साडेसाती

Submitted by जागोमोहनप्यारे on 24 November, 2011 - 09:27

साडेसाती

अजून काय लिहायचं? हे नावच इतकं महान आहे.. Proud धार्मिक विभाग चाळत असताना लक्षात आले की इथे साडेसातीवर माहिती देणारा धागा नाही. म्हणून हा धागा उघडला. इथे साडेसातीबद्दल सगळी चर्चा असावी.

१. साडेसाती आणि शनी
२. साडेसातीची कारणे
३. या कालात काय होते?
४. साडेसातीवर उपाय व शनी उपासना कशी करावी?
५. इतर काही धर्मिक उपाय
६. आपले काही अनुभव, किस्से
७. सध्या साडेसाती कुठल्या राशीना आहे? अशा समदु:खी लोकानी काय करावे?
८. साडेसातीचे एकंदर जीवनावरील दूरगामी परिणाम.

असे आणि या विषयी असलेले इतर अनेक मुद्दे विचारात घेता येतील.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शनिमहात्म्यात इतर ग्रहांच्यापण जाती दिल्या आहेत. उदा: राहू-केतू मातंग जातीचे
माझ्यामते या जाती त्या त्या ग्रहाच्या कारकत्वाशी संबंधित असाव्यात.

ब्राम्हणभोजन, दान हे तर सर्वच ग्रंथात लिहीले आहे.

हे का म्हणे...जर शनिदेव तेली असतील तर ब्राम्हण तृप्त झाल्याने ते का संतोष पावावेत
>>
मागे लिंबूटींबू यांनी कुठेतरी लिहिल्याचे आठवते की पूर्वीच्या काळी ब्राम्हणांकडे उत्पन्नासाठी विशिष्ट असा व्यवसाय नव्हता, त्यामुळे त्यांना भोजन द्यावे अशी प्रथा पडली असावी. कालांतराने स्वार्थी ब्राम्हणांनी ते सगळीकडे घुसडले असावे.

असो. असे नुसते तर्क करत बसण्याने काही उपयोग होत नाही. भारतीय तत्वज्ञानात 'विवेक' हा फार मोठा गुण सांगितला आहे. तो वापरून तुम्ही आजच्या काळाला साजेशी प्रथा सुरू करू शकता. सध्या जात आणि व्यवसायाचा काही संबंध राहिलेला नाही. त्यामुळे ज्या लोकांना दोन वेळच्या खाण्याची वानवा आहे, किंवा ज्यांना अगदीच जाडेभरडे अन्न खावे लागते, त्यांना चांगले जेवण देऊन तुम्ही तृप्त करू शकता. अशाने श्रद्धाही डळमळीत होत नाही आणि समाधान पण मिळते.

अश्विनीमामी | 25 November, 2011 - 05:56 म्हणतात.
५) आपली औकात/ पत काय आहे ते नक्की कळले. माझा स्वभाव अहंकारी आजिबातच नाही. जुळवून घेण्याचा आहे. पण तरीही स्वभावात एक प्रकारचे ह्युमिलिटी व हंबलनेस आला. परिस्थिती किती वाइट असू शकली असती व ती तशी नसण्यात आपले कर्तुत्व काय याचा विचार नीट केला. लोकांची किंमत कळली.

ह्यावरून जे आठवलं ते लिहितोय. मला वाटते अहंकार आणि शनि महाराज असा काहीसा तो विषय होता. प्रमुख प्रतिपादनाचा मुद्दा होता, "जे आपल्या हक्काचे नाही ते आपले आहे असे समजणे हा मोठा दोष मानवात असतो व हा दोष घालवणे हे शनिमहाराजांचे कार्य आहे." यालाच फुगलेला अहंकार असा शब्द तेव्हा वापरला गेल्याचे आठवते.

त्यासाठीचे स्पष्टिकरण असे दिलेले होते की,

साधारणतः माणसाची स्वतःची एक प्रतिमा त्याने स्वतःच बनविलेली असते व बर्‍याच वेळेस ती थोडीफार तरी भ्रामक असते. उदा.

एखादी व्यक्ती चांगली असते, खरे बोलणारी असते. सहसा ती इतरांना दुखवत नाही त्यामुळे इतरांची आवडती असते. उच्च शिक्षण व त्या आधारे मिळणारी चांगली नोकरी व त्यामुळे आलेली सुबत्ता ह्या आणखी जमेच्या बाजू असू शकतात. अशा व्यक्तीचे आपण चांगले आहोत असे मत असते व इतरांचेही तसेच मत असते. जर अशा व्यक्तिला सौंदर्यही लाभले तर ही प्रक्रिया आणखी गतीमान होते. स्त्रियांच्या बाबतीत तर ही गती अनेकपटीने वाढते कारण स्त्रीचे सौंदर्य ही स्त्रीची शक्ति असते. आपल्या प्रतिमेला तडा जाऊ नये यासाठी अशी व्यक्ती पुढेही चांगली वागत राहाते. इतपर्यंत सगळे ठीक असते. पण अशी व्यक्ती ह्या आपल्या चांगुलपणाचे सर्व श्रेय स्वतःकडे नकळत घेऊ लागते. ही सर्व प्रक्रिया हळूहळू होत असल्याने त्या व्यक्तिच्या हे लक्षातही येऊ शकत नाही. इतकेच नव्हे तर हा चांगुलपणा ज्यांच्याकडे नाही त्यांच्याकडे अशी व्यक्ति दोषेकदृष्टीने पाहाते.

खरे म्हणजे अशी व्यक्ती चांगली निपजते कारण त्या व्यक्तिला मिळालेले चांगले आई-वडिल, चांगले शेजारी-पाजारी, चांगले मित्र, चांगल्या शैक्षणिक सुविधा वगैरे वगैरे. या सर्व गोष्टींना जर आवश्यक ते श्रेय प्रत्येक वेळेस दिले गेले तर अशा व्यक्तिला आपण चांगले आहोत असे नक्की वाटेल पण त्याचा गर्व होणार नाही.

हेच आणखी स्पष्ट व्हावे म्हणून असे म्हटले होते की, अशी व्यक्ती जर झोपडपट्टीत जन्माला आली असती, वडिल दारूडे, आईच्या तोंडात शिव्या, भाऊ जुगारी व सवंगड्यात शाळेत जाणारे कोणीही नाही. अशी सर्व परिस्थिती असताना देखील जर अशी व्यक्ती चांगली निपजली असती तर मात्र ती व्यक्ती चांगली असण्याचे सर्व श्रेय त्या व्यक्तीकडेच गेले असते.

थोडक्यात, हे जे जास्तीचे श्रेय ती व्यक्ति तिच्या नकळत स्वतःकडे घेते ते त्या व्यक्तिकडून काढून घेणे हे शनिदेवांचे काम आहे.

पुढे असेही म्हटले होते की, ज्याचे श्रेय आहे ते त्यालाच देणे म्हणजे कृतद्यता होय. कृतद्यता ही नम्रता वाढवते. नम्रता ही अहंकार कमी करते. व ज्याचा अहंकार कमी त्याला शनिदेव कधिही त्रास देत नाहीत अशी काहिशी ती उपपत्ती होती.

'अहो' आणि दोन्ही मूलं सिँह राशी ची आहेत आणि मी वृश्चिकची .प्रगती निश्चितच झाली पण सासुबाई गेल्या ही खुपच वाईट गोष्ट झाली.साडेसाती सुरु झाल्यापासून माझ्यावर खुपच दडपण येत आहे .हा धागा सुरु केल्याबद्दल आभार.

बाप्रे... मी वृच्शिक आहे.. आता २०१८ पर्यंत साडेसाती रहाणार.<<

=)) जामोप्या!
तुमच्या धाग्यापासून साडेसाती सुरू झालिये. तुमच्या धाग्यांतली नॉर्मल खणाखणी गायबून टिप्पिकल माबो झालाय धागा.

@अश्विनीमामी,
साडेसाती नसती तरी जे घडले, ते होऊच शकले असते. तुमचा स्वतःवर विश्वास आहे, म्हणून तुम्ही उभ्या आहात. बाकी सगळे मदतीसाठी आहे. साडेसातीवर जबाबदारी टाकून तुम्हाला बरे वाटत असेल तर छान, पण मलातरी तुम्ही स्वतः जास्त खंबीर दिसता. तेच महत्वाचे. टिकवून ठेवा.

भागवत साहेब,
>>थोडक्यात, हे जे जास्तीचे श्रेय ती व्यक्ति तिच्या नकळत स्वतःकडे घेते ते त्या व्यक्तिकडून काढून घेणे हे शनिदेवांचे काम आहे.<<

असहमत.

हे 'शनिदेव' कोण? त्यांना हे काम कुणी वाटून दिले? कशावरून? ते देताना तुम्ही, किंवा ज्यांनी तुम्हाला सांगितले, ते बाजूला ढिगार्‍यावर बसून ऐकत होते काय? जगातील इतर लोक ज्यांना शनी हा शब्दही ठाऊक नाही त्यांचे श्रेय काढून घ्यायला कोण येतो? कैच्याकै आप्लं!

व्यक्ती श्रेय 'नकळत' स्वतः कडे घेते म्हणे!
वारेवा!
नकळत कसे? कष्ट मी करीन तर श्रेय माझेच. हे मी, कळून, समजून उमजून नेहेमीच म्हणतो. शनीच्या नानाची टांग!
फक्त, त्याच प्रमाणे, चूक झाली तर मगदूरानुसार त्याची शिक्षा भोगण्याचा, जबाबदारी घेण्याचाही 'कासेत' दम हवा! तो दमही ठेवतो.

तो दम नसेल तर मग श्रेय शनीचे, अन चूकही त्याचीच. असल्या जबाबदारी चुकविणार्‍या माणसाला तुम्ही तुमच्याकडे नोकरीत ठेवाल का?
जै साडेसाती.

कसले कष्ट, कसले श्रेय अन कसला दम ? काहीपण बोलू नका. या जगात त्या परम शक्तीच्या ईच्छेशिवाय काही म्हणजे काहीच घडू शकत नाही. अहो जिथे जन्म अन मृत्यू तुमच्या आमच्या स्वाधीन नाही तिथे त्याच्या मधले आयुष्य काय असणार ? आणि हे सांगुन देखील ज्याला कळत नाही त्याचे कर्म !!! Sad

अश्विनीमामी | 25 November, 2011 - 05:56 म्हणतात.
५) आपली औकात/ पत काय आहे ते नक्की कळले.

खरेच हे कळणे हे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे माणूस खूप वास्तववादी होतो. मनोरंजने किंवा दिवास्वप्ने बघणे थांबते. माणूस वर्तमानकाळात राहायला लागतो. साडेसातीचा काळ त्यामुळेच माणसाचा शिक्षणाचा काळ असतो असे म्हटले जाते. आपल्या विचारांना ही दिशा मिळाली म्हणजे साडेसातीचा त्रास एवढा वाटत नाही. काही वेळेस तर असे वाटते की, आपल्यावर जे प्रसंग आले ते आले नसते तर आपण इतके प्रगल्भ होऊ शकलो नसतो.

तुमच्या हाती स्वतःचा जन्म नाही, पण स्वस्त्रीसंभोग करून तुम्ही तुमच्या अपत्याला जन्म द्यायचा की गर्भपात करवून संपवायचे हे ठरवू शकता. कोण परमेश्वर आहे इथे? पोरे जन्माला घालणारे आईबाप, की सोनोग्राफी करून स्त्रीभ्रूणहत्या करणारा तो नवरा/बायको/सासू??? जन्ममृत्यू नक्कीच हातात आहे. बर्‍याच अंशी. अगदी गर्भाशयाशिवायही मानवाने गर्भ तयार केला आहे. अन भरपूरांना यमसदनीही धाडले आहे. मनुष्यांनीच.

उग्ग्ग बड्बड. देवळात जा अन हरीभजन करून काळ व्यतीत करा. क्षूद्र मानवांशी बोलू नका आपण.

अश्विनीमामी | 25 November, 2011 - 05:56 म्हणतात.
माझा स्वभाव अहंकारी आजिबातच नाही. जुळवून घेण्याचा आहे. पण तरीही स्वभावात एक प्रकारचे ह्युमिलिटी व हंबलनेस आला.

अश्विनीमामी ह्युमिलिटी व हंबलनेस हीच ती कृतद्यता. ही कृतद्यता आपला अहंकार वाढू देत नाही. सर्व संतांनी असे सांगितले आहे की, अहंकार हा सर्व दोषांचा राजा आहे. सर्व दोषांचे मूळ आहे. हे लक्षात घेतले तर तुम्ही साडेसातीमधील किती महत्वाची गोष्ट सांगताय हे जाणवेल. खरच तुम्ही भाग्यवान आहात.

अश्विनीमामी | 25 November, 2011 - 05:56 म्हणतात.
परिस्थिती किती वाइट असू शकली असती व ती तशी नसण्यात आपले कर्तुत्व काय याचा विचार नीट केला. लोकांची किंमत कळली.

खरेच तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडताय. आपले कर्तृत्व किती तोकडे आहे हे लक्षात आले म्हणजे आपोआपच आपण आपले कर्तव्य तर करत राहातो पण त्याचा अभिमान राहात नाही. इतकेच नव्हे तर आपल्या कार्याला यश येऊनही परमेश्वराच्या कृपेमुळे ते मिळाले असे वाटून हात जोडावेसे वाटतात. हया अतिशय चांगल्या विचाराला तुमच्या मनात घर करू दिल्याबद्दल अभिनंदन.

तुमचा जन्म तुमच्या स्वतःच्या निर्णयाने झाला आहे का ? तुमच्या / माझ्या माता पित्यांना कल्पना होती का की त्यांच्या पोटी इब्लिस / महेश सारखी व्यक्ती जन्माला येणार आहे. उगीच काही तरी बोलू नका. कोण कुठे केव्हा जन्माला येणार आहे हे अजुनही मानवाच्या ताब्यात नाही. मृत्यु देखील नाही. अनेकांनी अनेकांना मारले असले तरी ते सुद्धा त्यांच्या नशिबामुळेच घडते. नैसर्गिक आपत्तीची पुर्वसुचना देणारी कितीही मोठी यंत्रणा निर्माण केली तरी अजुनही भुकंप, त्सुनामी सारख्या घटना आपण रोखू शकत नाही.
जागो इब्लिस प्यारे जागो, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हेच खरे. तुम्ही कितीही आकाश पाताळ एक केलेते तरी तुमच्या माझ्या कोणाच्याही हाती काहीही नाही.

सुचा | 25 November, 2011 - 11:13 लिहितात
'अहो' आणि दोन्ही मूलं सिँह राशी ची आहेत आणि मी वृश्चिकची .प्रगती निश्चितच झाली पण सासुबाई गेल्या ही खुपच वाईट गोष्ट झाली.साडेसाती सुरु झाल्यापासून माझ्यावर खुपच दडपण येत आहे .हा धागा सुरु केल्याबद्दल आभार.

तुम्ही अश्विनीमामी काय लिहित आहेत ते वाचले का? साडेसाती ही आणखी प्रगल्भ होण्याची संधी आहे असे समजा. मन चिंती ते वैरी न चिंती अशी म्हण आहे. आणि असे जेव्हा नको ते मनात येऊ लागते तेव्हा उगीचच दडपण येते.

या दडपणामुळे कदाचित आपण आणखी चुका करून त्रास वाढवून घेतो. घडणार्‍या गोष्टी घडतच असतात. मात्र त्यातून आपण काही शिकलो की नाही हे पाहाणे मह्त्वाचे. सासुबाई गेल्या हा भूतकाळ झाला. पण सासुबाईंनी तुम्हाला जे काही चांगले संस्कार दिले आहेत ते तर त्यांनी काढून घेतले नाहीत ना जाताना. ते चांगले संस्कार दृठ करणे म्हणजेच सासूबाइ घरात असणे असे होत नाही का? त्यांनी तुम्हाला जे काही चांगले दिले आहे ते जपणे म्हणजेच श्राध्द. तीच त्यांची खरी सेवा. तीच त्यांची खरी आठवण.

मस्त धागा!
मोहन कि मीरा, फचिन, अश्विनीमामी-तुमच्या पोस्टी खूपच भावल्या अणि पटल्या. टिआरपी वाढवा रे सर्वांनी.

अश्विनीमामी | 25 November, 2011 - 05:56 लिहितात.
६) शनि तुम्हाला करेक्ट मार्गावरूनच चालायला भाग पड्तो हे एकदा लक्षात आल्यावर वागणूक अगदी थरोली प्रॉपर, कायद्याला धरून , अध्यात ना मध्यात अशी झाली.

हे अगदी खरे आहे. साडेसातीत शक्यतो खोटे बोलू नये. कायदा तोडू नये असे सांगितले जाते. कायदा अथवा नियम मोडणे म्हणजे नियम अथवा कायदा सर्वांना समान फक्त मी सोडून असे म्हणणेच होय. ह्यालाच म्हणतात फुगवलेला अहंकार. साडेसातीत हा महागात पडण्याचीच शक्यता असते. मात्र जर कायदे कानून पाळले तर मात्र काहीच त्रास होत नाही. खरेच साडेसातीत आपत्ती येतात पण विचारवंतांना मात्र त्या इष्टापत्तीच वाटतात.

>>> एका मानसशास्त्रीय लेखात असे वाचले होते की, डोक्यात तिडिक गेली की, त्यावेळेस तो माणूस एकदम भरपूर मुद्दे एकापुढे एक असे मांडतो.

किंवा एका पाठोपाठ एक असे धागे काढतो

>>> शिवाय असेही वाचल्याचे आठवते की, जर त्या मुद्यांना विषेश आधार नसेल तर तो आकस्त्राळेपणा करतो, मोठ्याने बोलतो किंवा आकाश पाताळ एक करतो.

अगदी बरोबर! पटलं.

शाम भागवत साहेब,

तुमचं नांव घेतले, ती अर्धी राहीली ना मोजायची!
अर्धवटाचे नांव ते अर्धे :)) अध्यात्माच्या अर्ध्या हळकुंडात पिवळे तुम्ही!

माझ्या म्हणण्याचा अर्थ इतकाच होता, की आवरा.

तुम्हाला समझले नाही, समझवून सांगतो:

तुमचाच कर्मविपाक ग्राम्य भाषेत सांगितला. कर्म केलेत, फळ 'भोगा'
भोगणे दोन अर्थी आहे.
१. दु:ख, शिक्षा इ. 'भोगावी' लागते,
२. संपत्ती, राज्य, इ. 'भोगायचे' असते.
यालाच म्हटले. मी कमावले, तर मीच भोगणार. दोन्ही अर्थांनी. पण तुमच्या 'बाबा वाक्यं प्रमाणं' डोक्यात हा उजेड पडणार नाही.

तुम्ही आपले सात, साडे सात मोजत रहा. तेवढेच लागले गळाला ४-२ श्रद्धाळू मासे, तर शिजवून खाता येतील तुम्हाला, किंवा कुण्या कुडमुड्या ज्योतिषाला.

मला प्रतिसाद लिहून माझ्या "बरळण्या"विरुद्ध बोला, असे तुम्हाला 'तो' 'सर्वशक्तीमान' परमेश्वर सांगतो आहे का?
तसे असेल तर अती उत्तम. माझे ना तुमच्याशी भांडण, ना आणिक कुणाशी. तेंव्हा तुमचे साडेसातीचे हिशेब एन्ज्वाय करा. कसे?

अहह!
जामोप्याची साडेसाती सुटली!!
साक्षात मास्तुरेंचा अनुग्रह धाग्यावर!!!
तेच म्हटलं, इथे अजून 'वास' का नाही आ(झा)ला!!

आता शून्य मिन्टात झील तोडली जाणार!
रिक्षा फिरलेली दिसते.

भरून पावलो Lol

>>> तेच म्हटलं, इथे अजून 'वास' का नाही आ(झा)ला!!

ह्या एचएमव्हींना "वास" घ्यायची फार आवड दिसतेय. आमची वाट कशाला बघत होता? आपल्या मास्टरांच्या वासाने नाही समाधान झालेलं दिसत! की इतरांच्याकडे पण नाक लावून बसता?

>>> भरून पावलो

वा! अभिनंदन! छाती भरभरून वास घेतलेला दिसतोय!

महेश,
>>जागो इब्लिस प्यारे जागो, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हेच खरे. तुम्ही कितीही आकाश पाताळ एक >>केलेते तरी तुमच्या माझ्या कोणाच्याही हाती काहीही नाही.

अगदी अगदी!
पुढल्या वेळी आजारी पडलात की हॉस्पिटलात जाऊ नका. भजन पूजन करा. जमल्यास नवस बोलून पहा. शेवटी तुमच्या हातात काही नाही, अन त्या डॉक्टरच्याही हाती काही नाही. जी अडचण येईल, त्यानुसार आपण शनीची वेगवेगळी पूजा बांधत जावा!
बेष्ट लक तुम्हाला Wink

>>अगदी नाकपुड्या भरलेल्या दिसताहेत!

अगदी! वासाने भरून गेल्यात.. Sad
डोळे बंद करता येतात.. नाक नाही. निसर्गाची करणी Wink
पण तेही बरेच आहे. निसर्ग हुस्शार आहे तेच खरे. अगदी झोपेतही काही जळते या वासाने जाग येते. शेवटी सेल्फ प्रिझर्वेशन महत्वाचे. आपण येथे वास दिलात -आय मीन केलात- याबद्दल धन्यवाद @ मास्तुरे!

ही माझी शेवटची पोस्ट.

२३ तारखेला म्हणजे बुधवारी जालावर काही शोध घेत होतो तेव्हा केदार याची वेदकालीन संस्कृती लेखमालेची लिंक आली. काय आहे ते पाहावे म्हणून ती उघडली. नंतरचे चोवीस तास ते पाच भाग व त्यावरील चर्चा वाचण्यातच गेले. खूप छान लेखमाला. खूप संदर्भ एकाच जागी मिळत असल्यामुळे फेव्हरीटमधे भर घातली.

लेखमाला वाचून झाल्यावर हितगुज मधून कोणते ग्रुप आहेत ते सहज बघत होतो. धार्मिक ग्रुप पाहिल्यावर उत्सुकता चाळवली. पहिलाच विषय साडेसाती. माझी रास सिंह. नुकतीच माझी साडेसाती संपली. या साडेसातीत बरेच काही शिकायला मिळाले. विशेष करून नकारात्मक विचार वाढण्याची शक्यता याकाळात जास्त असते व या नकारात्मक विचारांमुळे जास्त त्रास होतो हे ठेच लागून अनुभव घेऊन शिकलो. त्याच बरोबर सकारात्मक विचारांमुळे आपण आपल्यावर ओढवलेल्या परिस्थितीतूनही सहीसलामत सुटु शकतो हेही शिकायला मिळाले. त्यामुळे या अनुभवाच्या आधारे काही लिहावे असे वाटू लागले.

पण लिहिण्यासाठी मेंबर असणे आवश्यक म्हणून मेंबर झालो.

आपले अंतर्मन म्हणजे इश्वर आहे. इश्वर म्हणजे परमेश्वराचा अंश. त्यामुळे सर्व देवदेवता, ग्रह, तारे, या इश्वरात समाविष्ट असतात. त्याप्रमाणे शनिदेवही आपल्याच अंतर्मनात असतात. आणि ते तेथूनच कार्य करत असतात. असो.

फुगलेला अहंकार कमी करणे हे शनिमहाराजांचे काम. शनिच्या देवळात नेहमी हनुमानाची मूर्ती असते. जो हनुमानाचा भक्त त्याला शनि महाराज कधिही त्रास देत नाहीत. हा एक वर खुद्द शनिमहाराजांनी हनुमानाला दिला आहे. ती गोष्ट सगळ्यांना माहित असेल म्हणून येथे देत नाही आहे.

त्यामागचा गूठार्थ फक्त लिहितो.

महाबली हनुमान हा अजिंक्य असा वीर आहे. त्याच्या कडे सर्व प्रकारच्या शक्ति आहेत. पण त्याला एक शाप आहे की त्या शक्तिंची आठवण त्याला असणार नाही. आपल्या मोठेपणाची आठवण नसल्यामुळेच तो विनम्र आहे. अहंकाररहित आहे. कायम हात जोडून रामापुढे बसून आहे.

शनि व हनुमान यांच्यात झालेल्या द्वंधात मारुती जिंकतो, कारण शनिचे काम आहे फुगलेला अहंकार काढून टाकणे. पण ज्याचा अहंकार शिल्लकच राहिलेला नाही त्यावर शनिचे काय चालणार? शनि हरणार आणि हनुमान जिंकणार ही जणू काळ्या दगडावरची रेषच. हेच सांगण्यासाठी, लक्षात राहाण्यासाठी किंवा बिंबविण्यासाठी ही गोष्ट रचली गेली आहे.

आणखी एक म्हणजे हनुमानाचा जो भक्त त्याला शनिमहाराज त्रास देत नाहीत याचा अर्थच हा, की वीर हनुमानाप्रमाणे जो अहंकाररहित होण्याचा मार्ग चोखाळत आहे त्याला शनि महाराज कधिही त्रास देत नाहीत.

थोडक्यात सर्व संताचे जे सांगणे आहे की, माणसाचा खोटा अहंकार हेच सर्व दु:खाचे कारण आहे. हा खोटा अहंकार नाहिसा करण्यासाठी शनिदेव या साडेसातीच्या काळात मदत करत असतात. असा भाव ठेवून जो कुणी साडेसातीला सामोरा जाईल त्याला साडेसातीचा नक्की फायदा होईल व भट्टीतून तावून सुलाखून निघालेले सोने जसे आणखी दैदिप्यमान भासते तसे त्याचे जीवन आणखी उजळेल.

गेले बारा तास मी प्रतिसाद लिहितोय. आणि माझा जन्मही या साईटवर बारा तासापूर्वी झालाय. प्रतिसाद तपासतोय. चुका सापडल्यावर त्या दुरुस्त करतोय. तर कधी पुनः पुन्हा संपादन करणे चाललेय. रात्रीचे तीन वाजलेत. पण माझ्या मनातला प्रतिसाद पूर्ण झालाय. आजच मला हा विषय माझ्यापुरता संपवायचा होता. पुन्हा कधी इथे येईन हे सांगता येत नाही. कारण मी ब्लॉगर नाही.

मी मांडलेल्या विचारांमुळे कुणाचा फायदा झाला असेल तर त्याचे श्रेय मला न देता त्या शनिदेवांना द्या. पण जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील किंवा कोणाला त्रास झाला असेल तर त्याबाबत क्षमा मागतो.

सर्वांना नमस्कार, सर्वांना शुभेच्छा.

बादवे, @ महेश, शाम भागवत, मास्तुरे,
मुद्यांचा प्रतिवाद करण्याचा प्रयत्न करा कधी तरी.
फाटे फोडून ४ प्रतिसाद टाईपले की आपण जिंकलो, असे कधीच होत नाही. धागे वाचायला येणारे सगळेच लहानपणापासून बौद्धिके ऐकलेले नसतात. Wink

(संपादन) बोअर झालं आता. माझी झोपेची वेळ झाली. नंतर भेटू Lol

>>> बादवे, @ महेश, शाम भागवत, मास्तुरे, मुद्यांचा प्रतिवाद करण्याचा प्रयत्न करा कधी तरी.

हा नियम स्वतःला लावा आधी आणि आपल्या मास्टरांना पण लावा. आणि मग इतरांना सांगा.

>>> तुम्हाला समझले नाही, समझवून सांगतो:

कृपया असली भाषा वापरू नये ही विनंती!

>>> अहो मला जेमतेम ८ तास झालेत मेंबर होऊन. मीही मजेत आहे. जे वाचले ते इथे टाकले. इतकेच. पण तुम्ही बरळता हे माहित नव्हते.

बघा नवीन सभासदांना सुद्धा लक्षात आलं हे!

>>> माझी झोपेची वेळ झाली. नंतर भेटू
>>> अगदी झोपेतही काही जळते या वासाने जाग येते.

शांत झोपा. नाहीतर इथे मायबोलीवर कोणी "हिंदू" किंवा "सावरकर" असा नुसता शब्द जरी टाईप केला तरी झोपेत तुम्हाला वास येईल आणि मग तुमचे बरळणे सुरू होईल.

पुढल्या वेळी आजारी पडलात की हॉस्पिटलात जाऊ नका. भजन पूजन करा. जमल्यास नवस बोलून पहा. शेवटी तुमच्या हातात काही नाही, अन त्या डॉक्टरच्याही हाती काही नाही

पण प्राक्तनातच जर हॉस्पिटलात जाणे,भजन करणे,नवस करणे असेल तर?

@ शाम भागवत, उर्फ ८ तास मेंबर.
तुमच्या प्रत्येक पोस्टीची स्क्रीन कॅप्चर्स आहेत मजकडे. त्या प्रत्येक प्रश्नचिन्हाच्याजागी, अन पहिल्या पूर्ण पोस्टीची अन एडिट केलेल्या प्रत्येक पोस्टचीही.
तेच महेश यांचेसाठीही.
अन मास्तुरे,
सुधरा!
मी गेलो म्हटलं की लगेच पोस्टी एडिट करायला सुरुवात Happy
कधी सुधरणार तुम्ही? डुआय किति काढणार? पब्लिक मूर्ख वाट्टं का तुम्हाला?

Pages