कोथिंबीर भात

Submitted by saakshi on 7 November, 2011 - 06:46
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तांदूळ - २ वाट्या
कोथिंबीर - आवडेल तेव्हढी बारीक चिरून (मी एक वाटी घेतली होती)
कांदा - १ मध्यम आकाराचा बारीक चिरून
हिरव्या मिरच्या - ४ चिरून (आवडीप्रमाणे कमी-जास्त करू शकता)

क्रमवार पाककृती: 

१. तांदूळ स्वच्छ धुवून निथळत ठेवावा.
२. कांदा, मिरची, कोथिंबीर mixer मधून बारीक पेस्ट करून घ्यावी.
३. कढईत फोडणी करून घेऊन वरील पेस्ट चांगली परतून घ्यावी.
४. तांदूळ घालून पुन्हा परतावे.
५. पाणी घालून एक उकळी आल्यावर मीठ घालावे व शिजू द्यावे.
६. लसणाच्या चटणीबरोबर/दह्याबरोबर/तुपाबरोबर गरमागरम गट्टम करावे Happy

वाढणी/प्रमाण: 
२ जणांसाठी भरपूर होतो...
अधिक टिपा: 

भात थोडा मऊ शिजू द्यावा, म्हणजे कोथिंबीरीचा मस्त वास त्यात उतरतो.

माहितीचा स्रोत: 
स्वतः केलेले प्रयोग...
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

मी हल्ली [इथला वाचुन ] करते बरेचदा. भन्नाट लागतो. [बदाम नाही हो घालत]>>>>धन्यवाद म. Happy

धन्यवाद जामोप्या, kavya Happy