काही दिवसांपूर्वी फ्लोरीडाला ट्रिप मारण्याचा छान योग आला. तेव्हा एक छान कार भाड्याने घेऊन मायामीच्या दक्षिणेला समुद्रात असलेली बेटं म्हणजेच 'की वेस्ट', दक्षिण फ्लोरीडात असणारं सुमारे १५ लाख एकर एवढं मोठं अवाढव्य 'एव्हरग्लेड्स नॅशनल पार्क' आणि मायामी शहरापासून अगदी अर्ध्या तासावर, बहुतांश भाग समुद्राखाली असलेलं 'बिस्केन नॅशनल पार्क' ह्या तीन ठिकाणी जाऊन आलो. अनेक वेगळ्यावेगळ्या प्रकारचे पक्षी आणि प्राणी इथे मुक्तपणे वावरताना दिसतात, त्यातल्याच काही पक्ष्यांचे फोटो अपलोड करत आहे.
इथे नेहेमीच खूप पर्यटक असतात त्यामुळे कदाचित पक्ष्यांना त्यांची सवय झाली आहे, कारण ह्यातल्या एकाही फोटोसाठी झाडांवर चढणे, उलटे लटकणे, धावत जाऊन फोटो काढणे वगैरे वगैरे विशेष परिश्रम घ्यावे लागले नाही!
हे पक्षी सगळीकडे दिसत होते.(बगळे असावेत बहुतेक!)
ही आपल्या चिमणीसारखी दिसणारी छोटी चिमणी!
ह्या भाऊंच्या एक फूटावरून काढलेला फोटो! ह्यांना एकतर चष्मा लागला असावा नाहीतर तंद्री!
ही सगळ्या पक्ष्यांची कॉमन जागा. हा एकदम उथळ समुद्राचा भाग असून ह्याखाली खूप कोरल्स आहेत.
हा तर मस्त उन्हात पंख वाळवत होता!
ह्यानं तर अजिबात न घाबरता मला पार्कींग लॉट मधून स्टोरपर्यंत रस्ता दाखवला!
हे मला ओळखता येणारे एकमेव पक्षी, सीगल्स (चुकण्याची शक्यता आहे, सांभाळून घ्या!), साउथ बीच, मायामी..
शिव शिव ब्राह्मण युएसला जाऊन
शिव शिव ब्राह्मण युएसला जाऊन पाली खाऊ लागले, काय वाटत असेल पूर्वजांच्या कर्मठ आत्म्यांना.>> चुकून 'आत्म्यांना' च्या ऐवजी 'आत्त्यांना' असं वाचलं..

युएसमधल्या भारतीय रेस्टॉरंट्स चा इतका कंटाळा आला आहे की विचारू नका, त्याच्यासमोर पालीसुद्धा गोड लागतात!!
फोटो छान आलेत!
फोटो छान आलेत!
व्वा! मस्त आलेत.....आत्ता
व्वा! मस्त आलेत.....आत्ता दिसले फोटो!
आत्या हा हा हा.बाकी अमेरिकेत
आत्या हा हा हा.बाकी अमेरिकेत फक्त गरम कुत्रा खातात एवढच ऐकलय.
अफलातूनच
अफलातूनच
मस्त फोटो..... सगळे
मस्त फोटो..... सगळे आवडले.
पाणपाल हा शब्द पहिल्यांदाच ऐकला. मी मगर स्णि सुसर एवढेच ऐकलेल

मस्त मस्त! सुखद विहंगदर्शन!!
मस्त मस्त! सुखद विहंगदर्शन!!
७नं. फोटोतला पक्षी कुणाकडे बघुन छद्मी हसतोय असं वाटतय!
सुर्रेख फोटो..
सुर्रेख फोटो..
एकच नंबरच !!!
एकच नंबरच !!!
व्वा! सुंदर फोटो.
व्वा! सुंदर फोटो.
व्वा अतीशय सूंदर फोटो.
व्वा अतीशय सूंदर फोटो.
Pages