चॅनेल्सवरील बिनडोक सिरियल्सबद्दल चॅनेलकडे निषेधात्मक मेल पाठवण्यासंबंधी

Submitted by स्वप्ना_राज on 7 December, 2011 - 04:38

मंडळी,

आपण मराठी चॅनेल्सवरून दाखवल्या जाणार्‍या बिनडोक सिरियल्सबद्दल वैतागून बोलत असतो. कधीकधी आपल्यातले काहीजण चॅनेलकडे इमेल करून ह्याबद्दल तक्रारही करतात. पण........

ह्यावेळी आपण सगळ्यांनी मिळून निषेध केला तर?
केवळ एका सिरियलबद्दल निषेध करण्याऐवजी सर्व सिरियल्सबद्दल (कुंकू, दिल्या घरी, अरुंधती, आभास हा, एकाच ह्या, पिंजरा ह्या झीमराठीवरील सिरियल्स) एकत्रित तक्रार केली तर?

ह्यातून काही निष्पन्न होईलच असं नाही. पण ह्याबद्दल बर्‍याच इमेल्स आल्या तर चॅनेलच्या एखाद्या माणसाला जाग येईल आणि दाखवला जाणारा बिनडोकपणा जरा कमी होईल. शेवटी काय 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन'. त्यामुळे आपण आपलं काम करू यात. काही नाही तरी निषेध नोंदवल्याचं आणि एक मिनी आंदोलन केल्याचं समाधान तरी मिळेलच ना?

काय म्हणताय?

वि.सू. - हा धागा फक्त ही मेल पाठवण्याबद्दल मुद्दे एकत्र करण्यासाठी आहे. प्रतिक्रिया मिळवायला किंवा माबोची जागा फुकट घालवायला नाही. त्यामुळे काही दिवसांनी हा धागा बंद करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जाहीर पाठींबा.. पण फक्त झी नको, ते स्टार प्रवाह, आणी इ टिव्ही वगैरे सगळीकडेच बिनडोक सिरीअल्स असतात.. Happy

स्वप्ना, शीर्षक बदल.

बिनडोक सिरीयल हे विशेषण सगळ्याच वाहिन्यांवरच्या सगळ्याच मालिकांना लागू आहे.

मसुद्याबद्दल साधारण मला असं वाटतं:

अ. प्रत्येक सिरियलमध्ये आपल्याला जे खटकतं ते स्पष्टपणे सांगावं. उदा:

१. कुंकू

अहिल्या सतत करत असलेली कटकारस्थानं, आत्याबाईला तिच्या आजाराबद्दल स्पष्टपणे न सांगता तिला भ्रमात राहण्यास मदत करणं

२. दिल्या घरी तू सुखी रहा

वरपक्षाने वधूपक्षाकडे हुंडा मागणे, वधूपक्षाने वरदक्षिणा द्यावीच लागणारच असं गृहीत धरून चालणं, मुलींनी कॉलेजात शिकण्यापेक्षा घरकाम शिकावं असा संदेश, सासू सुन घरात यायच्या आधीच तिच्यावर खार खाऊन असते असं दाखवणं

३. अरुंधती

वराची नीट चौकशी न करता लग्न ठरवलं जाणं, पाय निकामी करून येण्याची अरुंधतीची बतावणी, सासूची कारस्थानं

४. एकाच ह्या

श्रीकांतला मानसोपचारांची गरज असतानाही मांत्रिक आणणारं कुटुंब, लग्न टिकावं म्हणून अंजलीने केलेली तडजोड, श्रीकांतच्या आईची कारस्थानं

५. आभास हा

माणसं कधीच बदलत नाहीत हा मायाताईच्या व्यक्तिरेखेतून दिलेला संदेश, कट-कारस्थानं, कागदपत्रं बदलणं

तसंच कृत्रिम वाटणारे संवाद, अशक्य वळणं घेणारं कथानक, वर्षानुवर्ष चालणार्‍या मालिका.

ब. मालिकात एखादा भाग आवडला असेल तर त्याबद्दल - इथे निदान मला तरी काही सुचत नाहिये Happy

क. ज्यावर मालिका बनू शकतात अश्या मराठी साहित्यातल्या उत्तम कलाकृतीचे उल्लेख. हे थोडंसं 'गाढवापुढे गीता वाचण्यासारखं' आहे. पण नको तर हे सेक्शन काढून टाकता येईल.

मी यातली एकही सिरीअल पहात नाही. त्यामुळे हे काही सांगू शकत नाही. पण एकंदर कानावर कधीतरी काही पडते त्यावरुन निषेध करायला तयार आहे.

तक्रारींकरिता एक वेबसाईट आहे - कार्यक्रम चालू असताना एक स्ट्रिप नेहमी येत असते. पुन्हा चेक करायला पाहिजे.

बहुधा ही
http://ibfindia.com/guidelines.php

स्वप्ना, एकूणच सगळ्या वाहिन्यांवरच्या सगळ्या आक्षेपार्ह मालिकांबद्दल इथे चर्चा अपेक्षित आहे ना?

फारएन्ड, मला वाटतं चॅनेलकडे तक्रार करून उत्तर न मिळाल्यास ह्या साईटवर तक्रार करता येते असं आहे. चॅनेलकडून उत्तर ह्या प्रकाराची काय व्याख्या आहे देव जाणे.

मंजूडी, एकदम मान्य. शीर्षक बदललं आहे.

संथ चालती ह्या मालिका बीबीवर नंदिनीने मांडलेला मुद्दा एकदम पटला की कॉमन मसुदा असेल तर एकाच व्यक्तिने अनेक वेळा मेल केली आहे असं वाटू शकतं. त्यामुळे इथे मांडलेले मुद्दे घेऊन प्रत्येकाने आपली मेल लिहावी. म्हणजे हा धागा काही दिवसांनी बंद करता येईल

पुर्ण अनुमोदन..!!
एकाच ह्या या सिरियलमधला काही भाग नाही, तर अख्खी सिरियल खटकण्यासारखी आहे.... Happy

स्वप्ना, कल्पना उत्तम आहे. मी स्वतः असे उपद्व्याप बर्‍याचदा करत असतेच. सध्या कुठलेच मराठी चॅनल दिसत नसल्याने मराठी सीरीयल्स बघितल्याच जात नाहीत. तरी जाहिरातीविरूद्ध निषेध नोंदवतच असते.

कॉमन मसुदा पाठवला तर एकच व्यक्ती सतत हेच मेल पाठवत आहे असा अर्थ निघू शकतो. सध्याच्या वायरल मीडीयामधे ते शक्य देखील आहे. सर्वाकडे कंपनीचे आयडी असतील असे नाही. त्यामुळे सीरीयल प्रमाणे पॉईंट्स घेऊन पाठवणे जास्त योग्य.

त्यामुळे कॉमन मसुदा नको. पण कॉमन पॉईंट जरूर घेऊ. वाटल्यास माबोची या ग्रूपची लिंक देखील देऊ. निषेधाच्या ईमेलमुळे ताबडतोब सीरीयल बंद वगैरे केली जाईल अशी अपेक्षा बाळगू नका. किमान लोकाना हे आवडत नाहिये किंवा त्यामधे नाराजीचा सूर येतो आहे हे जरी जाणवले तरी रग्गड म्हणायचे. पुढील सीरीयलच्या वेळेला अथवा याच सीरीयलचा प्लॉट बदलताना याची जाणीव त्याना येत राहील.

प्रत्येक सीरीयलसाठी चॅनलचा एक ईपी (Executive Producer) असतो. निर्माता दिग्दर्शकापेक्षा त्याचे महत्त्व जास्त असते. त्याचे/तिचे नाव समजू शकले तर ही ईमेल आपण सरळ त्यालादेखील पाठवू शकतो. त्यामुळे गोली निशानेपे लगेंगी.

प्रत्येक गोष्टीचा फक्त निषेध करण्याचा, भारतीयांचा जन्मसिध्द अधिकारच आहे आणि तो तुम्ही केलाच पाहीजे.

तिकडे भारतावर दहशतवादि हल्ला झाल्यावर, काँग्रेजी सरकार सतत पाकीस्तानाचा निषेध करत असतो.
इकडे च्यानलवाल्यांवर तुम्ही करा. नाहीतरी तुमच्या निषेधाची दखल पाकीस्तानातला साधा कुत्राही घेत नाही.

बाकी वायफळ बडबड करायला, आणि "१००% अनुमोदन., २०० % अनुमोदन." या असल्या प्रतिक्रीया मिळवायला काढा एक-एक बाफ, फुकटच आहे ते.. Proud

शीर्षक बदललं आहे.>>> अगं मग मराठी चॅन्ल्सवरील असं नको, 'बिनडोक सिरियल्सबद्दल चॅनेलकडे निषेधात्मक मेल पाठवण्यासंबंधी' एवढंच ठेव शीर्षक. हिंदीतल्या मालिकाही चिडचिडीशिवाय दुसरं काही देत नाहीत.

नंदिनी, मी वर म्हटल्याप्रमाणे निषेध नोंदवल्याचं समाधान आणि विशेष म्हणजे आपण एकटे नाही तर अनेक लोक आपल्यासोबत हे करत आहेत ही जाणीव एव्हढं मिळालं तरी पुरे.

साधा माणुस, माबोवरच्या फुकटच्या जागेची एव्हढी काळजी आहे तर तुम्ही प्रतिसाद देऊन कशाला आणखी जागा वाया घालवलीत? गप्प बसायचं ना? मी आधीच म्हटलं आहे की हा धागा काही दिव्सांनी बंद करता येईल. पण बहुधा मताची पिंक टाकायच्या घाईत तुम्ही वाचलं नसेल.

बाकी वायफळ बडबड करायला, आणि "१००% अनुमोदन., २०० % अनुमोदन." या असल्या प्रतिक्रीया मिळवायला काढा एक-एक बाफ, फुकटच आहे ते>> जस्ट लाइक युअर पोस्ट.

व्यक्तीगत इमेल पेक्षा अशा सोशल साईट वरुन ग्रूपचा मेल गेला तर जास्त परिणाम साधेल अस वाटत. तसेच आपण इतर सोशल साईट्स ची(फेबु, ट्वीटर) पण मदत घेतली तर??

या सिरिअल्स बिनडोक आहेत पण त्यात हुंडा, छ्ळ, तंत्रमंत्र, हिंसाचार ईंत्यादींचे कुठेच सरळ सरळ समर्थन नसते मग तक्रार आणि निषेध करणार कसला?

नंदिनी, मी वर म्हटल्याप्रमाणे निषेध नोंदवल्याचं समाधान आणि विशेष म्हणजे आपण एकटे नाही तर अनेक लोक आपल्यासोबत हे करत आहेत ही जाणीव एव्हढं मिळालं तरी पुरे.
>> नाही स्वप्ना, अशा नीगेटीव्ह प्रतिक्रियामधे वाढ झाली तर चॅनलला दखल घ्यावी लागेल. लोक कुठली सीरीयल बघतात त्यावर जाहीरातीचे रेट असतात. आणि जाहीराती म्हणजे रोजीरोटी. Happy त्यामुळे ईपीकडे तक्रार गेली तर त्याची दखल तो घेइल. त्यामुळे हळू हळू का होईना कारवाई होइल.

अजून एक करता येइल. प्रत्येक सीरीयलचे जे जाहिरातदार आहेत त्याना या ईमेल्ची प्रत पाठवणे. हे तर सीधा पेटपे लात मारना टाईप होइल. पण आपण करू शकतो. Happy

अ‍ॅडमिन, आपल्याला तसदी दिल्याबद्दल क्षमस्व. पण कृपा करून हा बीबी बंद करा ही विनंती. पुन्हा एकदा सॉरी.

सर्वात बेकार मालिका म्हणजे.. गुंतता हृदय हे.. घरोघरी ही मालिका चालु असताना पुरुषवर्गाला बोलायची पण बंदी असते म्हणे.. Wink

स्वप्ना, जस्ट इग्नोअर Happy

पाटील, तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय ते कळलं नाही.

काडीघालू राम.

या सिरिअल्स बिनडोक आहेत पण त्यात हुंडा, छ्ळ, तंत्रमंत्र, हिंसाचार ईंत्यादींचे कुठेच सरळ सरळ समर्थन नसते मग तक्रार आणि निषेध करणार कसला?
<<< पाटील सीरीयल्स बघत नाही की काय तुम्ही? सर्वाना समर्थनच काय प्रोत्साहन दिल्यासारखेच असते की.

मंजुडी- मला महणायचेय की ब्रॉड्कास्ट कंटेंटची कोणती गाईडलाईन मोडली जातेय तर तक्रार करणार?
प्रत्येक चॅनलचा येक टार्गेट ऑडिअन्स असतो आणि त्याला आवड्तील अशा मालिका बनवल्या जातात. उदा. बिनडोक मालिका बनवणारी एकता कपुर सेंसिबल चित्रपट बनौ शकते. टार्गेट ऑडिअन्स वेगळा आहे दोन्हिचा.

मायबोलीच्या नावाचा उपयोग करू नये असे मला वाटते. भविष्यात काही जाहिरातींसाठी, किंवा मायबोली प्रायोजित कार्यक्रमांसाठी या चॅनेल्सची मदत लागणार असेल तर, असे करणे धोक्याचे ठरेल.

बाकि सिरियल्स बिनडोक असतात तर पाहू नका, लोकांना जे आवडते ते आम्ही देतो, बाह्य घटकांची सेन्सॉरशिप, कलाकाराचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असे मुद्दे पुढे आले तर त्याला काय उत्तर द्यायचे याचा पण विचार करुन ठेवा.

Pages