इंग्लंडचा भारत दौरा २०११

Submitted by केदार on 14 October, 2011 - 08:32

आज पहिला सामना आणि तरी क्रिकेट बाफ वर प्रतिक्रिया नाहीत. भारताचा वाईट वॉश झाल्यामुळे असेल. पण घरके मैदानपे हम शेर है असे बरेच लोकं म्हणतात. चला तर मग ... नेहमीसारखेच आपल्या प्रतिक्रिया येऊद्यात.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाउ Happy

चला गळती सुरु! कमॉन इंग्लंड! >>> अरे थांब इतक्या लवकर वापस का बोलवत आहेस त्यांना. Happy येतील येतील. आज बॅटींग मस्त करत आहेत.

<< भाऊ तुमका गाळी मालवणीत >> आवशीचो धपाटो म्हंजे शाबासकीच ! Wink
१५० चेंडूत १७० ची भागीदारी ! कोहली, गंभीरचं अभिनंदन !!

कोहलीचे १००! ऑफचे ड्राईव्ह अफलातून होते आज. आणि त्याच जागेवर ३-४ चौके गेले. मजा आगया. गंभीरचेही व्हायला हवे होते.

जिंकलो !! आज रडवलं त्यांना. दोन्ही मॅच फार मोठ्या फरकाने जिंकल्या. आजच्या दोघांच्या खेळीवरून मला सचिन-द्रविडची आणि दादा-द्रविड मधील भागिदारी आठवली.

२-० .... Happy

आपली गोलंदाजी टुकार ह्या कॅटॅगिरीत होती आज.>> म्हणजे त्यांची फलंदाजी किती टुकार होती ह्याचा विचार कर Lol

जिंकलो आज पुन्हा. Happy जल्ला काय मांडवली झाली की काय याची??

तुझ्या घरी आलो की तू जिंकायचं., माझ्या घरी आलं की मी.

म्हणजे, इंग्लंड फक्त 'अपने गलीमें शेर' होते म्हणायचं का आतां !!! >> अगदी तसेच नाहि, पण they were definitely helped by tour in later part of summer. ODIs were closed call anyways back then.

<< जल्ला काय मांडवली झाली की काय याची?? >> प्रचंड "भांडवली' झालेल्या खेळात असली भावनिक ' माडवली' होण्याची शक्यता कमीच ! Wink
<< अगदी तसेच नाहि >> तरीही, अगदी तसे नाहीच, असेही नाही !! Wink

<< आजच्या सामन्यात रडवणार भारताला नक्की! >> नक्की ? भारताच्या फलंदाजीवरून वाटत नाही तसं. २१७ - ३. ३८ षटकांत ! पण आत्ता रैना गेला ! सामना अटीतटीचा होणारसं दिसतंय .

म्हणजे, इंग्लंड फक्त 'अपने गलीमें शेर' होते म्हणायचं का आतां !!!>>>>
इंग्लंड त्यांच्या गल्लीत गब्बरसिंग आहे तर आम्ही बि आमच्या गल्लीत कवट्यामहाकाळ आहोत Biggrin
नवीन शोध - आजकाल सामना फक्त यजमान देशानेच जिंकावा असा काहीतरी नियम होतो आहे. Wink

नवीन शोध - आजकाल सामना फक्त यजमान देशानेच जिंकावा असा काहीतरी नियम होतो आहे. ->>> ह्या नियमाला फारच मोठा अपवाद आहे.... ऑस्ट्रेलिया द.आफ्रिकेत आणि न्यूझीलंड झिम्बाब्वेत जिंकल नसते मग...

इंग्लंडने काल ढीसाळ क्षेत्ररक्षण केलं, धोनीने आपण "कूल" संज्ञेला पात्र आहोत हे दाखवलं, यावर इंग्लीश पेपरात कांही तारे तोडण्यात आलेत का ?

धोनीने आपण "कूल" संज्ञेला पात्र आहोत हे दाखवलं >> त्याचा chit chat बद्दलचा comment कसला मस्त tongue in-cheek आहे Lol

इंग्लंडने काल ढीसाळ क्षेत्ररक्षण केलं >> नासीर हुसेन कुठल्या इंग्लिश डेलीसाठी लिहितो ते शोधायला हवे Lol

भारत आजही तेजीत. इंग्लंड १६२-६. सुंदर क्षेत्ररक्षण. जडेजा आपली उपयुक्तता सिद्ध करतोय - चांगली गोलंदाजी व स्वतःच्या गोलंदाजीवर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण.

Pages