आपल्या सगळ्यांचे आवडते व्यक्तीमत्व श्री. दिनेशदा यांचे मुंबईत आगमन झाले आहे.
या भेटीदरम्यान मायबोलीकरांना आणि विशेषतः निसर्गाच्या पारावर गप्पा ठोकणा-यांना भेटायला ते उत्सुक आहेत. (जिस्प्याच्या प्रदर्शनात काही मायबोलीकरांना त्यांनी आधीच दर्शनाचा लाभ दिलाय ते वेगळे
)
कोणाच्या घरी भेटण्यापेक्षा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी भेटणे सगळ्यांना सोईचे पडेल असा विचार करुन यावेळी माहिमचे "महाराष्ट्र निसर्ग उद्यान" हे ठिकाण निवडले आहे.
तारिख : २२ जानेवारी २०१२
वेळ : सकाळी ९ ला गेटभेट.
ज्या कोणाला भेटायचे आहे त्यांनी हात वर करावेत. अजुन काही चांगले स्थळ सुचत असले तर तेही सुचवावे. उत्सवमुर्तींना संध्याकाळी लवकर घरी परतायचेय हे लक्षात ठेऊन स्थळ सुचवा. (ते कुर्ल्याला राहतात आणि रात्री उशीराचे परतीचे विमान आहे.)
निसर्ग उद्यानाबद्दल अजुन माहिती - http://www.mumbai77.com/city/1018/gardens-parks/maharashtra-nature-park/
उद्यान रविवारीही सकाळी ८.३० पासुन सं. ४ पर्यंत सामान्य जनतेकरता उघडे असते. ३० पेक्षा अधिक लोकांचा ग्रुप असेल तर गाईडचीही व्यवस्था उद्यान व्यवस्थापक करतात.
माफ करा पण जनरली कुठल्याही
माफ करा पण जनरली कुठल्याही गटगचे ग्रुप फोटो, व्यक्तींचे फोटो हे गटगला हजर असलेल्यांपुरतेच मर्यादित असायला हवेत. फोटोतील सर्व व्यक्तींची परवानगी न घेता आपल्या फेसबुक/ फ्लिकर/ पिकासा अकाउंटला कुणालाही बघता येईल असे ठेवणे योग्य नाही.
मला तरी पटलेले नाहीये.
नीधपशी सहमत. फेबु वर
नीधपशी सहमत.
फेबु वर टाकण्यापेक्षा पिकासावर अपलोड करुन, फक्त आलेल्या मंडळींना त्याची लिंक देऊन, अशी लिन्क घेऊन येणा-यासच फोटो पाहण्याची अनुमती दिलेली बरी. अर्थात आलेल्या मंडळींनी अशी लिन्क पुढे फॉरवर्ड करु नये.
नीधप, साधना + १ आलेल्या
नीधप, साधना + १
आलेल्या लोकांना न विचारता असे फोटो काढून टाकायला नकोत. मायबोलीवरचे आतापर्यंतच्या गटगचे वृत्तांत वाचले नाहीत का?
वरील सगळ्यांशी सहमत. देवकाका,
वरील सगळ्यांशी सहमत.
देवकाका, कृपया ती लिंक/पर्सनल फोटो डिलीट करा.
फेबु वर टाकण्यापेक्षा पिकासावर अपलोड करुन, फक्त आलेल्या मंडळींना त्याची लिंक देऊन, अशी लिन्क घेऊन येणा-यासच फोटो पाहण्याची अनुमती दिलेली बरी. अर्थात आलेल्या मंडळींनी अशी लिन्क पुढे फॉरवर्ड करु नये.>>>>>+१
धन्यवाद साधना, मामी आणि
धन्यवाद साधना, मामी आणि जिप्सी.
आपण काढलेले इतर लोकांचे फोटो हे त्यांच्या परवानगीशिवाय सार्वजनिक जागी ठेवू नयेत हे बेसिक एथिक्स आहेत. अगदी भले भले फोटोग्राफर्स सुद्धा हे पाळतात.
माबोवरच्या बहुतांश गटगच्या वृत्तांतामधे एखाद दुसरा फोटो नमुन्यादाखल दिलेला असतो. बाकी फोटोग्राफ्स हे गटगला आलेल्या लोकांनाच पाठवले जातात आणि त्यांनी ते पुढे इतरांना पाठवू नये असा संकेत असतो. जो जनरली पाळला जातो.
फेसबुकवरच्या त्या फोटोंना मी फेसबुकवरच रिपोर्ट करणार आहेच.
आपल्या सगळ्यांची सूचना लक्षात
आपल्या सगळ्यांची सूचना लक्षात घेऊन मी थोपुवरून ती छायाचित्र काढून टाकलेत...आपल्याला झालेल्या त्रासाबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.
punhaa kadhee honaare asa
punhaa kadhee honaare asa gataga?
Pages