पाण्याच्या फोडणीची पोळी

Submitted by धनुकली on 12 December, 2011 - 04:32
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मुख्य जिन्नस
- ताज्या कींवा शिळ्या पोळ्या -२
फोडणी साठी
- मोहरी, जिरे, जिरे पावडर, हळद, तिखट, मीठ, साखर, तेल, काळा मसाला, प्यायचे पाणी ( दीड वाटी ), आमचुर किंवा आम्सुले काहीही आंबट चालेल.
सजावटी साठी
कोथींबीर, बारीक शेव

क्रमवार पाककृती: 

- पोळ्यांचे नाचोज इतके (डिस्को पापडा इतके) मोठे तुकडे करावे, बाजुला ठेवुन द्यावे
- कढईत फोडणी साठी तेल गरम करावे
- एका भांड्यात पाणी तयार ठेवावे
- कडक तापल्यावर तेलात मोहोरी, जिरं घालावं
- तडतडल्यावर त्यात हळद, तिखट, जीरं पावडर घालुन परतुन लगेच्च पाणी घालावं (आधी तयार ठेवलेलं, फोडणीत हळद तिखट घातल्यावर खूप खेस येते. लगेच पाणी घालावं! )
- पाण्याला उकळी येउ ध्यावी
- पाणी खळखळ उकळल्यावर त्यात मीठ आणि साखर घालावी. ( चवी नुसार)
- आमचुर्/आम्सुले घालवी, काळा मसाला घालावा, उकळु ध्यावे.
- ढवळावे, आमचुर/ मसाल्याच्या गुठळ्या होउ देउ नये
- प्लेट तयार ठेवावी
- उकळत्या पाण्यात पोळ्या सोडाव्या
- १५ सेकंदात प्लेट मध्ये काढुन कोथींबीर, शेव घालुन लगेच्च खावे

वाढणी/प्रमाण: 
१ भुकेल्या व्यक्ती साठी पुरेसे :)
अधिक टिपा: 

- चवी नुसार मीठ, तिखटाचे प्रामाण ठरवावे
- थंडीत दुपारचा अवडता खाउ!
- थकलेल्या संध्याकाळी फ्रेश व्हायला ट्राय करु शकता
- आवडीच्या भाज्या घालु शकता.
- आंब्याच्या लोणच्या अथवा टोमाटो केचप बरोबर छान लागते

माहितीचा स्रोत: 
आजी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे रेसिपी. आम्ही आमसूला ऐवजी ताक घालतो. कढी उकळली की पोळीचे तुकडे घालायचे आणि मग तूप घालून खायचे. ही रेसिपी पण ट्राय करेन.

पनू: ताकाची आयडीया छान आहे. ट्राय करीन.

माझी मामी कढीतले कडबोळे करायची.. कुणाला माहीत आहे का ती रेसीपी?
पनू च्या ताकातल्या पोळ्यांनी एक्दम आठ्वण झाली.

साक्षी: हो माझी फेवरीट आहे ही डीश. Happy

धन्स दक्षिणा, वाचुन आवडली की करुन सुधा पाहीली?
out of curiosity विचारते आहे. दिवा घ्या Happy

आमच्या घरी कांदा, हळद, तिखट (हवा असल्यास थोडा गोडा मसाल), धणे पावडर आणि शेंगदाण्याचं कुट घालून करतात उकडलेली /पाण्याच्या फोडणीची पोळी.
मला शिळ्या पोळ्यांच्या कोरड्या कुस्कर्‍यापेक्षा अशी पातळ फोडणीची पोळी जास्त आवडते खायला. Happy

>>>अरे वा! पाण्यातही फोडणी देता येऊ शकते आणि मोहरी त्यातही तडतडतील , ही कल्पना अभिनव आहे! नक्की करुन पाहणार
>>> लेखकाने क्रम चुकवल्यामुळे तुमचा गैरसमज झालाय सानी.
खरं ते असं हवं
>>- कढईत फोडणी साठी तेल गरम करावे
- कडक तापल्यावर त्यात मोहोरी, जिरं घालावं
-एका भांड्यात पाणी तयार ठेवावे
>>

असंय का ते? Uhoh पण वर शीर्षकामुळे आणि क्रम चुकल्याने अजूनही लोकांचा गैरसमज झालेला दिसतोय...
धन्स सायो Happy