साडेसाती

Submitted by जागोमोहनप्यारे on 24 November, 2011 - 09:27

साडेसाती

अजून काय लिहायचं? हे नावच इतकं महान आहे.. Proud धार्मिक विभाग चाळत असताना लक्षात आले की इथे साडेसातीवर माहिती देणारा धागा नाही. म्हणून हा धागा उघडला. इथे साडेसातीबद्दल सगळी चर्चा असावी.

१. साडेसाती आणि शनी
२. साडेसातीची कारणे
३. या कालात काय होते?
४. साडेसातीवर उपाय व शनी उपासना कशी करावी?
५. इतर काही धर्मिक उपाय
६. आपले काही अनुभव, किस्से
७. सध्या साडेसाती कुठल्या राशीना आहे? अशा समदु:खी लोकानी काय करावे?
८. साडेसातीचे एकंदर जीवनावरील दूरगामी परिणाम.

असे आणि या विषयी असलेले इतर अनेक मुद्दे विचारात घेता येतील.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंदार_जोशी | 28 November, 2011 - 11:56 नवीन

>>ज्या दिवशी तिसरी गम्मत केलीत, त्या दिवशी सगळ्या फोटोसकट मायबोलीवर नवा धागा काढीन हे माझे वचन तुम्हा लोकांना!

बरं मग? ठेवा सेव्ह करुन. Or else shove it up where the sun doesn't shine!! Who cares? Who gives a damn?

<<

डेक्कन चा बस स्टॉप आठवतोय का?

वाल्याकोळ्याचे मन भक्तीने शुद्ध झाले होते त्यामुळे त्याचा वाल्मिकी झाला, पण पांडव सत्शील असले तरी अहंकारी होते (धर्मराज वगळता) त्यामूळे त्यांना नरकवास भोगावा लागला.
तुम्ही मनातुन अगदी अंतरात्म्यापासुन शुद्ध, सात्विक, प्रामाणिक असाल तर आणि तरच तुम्हाला खरी आत्मज्ञानप्राप्ती (ईश्वरप्राप्ती) होऊ शकते. अधिक माहिती साठी "उपासना" या धाग्यावर जाऊन पहावे.

>>हॉस्पिटलमधे न जाता भजन, इ. करावे
लॉजिकल कर्म सोडून मुर्खपणा करावा असे मी कुठेच म्हणलेले नाही. हॉस्पिटलमधे देखील अनेक असाध्या दुर्धर रोगांवर इलाज चालू असुन देखील लोक दगावतात. किंवा अनेकवेळा डॉक्टर स्वतःच सांगतात की आता आमच्या हातात काही नाही. असो, बहुतेक हे सर्व या जन्मात समजणे / समजावून घेणे तुमच्या नशिबात नसावे. Sad

>>हॉस्पिटलमधे न जाता भजन, इ. करावे
लॉजिकल कर्म सोडून मुर्खपणा करावा असे मी कुठेच म्हणलेले नाही. हॉस्पिटलमधे देखील अनेक असाध्या दुर्धर रोगांवर इलाज चालू असुन देखील लोक दगावतात. किंवा अनेकवेळा डॉक्टर स्वतःच सांगतात की आता आमच्या हातात काही नाही. असो, बहुतेक हे सर्व या जन्मात समजणे / समजावून घेणे तुमच्या नशिबात नसावे. अरेरे

<<

म्हणजे ते असाध्य अन दुर्धर रोग त्या रोग्याला त्याच्या कर्मामुळेच होतात. हो कि नै? आईला एड्स होता म्हणुन बाळाला झाला. ते त्या बाळाचे मागल्या जन्मीचे कर्म!
हो ना?
अन आईला झाला कारण तिचे या जन्मीचे कर्म?
मग मरू द्यायचे ना त्याला अन त्याच्या आईलाही? सिंपल कर्माची फळं भोगतो आहे तो??

तुमचे नशीब, कर्म अन विद्वत्ता समजली, महेशजी.

हे मलाही न उलगडलेले कोडे आहे.. जर आपल्या कर्मातून फळे निर्माण होतात आणि फल अखेर शून्य करणे हाच मोक्ष तर मोक्षाची कामना करणारे जन्मल्यावर लगेच मरत का नाहीत ? आयुष्यभर कर्मे करा, भोग भोगा.. पुन्हा कर्मे .. यातून मोक्ष मिळणार कसा?

@इब्लिस : कोणत्याही गोष्टीसाठी प्रामाणिक प्रयत्न करू नयेत असे मी किंवा कोणीच म्हणलेले नाहीये. उदा. आजारी पडलात तर योग्य उपचार घेणे. विद्यार्थी दशेत योग्य अभ्यास करणे. नोकरी/धंदा जे काही असेल त्यात योग्य मार्गाने प्रगती करणे, इ. पण प्रयत्नांचे फळ अमुकच मिळेल असे मी/तुम्ही/कोणीच सांगु शकत नाही. (no one can predict end result) त्यामुळे दु:खी न होता मिळालेले फळ/रिझल्ट आपल्या नशिबाप्रमाणे आहे हे समजावून घ्यावे. तसेच नशिब हे आपण करत असलेल्या ईच्छा/आकांक्षा आणि कर्माने बनते.

असो, माझ्याकडे फार नसलेले ज्ञान पाजळणे थांबवून बाफच्या मुळ विषयाकडे गाडी नेऊयात.
कन्या राशीला अजुन २ वर्षे साडेसाती शिल्लक आहे ना ?
एकाच साडेसातीत किती वाईट फळे मिळू शकतात ? तसेच एकाच प्रकारची घटना दोनवेळा घडू शकते का ? उदा. एकाच परिक्षेत दोन वेळा नापास होणे, दोनदा नोकरी जाणे, जवळच्या दोन व्यक्तींचा अपघात/मृत्यू होणे, इ.

काच साडेसातीत किती वाईट फळे मिळू शकतात ? तसेच एकाच प्रकारची घटना दोनवेळा घडू शकते का ? उदा. एकाच परिक्षेत दोन वेळा नापास होणे, दोनदा नोकरी जाणे, जवळच्या दोन व्यक्तींचा अपघात/मृत्यू होणे, इ.>> ते तर आहेच पण माबो अ‍ॅक्सेस पण दिवसातून दोनदा जाऊ शकतो. मला त्याचीच भीती वाट्ते.

> (no one can predict end result)

बरोबर. "no one" being the keywords.

> त्यामुळे दु:खी न होता मिळालेले फळ/रिझल्ट आपल्या नशिबाप्रमाणे आहे हे समजावून घ्यावे. तसेच नशिब हे आपण करत असलेल्या ईच्छा/आकांक्षा आणि कर्माने बनते.

चूक - इतके जास्त पॅरॅमिटर्स असतात की काही लोकांचे योग्य प्रयत्नही फसणार. पण ते पॅरॅमिटर्स म्हणजे कर्म म्हणणे म्हणजे आपल्याला समजत नाही म्हणुन त्याला (ती) एक शक्ती आहे असे म्हणण्यासारखेच आहे. नूसते नाव दिल्याने काही होत नाही.

धार्मिक विधी, स्तोत्र म्हटल्याने इच्छापूर्ती होते असे म्हणतात. इच्चा चांगली की वाइट हे देव ठरवत नाही का?

तेच तेच लोक, तीच तीच मते, तीच तीच चर्चा आणि तोच तोच निष्कर्ष.. नथिंग Happy

इथल्या चर्चेत थोडा विरंगुळा:

एकदा एका गावात पुर येणार होता.. त्याबद्दल सगळी माहिती त्या गावातल्याना देण्यात आली होती. घर सोडुन देण्याबाबतच्या सुचनाही देण्यात आल्या होत्या. तरीही एक मनुष्य घर सोडायला तयार नव्हता.माझा देव माझे रक्षण करेल असे तो म्हणत होता. पुराचे पाणी वाढायला सुरुवात झाली. आजुबाजुच्या घरातली माणसे घर सोडुन सुरक्षित स्थळी गेली..तरीही हा माणुस घर सोडायला तयार नव्हता. नंतर पोलिस आणि मदत समितीची माणसे येउन घरे चेक करु लागली त्यानी हर तर्‍हेने त्याला सांगितले तरी तो घर सोडायला तयार नव्हता.. पाणी आणखी वाढले.. पहिल्या मजल्या पर्यंत पाणी चढले, नंतर बोटी सोडल्या गेल्या त्याला बोटीतुन यायला सांगितले तरीही त्याने नकार दिला.."माझा देव माझी मदत करेल" हेच एक तो धरुन बसला होता.. नंतर पाणी आणखी वाढले..तो छतावर जाउन बसला..काही वेळाने मदतीसाठी हेलिकॉप्टर्स आली..त्याला घ्यायला त्यालाही त्याने नकार दिला.. शेवटी पुराचे पाणी आणखी वाढले आणि तो मरण पावला.

पुढे तो स्वर्गात गेला आणि देवाला भेटुन म्हणाला
"माझा तुझ्यावर इतका विश्वास होता मग तु माझी मदत करायला का आला नाहीस?"
त्यावर देव म्हणाला..
"अरे पण मी पाठवली होती की..ती पुराची पत्रके, त्या मदत समितीतले लोक, बोटी, हेलिकॉप्टर्स........"

--------------------------------------------------------------------------------------------------------------

दोन मित्र होते..अनिल आणि सुनिल..
त्यातला अनिल पापभिरु, आस्तिक होता..आणि सुनिल नास्तिक..पापपुण्याची तमा न बाळगणारा असा होता.
एके दिवशी दोघे रस्त्याने जात असताना अनिल एका दगडाला ठेच लागुन पडला आणि त्याच्या डोक्याला जखम झाली. त्यावर सुनिल हसायला लागला. काय तुझा देव, तुझ्या मदतीला नाही आला? मग ते पुढे चालु लागले..रस्त्याच्या कडेला काहीतरी पडलेले त्याला दिसले..जवळ जाउन पाहतो तर एक ५०० ची नोट होती.
त्यावर तो अनिलला म्हणाला "बघ सत्कर्म बिर्म सगळे झुठ आहे.. मी बघ..मला काही पर्वा नाही कशाची आणि माझा बघ फायदा झाला आणि तु देव देव करतोस ते देवाने तुला पाडले की नाही?"
पुढे त्या रस्त्याने जाताना एका ज्योतिषाचे घर होते..सुनिल म्हणाला चल बघुया हा ज्योतिषी काय म्हणतो..
ज्योतिषाने दोघांचा हात पाहिला आणि अनिलला म्हणाला "आज तुमचा अतिशय भाग्याचा दिवस आहे, तुम्हाला काही लाभ झालेला दिसतो". आणी सुनिलला म्हणाला "अरेरे तुमचे आज प्रचंड नुकसान झालेले दिसतेय".
हे ऐकुन सुनिल हसुन हसुन गडाबडा लोळायला लागला म्हणाला "अहो महाराज आज हा रस्त्यात पडला आणि डोक्याला जखम झाली, रक्त गेले आणि मला ५०० रु. मिळाले. काय ज्योतिष सांगता तुम्ही?"
त्यावर ज्योतिषी अनिलला म्हणाला" आज तुमचा म्रुत्युयोग होता पण तुमच्या फक्त डोक्याला थोडी जखम झाली म्हणुन मी तुमचा भाग्याचा दिवस असे म्हटले"
त्यावर सुनिलकडे वळुन म्हणाला "आज खरेतर तुमच्या भाग्यात ५,००,०००रु. मिळण्याचा योग होता पण तुम्हाली ५००च मिळालेले दिसतात"
--------------------------------------------------------------------------------------------------------------

A knowledge of the existence of something we cannot penetrate, of the manifestations of the profoundest reason and the most radiant beauty - it is this knowledge and this emotion that constitute the truly religious attitude; in this sense, and in this alone, I am a deeply religious man. (Albert Einstein)
--------------------------------------------------------------------------------------------------------------

सूर्यपुत्रो दीर्घदेहो विशालाक्षः शिवप्रियः||
मंदचारः प्रसन्नात्मा पीडाम हरतु मे शनि:||

ज्योतिषीच तो.. तो असलेच काहीतरी युक्तीवाद करणार. Happy .. त्यामुळे ज्योतिष्याचा नाद न धरता आपले आयुष्य आनंदात जगावे. मिळालेल्या पैशाचा व कालाचा, आयुष्याचा सदुपयोग करावा . Happy

तेच तेच लोक, तीच तीच मते, तीच तीच चर्चा आणि तोच तोच निष्कर्ष.. नथिंग

त्याच राशी आणि तेच ग्रह.. Proud

एक माणुस खुप गरीब असतो. तो मोठा शिवभक्त असतो.

एकदा पार्वती शंकराला म्हणते की हा माणुस तुमचा एवढा भक्त आहे तर तो गरीब का ? तुम्ही त्याची सांपत्तिक स्थिती सुधारण्यासाठी काही करत का नाही ? शंकरांनी पार्वतीला सांगितले की त्याच्या नशिबात असे आहे. त्यात मीदेखील काही बदल करू शकत नाही.

तरीही पार्वतीने हट्ट चालू ठेवला, त्यावर भगवान म्हणाले ठिक आहे तुझी ईच्छा आहे तर प्रयत्न करून पहातो.
हा माणुस रोज ज्या देवळात जात असे त्याच्या जाण्यायेण्याच्या रस्त्यावर शंकराने हिरेमाणकांनी भरलेली थैली ठेवली.

हा नेहेमी प्रमाणे दर्शन घेऊन बाहेर आला. पहातो तर अनेक भिकारी होते, त्यात काही अपंगदेखील होते.
या माणसाने विचार केला की मी गरीब आहे पण अपंग तर नाही. माझ्या दु:खापेक्षा यांचे दु:ख केवढे असेल ?
आज अंध माणसाचे दु:ख कसे असते ते अनुभवून पाहू असा विचार करून हा डोळे मिटून घरी निघून गेला.

भगवंताने पार्वतीला सांगितले बघ नशिबात जे आहे ते घडतेच घडते त्यासाठी काहीना काही तरी करून तशी परिस्थिती निर्माण होते.

तेच तेच लोक, तीच तीच मते, तीच तीच चर्चा आणि तोच तोच निष्कर्ष.. नथिंग

त्याच कथा, तेच बोध

त्याच राशी आणि तेच ग्रह..

सध्या तुमचा ग्रह कुणाच्या राशीला आहे म्हणे? Proud

ज्योतिषीच तो.. तो असलेच काहीतरी युक्तीवाद करणार. स्मित .. त्यामुळे ज्योतिष्याचा नाद न धरता आपले आयुष्य आनंदात जगावे. मिळालेल्या पैशाचा व कालाचा, आयुष्याचा सदुपयोग करावा . +1

मुसल मान, ख्रिस्चन, जुय. बौद्ध, जैन,पारशी....याना कुठे साडेसाती असते? धर्म बदलून बघा Proud

Proud

मुसल मान, ख्रिस्चन, जुय. बौद्ध, जैन,पारशी....याना कुठे साडेसाती असते? धर्म बदलून बघा
>>>>>>

साडेसाती म्हणजे "ज्योतीष शास्त्रा" तिल एक आडाखा. ज्योतिष हे शास्त्र आहे. मग माणुस कोणीही असो, कोणत्याही धर्माचा असो. शास्त्र हे आपल्या जागीच रहाणार. ह्यात धर्माचा काय संबंध?

प्रख्यात ज्योतीषी वसुधा वाघ ह्यांचे पुस्तक "सारे प्रवासी घडीचे" वाचा. ह्यात त्यांचे मुख्य क्लायंट नवल टाटा आहेत. तसेच अनेक परदेशी माणसे त्यांचा सल्ला घेत.

डॉ.भा. नी. पुरंदरे ( पुस्तक "शल्य कौशल्य") स्वतः फार छान पत्रिका पहायचे. त्या पुस्तकात त्यांनी पत्रिकेवरुन धोका कळुन एका मुसलमान बाई व तिच्या बाळाचे प्राण वाचवले.

> मुसल मान, ख्रिस्चन, जुय. बौद्ध, जैन,पारशी....याना कुठे साडेसाती असते? धर्म बदलून बघा

हा युक्तीवाद सुचला नव्हता! लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद.

तशी ती आस्तिकांनाही नसते. आपल्या सौर्यमालेबहेरील प्राण्यांना तर नाहीच (हे बहुदा शनिभक्तही कबुल करतील).

इथेच मागे एक पोस्ट्मधे कोणितरी लिहिले होते की जन्म म्रुत्यु आपल्या हातात नसतो. गेल्या महिन्यामधे मी एक शिबिराला गेलो होतो. मन्।शक्ति च्या. तिथे त्यान्नी सान्गितले आणि जे पटले ते हे की प्रत्येक जण आप-आपल्या ईछेप्रमाणे आणि कर्माप्रमाणे जन्म घेत असतो.

आणि एक सिह वाल्यान्चि साडेसाती आत्ता सम्पलि आहे अस नाही. पुढच्या वर्षी शनि वक्रि होउन पुन्हा कन्येमधे येणार आहे. तेव्हा साडेसातिचीच फळे देणार आहे. रेफ. - http://dhondopant.blogspot.com/

>>आणि एक सिह वाल्यान्चि साडेसाती आत्ता सम्पलि आहे अस नाही. पुढच्या वर्षी शनि वक्रि होउन पुन्हा कन्येमधे येणार आहे. तेव्हा साडेसातिचीच फळे देणार आहे.
फळे देणार आहे कोणाला सिंहला की कन्येला ?

सिंह

नरेन्द्र मोदींची साडेसाती संपली

मोदींच्या विरोधात पुरावे नाहीत
- सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, April 11, 2012 AT 12:15 AM (IST)
Tags: snn, gujarat riot, narendra modi
अहमदाबाद - गुजरातमधील 2002 च्या दंगलींप्रकरणी झाकिया जाफ्री यांनी दाखल केलेल्या तक्रारीबाबत मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह इतर 58 जणांविरोधात सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या विशेष चौकशी समितीला (एसआयटी) कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत, असा खुलासा महानगर दंडाधिकाऱ्यांनी आज केला.

झाकिया यांना तीस दिवसांच्या आत सर्व कागदपत्रे तसेच "एसआयटी'च्या अहवालाची प्रत देण्यात यावी, असा आदेशही न्यायालयाने दिला. झाकिया यांच्या तक्रारीत उल्लेख करण्यात आलेल्या 58 जणांविरोधात कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. तसेच, तपास संस्थेने तसा अहवाल दिला असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आणि नैसर्गिक न्यायाच्या आधारे याचिकाकर्त्या झाकिया यांना संबंधित अहवालाची प्रत व त्यासंबंधीची कागदपत्रे देण्यात यावीत, असा निर्णय न्यायमूर्ती एम. एस भट्ट यांनी दिला. अहवालाची मागणी करण्यासाठी झाकिया यांनी अगोदरच याचिका दाखल केली असल्याने त्यांना नोटीस बजावण्याची आवश्‍यकता नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. गुलबर्ग सोसायटीतील दंगलीत झाकिया यांचे पती व कॉंग्रेसचे माजी खासदार एहसान जाफ्री यांच्यासह 68 जणांचा बळी गेला होता. त्यानंतर झाकिया यांनी नरेंद्र मोदींसह त्यांच्या तत्कालीन मंत्रिमंडळातील काही मंत्री, पोलिस अधिकारी आणि काही भाजप नेत्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. 2002 च्या दंगली या कट-कारस्थान रचून नियोजनबद्धपणे घडविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. सर्वोच्च न्यायालयाने दंगलींच्या चौकशीसाठी आर. के. राघवन यांच्या नेतृत्वाखाली "एसआयटी'ची स्थापना केली होती.

लढा सुरूच ठेवणार ः झाकिया जाफ्री
""एसआयटीने प्रकरण बंद करण्याचा निर्णय वेदनादायक आहे. यापुढेही न्यायासाठी मी लढा सुरूच ठेवीन,'' अशी प्रतिक्रिया झाकिया जाफ्री यांनी व्यक्त केली आहे. देवाच्या न्यायालयात मला न्याय मिळेल. सत्य बाहेर येईल याची मला खात्री आहे, असे सांगून त्या म्हणाल्या, ""पुढचा मार्ग खडतर असेल, मात्र न्यायालयावर माझा विश्‍वास आहे.''

Pages