Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
साडेसाती

Hitguj » Views and Comments » General » साडेसाती « Previous Next »

Bee
Wednesday, July 11, 2007 - 4:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साडेसातीबद्दल मी अगदी लहानपणापासून ऐकतो आहे. साडेसाती ही नेहमी वाईटच असते का? आजवर मी साडेसातीच्या ज्याही काही गप्पा ऐकल्या आहेत त्यावरून साडेसाती हे नाव ऐकले की अंगावर भितिने काटा उभा राहतो. ह्या काळात ज्यांच्यासोबत वाईट घटना घडल्यात त्या खरच त्या व्यक्तीच्या जीवनाचे नुकसान करणार्‍यातल्या होत्या. त्यामुळे साडेसाती हा प्रकार अंधश्रद्धा आहे असे म्हणनेही चुकीचे वाटते.

साडेसातीमधे मनुष्याने महत्त्वाची कामे करू नये, ती फ़सतात असे अनेकांनी मला सांगितले. तग धरावी, शनीदेवाची नित्यनेमाने पुजा करावी. काळे उडीद शनवारी शनीला अर्पण करावे, मारोतीच्या देवळात जावून दिव्यात तेल घालावे. रुईची माळ चढवावी. असे अनेक काही मी ऐकले आहे.. बरेच जण हे नियम पाळताना बघितले आहे.

वयाच्या ३०व्या वर्षी, साडेसाती लागली आहे असे कळले. मग ३८ वय होईपर्यंत लग्न करायचे नाही. केलेच तर खूप जपावे लागेल. असे अनेक सल्ले मिळाले. लग्न ही अर्थातच जीवनातली महत्त्वाची बाब आहे, त्याला एक योग्य वय लागतं, साडेसातीपायी इतकी वर्ष वाट बघून जरा जास्तच वाटते आहे. भविष्याचे केवढे मोठे नुकसान ना हे.. :-(


Chyayla
Wednesday, July 11, 2007 - 6:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, खरे तर साडेसाती बद्दल उगाच घाबरवुन देण्यात येते की साडेसाती मधे शनीची अवकृपा होते व सगळ काही वाईटच होते. जर नीट विचार केला तर शनी सारखा प्रेमळ ग्रह नाही, खरच आश्चर्य वाटत ना? शनीमुळे आपल्याला मानसिक त्रास खुप होतो, एखादे कार्य हाती घ्या आणी नेमका त्यात तुम्हाला पदोपदी कमालीचा संघर्ष करावा लागतो पुष्कळदा त्यात अपयश येते. किन्वा फ़ार उशीरा फ़ळ मिळते. कारण शनी हा वृद्ध आहे व प्रत्येक गोष्टीचे फ़ळ देण्यास विलम्बकारक असतो. पण फ़ळ देतो हे निश्चित.

तरी शनी महाराजांच ते जातकावरील प्रेमच असते त्यामागे हीतच असत. फ़क्त तो जीवनाची कठोरता, काटे जाणवुन देतो जेणेकरुन जातक जीवनात येणार्या कठीण प्रसंगाना धैर्याने तोंड द्यायला शिकला पाहिजे ही त्यामागची भावना असते. जर त्याला सगळ कमी प्रयत्नात सहज मीळत गेले तर त्यात गर्व वाढु शकतो आणी मग मागुन अनेक संकटे येउ शकतात.

विश्वास ठेव साडेसाती जशी संपायला येते तेंव्हा ती फ़ारच मोठा फ़ायदा करुन जाते. अगदी जी कामे ईतक्या वर्शात झाली नाही ती मोठी कामे सहज होतात आणी ईतकच नव्हे तर आंधळा मागतो १ डोळा आणी देव देतो २ किंवा "छप्पर फ़ाडकेच" देतो. हा हमखास अनुभव आहे, मी स्वता:चा व कित्येकांचे अनुभव पडताळुन पाहिला आहे.

हे बघ मारोतीची किंवा शनी देवाची उपासना यासाठी सांगितली की कठीण प्रसंग येतीलच त्याला टाळु शकत नाही पण उपासनेमुळे मनाला ते सहन करण्याचे सामर्थ्य देत एवढच. त्यामुळे साडेसातीला घाबरु नकोस आणी त्यातल्या त्यात लग्नासारख्या गोष्टी जीथे साडे सात वर्ष थाम्बावे लागणार म्हणतो त्याची अजीबात गरज नाही. लग्न सारख्या प्रसंगात अर्थातच दोघांची पण पत्रिकेचा विचार करावा त्यात एकाला असेल आणी दुसर्याला नसेल तर सहसा काही भीती बाळगावी असा त्रास होत नाही झाला तरी तो पुढे नक्कीच निस्तरल्या जातो.



Aschig
Wednesday, July 11, 2007 - 8:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, तो शनी बिचारा आपल्या सुर्याभोवतीच्या orbit मध्ये कधीपासुन फिरफिर फिरतो आहे. गेल्या काही हजार वर्षांमध्ये मानवाला इतके शिंग फुटले की त्याने बिचार्या शनीच्या मागे साडेसाती लावुन दिली. शनि म्हणे सध्या मानव जातीला नष्ट करण्याकरता तप करतो आहे. त्याने म्हणुनच इतक्या जास्त अंगठ्या ( rings ) परीधान केल्या आहेत.

Antara
Wednesday, July 11, 2007 - 11:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साडेसाती ही एक अन्ध्श्रधा, एक थोतांड आहे. त्यावर विश्वास ठेवणे दुर्बलतेचे लक्षण! त्यामुले त्रास होतो वगैरे सगळा भम्पक पणा. स्वत्:च्या अपयशाचे, चुकिचे खापर फ़ोडायला निर्जिव ग्रह तारे पन चालतात माणसाला. }

Moderator_7
Thursday, July 12, 2007 - 10:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोकहो, विषयाला धरुन लिहा.

बी, ज्या विभागात नवीन बीबी उघडायला परवानगी नाही तेथे बीबी उघडायला मॉडरेटर्स ना विनंती करु शकता. त्या ऐवजी दुसर्‍या विभागात बीबी उघडणे योग्य वाटत नाही.


Mandarp
Thursday, July 12, 2007 - 10:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला,
तुम्ही म्हणता ते १००% खरे आहे.
मला सुद्धा हाच अनुभव आल. साडेसाती संपत असताना सगळी राहीलेली कामे आरामात झाली.
लग्न सुद्धा झाले.
त्या दयाळू परमेश्वराने अगदी "छप्पर फाडके" दिले.
पण त्याच बरोबर हे ही सान्गीतले पाहीजे की ज्यान्च्या पत्रिकेत मुळात कुयोग असतात त्यांना साडेसातीत खुप त्रास होतो. होत्याचे नव्हते होउन जाते, आणी त्याचा आयुष्यभर त्याचा त्रास होतो.

मन्दार


Karadkar
Thursday, July 12, 2007 - 10:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ignorance is a bliss Mod_7 ....

Aschig
Friday, July 13, 2007 - 5:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंदार, राहिलेल्या कामांमध्ये लग्नाला टाकले तुम्ही. hopefully तुमची बायको य BB वर फिरकत नाही.

mod_7 साडे-साती आणी बुध्धी नाती असे त्याचे झाले असावे. असे खापर कुठेतरी फोडता आले की मनाला कसे शांत वाटते. (लग्नाबद्दल जरी हे लागु असावे तरी वरिल वाक्य मंदारच्या BB करण्याला उद्देशीलेले नसुन B च्या BB उघडण्याला आहे.)


Bee
Monday, July 16, 2007 - 8:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आशिष, इथे लग्न हे फ़क्त एक उदाहरण झाले. हेच उदाहरण घेऊन साडेसातीवर बोला असे मी म्हंटले नाही. लोकांचे ह्या विषयावरचे अनुभव, ह्यात खरे किती खोटे किती, हे जाणून घ्यायचे होते म्हणून हा बीबी उघडला आहे. "मंदारच्या बीबी करण्याचा.. बुध्धी नाती" हे तुम्ही काय म्हणताहात मुळीच कळले नाही.

Aschig
Monday, July 16, 2007 - 3:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साडे-साती बद्दल मला seriously जे म्हणायचे आहे ते पहिल्या post मध्ये म्हंटले आहे. त्या फालतु गोष्टींवर आज देखिल लोक विश्वास ठेवतात याचे मला खेदमिश्रीत आश्चर्य वाटते.

नंतरच्या comments jokingly केल्या होत्या. होतकरु लोक त्या मधील लग्नाबद्दलचा भाग seriously घेतील अशी आशा आहे.


Maudee
Thursday, August 02, 2007 - 11:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, मी असे ऐकले आहे की साडे सातीतली दोन अडीचकी चांगली जातात आणि १ वाईट जाते.

शरद उपाध्ये(राशीचक्र फ़ेम) यानी साडेसाती बद्दल छान सांगितले आहे. त्यांच म्हणणं आहे की साडेसातीमध्ये जी संकट आपल्या वर येतात त्यात आपल्याला कोण कोण साथ देते त्यावरून आप्ल्याला ख़रच आपली माणसं कोण ते कळते म्हणजे साडेसाती एका दृष्टीने चांगलीच असते.
अर्थात यावर विश्वास ठेवण्यावर आहे:-)


Ami79
Wednesday, September 05, 2007 - 7:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी साडेसाती खुप जवळून अनुभवली आहे. माझा त्यावर विश्वास आहे. माझ्या आई वडिलांना एकाच वेळी साडेसाती सुरू होती.... पाच वर्ष. ती पाच वर्ष अतिशय खडतर गेली. आमची लहान सहान कामे सुद्धा नीट होत नसत. पैशाचे नुकसान, मनस्ताप तर ठरलेलाच

Zakki
Wednesday, September 05, 2007 - 12:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१९८७ चे शेवटचे सहा महिने ते १९८९ डिसेंबर हे दिवस मला कमालीच्या बाहेर वाईट गेले. त्या दिवसात आत्महत्येचे विचार दररोज मनात येत असत. मी कधी खोटे खोटे सुद्धा हसल्याचे आठवत नाही. मला नक्की माहिती नाही, पण ती कदाचित् साडे साती ची वाईट अडीच वर्षे असावीत.

पण माझी जन्मवेळ, दिवस नक्की नाही, रास नक्की माहित नाही. नि आता काही फरक पडत नाही. मला माझा आनंद केवळ नामस्मरणामुळे होतो नि मी आजकाल काय होईल याची काळजी करत नाही.

म्हणून तर मी इथे वाट्टेल ते लिहितो, नि मग कुणाला ते आवडत नाही नि ते रागावतात.

हटकेश्वर, हटकेश्वर.


Mansmi18
Wednesday, September 05, 2007 - 2:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साडेसातीसाठी उपाय म्हणुन पुढील मंत्र म्हणतात

सूर्यपुत्रो दीर्घदेहो विशालाक्ष: शिवप्रिय:
मंदचार्: प्रसन्नात्मा पीडाम हरतु मे शनी:



मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती







Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators