दोडक्याची सोप्पी भाजी.

Submitted by आरती on 21 November, 2011 - 10:30
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दोडकी - २ (छोटी) / १ (मोठे)
हिरव्या मिरच्या - ३
दाण्याचा कुट - २ चमचे (जाडसर)
तिळ - १ चमचा
तेल - १ डाव
साखर,मिठ चविप्रमाणे
फोडणीचे साहित्य - हळद, हिंग, मोहरी, जिरे, कडिपत्ता.

क्रमवार पाककृती: 

दोडक्याच्या शिरा काढुन, स्वच्छ धुवुन घ्यावे, दोडके किसुन घ्यावे, नेहमीपेक्षा थोडी जाड किसणी मिळाली तर उत्तम. हळद, हिंग, मोहरी, जिरे, कडिपत्ता सगळे घालुन फोडणी करुन घ्यावी. किसलेले दोडके घालावे. व्यवस्थीत हलवुन, फोडणी सगळ्या दोडक्याला लागेल असे बघावे. थोडी वाफ आली की दाण्याचा कुट, तिळ, मिठ, साखर घालुन हलवावे. एक वाफ आली की गॅस बंद करावा. दोडक्याचा रस राहिला असेल तर, अटेपर्यंत मंद आचेवर ठेवावे.

मस्त पिस्ता कलरची भाजी तयार होते.
DSC03494.JPG

वाढणी/प्रमाण: 
२ जणांना पुरते.
अधिक टिपा: 

१. भाजी झाकण घालुन शिजवु नये.
२. दाण्याचा कुट जाडसरच असावा.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडते, आवडते Happy अगं, आजच झुकिनी किसून कोरोडा केला तेव्हा ह्या भाजीची आठवण झाली होती. ज्यांना दोडक्याचं टेक्श्चर आवडत नाही त्यांना ह्या पद्धतीने नक्की आवडेल असं वाटलं.

वरदा,
अगदीच सोप्पी भाजी आहे म्हणुन नाही टाकला फोटो, टाकते Happy

दोडक्याचं टेक्श्चर आवडत नाही त्यांना ह्या पद्धतीने नक्की आवडेल असं वाटलं. >> अगदी बरोबर. दोडक्याची भाजी म्हंटल्यावर नवर्‍याने हातत सॉसची बाटली घेतली होती. पण एक घास खाल्ल्यावर आवडली Happy

मी अशीच करते दोडक्याची भाजी. फक्त तीळ नाही घालत, दाण्याचं कूट घालतेच. तसंच दोडका किसून न घेता किसणीवर सालं काढून फोडी करते. शिवाय किसलेल्या सालांची परतून चटणी करते. किसलेली सालं जरा लांब लांब असतात, म्हणून त्याचे थोडे बारीक तुकडे करुन घ्यायचे.. वरील प्रमाणे फोड्णी करुन त्यात कापलेला लसूण, तीळ आणि मिरचीचे तुकडे घालून मग दोडक्याची सालं घालून, मद गॅसवर कुरकुरीत होइपर्यंत परतायचं. अशीच दूधी भोपळ्याच्या सालांची चट्णी पण छान होते.

मस्त आहे भाजी... दोडक्याला पाणी भरपूर सुटतं ना? भाजी पचपचीत नाही ना होत किसल्यामुळे?
आता दोडका आणला की अशी भाजी करून बघणार. Happy

दिनेश, सालं नाही काढायची. फक्त शिरा काढायच्या. त्या थोड्या वर उचललेल्या असतात त्यामुळे, सालकाढणीने काढतान बरोबर तेवढ्याच निघुन येतात आणि साल तसेच रहाते. Happy

दोडक्याला पाणी भरपूर सुटतं ना? भाजी पचपचीत नाही ना होत किसल्यामुळे? >>
मंजू,
पाणी सुटतं पण अगदी थोडं. काकडी वगैरे सारख नाही. भाजी पचपचीत नाही होत. पण कोरडी पण नाही होत.
करुनच बघ एकदा Happy

मस्त आहे रेसिपी. छान होते भाजी अगदी. शिवाय एकदम सोप्पी आहे.
आज केली होती. आवडली सगळ्यांना.
धन्यवाद आरती.