध्दीचे द्योतक आहे. त्याचप्रमाणे आपल्याही झेंड्यातला केशरी रंग शौर्याचे, त्यागाचे, वैभवाचे प्रतीक आहे. चीनी झेंड्यातले चार तारे हे समाजातले चार वर्ग दाखवतात. कामगार, शेतकरी, इंटेलेक्चुअल (कष्टापेक्षा बुध्दीने काम करणारे - शास्त्रज्ञ इ.) आणि व्यापारी. टर्की झेंड्यातला चांद तारा हा इस्लामचे पवित्र चिन्ह म्हणून. मधली पेन्सिल आणि त्यावरचे मुलगी मुलगा म्हणजे या चारही समाजवर्गात, लिंग आणि धर्माच्या सीमा भेदून सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे हा सर्व शिक्षा अभियानाचा हेतू.
खालच्या चित्रातले मुघल गार्डन हे मुघल संस्कृतीचे चिन्ह. शहाजहानच्या काळात मुघल संस्कृती सर्वात वैभवसंपन्न होती. तेव्हाच बांधला गेलेला ताज हा जगातल्या काही आश्चर्यांपैकी एक आहे. त्याचे महत्त्व भारतासाठी अनन्यसाधारण आहे. तो उत्तरेला दाखवला जाणारा बाण म्हणजे जुनी दिल्ली कडे दर्शवत असेल तर ती पूर्वी शहाजहानबाद नावाने शहाजहानने वसवलेली राजधानी होती. किंवा मग तो बाण जामा मस्जिदीकडे जात असेल तर ते ही भारतातले अत्यंत महत्त्वाचे असे स्थान आहे. आणि या सार्‍याचा संबंध अर्थातच ' पंजाब सिंध गुजरात मराठा-' या ओळीशी असेल. Wink

जामोप्या, तुझ्च बरोबरे, तुलाच बक्षिस मिळायला हव.
मला पण आता असच वाटतय, की जनगणमन या राष्ट्रगानाशी सम्बन्धित हल्लीच्या "कल्ट" प्रमाणे सर्वधर्मसमभाव जागृत होण्यासाठी वरील सर्व आकडे/ठिकाणे/फोटोतील व्यक्ती वगैरे मुस्लिम धर्माशी रिलेट केले आहे. Happy
आता तू बक्षिस घेऊन टाक अन "सबको सन्मती दे भगवान ...." वाल भजन आख्खे म्हणून कार्यक्रमाची सान्गता कर बघु.

सर्व शिक्षा अभियान विषयी शोधले असता हे मिळाले -
Sarva Shiksha Abhiyan (SSA) is Government of India's flagship programme for achievement of Universalization of Elementary Education (UEE) in a time bound manner, as mandated by 86th amendment to the Constitution of India making free and compulsory Education to the Children of 6-14 years age group, a Fundamental Right.

86 correctionचा याच्याशी संबंध असेल का?

येस येस्स प्राची, ८६ वी दुरुस्ती. Happy
पण मग पुढील ओळीचा अर्थ काय? नॉट २८६? म्हण्जए २८६ व्या दुरुस्तीपर्यन्त वाट नै बघायची असेच काहीसे ना? Wink

टर्कीतल्या शिक्षणाविषयी माहिती शोधली असता
Children are obliged to take 8 years of primary education between the ages of 7 and 15, and by 2001 enrollment of children in this age range was nearly 100% हे मिळाले. आपल्या 'सर्व शिक्षा अभियानाचे ध्येयही हेच आहे ना?

प्राची, मला वाटते की तू बरोबर चालली आहेस. पेन्सिलीवर बसलेल्या मुलगा नी पुढील बाजुस पुस्तक घेतलेली मुलगी यावरुन नुस्ते सर्वशिक्षाअभियानच नव्हे तर "मुलिन्चे" शिक्षणास प्राधान्य हा हेतू स्पष्ट होतोच होतो. व हे सर्वात जास्ती जोमदाररित्या करायची गरज असलेला पृथ्वीवरिल फार मोठ्या कालखन्डातील मोठा समाज बाकी चित्रातुन दाखविला असेल का? की स्त्रीयान्चा सत्तेतील सहभागावर काही एक भाष्य आहे?

मुघल सल्तनत ते आजच्या महिला राष्ट्रपती असा काही सर्वशिक्षाअभियानाशी सम्बन्ध जोडायचा ना।ईये ना? पण मग ते आकडे कशाचे? महिला खासदारान्च्या सन्ख्येचे?

प्राची, सही गं.
८६ ही इंग्रजीत वापरली जाणारी एक टर्म आहे. गूगल केले असता समजले की to eighty six something म्हणजे एखादी गोष्ट नाकारणे, बॅन करणे. not 286 म्हणजे याच्या उलट. याचाच अर्थ, सहा वर्षापासून पुढच्या मुलांना शिक्षणाचा अधिकार देणे. हेच प्राचीने दिलेले 86 correction.
खाली चीन व टर्कीचे झेंडे आहेत. चीनमधील शिक्षणपद्धती पाहिल्यास असे समजते की,
The government provides primary education for six years, starting at age six or seven, followed by six years of secondary education for ages 12 to 18.
The Law on Nine-Year Compulsory Education (中华人民共和国义务教育法), which took effect on July 1, 1986, established requirements and deadlines for attaining universal education tailored to local conditions and guaranteed school-age children the right to receive at least nine years of education (six year primary education and three years secondary education). सर्वशिक्षा अभियानाची सुरुवातही १९८६ मध्येच झाली.
The main Aim of SSA is to provide useful and relevant Elementary Education for all the children in the age group of 6-14 years by 2010. There is also another goal to bridge all the Social, Regional and Gender gaps, with active participation of the community in the management of the schools.
हा संबंध वर झेंड्यांच्या अर्थात मी लिहीलेला आहे तसाच वाटतो. टर्कीबद्दल प्राचीने दिलेच आहे.
तिसर्‍या चित्राबद्दल विचार करावा लागेल.

आशूडींनी दिलेल्या माहितीवरून
6+1 not 286 याचा अर्थ सहा वर्षांवरील प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार असा होतो.

राष्ट्रपती भवन हे विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्यातली शेवटची पायरी.

राइट टु एजुकेशन अ‍ॅक्ट २००९??

मुघलांच्या शिक्षणक्षेत्रातील कामाविषयी शोधले असता हे मिळाले
The Mughal emperors were keen patrons of education, and there was considerable development in this area. In fact one of the duties of the public works department, Shuhra-I-Am was to build schools and colleges. Jahangir passed a law, whereby if a rich man was to die without an heir, his assets would be used by the State to help in the development and maintenance of educational institutes. Shah Jahan although more interested in building monuments, did take some significant educational initiatives like providing scholarships to assist students. Female education also existed in some form during the Mughal period. Girls from rich families were usually able to have an education, through private tuitions at home. The Middle class girls were usually able to attend the same schools as the boys.

म्हणजे उत्तर - सर्वांना शिक्षणाचा हक्क असणे...असे काहीसे असेल.

The Middle class girls were usually able to attend the same schools as the boys.

हे मुघलांच्या काळात होते असा मुघलांचा एवढा उदोउदो केल्यावर हिंदुत्ववाले इतिहासाची मोड्तोड केली म्हणून निषेध करतील्ल्ल......... मुघल म्हणजे आद्य फुले कर्वे की काय?

>>>>मुघल म्हणजे आद्य फुले कर्वे की काय? <<<< Lol Lol :d
नै रे बाबा, हिन्दुत्ववाले काय इतके येडे आहेत का कशाचाही निषेध करायला?
शेवटी त्या मुघली शाळा अन मुघली शिक्षण होते! आत्ताच्या फुले-आगरकर-कर्वे जे शिक्षण देऊ पहात होते त्या, त्या नक्कीच नव्हत्या!
(विश्वास बसत नसेल तर जाऊन बघ, अजुनही त्या काळच्या त्या तशाच चालु आहेत) Happy

>>>राष्ट्रपती भवन हे विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्यातली शेवटची पायरी. <<<
पण या "राष्ट्रपती भवन" अथवा महिला राष्ट्रपती याचा नेमका खुलासा कोणत्या चित्र/आकडे या वरुन करणार?

मुघली शिक्षण.. ते काय वेगळे अस्ते का? धर्मावरचे लेक्चर सोडले तर उरलेले गणित, भाषा, घोड्यावर कसे बसावे, घर कसे बांधावे, शेतात कसे पिकवावे... जडीबुटी... बाकी सगळे तर तेच असणार ना?

८६ चा अर्थ लागत असला तरी ६+१ का ? त्याचे कारण हे असेल का -
In 2002, through the 86th Amendment Act, Article 21(A) was incorporated. It made the right to primary education part of the right to freedom, stating that the State would provide free and compulsory education to children from six to fourteen years of age.[27] Six years after an amendment was made in the Indian Constitution, the union cabinet cleared the Right to Education Bill in 2008. It is now soon to be tabled in Parliament for approval before it makes a fundamental right of every child to get free and compulsory education.
म्हणजे ६ वर्षांनंतर आणखी एक डेव्हलपमेंट ? Happy

आशूडी, तुम्हीही बरोबर मार्गावर आहात. (तुमची पोस्ट नं. २).
तिसर्‍या चित्रासाठी क्ल्यु- (आशूडी यांच्या तिसर्‍या पोस्ट्मधले) 21(A). Happy

21(A) >>>> माप्रांनी हे का ठळक केलय बरं? ते तर 'एकवीस अपेक्षित' असल्यासारखं वाटतय. Happy

श्या अहो किती बादरायण सम्बन्ध लावायला सांगता

पिन्जौर ते बिलासपूरला जायच्या नॅशनल हायवेचा नंबर २१अ आहे. (आणि म्हणून त्या गार्डन फोटो मधल्या रस्त्यावरून बाण दाखवलाय. :अओ:)

थोडक्यात उत्तर सर्व शिक्षा अभियान हेच आहे का?

हो बरोबर तुझे आशूडी. पिन्जौर ते स्वारघाट फक्त. आणि स्वारघाट्चा अक्षांश रेखांश ३१ २० एन आणि ७६ ४५ ई दाखवतय विकी. स्वारघाट बिलासपूर तालुक्यात येतं.

वा मस्त चाललयं Wink

त२ २१ नं ला अधोरेखित केलय. बिलासपूर येतं हिमाचल प्रदेशात. आणि विकीनुसार हिमाचल प्रदेश हे

सगळ्यात जास्त एज्युकेशन रेट असलेलं राज्य आहे केरळानंतर. अनेक नामांकित शाळा तिथे आहेत.
याचा अर्थ पुन्हा एकदा शाळेशी संबंध की काय Happy

Pages