तापल्या तव्यावरती देशी गोळ्याला आकार
विठ्ठला थालीपीठ स्वीकार. //
तेल, पीठ अन कांदे बारा
तूच मिसळशी सर्व पसारा
गोळा मोठा ये आकारा
थालीपीठाच्या चवडीला मग नसे अंत ना पार //
गोळ्या गोळ्याचे रूप आगळे
काकडी, गाजर आणि ते मुळे
तुकड्यातुकड्याना स्वाद वेगळे
मुखी कुणाच्या पडते लोणी कुणा लोणचे खार //
तूच थापिशी तूच भाजशी
संगे लोणी तूप वाढशी
पाकक्रियेचे पुण्य जोडिशी
देशी जिव्हा आणि समोरी रसस्वाद, आभार //
मूळ काव्य :
फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार
विठ्ठला, तू वेडा कुंभार ॥ धृ. ॥
माती, पाणी, उजेड, वारा,
तूच मिसळशी सर्व पसारा
आभाळच मग ये आकारा
तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार ॥ १ ॥
घटाघटाचे रूप आगळे,
प्रत्येकाचे दैव वेगळे
तुझ्याविणा ते कोणा न कळे
मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार ॥ २ ॥
तूच घडवीसी, तूच फोडीसी,
कुरवाळिसी तू, तूच ताडीसी
न कळे यातून काय जोडिसी
देसी डोळे परी निर्मिसी तयापुढे अंधार ॥ ३ ॥
छान
छान
नाही जमलं..
नाही जमलं..
जामोप्या, लवकर बरे व्हा.
जामोप्या, लवकर बरे व्हा.
छान
छान
(No subject)
छान
छान
मला आवडलं.
मला आवडलं.
छान
छान
वा वा
वा वा
(No subject)
(No subject)
(No subject)
छान
छान
छान
छान
मस्ताय
मस्ताय
विठ्ठलाला थालिपिठ बनवायला
विठ्ठलाला थालिपिठ बनवायला बसवलंत. तरी बरी आहे.
जमलय!!!
जमलय!!!
(No subject)
छान विडंबन आहे. मला माझे
छान विडंबन आहे.
मला माझे विडंबन आठवले.
http://www.maayboli.com/node/23130
(No subject)
धन्यवाद.. (रिक्षा.)
धन्यवाद.. (रिक्षा.)
छान जमलयं!
छान जमलयं!
छान विडंबन आहे. पण थालीपिठ
छान विडंबन आहे.
पण थालीपिठ विठ्ठ्लाला स्विकारण्यास सांगण्याची गरज होती का?