इंग्लंडचा भारत दौरा २०११

Submitted by केदार on 14 October, 2011 - 08:32

आज पहिला सामना आणि तरी क्रिकेट बाफ वर प्रतिक्रिया नाहीत. भारताचा वाईट वॉश झाल्यामुळे असेल. पण घरके मैदानपे हम शेर है असे बरेच लोकं म्हणतात. चला तर मग ... नेहमीसारखेच आपल्या प्रतिक्रिया येऊद्यात.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

४६ ओव्हर्स मध्ये भारत २६१. ३ र्‍या पावर प्ले नंतर भारताला धावा काढता येऊ लागल्या आहेत. अन्यथा २२० होतील की नाही ह्याची शंका होती. आता २८० च्या आतबाहेर असू. रैना आणि धोनी चांगले खेळले.

तुका म्हणे उभे रहा
जे जे होईल ते ते पहा!
केदारा, जितक्या इझिली आपण धावा करतोय त्यावरून त्यांना पण सहजपणे ३०० च्या वर काढता येतील!

आणि , एक खांबी तंबू न होता सर्वानी हातभार लावला, हें विशेष ! जे धावचित झाले तेही दोषी न ठरता !!! ' स्लो डिलीव्हरीं'चा इंग्लीश गोलंदाजांकडून छान उपयोग !!! सामना रंगणार असा अंदाज , अर्थात माझा !

३०० झाले ! भारीये की

विनयकुमारचा अजित आगरकर झालाय.. काही ना करो पण तरी संघात..
देसाई.. हे पहा http://www.espncricinfo.com/ci/content/player/26184.html
वनडे त २८८ विकेट्स.. टेस्टमध्ये ५८ विकेट्स.. दोन्हीत मिळून १ सेंच्युरी आणि ३ हाफ सेंच्युर्‍या... शिवाय वनडे त फास्टेस्ट ५० विकेट्स.. माझ्या माहितीप्रमाणे तो रेकॉर्ड अजूनही आहे..
तो अगदी जगातला ग्रेटेस्ट बॉलर वगैरे नव्हता हे मान्य.. त्याचा फॉर्म अधे मधे गेला होता हे ही मान्य... पण त्याचे स्टॅट्स बघता "काही ना करो" म्हणणं जरा जास्त आहे.. मागे कुठल्यातरी बाफवर चर्चा झाली होती ह्याबद्दल.. असो !

१२६ला ६. इंग्लंड नामोहरम ! << सामना रंगणार असा अंदाज , अर्थात माझा >> माझा अंदाज फालतू ठरणार - अर्थात, नेहमीप्रमाणे !!!

अहो अंदाजच ते, असे अधून मधून चुकणारच. पुष्कळसे अंदाज तर बरोबर असतातच ना?
काही हरकत नाही. बीसीसीआय चा संघ तर जिंकेल ना. सध्या तरी त्यात बरेच जण इंड्यनच आहेत. काही वर्षांनी लोक म्हणतील, बोलून चालून हा संघ भारताचे प्रतिनिधित्व करतच नाही, मग अमेरिकेत जसे स्वस्त म्हणून इतर देशातले लोक घेतात बेसबॉलमधे तसे बीसीसी आयने पण घ्यावे. आय पी एल यशस्वी होते ना, त्यावरून कळतेच.

चुकलं: अजित आगरकर खरं तर विनयकुमार पेक्षा बराच चांगला बॉलर होता.
विनयकुमारला भारताबाहेर विकेट मिळण्याची अपेक्षा ठेवणं अशक्य....

सात झाल्या ... आता नाही टिकत .. Happy

अजित आगरकर खरं तर विनयकुमार पेक्षा बराच चांगला बॉलर होता.>> तसे नाहि देसाई. तो बर्‍याच Indian बॉलरस मधे चांगला होता, consistent पेस होता, skiddy deliveries होत्या, चांगला yorker होता, fielding चांगली होती. मुख्य problem हा होता कि, सहा तले पाच चांगले चेंडू टाकल्यावर एक अतिशय खराब टाकून केलेल्या कर्मांवर पाणी ओतत असे. शिवाय तो अति अपेक्षांचा बळी होता. श्रिकांतने all rounder म्हणून त्याला push करणे अतिशय चूकीचे होते. तशा त्याला down under series मधे ऑसीजनी target केले नि आपल्या महामूर्ख मिडीयाने त्यांचा पाठपुरावा केला. गेल्या दहा -बारा वर्षांमधे आपण खेळवलेले fast ballers बघता एव्हढा माज आपल्याला परवडण्यासारखा होता का ?

विनयकुमारबद्दल मात्र अनुमोदन. एक कर्नाटक नि तामीळनाडू (किंवा chennaI super king) वगळता बाकीच्या राज्यांमधे fast ballers नाहितच का ?

न्युज चॅनल बघा. गुणगान काय चालिसा सुरू झाली सर्वत्र.

पण काय का असेना, जिंकलू हे जास्त म्हत्त्वाचे. Happy

दूसरा एकदिवसीय सामना.
इंग्लंड २३९-९. भारताची सुरेख गोलंदाजी व क्षेत्ररक्षण. विनयकुमारला २८ धावात ४ बळी ! इथं कुणालाच रस कसा नाही दिसत या सामन्यात.

>>> इथं कुणालाच रस कसा नाही दिसत या सामन्यात.

माझ्यापुरतं बोलायचं झालं तर,

(१) अति क्रिकेटचे अजीर्ण झाले आहे
(२) सचिन व सेहवाग हे माझे दोन्ही हीरो नाहीत. विशेषत: सचिनशिवाय भारतीय संघ म्हणजे गांधी घराण्याशिवाय काँग्रेस किंवा बाळ ठाकर्‍यांशिवाय शिवसेना किंवा पवारांशिवाय राकाँ किंवा मायावतीशिवाय बसप . . . किंवा गणपतीशिवाय मखर . . .

त्यामुळे मजा येत नाही.

आणि (३) सध्या मी रोमात आहे.

ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यापासून क्रिकेटमध्ये पुन्हा रस निर्माण व्हावा अशी इच्छा व अपेक्षा आहे. Happy

काल विनयकुमारल्या शिव्या घातल्या तर आज त्याला ४ विकेट. आज कुणाला शिव्या घालू? Proud

(याचा अर्थ 'तो एकदम चांगला गोलंदाज आहे' असा मी तरी घेत नाही)...

अपनी अपनी गलीमें कुत्ता भी शेर होता है!
आपल्या फास्ट बोलरनी काढलेल्या विकेटी पहाता मला वाटतंय की इंग्लंडला चान्स आहे आज!

आपली गोलंदाजी टुकार ह्या कॅटॅगिरीत होती आज. पण आपली फलंदाजी चांगली आहे. देखेंगे.गली भी अपनी औरे कुत्ते भी. Happy

अपनी अपनी गलीमें कुत्ता भी शेर होता है!>> हमने आपका पता लिया हय. हमारा आदमी उधरीच हय. वो आपकी जरूर शिकार करेगा. Happy

पराग Lol

मास्तुरे, ऑस्ट्रेलियापर्यंत थांबायची गरज नाही. नोव्हे. मधे विंडीज बरोबर कसोटी सामने आहेत. सचिन, सेहवाग, झहीर बहुधा तोपर्यंत येतील. दिल्ली, कोलकाता आणि मुंबईत टेस्ट्स आहेत.

बाहेर कुत्ता वगैरे ठीक आहे पण हे शेर इंग्लंड मधे डॉन्की झालेत म्हंटल्यामुळे तरी राग येउन हे पाचही सामने जिंकावेत ही अपेक्षा आहे. अर्थात डॉन्की चा डाग काढायचा म्हणजे फिल्डिंग चांगली करावी लागेल. त्यापेक्षा सामने जिंकणे कमी त्रासाचे Happy

रहाणे चा कपिल स्टाईलने पोपट केला इंग्लंड ने. १९८५ मधे दिल्लीलाच इंग्लंडविरूद्धच महत्त्वाच्या वेळेस कपिल आधी सिक्स मारून पुढच्याच बॉल ला तेथेच कॅच देउन आउट झाला होता. आणि भारत मॅच हरला होता. पाजीसाहेब एक मॅच बाहेर होते त्यानंतर.

Pages