विठ्ठला थालीपीठ स्वीकार

Submitted by जागोमोहनप्यारे on 24 December, 2011 - 08:49

तापल्या तव्यावरती देशी गोळ्याला आकार
विठ्ठला थालीपीठ स्वीकार. //

तेल, पीठ अन कांदे बारा Proud
तूच मिसळशी सर्व पसारा
गोळा मोठा ये आकारा
थालीपीठाच्या चवडीला मग नसे अंत ना पार //

गोळ्या गोळ्याचे रूप आगळे
काकडी, गाजर आणि ते मुळे
तुकड्यातुकड्याना स्वाद वेगळे
मुखी कुणाच्या पडते लोणी कुणा लोणचे खार // Proud

तूच थापिशी तूच भाजशी
संगे लोणी तूप वाढशी
पाकक्रियेचे पुण्य जोडिशी
देशी जिव्हा आणि समोरी रसस्वाद, आभार // Proud

मूळ काव्य :

फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार
विठ्ठला, तू वेडा कुंभार ॥ धृ. ॥

माती, पाणी, उजेड, वारा,
तूच मिसळशी सर्व पसारा
आभाळच मग ये आकारा
तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार ॥ १ ॥


घटाघटाचे रूप आगळे,
प्रत्येकाचे दैव वेगळे
तुझ्याविणा ते कोणा न कळे
मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार ॥ २ ॥

तूच घडवीसी, तूच फोडीसी,
कुरवाळिसी तू, तूच ताडीसी
न कळे यातून काय जोडिसी
देसी डोळे परी निर्मिसी तयापुढे अंधार ॥ ३ ॥

गुलमोहर: 

छान

छान Happy

छान

छान

छान

छान