संत्रा बर्फी

Submitted by मंजूडी on 19 November, 2011 - 01:15
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. साधारण चार ते पाच मोठ्या संत्र्यांची साले
२. अडीच वाट्या साखर
३. चार टेबलस्पून मिल्क पावडर
४. एक वाटी काजू किंवा बदामाची पावडर
५. एक टिस्पून लिंबाचा रस
६. चमचाभर तूप

क्रमवार पाककृती: 

१. संत्र्यांची साले सगळे दोरे काढून कूकरमध्ये उकडून घ्यावीत.

Image0109.jpg

कडूपणा उतरेल अशी भिती वाटत असेल तर सालांचा जाडसर पांढरेपणा धारदार सुरीने खरवडून घ्या. सालं उकडण्यासाठी कूकरच्या दोन शिट्या पुरतात. साले थंड झाल्यावर त्याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यावी. वर दिलेल्या प्रमाणासाठी ही पेस्ट एक वाटी व्हायला हवी. पेस्टची किंचीत चव घेऊन बघा. कडसर चव असेल तर एकाऐवजी अर्धी किंवा पाऊण वाटी पेस्ट घ्या.
२. नॉनस्टीक पॅनमध्ये किंवा कढईत चमचाभर तूप गरम करून एक वाटी संत्र्याच्या सालींची पेस्ट आणि अडीच वाट्या साखर त्यात घालावी.
३. साखर विरघळून मिश्रण उकळले की त्यात लिंबूरस घालून नीट मिसळून घ्यावा.
४. नंतर काजू किंवा बदाम पावडर आणि मिल्क पावडर घालून मिश्रण एकजीव करावे.
५. गॅस मंद ठेवून मिश्रण परतावे. त्याचा गोळा फिरू लागला की गॅसवरून खाली काढून ताटात थापावा.
६. आवडीप्रमाणे बदामाचे काप किंवा वर्ख लावून सजावट करावी. हव्या त्या आकारात बर्फ्या कापाव्यात.

ही तयार बर्फी (वडी म्हणा हवंतर Wink )

orange burfi 1.jpg

वड्यांच्या फिनिंशिंगसाठी माफी द्या.
आणि जुन्यापान्या मोबाईलच्या तिसर्‍या जगातील कॅमेर्‍याने फोटो काढलेला आहे.

वाढणी/प्रमाण: 
बाजारात काजू कतली मिळते त्या आकाराच्या साधारण पंचवीस बर्फ्या होतात.
अधिक टिपा: 

१. गेल्या वर्षी मानुषीने संत्र्याचे सोप्पे सरबत लिहिले होते. त्यातली संत्र्याचे साल उकडण्याची युक्ती भारीच आवडली होती. प्रत्यक्षात ते साल उकडून त्याची पेस्ट केल्यावर त्याचा जो स्वाद आला होता तो भयंकरच आवडला होता. तीच पेस्ट इतर गोड पदार्थात वापरता येईल असं वाटून जरा एक दोन प्रयोग केले. त्यातला केक पारच फसला. ही संत्रा बर्फी मात्र पहिल्याच प्रयत्नात बर्‍यापैकी जमली. नंतर करून करून प्रमाण योग्य जमले.
२. ह्यात संत्र्याच्या सालीचा स्वादच इतका मस्त असतो की इतर केशर, वेलची इत्यादी स्वादांची गरज पडत नाही.
३. आता संत्र्यांचा मोसम चालू होतोय. नक्की करून पहा.

माहितीचा स्रोत: 
काजू कतलीच्या बर्‍याच पुस्तकांतून आणि नेटवर वाचलेल्या पाककृती आणि स्वप्रयोग.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयला ईतके दिवस प्रेमाने (आचरटपणे) खात होते त्यात साली असतात? किंवा कोहाळे Sad

आता घरी करुन पाहतेच. Happy

मानुषी ह्यांच्या रेसिपी मध्ये संत्र्याची साल उकडताना सायट्रिक असिड घातलेले तसे येथे पण घालायचे आहे का?मी काल ह्या पद्धतीने हि बर्फी केली पण बरीच कडू झाली Sad

Sahish, यात सायट्रिक अ‍ॅसिड नाही घालायचे. संत्र्याच्या सालीचे सगळे पांढरे दोरे काढून टाकले म्हणजे कडू होत नाही.

दोरे जे निघू शकत होते ते मी सगळे काढलेले पण जे सालीचाच भाग असतात ते तर नाही काढले .आणखी एक म्हणजे मी थोडेसे पाणी टाकून मग कुकर मध्ये उकडल्या ..आणि मग पाणी मात्र काढून टाकले ....काही तरी चुकले हे नक्की ...-:).

मंजु.. मस्त रेसिपि!!
पण ह्यात ती केशरी रंगाचीच संत्री साल घ्यावी लागेल ना! करुन पहावी लागेल Happy

सेम पिंच पूनम, मी पण खोबर घालुन करायचा विचार केलाय. कारण काजु, बदाम मधे काहीही फ्लेवर घातला तर आमच्याकडे खाणार नाहीत.

मी करून बघितली. पण खूपच कडू झाली. Sad संत्र्याच्या सालीचे सगळे पांढरे दोरे काढून टाकले होते. सालीचा पांढरा भाग पण सुरीने खरवडून काढला. काय चुकले असावे? Sad

Pages