दिनेशदा - निसर्ग गटग - २२ जानेवारी - महाराष्ट्र निसर्ग उद्यान, माहिम.

Submitted by साधना on 11 January, 2012 - 02:58
ठिकाण/पत्ता: 
माहिमचे महाराष्ट्र निसर्ग उद्यान

आपल्या सगळ्यांचे आवडते व्यक्तीमत्व श्री. दिनेशदा यांचे मुंबईत आगमन झाले आहे.

या भेटीदरम्यान मायबोलीकरांना आणि विशेषतः निसर्गाच्या पारावर गप्पा ठोकणा-यांना भेटायला ते उत्सुक आहेत. (जिस्प्याच्या प्रदर्शनात काही मायबोलीकरांना त्यांनी आधीच दर्शनाचा लाभ दिलाय ते वेगळे Happy )

कोणाच्या घरी भेटण्यापेक्षा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी भेटणे सगळ्यांना सोईचे पडेल असा विचार करुन यावेळी माहिमचे "महाराष्ट्र निसर्ग उद्यान" हे ठिकाण निवडले आहे.

तारिख : २२ जानेवारी २०१२
वेळ : सकाळी ९ ला गेटभेट.

ज्या कोणाला भेटायचे आहे त्यांनी हात वर करावेत. अजुन काही चांगले स्थळ सुचत असले तर तेही सुचवावे. उत्सवमुर्तींना संध्याकाळी लवकर घरी परतायचेय हे लक्षात ठेऊन स्थळ सुचवा. (ते कुर्ल्याला राहतात आणि रात्री उशीराचे परतीचे विमान आहे.)

निसर्ग उद्यानाबद्दल अजुन माहिती - http://www.mumbai77.com/city/1018/gardens-parks/maharashtra-nature-park/

उद्यान रविवारीही सकाळी ८.३० पासुन सं. ४ पर्यंत सामान्य जनतेकरता उघडे असते. ३० पेक्षा अधिक लोकांचा ग्रुप असेल तर गाईडचीही व्यवस्था उद्यान व्यवस्थापक करतात.

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, January 21, 2012 - 22:30 to रविवार, January 22, 2012 - 02:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धारावी डेपोसमोरुन जे प्रवेशद्वार आहे (आत गेल्यावर लगेच डाव्या हाताला एका भिंतीवर वारली पेंटींग केलेय ते प्रवेशद्वार) त्यात आत भरपुर पार्किंगची सोय आहे, शिवाय बाहेरचा रस्ताही रविवार सकाळचा मोकळा असतो.

संध्याकाळचं असतं तर जमवलं असतं Happy मी रोज त्या रस्त्यावरुनच जाते तरी अजून ते निसर्ग उद्यान आतून पाहिलं नाहिये Sad

माझेही आता तळ्यात मळ्यात कारण माहिमला यायच म्हणजे मला लॉन्चने यावे लागणार. शिवाय त्यादिवशी मिस्टरांनाही कामासाठी दुसरीकडे जायचे आहे. प्रयत्न करते.

जागु तु माझ्या घरी येऊन आपण एकत्र जायचा ऑप्शन मी दिला तुला असता पण पुढच्या रविवारी माझ्याकडे गाडी नसणार.... त्यामुळे मला ट्रेनची यात्रा करावी लागणार.. Happy नाहीतर मी तुला परत एकदा माझ्या गाडीतुन मुंबईदर्शनाचा आनंद दिला असता Wink

मी आजच मुंबईत परतलो.
मुंबई-पुणे-रत्नागिरी-कोल्हापूर्-मलकापूर-मार्लेश्वर्-देवरुख-कर्णेश्वर (संगमेश्वर्)-रत्नागिरी---मुंबई
असे सगळे दोन दिवसात फिरुन आलो.

निसर्ग उद्यानात २/३ तास पुरेसे होतील. मग आपल्याला पवईला देखील जाता येईल.
त्यामूळे निसर्गौद्यानात जरा नंतर भेटलो तरी चालेल.
मधल्यावेळेत खाण्यासाठी गुरुकृपा मधले खास खास समोसे आहेतच. हवे तर मी ते आधीच आणू शकेन.

निसर्गौद्यानात जर २-३ तास पुरेसे होतील तर तेथुन थेट गुरूकृपामध्ये गेलो तर जास्त बरे होईल.... गरम गरम समोसे, सोबत कुल्फी सगळेच खाता येईल Happy

मला खूप यायची इच्छा होती पण जमत नाहीये Sad तुम्ही सर्वांनी मजा करा. छायाचित्रकारा, नंतर फोटो डकव. साधना वृत्तांत लिहिशीलच ना? पण त्यात खादाडीचा उल्लेख असू नये - तसाही तो नि.ग. ला धरून होणार नाही Happy बाकीचा वृत्तांत पण आपण काय चुकवले याची रुखरुख लावायला पुरेसा असेल.

माझं अजून नक्की नाहीये...पण जमल्यास येण्याचा प्रयत्न करेन.....खास दिनेशदासारख्या जुन्या मालाडकराला भेटण्यासाठी.

स्थळ बघुन ठरवता येईल ,,,पिल्लु आहे बरोबर

आता स्थळ बघाय्ला तु माहिमपर्यंत येतेयसच तर गटग आटपेपर्यंत तरी थांब Happy

साधना, मी येतेय.
भरपूर वेळाचा प्लॅन आहे तर खादाडीचं कसं काय करणारोत याचं काही ठरवलंय का? उद्यानाच्या आसपास एकही लायकीचे हॉटेल नाहीये. सायन स्टेशन क्रॉस करून मग कॉर्नरला आहे ते उडपी टाइपचे हॉटेल हे माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यात जवळचे हॉटेल. नाहीतर या दुसर्‍या साइडला बांद्र्याला एमआयजी क्लबच्या लेनला काही आहेत ती.
की प्रत्येकाने काही आणायचेय नाश्त्यासाठी वगैरे?

खादाडीचं कसं काय करणारोत याचं काही ठरवलंय का?>>
चालत आसेल तर लिलावटिला 'महालक्ष्मी सरस' लागल आहे. तिथे महारष्ट्रातल्या वेगवेगळ्या गावातले स्टॉल्स असतात. मांडे, ज्वारी - बाजरिची थालिपीठ वगैरे बरेच प्रकार असतात.

तेच तर रिमा. उद्यानापासून कुठलीही डिसेंट अशी खादाडीची जागा किमान १०-१५ मिनिटांच्या अंतरावर आहे. सरस इत्यादीला पोचायचं तर सगळ्यांची मोट बांधून पोचायलाच अर्धा-पाउण तास जाईल.

खादाडीची व्यवस्था घरुन करुन यायला जमेलसे वाटत नाही कारण सध्या मस्त गुलाबी थंडी पडलीय. असल्या थंडीत भल्या पहाटे उठुन कोण जाईल किचनमध्ये. सरस मध्ये दुपारचे जेवण मिळेल काय?? कारण हे लोक संध्याकाळचे अ‍ॅक्टीव होतात.

बांद्र्याला हायवेला लागुन हायवे गोमांतक आहे. तिथे जाता येईल (शाकाहारीही मिळते तिथे). नाहीतर माटुंग्याला रमा नायक चे ऑथेंटिक सा.इ. खाता येईल. सायनला गुरुकृपाही आहे पण तिथे स्नॅक्स मस्त मिळतात. तेलात थबथबलेले सिंधी जेवण मला तरी नकोसे वाटेल.

वरचे सगळे ऑप्शन्स जरा लांबलांबचे आहेत. पण धारावीत जेवणार कोण?? काय आहे तिथे??? Happy

Pages