मंडळी,
आपण मराठी चॅनेल्सवरून दाखवल्या जाणार्या बिनडोक सिरियल्सबद्दल वैतागून बोलत असतो. कधीकधी आपल्यातले काहीजण चॅनेलकडे इमेल करून ह्याबद्दल तक्रारही करतात. पण........
ह्यावेळी आपण सगळ्यांनी मिळून निषेध केला तर?
केवळ एका सिरियलबद्दल निषेध करण्याऐवजी सर्व सिरियल्सबद्दल (कुंकू, दिल्या घरी, अरुंधती, आभास हा, एकाच ह्या, पिंजरा ह्या झीमराठीवरील सिरियल्स) एकत्रित तक्रार केली तर?
ह्यातून काही निष्पन्न होईलच असं नाही. पण ह्याबद्दल बर्याच इमेल्स आल्या तर चॅनेलच्या एखाद्या माणसाला जाग येईल आणि दाखवला जाणारा बिनडोकपणा जरा कमी होईल. शेवटी काय 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन'. त्यामुळे आपण आपलं काम करू यात. काही नाही तरी निषेध नोंदवल्याचं आणि एक मिनी आंदोलन केल्याचं समाधान तरी मिळेलच ना?
काय म्हणताय?
वि.सू. - हा धागा फक्त ही मेल पाठवण्याबद्दल मुद्दे एकत्र करण्यासाठी आहे. प्रतिक्रिया मिळवायला किंवा माबोची जागा फुकट घालवायला नाही. त्यामुळे काही दिवसांनी हा धागा बंद करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
शैलजा, (तू हा मुद्दा काढणार
शैलजा,
(तू हा मुद्दा काढणार हे मला टायपतानाच वाटलं होतं)
>>स्वप्ना, पाच मिनिटांत जाता
>>स्वप्ना, पाच मिनिटांत जाता येता एवढे अपडेट्स कळतात? पटत नाहीये
अरेच्चा! तुम्हाला असं म्हणायचं आहे का की मी ह्या सिरियल्स ७ ते ९ बघते पण इथे तसं सांगत नाहिये? मज्जाच आहे.
>>आणखी एक करु या. खरेच चांगले
>>आणखी एक करु या. खरेच चांगले कार्यक्रम कुठल्याही चॅनेलवर सादर होत असतील, तर त्याबद्दल माहिती देणारा एक धागा इथे काढू या.
अनुमोदन. 'संथ चालती ह्या मालिका' बीबीवर मी बर्याचदा असे पोस्टस टाकत असते. पण स्वतंत्र धागा असेल तर उत्तमच.
बापरे, बरंच विचारमंथन चालू
बापरे, बरंच विचारमंथन चालू आहे. पण विरोध करू नका, असं म्हणणार्यांचं म्हणणं काही पटलं नाही. नानबा म्हणतात त्याप्रमाणे ग्राहक म्हणून निषेध नोंदवायचा हक्क आहेच. तसंही वर स्वप्ना_राज स्वत:ही म्हणतायत, की 'ह्यातून काही निष्पन्न होईलच असं नाही.'
एवढंच कशाला, कितीतरी लोक पुस्तक वाचल्यानंतर लेखकाशी पत्रव्यवहार करून त्याला कळवतात, आवडलं / नाही, इत्यादी इत्यादी. ह्या मालिकांमधले कलाकारही सांगत असतात की अनेक लोकांना भूमिका आवडली वगैरे. मग तसंच अनेक लोकांना नाही आवडली हेदेखील त्यांना कळालं तर बिघडलं कुठं?
आपल्या लहानपणी टीव्ही नव्हता,
आपल्या लहानपणी टीव्ही नव्हता, तेव्हा आपण, आपले आईवडील, आजीआजोबा काय करायचे? घरातले ज्येष्ठ सदस्य आवडीने या मालिका बघतात, म्हणून निर्माते, वाहिनी चालवणारे त्या तयार करतात. त्यांनी त्या मालिका बघितल्या नाहीत, तर त्या तयार होणार नाहीत.
पण विरोध करू नका, असं
पण विरोध करू नका, असं म्हणणार्यांचं >> बॅक टू स्क्वेअर वन!! पुन्हा एकदा लिहीते, विरोध करु नका, निषेध करु नका असं इथे कुणीही म्हटलेलं नाहीये. नुसतं इ मेल करुन काम होणार नाहीये. त्यासाठी ठोस कृती घडायला हवी आणि सुरुवात स्वतःच्या घरापासून करायला हवी.
सविनय कायदेभंग चळवळ आठवली.
आशूडी, माझा रोख 'हा कोणताही
आशूडी, माझा रोख 'हा कोणताही असा सामाजिक, ज्वलंत वगैरे प्रश्न नाही की ज्यासाठी कोणत्याही प्रकारचे आंदोलन किंवा निषेध व्यक्त करणे योग्य आहे. ' ह्या बर्याच आधीच्या किंवा 'एखादी मालिका नुसतीच रटाळ , बिनडोक आहे म्हणून निषेध नोंदवणे योग्य वाटत नाही. पण जिथे सामाजिक दृष्ट्या अयोग्य गोष्टींवरच मालिकांचा
भर असतो तिथे मात्र निषेध नोंदवायला हवा.' ह्या वाक्यांवर होता. माझा प्रतिसाद देखील ह्यालाच अनुसरून आहे. ही वाक्यं लिहिणार्यांनी त्यानंतर कुठे हा दृष्टिकोन नाही असं म्हटल्याचं किंवा म्हणणं मागे घेतल्याचं मला तरी दिसलं नाही प्रतिसादांमध्ये. म्हणून मी तसं म्हटलं.
आपल्याला बिनडोक वाटणार्या
आपल्याला बिनडोक वाटणार्या मालिकेबद्दल नापसंती : 'मला आवडली नाही, कारण.....'असं कळवता येईल. जसं कुणी आपल्याला एखादी मालिका का आवडली ते कळवतं(?) तसंच!
निषेध याचा अर्थ ही मालिका काढणे अयोग्य आहे असे म्हणणे होईल. त्या मालिकांना प्रेक्षकवर्ग आहे, स्पॉन्सर्स आहेत त्यांना आपल्याला काय हवे ते ठरवायचा अधिकार आहे.
अजूनही म्हणणं मागे घेतलेले नाही.
बाजो यांच्या खूपच आधीच्या
बाजो यांच्या खूपच आधीच्या पोस्टशी सहमत (नंतरच्या असतील तर माहीत नाही :फिदी:)
मालिका पाहण्याव्यतिरिक्त फिरायला जाणे, घरातल्यांची आपुलकीने चौकशी करणे, छंद जोपासणे, मुलांशी खेळणे हे पर्याय आहेतच... त्या व्यतिरिक्त एखादं * विबासं जोपासणे हे ही वेळ घालवण्याचं एक उत्तम साधन असू शकतं
*( एखादं म्हणजे २४ - २३ = १)
( शेवटची मन लावून पाहीलेली मालिका म्हणजे श्रीयुत गंगाधर टिपरे )
बिनडोक मालिका बन्द पाडण्याचा
बिनडोक मालिका बन्द पाडण्याचा प्रयत्न म्हणजे बिनडोक मालिका पाहणार्या * * डो * लोकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणण्यासारखे आहे
प्रत्येकाची करमणुकीची
प्रत्येकाची करमणुकीची कल्पना/गरज वेगवेगळी असते.
कटकारस्थाने करणार्या पात्रांना शिव्याशाप देत त्यांच्या कारस्थानांना बळी पडणार्यांसाठी हळहळणे झाले नाही तर मालिका बघितल्याचे समाधान काहींना लाभत नाही.
आजूबाजूला दिसणारी, वास्तवाच्या जवळ जाणारी दृश्ये मालिकांमध्ये असली तर हेच पुन्हा का बघायचं म्हणून वैतागणारे प्रेक्षक असतात.
बिनडोक विनोदी मालिका, बिनडोक रडारडीच्या मालिका आवडणार्यांच्या डोक्यात जातात. (अशा बिनडोक्याच्या विनोदी व्यक्तिरेखा घडवायला खूप अक्कल लागते हे त्यांना पटत नाही.)
रामायण ही मालिका भक्तीभावाने बघितली गेली त्याला फारतर पंचवीसेक वर्षे उलटून गेलीत.
आधी आपल्याच घरातल्या प्रेक्षकांची अभिरुची बदलायचा प्रयत्न करून बघावा आणि मग एकंदरित प्रेक्षकांच्या आवडी आणि त्या पुरवणार्यांकडे मोर्चा वळवायचा का ते बघावे.
भरत मयेकर - मला उद्देशून
भरत मयेकर - मला उद्देशून म्हणाला असाल तर असं म्हणतो, की म्हणणं मागे घ्या, असं मी म्हणतही नाही. फक्त ते म्हणणं तसं असल्याने माझं वरचं म्हणणं सयुक्तिक आहे एवढंच म्हणालो.
आणि तुमचं 'मला आवडली नाही ... असं कळवता येईल' हे बरोबरच आहे. परंतु माझ्या बाबतीत मी निषेध अशाचा करू इच्छितो, की ह्या बहुसंख्यांना हवं ते देण्याच्या खेळात जे उरलेले असतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं. मला (आणि माझ्यासारख्या काही अजून लोकांना) आवडेल असा एखादा कार्यक्रम ते देउ शकत असतील तर द्यावा. त्याला अगदीच प्रेक्षकवर्ग कमी असेल असं मला तरी वाटत नाही. वर कुणीतरी श्रीयुत गंगाधर टिपरे या कार्यक्रमाचं नाव घेतलेलं आहे.
आता ह्यावर कोणी म्हणेल, की ज्यांना तळेगाव बुद्रुकमध्ये इथिओपिअन रेस्टॉरंट हवंय त्यांनी ते तिथे का नाही (आहे किंवा नाही हे मला माहित नाही, एक उदाहरण म्हणून घ्या - महाराष्ट्रातल्या योग्य त्या खेड्याचं नाव घालून.) असं म्हणून निषेध व्यक्त करण्यासारखं हे आहे. ह्यावर माझा प्रश्न एवढाच, की खरंच 'तळेगाव बुद्रुकमध्ये इथिओपिअन रेस्टॉरंट' एवढी विसंगत जोडी आहे का इथे? अगदी बारीक अभिनयातल्या खुब्या वगैरे दाखवा असं म्हणणं अवास्तव ठरेल कदाचित, पण तरीही नेहमीच्या स्टीरिओटिपीकल प्रकारापेक्षा बरं काहीतरी देता येईल असं माझं मत.
त्यातून मालिका हा एक माध्यमप्रकार ह्या नात्यानेदेखील बघू शकतो. चित्रपट बघताना त्या माध्यमाची ओळख होते. कॅमेर्याच्या मर्यादा, विशिष्ट कोन वगैरे. तसंच इथेही. मालिकांशिवाय इतरही बरंच काही आहे करण्यासारखं वगैरे अगदी मान्य. पण एखादी मालिकादेखील माझ्या अभिरुचीची तहान भागवत असेल (माझ्या अभिरुचीला केटर करत असेल) तर मला हाही आस्वाद घेता येईल.
जो पहिला मुद्दा आहे उरलेल्यांकडे दुर्लक्ष होण्याचा, तो माझ्या दृष्टीने बराच व्यापक आहे. आपल्या सध्याच्या शिक्षणपद्धतीचाही तो एक दोष आहे असंही मी म्हणतो. कदाचित बरेच जण म्हणत असतील. पण असो. तो वेगळा मुद्दा आहे.
<<<ह्या बहुसंख्यांना हवं ते
<<<ह्या बहुसंख्यांना हवं ते देण्याच्या खेळात जे उरलेले असतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं. मला (आणि माझ्यासारख्या काही अजून लोकांना) आवडेल असा एखादा कार्यक्रम ते देउ शकत असतील तर द्यावा>>>
तुम्ही प्रायोजक मिळवून द्या, ते कार्यक्रम देतील.
आकाशवाणीवर शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम असतात (अगदी भीमसेन, कुमार, बेगम अख्तर यांचेही). खाजगी एफेमवाले देतील का?
दूरदर्शनवरही असायचे. कधी काळी. प्रतिभा आणि प्रतिमा, शरदाचे चांदणे.
आपण रेनबो एफएमचं नाव ऐकलं आहे
आपण रेनबो एफएमचं नाव ऐकलं आहे का? त्यावर असायचे बर्याच आत्ताआत्तापर्यंत. अगदी आत्ता काय आहे ते माहित नाही.
बाकी आपला आणि माझा मतभेद अशा वर्गाची संख्या किती आहे यावर दिसतो. त्याविषयी आपण प्रत्यक्ष काहीच बोलताना दिसत नाही. मला स्वत:ला तरी असे बरेच लोक माहित आहेत जे असा एखादा कार्यक्रम बघायला उत्सुक असतील. म्हणून मी एक्स्ट्रापोलेट करतो असं म्हणा हवं तर. इथे असलेल्या प्रतिसादांच्या संख्येवरूनही असं म्हणता येईल कदाचित. आता तुमचा ह्याबाबतीत प्रत्यक्ष मतभेद असेल तर तसं सांगा. खरं काय आहे हे कदाचित संख्याशास्त्रीय चाचण्या, सर्व्हे वगैरे करून कळू शकेल. ते करायची इच्छा आणि शक्ती आपल्या दोघांकडे कितपत आहे ह्याविषयी मी साशंक आहे. (तुमच्या बाबतीत तरी.) तोपर्यंत आपली नुसतीच बोलाची कढी आणि बोलाचा भात असावा.
एफेम रेन्बो आणि गोल्ड ही
एफेम रेन्बो आणि गोल्ड ही दोन्ही सरकारी मालकीची आहेत. एफेम गोल्डवर(मुंबई) शनिवार आणि रविवार रात्री असतं हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत.
चांगल्या मालिकांबद्दल उदाहरणे देतो. चिनूक्स यांनीही आधी दिली होती.
इटीव्ही मराठीवर सोनियाचा उंबरा आणि मंथन या दोन सशक्त कथानक, संयत अभिनय(नामांकितांचा) असलेल्या मालिका होत्या. दोन्ही मूळ कन्नड मालिकांवर आधारित. सोनियाचा उंबराची वेळ दुपारी ३. मंथन संध्याकाळी ७:३० ला असायची नंतर ती सं.६ किंवा ६:३० ला म्हणजे दोन्हीना प्राइम टाइममध्ये जागा मिळाली नाही.
गंहृहे ही एक अपवादात्मक मालिका जिच्याबद्दल लोक आवडीने बघतो म्हणून सांगतायत. तिची वेळ प्राइम टाइमच्या सीमारेषेवर.
तथाकथित चोखंदळ प्रेक्षक मुका किंवा हतबल असावा.
स्वप्ना, भरत खरंच असा धागा
स्वप्ना, भरत खरंच असा धागा काढा. आणि आपल्या घरातल्या मंडळींना अवश्य त्याची माहिती देत राहू. एखादा थिएटरला न चाललेला पण सिडीवर / नेटवर उपलब्ध असलेला चित्रपट कुणाला आढळला, तर त्याबद्दल पण अवश्य लिहा.
आकाशवाणीवरच्या कार्यक्रमांबदलही लिहू या.
मी एक/दोन उदाहरण देतो, मी खुप वर्षांपासून आशा भोसलेच्या गायनाचा निस्सीम चाहता आहे. पण तिचे एक विस्मरणात गेलेले गाणे -- देव नाही झोपलेला (चित्रपट धर्मकन्या ) मी नेटवरच ऐकले. तूमच्या घरातल्या कुणालाही हे गाणे ऐकवा. (धिगाणा.कॉम) डोळ्याचा कडा ओलावतीलच, इतके अप्रतिम गायलेय तिने. याची चाल इतकी अवघड आहे, कि बाकी कुठल्याही स्पर्धकाला झेपेल का अशी शंकाच येतेय.
गेल्या दिवाळीला, ईप्रसारणवर आशानेच गायलेली, बाई सुंदराबाई यांची लावणी, ऐकवली होती. ती पण अप्रतिम होती. आणि मी तरी ती पहिल्यांदाच ऐकली.
ईप्रसारणवरचे कार्यक्रम आता कधीही आपल्या सोयीने ऐकता येतात. त्यातले निवेदन, गाण्यांची निवडही अप्रतिम असते.
अरेच्चा असंय होय? ह्याची
अरेच्चा असंय होय? ह्याची कल्पना नव्हती. बरोबर आहे तुमचं.
आता आपल्या शेवटच्या वाक्यावर अजून असा प्रश्न पडतो, की तो मुका असेल तर त्याने मुका राहावं असं आपल्याला वाटतं का? हा धागा तो मूकपणा सोडण्याबद्दल आहे असं म्हणावं का?
दूरदर्शनचे चॅनेल्स म्हणजे
दूरदर्शनचे चॅनेल्स म्हणजे पाणीपुरवठ्याची योजना, शिक्षणसंस्था इत्यादी नाही. दूरदर्शन ही मूलभूत गरजांपैकीही नाही. कुठलेही चॅनेल हे अल्पसंख्यांकांसाठी काम करणारे NGO नाही.
टेलिव्हिजन ही एक इंडस्ट्री आहे. धंदा आहे. इंडस्ट्री म्हणतो तेव्हा तिथे आर्थिक गणिते, नफातोटा याचा विचार पहिला होतो. होणारच. त्यात चूक काही नाही.
कुठल्याही टिव्ही चॅनेलला नफा कुठून होतो? जाहिरातींतून. चॅनेल्सवरचा एअर टाइम हा विविध उत्पादनांनी विकत घेतलेला असतो आणि तो वेळ सिरीयलला दिलेला असतो त्यामुळे त्याला प्रायोजित म्हणतात. चॅनेलवरचं सर्वसाधारणतः एकही मिनिट हे अ-प्रायोजित नसतं.
नफा कधी होतो? तर जास्तीत जास्त टेलिव्हिजन सेटस वर तोच चॅनेल लागलेला असतो तेव्हा. अमुक एका स्लॉटला, अमुक एका कार्यक्रमाच्या वेळी किती लोक पहातात याचे गणित किती टेलिव्हिजन सेटसवर अमुक चॅनेल लागला होता ह्यावरून काढले जाते. तेव्हा घरामधे कोणीही नसताना टिव्हि सुरू झाला तरी जो चॅनेल दिसत असेल त्या चॅनेलच्या रेटिंगमधे भर पडणार. हे पहिलं समजून घ्या.
आता साधं गणित असं आहे की उत्पादन कंपन्या अश्याच कार्यक्रमांना प्रायोजित करणार जो कार्यक्रम जास्तीत जास्त टिव्ही सेटसवर लागतो. ज्याअर्थी बिन्डोक सिरीयल्स सुखेनैव चालू आहेत त्या अर्थी अश्या सिरीयल्सना प्रायोजक आहेत म्हणजेच तेवढ्या टिव्हीसेटसवर ह्या सिरीयल्स बघितल्या जातायत.
युद्धामधे शत्रूसैन्याची रसद तोडणे ही स्ट्रॅटेजी खूप महत्वाची मानली जाते. इथेही तेच आहे. बिन्डोक सिरीयल्समुळे मिळणारी व्ह्यूअरशिप कमी झाली की प्रायोजक डळमळतील आणि रसद तोडली जाईल. आणि कदाचित फरक पडेल.
आपण निषेधाची कितीही खरमरीत पत्रे लिहिली तरी त्याचा आपल्याला समाधान काहीतरी केल्याचं यापलिकडे काहीही उपयोग नाही. कारण त्याने प्रायोजक कमी होणार नाहीत.
बिंडोक सिरीयल्स नको असतील तर नकाराधिकाराचा वापर करता आला पाहिजे. आपल्याकडून अश्या सिरीयल्सच्या रेटिंगमधे भर पडणार नाही ही काळजी घेता आली पाहिजे. अन्यथा काही अर्थ नाही.
ज्ये ना ऐकत नाहीत किंवा अजून य कारणं असतील. असतीलच. व्हॅलिडही असतील पण जोवर आपल्या घरातून रेटिंग मिळणं बंद होत नाही तोवर खरोखरीचा उपाय होणे अशक्य आहे.
आपण संच आणि चॅनेल्सचे प्रक्षेपण विकत घेतो म्हणजे ग्राहक म्हणून आपले काहीच अधिकार नाहीत का असा एक मुद्दा आहेच. तर त्या अधिकाराच्या बळावर आपण निषेध दर्शवू शकतो. पण ग्राहक म्हणूनही अश्या चॅनेल्सना बिझनेस न देणे हे केल्याशिवाय सुधारणा कशी होईल?
आपण कोणता कार्यक्रम पाहतो
आपण कोणता कार्यक्रम पाहतो आहोत याचा डेटा सॅटेलाईट टीव्ही प्रोवाईडर्स ना लगेच मिळतो. तसा (हॅथवे सारख्या)केबल वाल्यांकडून मिळतो का?
इथे बरेच जण 'चांगल्या
इथे बरेच जण 'चांगल्या कार्यक्रमांविषयी लिहा/बोला/प्रसार करा' असे लिहीत आहेत. स्वप्ना अश्या कार्यक्रमांची माहिती वेळोवेळी 'संथ चालती ह्या मालिका' बाफवर देत असते. बहुतेक जण ती माहिती वाचतही असतील, पण ते नमूद करत नाहीत. सध्याच्या नविन नाटकांविषयी चर्चा करण्यासाठी, त्याची परीक्षणे लिहिण्या/वाचण्यासाठी तिने बाफही चालू केलेला आहे. पण तिकडेही प्रतिसाद अल्प आहे.
आणि एक उदाहरण म्हणून, इकडे मायबोलीवर अनेकदा आक्षेपार्ह जाहिराती दिसत असतात. (अॅडब्लॉकमुळे मला कुठल्याच जाहिराती दिसत नाहीत.) ह्या जाहिराती मायबोलीवर दिसणं हे अॅडमिन किंवा वेबमास्तरांच्या हातात नाही हे माहित असतानाही त्याबद्दल बर्याच मायबोलीकरांनी तक्रार/ निषेध नोंदवलेला आहेच. मग त्या तश्या जाहिराती दिसतात म्हणून मायबोलीवर येणे सोडणं हे किती जणांना खरोखरीच शक्य होईल?
वर कोणीतरी टिव्हीला पर्याय म्हणून मायबोली वाचा अश्या काहीश्या अर्थाची सूचना केलेली आहे. पण बरीच लोकं तर मायबोलीचं व्यसन कसं सोडवावं या चिंतेत आहेत, मग हे कसं व्हायचं?
दूरदर्शन ज्यावेळी सुरु झालं
दूरदर्शन ज्यावेळी सुरु झालं त्यावेळी, लोकशिक्षण, जनसंपर्क अशी कारणे सांगण्यात आली होती. त्याकाळात खरेच शिक्षण प्रसाराचे कार्यक्रम होत असत. शालेच कार्यक्रम तर होतेच, पण ज्ञानदीप, आमची माती आमची माणसं सारखेही कार्यक्रम होते. हा लोकशिक्षणाचा मुद्दा आता बाजूलाच पडलाय.
ज्ञानदीप ने मोठीच चळवळ उभारली होती. कामगार विश्व चे कार्यक्रम पण चांगले होते.
टाटा स्काय वरही इंग्रजी शिक्षणाचे कार्यक्रम होत असत. (असे टाटाच करु शकतात.)
स्वप्ना च्या संथ चालती या बीबीचे शीर्षकच थोडे गोंधळात टाकणारे आहे. चांगल्या कार्यक्रमासाठी वेगळा बीबीच हवा.
वर कोणीतरी टिव्हीला पर्याय
वर कोणीतरी टिव्हीला पर्याय म्हणून मायबोली वाचा अश्या काहीश्या अर्थाची सूचना केलेली आहे. पण बरीच लोकं तर मायबोलीचं व्यसन कसं सोडवावं या चिंतेत आहेत, मग हे कसं व्हायचं?>>>>
तुम्हाला डीडी वरचे चांगले कार्यक्रम बघायचे आहेत.. रोज रात्री १०:३० नंतर डीडी सह्याद्री लावा.... हमखास गाण्याचा चांगला कार्यक्रम ऐकायला मिळतो....
TV LA REMOTE AAHE
TV LA REMOTE AAHE NAA...MAG...JYA NAKO AAHET TYA KASHALA PAAHATAAT..?
KI REMOTE CHE BUTTON DABAAY CHA PAN KANTALAA AALELA AAGE...
टाटा स्काय वरही इंग्रजी
टाटा स्काय वरही इंग्रजी शिक्षणाचे कार्यक्रम होत असत. (असे टाटाच करु शकतात)
यासाठी पैसे भरावे लागतात ना?
इंग्रजी संभाषणाचा वर्ग एन्डीटीव्ही इमॅजिनवरही असायचा. शेरनाझ इराणी टीचर होत्या. पण मग ते लोकांची लग्ने जमवायच्या समाजसेवेकडे वळले.
डीडी भारती वर अनेक जुने कार्यक्रम पुनःप्रक्षेपित होतात. लोकसभेचे अधिवेशन चालू नसताना लोकसभा चॅनेलवरचे कार्यक्रम बघण्यासारखे असतात.
मी ओझी किंवा ऑनलाईन
मी ओझी किंवा ऑनलाईन सबस्क्रीक्शन घेऊन लॅपटॉप किंवा मोबाईलवरच शिरेली बघते.
मी केले..... पण व्यर्थ!
मी केले..... पण व्यर्थ!
झी टिव्हीवरच्या जुन्या मालिका
झी टिव्हीवरच्या जुन्या मालिका जसं की प्रपंच, ४०५ आनंदवन, पिंपळपान इ. कुठे विकत मिळु शकतील का? आणि साधारण सर्व एपिसोडची किंमत काय असेल?
ह्या धाग्यावर नीधप यांनी सुचवल्याप्रमाणे वाईट सिरील्सचा टिआरपीकाअणि अर्थपुरवठा कमी करणे हा वाईट सिरीयल बंद करायचा एक उपाय आहे. तसचं चांगल्या सिरीयल्सचा अर्थपुरवठा वाढवणे हा दुसरा उपाय होऊ शकतो का?
चांगल्या सिरीयल लोकं extra पैसे देऊन बघतात हे कळलं की निर्मातेसुद्धा अधिकाधिक चांगल्या मालिका बनवतील.
परवा चला हवा येउ द्या मधे
परवा चला हवा येउ द्या मधे एकाकिका विषेश होता त्यात बाकी ओळखिच्या चेहर्यात प्रविण तरडे होते( याना मी मेजर रोल करताना बघितले नाहीये पण चान्गला असु शकेल) त्यानी म्हणे झी च्या बर्याच मालिका लिहल्या त्यावरच स्किट वैगरे एक्दम मजेदात होत पण शेवटी एक गोष्ट लक्षात आली की हे अस ऑन डिमाण्ड लास्त मोमेन्ट स्क्रिप्ट जर लिहल जात असेल तर त्याचा दर्जा,कन्टिन्युटी यावर शन्का घ्यायला वाव आहे की, कलाकार जर पर डे हिशोबाने काम करणारे असतील तर त्याना त्याचा पैसा मीळाला म्हणजे झाल.
Pages