Submitted by विदेश on 30 January, 2011 - 10:02
(चाल: विठ्ठला, तू वेडा कुंभार -)
‘भ्रष्टाचारा ’वरती करसी भाषणबाजी फार
पुढार्या,तू मंञी होणार !
माती,वाळू,सिमेंट,चूना
तूच पुरवसी खडी विटांना
इमारती त्या उभारतांना
तुझ्या ’आदर्शां ’च्या गणतीला
नसे अंत ना पार !
सभासभांचे रूप आगळे
प्रत्येकीचे जथे वेगळे
तुझ्याविना ते काढती गळे
हाती कुणाच्या दिसती नोटा
कुणी पिऊन हुश्शार !
तूच भेसळीतून जोडसी
घोटाळ्यांतुन एकी तोडसी
कुरघोडयांतुन पक्ष फोडसी
देसी पेटया- लाच पुरवसी
पक्ष पुढे बेजार !!
गुलमोहर:
शेअर करा
छान जमले आहे.
छान जमले आहे.
जमलय..
जमलय..
(No subject)
छान.
छान.
चांगली.
चांगली.
३० जानेवारी... गांधीजीना
३० जानेवारी... गांधीजीना श्रद्धांजली म्हणून लिहिली होती का?
मस्त
मस्त
गांधीजी सोडून, इतर जे "आदर्श"
गांधीजी सोडून, इतर जे "आदर्श" आहेत त्यांना उद्देशून...!
<<<तूच भेसळीतून
<<<तूच भेसळीतून जोडसी
घोटाळ्यांतुन एकी तोडसी>>>
"तुच घडविसी, तूच फोडीसी" अशा प्रकारे आलं असतं तर पूर्ण जमून आली असती. चांगला प्रयत्न.
माझी रिक्षा...
माझी रिक्षा... http://www.maayboli.com/node/31460
छान आहे. नुतनवर्षाभिनंदन.!
छान आहे.
नुतनवर्षाभिनंदन.!
चांगली जमलिय!
चांगली जमलिय!