राधा गौळण

Submitted by पाषाणभेद on 22 September, 2011 - 20:39

राधा गौळण

आळवणी करते कृष्णाची; राधा गौळण मी मथूरेची ||धृ||

दुध दही करण्यासाठी; बाजारी मथुरेच्या नेण्यासाठी
पहाटेच उठूनी धारा काढीते गायींची ||१||

गोपींकांना सवेत घेवूनी; यमूना तिरावर रास खेळूनी
वाट पाहते नंदलालच्या मुरलीची ||२||

मायेच्या पाशात न शिरण्या; मोहांपासूनी विलोभी होण्या
आस लागली तुझ्या न माझ्या मिलनाची ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२३/०९/२०११

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

पाभे या वेळेस बात कुछ जमी नही. कदाचित आधी तुमच्या दादा ष्टाईल कविता वाचल्या आहेत म्हणुन.
शिर्षक वाचुन एका जुन्या गाण्याची आठवण झाली.
"राधा गौळण करीते मंथन, अविरत हरीचे मनात चिंतन"
पु.ले.शु.