मंडळी,
आपण मराठी चॅनेल्सवरून दाखवल्या जाणार्या बिनडोक सिरियल्सबद्दल वैतागून बोलत असतो. कधीकधी आपल्यातले काहीजण चॅनेलकडे इमेल करून ह्याबद्दल तक्रारही करतात. पण........
ह्यावेळी आपण सगळ्यांनी मिळून निषेध केला तर?
केवळ एका सिरियलबद्दल निषेध करण्याऐवजी सर्व सिरियल्सबद्दल (कुंकू, दिल्या घरी, अरुंधती, आभास हा, एकाच ह्या, पिंजरा ह्या झीमराठीवरील सिरियल्स) एकत्रित तक्रार केली तर?
ह्यातून काही निष्पन्न होईलच असं नाही. पण ह्याबद्दल बर्याच इमेल्स आल्या तर चॅनेलच्या एखाद्या माणसाला जाग येईल आणि दाखवला जाणारा बिनडोकपणा जरा कमी होईल. शेवटी काय 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन'. त्यामुळे आपण आपलं काम करू यात. काही नाही तरी निषेध नोंदवल्याचं आणि एक मिनी आंदोलन केल्याचं समाधान तरी मिळेलच ना?
काय म्हणताय?
वि.सू. - हा धागा फक्त ही मेल पाठवण्याबद्दल मुद्दे एकत्र करण्यासाठी आहे. प्रतिक्रिया मिळवायला किंवा माबोची जागा फुकट घालवायला नाही. त्यामुळे काही दिवसांनी हा धागा बंद करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
दिनेशदा, अहो, चॅनेलकडून मेल
दिनेशदा, अहो, चॅनेलकडून मेल मिळाल्याची एक मेल येते उत्तर म्हणून. बाकी काही नाही.
नंदिनी.. तु या क्षेत्रातील
नंदिनी.. तु या क्षेत्रातील माहीतगार आहेस म्हणुन एक सिरीयस प्रष्ण.. अश्या पद्धतीने निषेधाच्या मेल्स पाठवुन अथवा समस पाठवुन या सिरीअल्सच्या निर्मात्यानी सिरीअल्स बंद केल्याचे किंवा त्यातील बिनडोकपणा कमी केल्याचे एखादे उदाहरण माहिती आहे का?? म्हणजे निर्माते लोक अश्या गोष्टीना महत्व देतात का?? मला अजुन ते टीआरपी कसा ठरवतात तेच समजले नाही.. म्हणजे कोण सर्व्हे करते? कुणाचा करते वगैरे??:)
मंजूडी.. गुंतता आणी त्याचे वाईट परिणाम याच्यावर एक लेख लिहावा लागेल..;)
राम,
राम, http://in.answers.yahoo.com/question/index?qid=20070410032433AAC2Iqz
पाटील, गाईडलाईन मोडली जातेय
पाटील, गाईडलाईन मोडली जातेय म्हणून नव्हे, तर एकूणच अश्या प्रकारच्या मालिकांमुळे समाजात चुकीचा संदेश पसरवला जातो आहे म्हणून निषेध व्यक्त करायचा. तुम्ही म्हणताय तो टार्गेट ऑडीयन्सचा मुद्दा मान्य, 'आमच्या प्रेक्षकांना जे आवडतं ते आम्ही देतो' असं प्रत्युत्तर येण्याचीही शक्यता आहेच, पण निदान एक वर्ग आहे की ज्यांना हे असलं काही आवडत नाहीये एवढं कळलं तरी खूप झालं.
आणि तसाही ह्या वाहिन्यांचा भरवसा नाहीच, 'तक्रारी येताहेत म्हणजे हे लोकं आपली वाहिनी बघतात' असा अर्थ काढून खूश होतील.
राम , क्षेत्रातली माहितगार
राम , क्षेत्रातली माहितगार वगैरे नाहिये पण तरी

कधी कधी काही सीरीयल्सच्या वेळा बदलतात. प्राईम टाईमवरून दुसर्याच टाईमला सुरू होतात किंवा चालत असलेली सीरीयल बंद होऊन दुसरी नविन सीरीयल सुरू होते. याचा अर्थ कुठेतरी प्रेक्षकानी या सीरीयलला नाकारलेलं असतं. फक्त हे चॅनलवाल्याना वेळेत समजत नाही. फार उशीराने समजते. ते वेळेत समजावे म्हणून हा खटाटोप.
स्वप्ना..धन्यवाद.. पण केवळ
स्वप्ना..धन्यवाद.. पण केवळ ५५०० घरातील सर्व्हेनुसार ठरवलेले टीआरपी कितपत योग्य असतील याची शंकाच वाटते..
नंदिनी.. धन्यु.. आता सगळ्याना सांगतोच गुंतता बंद पाडायची आयडीया..:P
तुम्ही टार्गेट ऑडियन्स कोण
तुम्ही टार्गेट ऑडियन्स कोण आहे त्यांच्या दृष्टिकोणातून हा विचार केला आहे का? तो आपण किंवा आपल्यासारखे लोक हा नाही. खेडेगाव, निम्न शहरी, घरी राहणार्या, कमी एक्स्पोजर असणार्या स्त्रीया व पुरूष ज्यांची मानसिकता व विचारसरणी आपल्यापेक्षा जरा वेगळी व संकुचित असू शकते. शहरी सुशिक्षित प्रेक्षक वर्ग सोडल्यास जो प्रचंड मोठा श्रोतावर्ग आहे त्याच्या मानसिक गरजा ह्या व अश्या सीरीअल्स भागवत आहे. हिंदी मध्ये ही तोच प्रकार आहे. मुख्य म्हणजे जाहिरात दार व स्पॉन्सर्स ह्यांना त्यांची उत्पादने टार्गेट ह्याच वर्गासाठी करायची आहेत कारण शहरी लोकांना वेगळ्या ऑप्शन्स उपलब्ध आहेत. मला आजिबात वाद घालायचा नाही. वरील चर्चा व उपक्रम बरोबरच आहे. फक्त एक बाजू लक्षात आणली. प्रोड्यूसरला टीआरपी वर लक्ष केंद्रित करायचे असते व टीआरपी जास्त असलेल्या कार्यक्रमालाच जास्त जाहिराती मिळतात. उत्तम क्वालिटीचे, संगीत, नाट्यसंगीत, समीक्षा, साहित्य चित्रकला, नाटके ह्यावर आधारित किती प्रोग्राम आहेत? सूरताल सोडले तर नाहीतच कारण व्ह्यूअर शिप नाही.( सऱकारी भारती चॅनेल ला फार कमी जाहिराती असतात.)
व्यक्तिशः मला संगीत खुर्ची, एकापेक्षा एक व तत्सम नाच वगैरे पण अगदी बघवत नाही. ओवरडन वाट्ते.
अश्विनीमामीना अनुमोदन-
अश्विनीमामीना अनुमोदन- बुकशेल्फ ( अतुल कुलकर्णी - झी मराठी) सारखे कार्यक्रम लवकरच बंद पडले.
माफ करा, पण या धाग्यातील
माफ करा, पण या धाग्यातील विचार पटले नाहीत.
१. टीव्ही बंद करण्याची सुविधा उपलब्ध आहे
२. ईमेल करून मालिका बंद होतील, सुधारतील याची शक्यता अतिशय कमी वाटते.
३. आपली काही जणांची अभिरुची आठ कोटी (की किती?) मराठी लोकांना रिप्रेझेंट करत नसावी.
४. हा कोणताही असा सामाजिक, ज्वलंत वगैरे प्रश्न नाही की ज्यासाठी कोणत्याही प्रकारचे आंदोलन किंवा निषेध व्यक्त करणे योग्य आहे.
५. मराठी मालिका (किंवा कोणत्याही) ही त्या त्या निर्माता, दिग्दर्शक, अभिनेते समुह व इतर सहभागी स्टाफसाठी रोजीरोटीबरोबरच कलानिर्मीतीही आहेच. दर्जाबाबतची मते अतिशय सापेक्ष असतात. ७० वर्षापुढच्या अनेक महिला किंवा ग्रामीण विभागातील अनेक महिला या सिरियल्सना बिनडोक समजत नसतील.
पुन्हा माफ करा, पण या धाग्यावर आलेले प्रतिसाद पाहून मात्र नवल वाटले. मालिका बंद व्हाव्यात, सुधाराव्यात वगैरेसाठी ईमेल आंदोलन करण्यात अनेक जण स्वारस्य दाखवत आहेत. हिरीरीने चर्चा करत आहेत. इन्टरनेटचा फोरम अजूनही (दुर्दैवाने?) एकंदर ग्रामीण महाराष्ट्रासाठी मत बनवण्यालायकीचा फोरमच नाही आहे. वर्तमानपत्रे, टीव्ही व फोनकॉल्स हे फोरम्स त्यांच्यासाठी महत्वाचे आहेत.
-'बेफिकीर'!
तसेच, टीव्ही बंद करायचा नाही
तसेच, टीव्ही बंद करायचा नाही आहे व टीव्हीवरच उत्तम कार्यक्रम बघायचे आहेत अशी मानसिक गरज असल्यास अर्थातच इतर चॅनेल्स ( म्हणजे मराठीच असे नव्हे ), इतर कार्यक्रम असे पर्याय आहेतच. त्याशिवाय, टीव्ही ही जरी अत्यंत सोयीची करमणूक सुविधा असली तरी इतरही अनेक सुविधा उपलब्ध आहेतच. जसे सीडी, म्युझिक इत्यादी! वरवर हा अत्यंत अवांतर प्रतिसाद वाटला तरी आपण टीव्हीकडून जी बेसिक गरज भागवतो ती करमणूकच असते (अॅटलीस्ट मालिका बघणार्यांची तरी) हे मान्य व्हावे.
-'बेफिकीर'!
मराठी नाट्य परंपरा बघता एक
मराठी नाट्य परंपरा बघता एक पूर्ण चॅनेल फक्त नाट्यविषयाला वाहिलेले चालू शकेल. त्यातच मध्ये ललितकला, शास्त्रीय नाचाचे पर्फॉरमन्सेस, क्लासिकल संगीत, वाद्य संगीत चित्रकला व साहित्यावर आधारित कार्यक्रम घालता येतील. विजया बाईंनी बसविलेली नाटके, नाट्य विषयक चर्चा, वग, मालवणी नाटके इत्यादीवर चर्चा व प्रयोग, तसेच प्रायोगिक रंगभूमीवर मेहनत करणारे गुणी कलाकार यांना कधी कधी प्रयोगांचे आर्थिक गणित जमत नाही अश्यांना अर्धा तासाचे एक्स्पोजर मिळाले तरीही फार उपयोग होइल.
आपणही घर बसल्या आरामात उत्तम कलाकृति बघू शकू. पे पर व्ह्यू चॅनेल करता येइल. आळंदीस एक गुणी भजन गायक आहेत. शुभा मुद्गल यांनी त्यांची कला जगासमोर आणण्यात त्यांना मदत केलेली आहे. असे कलाकार पण स्वतःस व्यक्त करू शकतील.
जुनी संगीत नाटके, नाट्यसंगीत हा तर फारच गहन व मोठा विषय आहे. पूर्वीच्या दूरदर्शन वर असे कार्यक्रम असत.
अमा. असे एक चॅनल पूर्वी होते
अमा. असे एक चॅनल पूर्वी होते 'प्रभात' नावाचे. झीमराठी सुरु झाले त्याच काळात ९५-९६ मध्ये. त्यावर अनेक गाजलेली नाटके लागायची. नंतर ते बंद पडले.
इमेल करुन फार काही फरक पडेल असं वाटत नाही. अमाच्या टारगेट ऑडियन्स आणि बेफिकीर यांच्या ३ आणि ५ बद्दल अगदी सहमत.
दिवसेंदिवस झीच्या मालिकांचा दर्जा खालावताना दिसतोय. आभाळमाया, वादळवाट, प्रपंच, झोका, रेशीमगाठी सारख्या मालिका दाखवणारे हेच का ते चॅनल असा प्रश्न पडावा इतपत. आणि हे साधारण सुरु झालं अवघाचि हा संसार, 'वहिनीसाहेब' पासून. किंवा कदाचित त्या आधीच. मग त्याच त्या पठडीतल्या मालिका एकामागून एक यायला सुरुवात झाली. आणि आता 'रिअलिस्टिक' वाटेल अशी एकही मालिका नाही. अगदी 'गुंतता' ही नाही. (केवळ व्हाईट कॉलर मसाला.) याचे कारण काय? तर तशा प्रकारच्या मालिकांना मिळालेली व्ह्यूअरशिप, प्रतिसाद. जे लोकांना आवडतंय तेच ते दाखवणार. कोणत्या लोकांना आवडतंय याच्याशी त्यांना काहीही देणं घेणं नसावं.
छान धागा स्वप्ना. - इमेल
छान धागा स्वप्ना.
- इमेल निषेध तर करावाच पण निषेध करण्याचा सर्वात मोठा उपाय म्हणजे न-पाहणे. त्याने व्हियुरशीप अफेक्ट होईल
- I don't watch the following असा ब्लॉग तयार करणे, फेसबुक ग्रुप. जे काय असेल ते..
मी टीव्ही पहातच नाही. (हल्ली एक सिरीयल आंतरजालावर पाह्ते. ती बरी आहे)
त्यामुळे यातली कुठलीही मालिका पाहण्याचा प्रश्नच उद्बवत नाही. वर नमुद केलेली कुठलीही मालिका पाहिलेलीच नाही. आणि ऐकले तेही फक्त इथेच.
एकदा नवरा आणि मी यावर सिरीयसली बोलत होतो. त्याच्या टीममधले मुलगे रोज बिगबॉस वगैरे पाहुन त्यावर चर्चा करायचे. आम्ही असे ठरवले की लोकांशी बोलता यावे म्हणूनही हे घाणेरडे शोज बघायची आपल्याला खरंच गरज आहे का? नाहीये. आहे तसे बरे आहोत की. आणि असले प्रोग्राम पहात नाही म्हणून बोलायलाच काही नसणे तेही घातकच.
मग न-पाहणॅ हे इतके अवघड का वाटावे?
तसेही दिवसाकाठी आपल्याकडे किती तास असतात? त्यात हे पहात बसले तर कसे व्हायचे?
त्यापेक्षा करण्यासारख्या कितीतरी गोष्टी आपल्याकडे आहेत.
स्वप्ना, तुम्ही लोक असे करु
स्वप्ना,
तुम्ही लोक असे करु शकता, कि आम्ही अमुक इतक्या सुशिक्षित जणी, या या कारणासाठी आजपासून मालिका पाहणे बंद करत आहोत, तसेच आमच्या संपर्कात असणार्या अनेक प्रेक्षकांना तसे करण्याचा आग्रह करणार आहोत्...असा मेसेज पाठवा.
आणि त्याची प्रत या मालिका प्रायोजित करणार्या कंपनीच्या संबंधित विभागाला पाठवा.
मी मागे लिहिलेच होते कि माझ्यापुरता मी अनेक वर्षांपासून या मालिकांवर बहिष्कार टाकलाय. त्याने मालिकांना काही फरक पडला नसेल, पण मला स्वतःला मात्र नक्कीच पडला.
स्वप्न.... १०० -२०० -------
स्वप्न.... १०० -२०० ------- वट्तेल तितके टक्के अनुमोदन ........पण नुस्त्य वाय्फळ गप्पा आणी टि पी ला नाही तर इ मेल करुन निशेध नोदवणे.....
एक अनुभव ----- सा रे ग म लिटिल चाम्प सगळ्यात पहिल्यान्दा सुरु झाले होते तेव्हा पल्लवी एक्दम वल्गर कपडे घालत होती तेव्हा मझ्या मैत्रिणीने त्याना सतत किमान १० -१२ दिवस एकच मेल केली ..त्यामुळे असेल किवा कशामुळे ते महित नाही पण नन्तर पल्लवी साडीत होती शेवट पर्यन्त.......
आजच्या जीवनशैलीत ज्येष्ठांना
आजच्या जीवनशैलीत ज्येष्ठांना द्यायला घरातल्या इतर माणसांना वेळ नसतो. म्हातारपणामुळे आलेली दुखणी-खुपणी, शारिरीक दुर्बलता यामुळे आपले छंद जोपासणे त्यांना अनेकदा शक्य होत नाही आणि मग वेळ कसा घालवायचा हा प्रश्न उभा राहतो. त्यांनाही ह्या मालिका आवडतात अशातला भाग नाही पण ती त्यांची गरज बनलेली असते. म्हणून जो पर्यंत त्याला आपण (आजची कामात व्यग्र असलेली पिढी) पर्याय देऊ शकत नाही तोपर्यंत त्यांना मालिका बघू नका असे सांगणे आपल्या जीवावर येते. त्यामुळे मालिका न बघणे जरी शक्य असले तरी त्यातले ते अत्यंत नाटकी संवाद, ते कर्कश वाद्यसंगीत काही टाळता येत नाहीत. आणि केवळ त्यावरूनच मालिकेत काय चालले आहे ते कळते.
अशा परिस्थीतीत मालिकांत काही गोष्टी खूपच खटकतात. संस्कारक्षम पिढीवर त्यांचे वाईट परिणाम प होऊ शकतात.
१. अनेक मालिकांत दिसणारे विवाहबाह्य संबंध - हे समाजात आजही इतके प्रचलीत नाहीत जितक्या सहजपणे ते मालिकांत दिसतात.
२. रोजच्या व्यवहारात दिसणारी कट कारस्थाने - आज बहुतेक कट कारस्थाने न दाखवता मालिका बनू शकते हेच मालिका बनवणारे विसरत चालले आहेत. रोजच्या जीवनात असली कारस्थाने सामान्य माणूस करत नाहीच.
३. भयंकर श्रीमंती रहाणी - ह्याचे दुष्परीणाम तर खूपच जाणवतात. मुलांना ही सगळी रहाणी खरी वाटू लागते आणि त्यांच्या मागण्या अवाजवी प्रकारे फुगत जातात.
४. माणसाचे व्यक्तीमत्व हे काळ्या आणि पांढर्या छटांचे मिळून बनले असते. पूर्णपणे काळे किंवा पांढरे असू शकत नाही. मालिक्तेअली पात्रे मात्र काळ्या किंवा पांढर्या रंगातलीच असतात. मुलांचा त्याने खूप गोंधळ उडतो.
बेफिकीर अनुमोदन. (हे वाक्य मी
बेफिकीर अनुमोदन. (हे वाक्य मी कधी लिहिन असे स्वप्नात देखील वाटले नव्हते :दिवा:) अचूक मांडले आहेत तुम्ही. तसेच पाटील, अश्विनीमामी वगैरे लोकांनीही योग्य मुद्दा मांडलाय.
>>त्यामुळे मालिका न बघणे जरी
>>त्यामुळे मालिका न बघणे जरी शक्य असले तरी त्यातले ते अत्यंत नाटकी संवाद, ते कर्कश वाद्यसंगीत काही टाळता येत नाहीत. आणि केवळ त्यावरूनच मालिकेत काय चालले आहे ते कळते.
>>अशा परिस्थीतीत मालिकांत काही गोष्टी खूपच खटकतात. संस्कारक्षम पिढीवर त्यांचे वाईट परिणाम प होऊ शकतात.
अगदी अगदी बरोबर माधव. माझं हेच झालंय. पण माबोवर मालिकाबद्दल लिहिलं रे लिहिलं की 'बघू नका ह्या मालिका, आम्ही नाही बघत' असा सूर निघतो. हे सगळ्यांनाच शक्य आहे असं नाही. दुसरं असं की आपण मालिका न बघून तो प्रश्न आपण आपल्यापुरता सोडवतो. पण जे लोक ह्या असल्या मालिका पहातात त्यांच्यावर कळत नकळत परिणाम होतच असतो ना? भाग्यलक्ष्मीमध्ये तिची सासू तिला लाथाबुक्क्यांनी मारत असल्याचा एपिसोड पाहून मी झीला जी मेल लिहिली होती त्यात हेच लिहिलं होतं की उद्या तुमच्या मुलीला किंवा बहिणीला असल्या सिरियल्स पाहून सासूने असं वागवलं तर तुम्हाला कसं वाटेल?
>>मराठी मालिका (किंवा कोणत्याही) ही त्या त्या निर्माता, दिग्दर्शक, अभिनेते समुह व इतर सहभागी स्टाफसाठी रोजीरोटीबरोबरच कलानिर्मीतीही आहेच. दर्जाबाबतची मते अतिशय सापेक्ष असतात. ७० वर्षापुढच्या अनेक महिला किंवा ग्रामीण विभागातील अनेक महिला या सिरियल्सना बिनडोक समजत नसतील.
बेफिकीर, माफ करा. पण रोजीरोटी एखाद्या ड्रग विकणार्या माणसाला पण असते. म्हणून नाक्यानाक्यावर उद्या ड्रग विकणारे लोक उभे राहिले तर त्यांचं पोट त्याच्यावर आहे म्हणून दुर्लक्ष करायचं काय?
दर्जाबाबतची मतं सापेक्ष असूही शकतील पण सुनेला लाथा मारणारी सासू किंवा 'माझ्या वडिलांनी ऐपतीप्रमाणे वरदक्षिणा दिलीच असती' असं म्हणणारी मुलगी किंवा कुठल्यातरी ज्योतिषी बाईने भाच्याच्या पत्रिकेत लवकर मृत्यू आहे म्हणून संगितलं म्हणून अखंड सौभाग्यवती असल्याची पत्रिका असलेल्या त्याच्याहून लहान मुलीशी त्याचं लग्न लावून देणारी आत्याबाई किंवा मानसोपचारांची गरज असलेल्या मुलावर मांत्रिकाकडून उपचार करून घेणारं कुटूंब ह्यांचा दर्जा उच्च कसा असू शकतो?
७० वर्षापुढच्या अनेक महिला किंवा ग्रामीण विभागातील अनेक महिला या सिरियल्सना बिनडोक समजत नसतीलही पण मग त्यांचं मत बदलायची जबाबदारी चॅनेल्सचीच नाही का? कदाचित त्या महिला सती जाणं योग्य समजत असतील म्हणून मग त्यांना सती जाउ द्यायचं का सती जाणं चूक कसं ते समजवायचं?
ईमेल करून मालिका बंद होतील, सुधारतील याची शक्यता अतिशय कमी वाटते असं तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. नाही होणार ह्या मालिका बंद क्दाचित. पण दुसरे काय पर्याय आहेत? आपला टीव्ही बंद करायचा हा एक पर्याय झाला. ह्या मालिकांचे समाजजीवनावर होणारे परिणाम आता दिसत नाहियेत. आणखी ८-१० वर्षंनी दिसायला लागले की हा पर्याय उपयोगी पडणार नाही. मग कदाचित उठून हिमालयात जावं लागेल. दुसरा पर्याय काय आहे? चॅनेलवर मोर्चा घेऊन जाणं? का जाळपोळ करणं? ते हिंदी पिक्चरमध्ये शोभून दिसतं नाही का? मग जे आपल्याला पटलं नाही त्याबद्दल सनदशीर मार्गाने निषेध का करू नये? एकट्यादुकट्याला जे जमणार नाही ते कदाचित अनेकांनी केल्यावर होऊनही जाईल.
बेफिकीर, माफ करा. पण रोजीरोटी
बेफिकीर, माफ करा. पण रोजीरोटी एखाद्या ड्रग विकणार्या माणसाला पण असते. म्हणून नाक्यानाक्यावर उद्या ड्रग विकणारे लोक उभे राहिले तर त्यांचं पोट त्याच्यावर आहे म्हणून दुर्लक्ष करायचं काय?>>>>
चुकीची तुलना आहे
दर्जाबाबतची मतं सापेक्ष असूही शकतील पण सुनेला लाथा मारणारी सासू किंवा 'माझ्या वडिलांनी ऐपतीप्रमाणे वरदक्षिणा दिलीच असती' असं म्हणणारी मुलगी किंवा कुठल्यातरी ज्योतिषी बाईने भाच्याच्या पत्रिकेत लवकर मृत्यू आहे म्हणून संगितलं म्हणून अखंड सौभाग्यवती असल्याची पत्रिका असलेल्या त्याच्याहून लहान मुलीशी त्याचं लग्न लावून देणारी आत्याबाई किंवा मानसोपचारांची गरज असलेल्या मुलावर मांत्रिकाकडून उपचार करून घेणारं कुटूंब ह्यांचा दर्जा उच्च कसा असू शकतो?>>
दर्जा उच्च असू शकतो असा दावा नाही आहे. दर्जा उच्च नाही हे एखाद्याचे मत असू शकते. शंभर जणांसाठी तो उच्च असू शकतो. अगदी चुकीचे दाखवले तरी. चुकीचेही दाखवावेच लागते हे मत आपण स्वीकाराल की नाही हे माहीत नाही.
पण ते आवश्यक आहे व खरे आहे.
७० वर्षापुढच्या अनेक महिला किंवा ग्रामीण विभागातील अनेक महिला या सिरियल्सना बिनडोक समजत नसतीलही पण मग त्यांचं मत बदलायची जबाबदारी चॅनेल्सचीच नाही का? कदाचित त्या महिला सती जाणं योग्य समजत असतील म्हणून मग त्यांना सती जाउ द्यायचं का सती जाणं चूक कसं ते समजवायचं?>>>
हा जरा मोठा घोळ झाला आहे. माफ करा पुन्हा!
चॅनेल्सकडे कसलीही जबाबदारी नसते. पैसे मिळवणे हे एकच ध्येय असते. समाजाचे भले ही त्यांची जबाबदारी नाही. 'सती जाणे' याबाबत आपण केलेली तुलना पुन्हा चुकीची आहे.
चुकीचे दाखवावेच लागते म्हणजे
चुकीचे दाखवावेच लागते म्हणजे काय ते लिहितो:
लाथा मारणे, मांत्रिक, बालविवाह वगैरे चूक आहे हे विचार ऑलरेडी समाजाच्या बर्याचश्या थरात पोचलेले आहेत. पुर्वी काय होते किंवा काय काय चुकीचे घडते समाजात हेही लोकांना बघायचे असते. सी आय डी, क्राईम पेट्रोल या सिरिअल्स अश्याच आहेत. सखी गं टाक पुढचं पाऊल या सिरिअलमधील बहुतेक सर्वच गोष्टी पटत नाहीत, पण कथानक 'काही जणांना' खिळवून ठेवू शकते. जाऊ इतकी वाईट स्वभावाची असू शकते असे आजच्या समाजात होईल का? पण पुर्वी व्हायचे किंवा आजही कोठेतरी होते हेही पाहायला आवडते अनेकांना!
चॅनेल्सकडे कसलीही जबाबदारी
चॅनेल्सकडे कसलीही जबाबदारी नाही हे माझे विधान ' अशा मालिका प्रसारीत करण्याबाबत' मर्यादीत आहे असे गृहीत धरावेत.
माधव.. खुप छान पोस्ट.. पण
माधव.. खुप छान पोस्ट..

पण घरातील जेष्ठांबरोबरच मुले आणी स्रिया या सिरीअल्स ज्यास्ती प्रमाणात बघतात.. त्याचे दुष्परिणाम सर्वानाच माहिती आहेत.. आणी हे लोण फक्त शहरी भागातच नाही तर ग्रामीणभागातही खुप मोठ्ठ्या प्रमाणावर आहे.. दुर्दैवाने बर्याच घरामध्ये लोकाना करमणुकीची दुसरी स्वस्त साधने उपलब्ध नाहीत त्यामुळे याला टिव्ही बंद करणे हा पर्याय होउ शकत नाही.. सगळ्याच लोकाना याचे व्यसन लागले आहे..
इमेल करुन किंवा निषेध नोंदवुन या मालीकांवर फारसा फरक पडणार नाही हे मान्य पण काही जणानी जरी याची दखल घेतली तरी पुरेसे आहे..
आपण सर्व मराठी लोकाना रिप्रेझेंट करत नाही हे खरेच पण जे चुकीचे दाखवले जात आहे त्या गोष्टीला केवळ संख्याबळ कमी आहे म्हणुन विरोध करायचाच नाही का? या मालीकांचे मुलांवर होणारे परिणाम महत्वाचे नाहीत का?
हा सामाजीक किंवा ज्वलंत प्रष्ण नाही हे मान्य पण मुळात हा प्रष्ण तरी आहे का नाही??
या सिरीअल्स दाखवणे हा बर्याच जणांच्या रोजी रोटीचा भाग आहे हे मान्य पण याच धंद्यामध्ये काही दर्जा राखुन सामाजीक जाणीव ठेवुन जर निर्मीती केली तर ते चांगले नाही का? उदाहरणच द्यायचे झाले तर मालगुडी डेज किंवा व्योमकेश बक्षी, बोर्नव्हिटा क्वीझ या मालिकांचे देता येईल..
मुळात या मालिकांचा मुलांवर किती वाईट परिणाम होत आहे एवढे जरी सुजाण पालकांच्या लक्षात आले तरी खुप झाले.. आजकालची बहुतांश मुले,मैदानी खेळ सोडुन टिव्हीला चिकटलेली असतात.. आणी सगळ्यात महत्वाचे म्हणजे या मालिकांमधुन किंवा ओव्हर ऑल टिव्ही कार्यक्रमांमध्ये मुले जे काही पहातात त्या गोष्टीचे नकळत त्यांच्यावर संस्कार होत असतात.. मुलाना टिव्ही पासुन दुर ठेवणे बहुतांश घरात वेगवेगळ्या कारणांमुळे शक्य होत नाही. मग त्यानी काही दर्जेदार किंवा चांगले कार्यक्रम पहावेत ही अपेक्षा चुकीची आहे का?
एक उदाहरण म्हणुन सांगतो.. माझा नुकताच कॉलेज मध्ये जाणारा मुलगा आणी त्याचे सर्व मित्रमैत्रीणी व्ही टिव्हीवरची दिल दोस्ती डान्स नावाची मालिका न चुकता बघतात.. एक कॉलेज्,तिथे अभ्यास किंवा खेळ सोडुन फक्त प्रेमाचेच धडे दिले जातात, तिथले प्रोफेसर लोक मुलाना याबाबतीत मदत करतात वगैरे बकवास.. आता हे बघणारी मुले काय विचार करणार? त्यांचे कॉलेजविषयी काय समज होणार हे तो एक निर्माताच जाणे..
असल्या मालिका बनविणार्या
असल्या मालिका बनविणार्या सर्व लोकांना एवढी जबर शिक्षा केली पाहिजे की पुन्हा कोणी असल्या भंगार, भुक्कड मालिका काढण्याचा स्वप्नात सुद्धा विचार करू शकणार नाही.

माधव.. उत्तम पोस्ट आणि
माधव.. उत्तम पोस्ट
आणि स्वप्ना तुझ्या शेवटच्या पोस्टीला आता ३०० % अनुमोदन!! अगदी माझ्या मनातलं!! पण श्या.. मला ईतके नेटके लिहता येत नाही.
ओके मुळात ज्या मालिकेच्या
ओके
मुळात ज्या मालिकेच्या जाहिरातींवरून ही चर्चा सुरू झाली त्यातील एक जाहिरात इथे उदाहरणादाखल : एक मुलगी आपल्या आईला 'मुलगी शिकली प्रगती झाली' असं सांगत मुलींच्या शिक्षणाचं महत्त्व सांगतेय. यावर आई गंभीर होऊन प्रश्न विचारते, 'आणि सून शिकली तर?' त्यावर एक खाष्ट बाई दुष्ट चेहऱ्याने कर्कश्श आवाजात प्रश्न विचारते, 'मग घरातली कामं कोण करेल? मुलीचा ब्बाप?'
'टिव्ही बंद ठेवा' असं सांगणाऱ्यांनी कृपया लक्षात घ्या की एकत्र कुटंबात विविध वयोगटाच्या माणसांबरोबर राहताना हे अंमलात आणणं दरवेळी शक्य नसतं.
इथे मालिकांबद्दल लिहिणाऱ्या कोणाचाच त्या त्या मालिका बघणं हा फुल टाईम अजेंडा नाही. घरातील सगळ्यांपासून लांब दुसऱ्या खोलीत बसून पुस्तक वाचणं किंवा इतर काही करणं रोजच जमतं असं नाही.
बेफिकीर, हो, चुकीची तुलना आहे
बेफिकीर, हो, चुकीची तुलना आहे खरी. ती पोस्ट टाकल्यावर माझ्या लक्षात आलं. कारण ड्रग्जमुळे मानवी शरीराला काय अपाय होतो त्यावर टनावारी संशोधन उपलब्ध आहे. पण ह्या असल्या सिरियल्समुळे मनावर काय आणि किती खोलवर परिणाम होतो त्यावर संशोधन व्हायचं आहे अजून
>>चुकीचेही दाखवावेच लागते हे मत आपण स्वीकाराल की नाही हे माहीत नाही.
का बरं स्वीकारणार नाही? 'दुनियामे अंधेरा है इसी लिये उजालेकी कीमत है' वगैरे हिंदी ड्वायलॉग
पण १० सिरियल्समध्ये चुकीचं दाखवलं तर तेच बरोबर अशी काही लोकांची मनोधारणा होऊ शकते ना? सी आय डी, क्राईम पेट्रोल या सिरिअल्सची ह्या सिरियल्सशी तुलना चुकीची आहे. कारण ह्या क्राईम रिलेटेड सिरियलमध्ये हा गुन्हा आहे हे स्पष्ट असतं. आणि कितीही नाटकी पध्दतीने का होईना (उदा शिवाजी साटमने गुन्हेगाराच्या तोंडात मारणे आणि 'अब तुम्हे फासी होगी' असा आदेश स्वतःच देणे!) पण शेवटी गुन्हेगाराला शिक्षा झालली दाखवतात. पण ह्या ७ ते ९ च्या सिरियल्समध्ये फक्त चुकीच्या गोष्टी दाखवतात. त्यामुळे होणारं नुकसान एक तर दाखवत नाहीत किंवा इतक्या काळाने दाखवतात की मुळात त्या पात्रांनी काय चुकीचं केलं होतं हेच जनता विसरलेली असते.
एकच उदाहरण देते - कुंकूमध्ये नरसिंहाच्या जीवला धोका आहे म्हणून आणि जानकीच्या नशिबात अखंड सौभाग्य अहे म्हणून आत्याबाईंनी तिचं लग्न नरसिंहाशी ठरवलं. त्याला तिच्या वयाची एक मुलगी, अमृता, होती. जानकीचा एक मित्र तिच्यावर प्रेम करत होता आणि ह्या लग्नात आडवा येईल म्हणून नरसिंहने त्याला मारलं. आणि जानकीशी लग्न केलं. त्याची काय शिक्षा झाली त्याला माहित आहे? काही नाही. त्याने अमृताच्या नवर्याचा खून केला. काय शिक्षा? काही नाही. अहिल्याने परशूच्या बायकोचा खून केला. काय शिक्षा? काही नाही.
(No subject)
स्वप्ना - प्रचंड सहमत...पण
स्वप्ना - प्रचंड सहमत...पण बेफिकीर यांच्या अनेक मुद्यांशीही सहमत...
गावाकडचे अशिक्षित सोडाच माझ्या ओळखीच्या अनेक घरात किंवा खोटे कशाला बोला माझ्या घरातही या मालिका अत्यंत आवडीने पाहिल्या जातात...
त्यावर काही बोललो तर ही केवळ एन्टरटेनमेंट आहे इतकी गंभीरपणे त्यात काय चर्चा करायची असे उत्तर मिळते..आणि माझ्या भाबड्या मनाला अजूनही या अतर्क्य कथानकांमध्ये, चीड आणणार्या नाटकी संवादांमध्ये, खोट्या नात्यांमध्ये काय एन्टरटेनमेंट मिळते हे समजू शकलेले नाही.
इथे सर्व जण मालिका निर्मात्यांना अशा मालिका बनवण्यापासून परावृत्त करायचा प्रयत्न करत आहे..कुणी मला घरातल्या बायकांना (आज्जी, आई, बायको) यांना अशा मालिका पाहण्यापासून परावृत्त करू शकेन यासाठी काही उपाय सुचत आहेत का?
सॉरी फोक्स, पण मला ही
सॉरी फोक्स, पण मला ही एकप्रकारची डिक्टेटरशिप वाटते आहे. कपि सिब्बल यांचे फेबु व इतर साईटस् वर सेन्सॉरशिप लादण्याचे विधान व वरची चर्चा यात मला काहिही फरक वाटत नाही आहे. कदाचित मी समजून घेण्यात कमी पडत असेन. पण खर सांगायच तर मला वरची बरीचशी चर्चा ही दगडाने ठेचून मारण्याच्या प्रसंगासारखी वाटतेय.
ह्या मालिका बिनडोक वाटतात मलाही, पण मी त्या (खरतर टिव्हीच) न पहाण्याचा पर्याय स्वीकारलाय. पण हे वैयक्तिक आहे.
अशा मालिका पाहण्यापासून
अशा मालिका पाहण्यापासून परावृत्त करू शकेन यासाठी काही उपाय सुचत आहेत का?>>
)

मी गेले कित्येक महिने रोज या मालिका सहन करते, तुम्ही एक दिवस माझे ऐकलेच पाहिजे या भांडवलावर तुम्ही खालील उपाय योजना राबवू शकता.
१. आठवड्यातून १ संध्याकाळ टीव्ही बंद. (यासाठी कधी कधी रिमोट लपवून ठेवणे, टीव्हीची स्पीकर सिस्टीम ऑफ करणे असे अघोरी उपायही करावे लागतील. :फिदी:)
२. त्याच वेळात दुसर्या चॅनलवरचा एखादा चांगला कार्यक्रम लावणे व आता मला हा एपिसोड पूर्ण बघायचा आहे तुम्ही उद्या रिपीट टेलिकास्ट बघा असे सांगणे. तसेही, सहा महिने पाहिली नाहीत तरी काही फरक पडणार नाहीये त्या मालिकेत असा शेराही देणे. हा उपाय सरप्राईज टेस्टसारखा शक्य तितका रँडम ठेवणे.
३. एखाद दिवशी गप्पांच्या मस्त मूडमध्ये असताना ' संध्याकाळी टीव्हीवरच्या या मालिका सोडल्या तर मला काय करायला आवडेल?' या विषयावर त्यांच्याशी बोलणे. मग ते तुम्ही का करत नाही? असा प्रश्नही विचारायला विसरु नका.
४. त्याचवेळेत मुद्दाम स्वयंपाकघरात लुडबूड करुन सारखे प्रश्न विचारणे किंवा आपल्या नातेवाईंकांना फोन लावून यांना बोलायला बोलावणे. (तेवढीच त्याही घरात शांती
५. सब चॅनलवरचे कार्यक्रम खरोखर सगळ्यांनी एकत्र बसून बघता येणारे असतात. ते दाखवूनही तुलना करुन दाखवणे शक्य आहे.
एका विशिष्ट वयोगटासाठी, नात्यांसाठी हे उपाय अवघड असतील अशक्य नाहीत. मालिकात तथ्य नाही, भडकपणा आहे, अ आणि अ आहे तरी वेळ घालवायचा म्हणून बघणार्यात आपल्या घरातले येतात. त्यांचं लक्ष दुसरीकडे वळवायला हवं. हे एक व्यसन आहे. उद्या असल्या मालिकांआधी तंबाखूसारखी 'ही मालिका मनःशांतीस अपायकारक आहे' अशी स्टॅट्युटरी वार्निंग दिली तरी ते बघतील. ती वेळ महत्त्वाची असते, ती टळली की जिंकली.
हे काहीच करणे शक्य नसेल, तर स्वत: उठून दुसर्या खोलीत जाणे, खाली फिरायला जाणे, उद्याची तयारी करणे, मोबाईलवर विभा लावणे, पुस्तक किंवा मायबोली वाचणे हे उपाय आहेतच.
Pages