स्वप्न

Submitted by मोहना on 11 December, 2011 - 17:50

हे स्वप्न
माझं की तुझं
कुणास ठाऊक कुणाचं?
आपण मात्र काम करायचं
स्वप्नामध्ये रंग भरायचं
ह्याच कामात मी रमले होते
पुढे पुढे जात होते
तुझ्या पाऊलखुणांचा मागोवा घेत होते
शेजारीच तर माझ्या पावलांच्या
खुणा होत्या
आणि तू मात्र प्रारंभालाच उभा होतास
स्वप्नासारखा!

गुलमोहर: 

छान.

सुंदर...!
>> आणि तू मात्र प्रारंभालाच उभा होतास
स्वप्नासारखा! >> कवितेचा शेवट छान झालाय ..